1 उत्तर
1 answers

पाय खूप दुखतात उपाय सांगा?

4
सध्या पाय दुखण्याची तक्रार सर्व वयोगटांमध्ये सर्रास होताना दिसते. काहीवेळा खूप धावपळ झाली म्हणून तर काहीवेळा बराच काळ उभे राहील्याने, चालल्याने पाय दुखतात. अनेकांचे काम दिवसभर खुर्चीत बसून असते. यामध्ये पाय लटकत राहील्यानेही पायात वेदना होऊ शकतात. तर काही जणांचे वजन जास्त असल्याने गुडघे आणि टाचा दुखतात. अशा या पायदुखीवर घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास या समस्येपासून सुटका होऊ शकते. पाहूयात काय आहेत हे उपाय…

१. कामावरुन घरी आल्यावर खुर्चीवर एक पाय ठेवावा. दुसरा पाय जमिनीवर सरळ ठेवावा. यानंतर कमरेतून खाली वाकत पायाच्या अंगठ्याला हात टेकवण्याचा प्रयत्न करावा. साधारण ५ ते १० सेकंदांपर्यंत हे करत राहावे.

२. काही वेळ काम केल्यानंतर आपण बसलेल्या जागीच पाय सरळ करुन स्ट्रेच करावेत यामुळे थकवा दूर होतो आणि काही वेळाकरता आराम मिळतो.

३. पायांना नियमित मालीश केल्यानेही पायांचा थकवा कमी होतो. मालिश करताना तीळाच्या किंवा खोबरेल तेलाचा वापर केल्यास जास्त उपयुक्त ठरते. मालिश केल्याने रक्ताभिसरण चांगले होते आणि स्नायूंना आराम मिळतो.

४. पायांना सूज आली असल्यास कोमट पाण्यात मीठ टाकून त्यात दहा मिनिटांसाठी पाय बुडवून ठेवावेत. यामुळे पायांची सूज आणि थकवा दोन्ही कमी होते.

५. पाय दुखू नयेत यासाठी चांगल्या चपला किंवा बूट वापरावेत. हलक्या क्वालिटीचे बूट वापरल्यास पाय दुखतात. चप्पल कडक तसेच उंच असणार नाही याची काळजी घ्यावी.

६. लठ्ठपणा हेही पाय दुखण्याचे आणखी एक कारण असते. त्यामुळे ज्यांचे पाय दिर्घकाळ दुखतात त्यांनी वजन कमी करण्यावर भर द्यावा. लठ्ठ व्यक्तींचे वजन त्यांच्या गुडघ्यांवर येते, त्यामुळे त्यांचे गुडघेही दुखतात. अशांनी वजन नियंत्रणात राहील याची काळजी घ्यावी.

उत्तर लिहिले · 26/2/2019
कर्म · 55350

Related Questions

पयावरणीय परीणाम आणि इलेक्ट्रॉनिकसवरील आरोग्यावर होणार परीणाम कमी करणे आहे?
महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री?
जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो?
आरोग्याच्या दृष्टीने परिसर स्वच्छता बाबत थोडक्यात माहिती लिहा?
आरोग्य हे एक देणगी?
💉जागतिक क्षयरोग दिन 24 मार्चलाच का साजरा केला जातो?
खोकल्यामुळे छातीत का दुखते?