भाषा मराठी भाषा व्याकरण संस्कृत भाषा

कृपया ज,ञ आणि ज्ञ मधील भेद उच्चारणासहित विशद कराल का?

1 उत्तर
1 answers

कृपया ज,ञ आणि ज्ञ मधील भेद उच्चारणासहित विशद कराल का?

11
५ प्रकारांत व्यंजनांचे विभाजन केले आहे. हे प्रकार पुढीलप्रमाणे-

कण्ठ्य - पडजीभ व जिभेची मागची बाजू यांच्या संयोगातून निर्माण होणारे जिह्वामूलीय वर्ण- जसे अ, आ, क्, ख्, ग्, घ्, ङ्, ह्‌ आणि विसर्ग

तालव्य - जिभेचा स्पर्श वरील हिरडीवर होऊन त्यायोगे निर्माण होणारे वर्ण, जसे इ, च्, छ्, ज्, झ्, ञ्, य्‌, श्

मूर्धन्य - जिभेचा टाळूवर स्पर्श होऊन त्यायोगे निर्माण होणारे वर्ण, जसे - ऋ, ट्, ठ्, ड्, ढ्, ण्, र्‌, ष्, ळ्‌

दन्त्य - जिभेचा दातांना स्पर्श झाल्यावर निर्माण होणारे वर्ण, जसे - ऌ, त्, थ्, द्, ध्, न्, ल्‌, स्

ओष्ठ्य - दोन्ही ओठांमधून निर्माण होणारे वर्ण, जसे - उ, ओ, औ, प्, फ्, ब्, भ्, म्, उपध्मानीय

"ज" आणि "ञ" या शब्दाचे उच्चार हिरडीवर स्पर्श होऊन केल्याने तालव्य संज्ञा मध्ये समावेश होतो...

तर मराठी लिपीत क्ष (क्‍ष) आणि ज्ञ ही दोन जोडाक्षरे त्यांच्या नित्यवापरामुळे मूलध्वनी समजली जातात. हिंदीत क्ष, ज्ञ, श्र. आणि त्र ही जोडाक्षरे मूलध्वनी समजली जातात. मराठी भाषेतील ज्ञ हा दंत्य आहे, बंगालीतला ज्ञ (ज्‍ञ) तालव्य आहे, तर हिंदीतला ज्ञ (ग्य) कंठ्य आहे. मराठीतले च़, छ़, ज़, झ़ हे दंततालव्य आहेत, आणि फ़ दंतोष्ठ्य आहे..
उत्तर लिहिले · 14/7/2018
कर्म · 458480

Related Questions

हिंदूचे पवित्र धर्मग्रंथ संस्कृत भाषेत होते सामान्य व्यक्तींना ते समजत नव्हते जैन धर्माची शिकवण घेऊन सामान्य भाषेत होती त्या भाषेचे नाव काय?
संस्कृत मध्ये किती प्रकार पडतील?
सदोष म्हणजे काय सांगेल का कोणी महाशय?
संस्कृत भाषेचा संपूर्ण इतिहास काय आहे?
संस्कृत ला जर भाषांतर करायचं असेल तर कसे करावे?