Topic icon

गुडघेदुखीवर उपाय

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
4
सर्वात सोपा उपाय म्हणजे दररोज कमीत कमी दोन ते तीन किलोमीटर फक्त चालण्याचा व्यायाम करा, जास्त काही करायची गरज नाही. आपोआप काही दिवसात फरक जाणवेल.
बरेच लोक, चार चाकी गाडी घेतात, मणक्याची शस्त्रक्रिया करतात मात्र याचा फरक जाणवत नाही. जोपर्यंत शरीराचा व्यायाम होत नाही तोपर्यंत ते सुस्थितीत राहत नाही.

सर्वात महत्वाचे म्हणजे डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
उत्तर लिहिले · 3/11/2020
कर्म · 282915
3
असे ठामपणे समजले जाते की उभे राहणे आणि पाणी पिणे आरोग्याच्या अनेक समस्यांना कारणीभूत ठरू शकते. इंटरनेट शोधात या दाव्याची पुनरावृत्ती करणार्‍या असंख्य लेखांची माहिती समोर आली आहे.
संधिवात, अपचन, मूत्रपिंड आणि यकृत खराब होणे अशा काही आरोग्याच्या समस्या आहेत, ज्या उभे राहून नियमितपणे पाणी पिणाऱ्या व्यक्तीमध्ये उद्भवतात.
असे मानले जाते की या स्थितीत, पाणी शरीरातून वेगवान प्रवास करते, सांध्यामध्ये जमा होते आणि मूत्रपिंडाद्वारे योग्यरित्या फिल्टर होत नाही.

असे असले तरीही याला काही शास्त्रीय मान्यता नाही बघा. डॉक्टरांनी हे क्लिअर केले आहे की उभे राहून पाणी पिल्याने काही अडचण येत नाही. फक्त घाई घाई व एकदम पाणी पिणे टाळावे.
उत्तर लिहिले · 1/11/2020
कर्म · 61500
8
तुमचे आता वय झाले असेल म्हणून आवाज येत आहे.. सकाळी फिरायला जायचे....
उत्तर लिहिले · 14/6/2020
कर्म · 39105
7
अनेकदा रिकाम्या वेळात किंवा बसल्याबसल्या आपण जेव्हा पाय मोडत असतो. तेव्हा गुढघ्यातून आवाज येत असतो. हाडांशी जोडलेल्या आजारांकडे आपण नेहमीच दुर्लक्ष करत असतो.  हाडांमधून कट-कट असा आवाज येतो. त्याला मेडीकलच्या भाषेत 'क्रेपिटस' असं म्हणतात.  अनेकदा उठताना किंवा बसताना असा आवाज येत असतो. ३० ते ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे लोकसुद्धा या समस्येचा सामना करत असतात.

या समस्येचं सगळ्यात महत्वाचं कारण कॅल्शियमची कमी असणं हे आहे. यामुळे शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेला पूर्ण करण्यासाठी कॅल्शियमचे प्रमाण जास्त प्रमाणात असलेल्या पदार्थांचे सेवन करणं गरजेचं आहे. त्यात दूध, डाळी आणि वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश असतो. 


धन्यवाद
उत्तर लिहिले · 20/5/2020
कर्म · 55350
0
गुडघेदुखी

गुडघ्या मधून टकटक असा आवाज येतो, बसल्यावर उठण्यास त्रास होतो, यावर अचूक आणि रामबाण घरगुती उपाय.
आपण पाहतो की अनेक वयोवृद्ध आजही एकदम सहज उठतात बसतात आणि चालतात फिरतात पण त्या तुलनेने आपले कमी वय असून सुध्दा आपण लवकर थकतो. आपले गुडघे दुखतात, एकदा बसले की पुन्हा उभे राहण्यास त्रास होतो. गुडघ्यातून सारखा टकटक असा आवाज येत असतो इत्यादी.
पाहिलेच्या कसदार अन्नाची आणि पोष्टिकतेची तुलना आताच्या अन्ना सोबत न केलेलीच बरी कारण त्यामुळेच आजही वृध्द लोक अगदी तरुणांसारखे धावतात पाळतात तर आजकालची तरुण मंडळी वृद्धांच्या सारखे हळूहळू हालचाली करतात. असो आज आपण हल्ली सर्वांना सतावणाऱ्या गुदाघादुखीच्या घरगुती उपाया बद्दल जाणून घेऊ.
पारिजातक तुम्हाला माहीत असेलच ज्याचे सफेद रंगाची फुले रात्री उमलतात आणि सकाळी गळून जातात. या झाडाची 6 ते 7 पाने वाटून बारीक करून पेस्ट तयार करा आणि एक ग्लास पाण्यात उकळवा. उकळून उकळून ते जेव्हा अर्धे राहील तेव्हा ते आगीवरून काढा आणि कोमट करून दररोज रिकाम्या पोटी प्यावे. असे केल्यामुळे तुम्हाला शरीरातील आणि गुडघ्यातील वेदने पासून आराम मिळेल. या औषधी सोबत इतर कोणतेही औषध घ्यायचे नाही आहे. हा एक सर्वात प्रभावी उपाय आहे.
कणहेर चे पाने उकळून त्यांनी बारीक पेस्ट बनवा आणि तिळाच्या तेलात मिक्स करून गुडघ्यावर मालिश करा. असे केल्यामुळे तुम्हाला वेदने पासून सुटका मिळेल.
जर तुमच्या गुडघ्यामध्ये वेदना होत असतील तर रोज रात्री 2 चमचे मेथी एक ग्लास पाण्यात भिजत ठेवा. आणि सकाळी रिकाम्या पोटी मेथी चावून खावी आणि मेथीचे पाणी प्यावे यामुळे तुम्हाला कधीच गुडघा दुखण्याचा त्रास होणार नाही.
एक ग्लास दुधात 4-5 लसून टाकून चांगले उकळवा आणि कोमट झाल्यावर पिण्यामुळे गुदाघादुखी मध्ये आराम मिळतो.
दररोज अर्धा कच्चा नारळ खाण्यामुळे म्हातारपणात सुध्दा कधी गुडघेदुखीचा त्रास होणार नाही.
5 अक्रोड रोज रिकाम्या पोटी खाण्यामुळे तुमच्या गुडघ्यात कधी त्रास जाणवणार नाही.
रोज रात्री झोपण्या अगोदर एक ग्लास दुधात हळद मिक्स करून पिण्यामुळे तुम्हाला हाडे दुखण्याच्या त्रासातून मुक्ती मिळेल. एका डाळीच्या आकारा एवढा चुना (जो आपण पान खाताना खातो) दही किंवा पाण्यात मिक्स करून पिण्यामुळे तुम्हाला हाडे दुखण्याचा त्रास कधी होणार नाही. चुन्याचे पाणी कधीही सरळ बसून प्यावे यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळेल. हे औषध फक्त 1 महिना पिण्यामुळे शरीरातील कोणत्याही हाडाचे दुखणे असेल तर आराम मिळेल.
सकाळ आणि संध्याकाळी भद्र आसन करण्यामुळे तुम्हाला फायदा होईल.
हाडांच्या दुखण्या पासून वाचण्यासाठी आपल्या भोजना मध्ये 25% भाज्या आणि फळांचा समावेश सफरचंद, मोसंबी, संत्रे, टरबूज, खरबूज, केळे आणि नारळ इत्यादी फळांचे सेवन दररोज करा.
कोबी, सोयाबीन, हिरव्या भाज्या सोबतच काकडी, गाजर आणि मेथी आवश्य खावे.
करा. असे केल्यामुळे तुम्हाला कधीही हाडे दुखण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.
दुध आणि दुधा पासून बनलेले पदार्थ भरपूर खावेत आणि कच्चे पनीर आपल्या भोजनात शामाविष्ट करावे असे केल्यामुळे तुम्हाला सांधेदुखी मध्ये आराम मिळेल.
बाजरी, मका यांचे देखील सेवन करा. कारण यामध्ये ते सर्व पौष्टिक गोष्टी असतात जे हाडे आणि सांधेदुखी पासून मुक्ती देतात.
जर थंडीमुळे तुमच्या घरातील वृद्ध लोकांचे गुडघे दुखत असतील तर राईच्या तेलात लसून आणि ओवा शिजवा आणि मंग हे तेल कोमट झाल्यावर गुडघ्यावर मालिश करा, यामुळे वेदना त्वरित कमी होईल.
संकलक :  प्रमोद तांबे
उत्तर लिहिले · 10/5/2020
कर्म · 55350