Topic icon

व्याकरण

0
समुद्र सुमित तथा जल सीमित को उचित समझाइए
उत्तर लिहिले · 25/9/2024
कर्म · 0
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
1


प्रिय ___________,

माझ्या अनुभवानुसार रक्तदान हा एक महत्वाचा उपक्रम आहे ज्यामुळे आम्ही इतरांना मदत करू शकतो. मी तुमच्या संदेशाप्रमाणे रक्तदानाची महत्वाचीता अहवाल देण्याची संधी घेतली आहे.

तुमचे सहभाग रक्तदान करण्यासाठी महत्त्वाचे आहे. रक्तदान एक अत्यंत सरल उपक्रम आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःला आणि इतरांना मदत करू शकता. या उपक्रमामध्ये भाग घेण्याची मतदान तुम्हाला बहुतेक लाभ देते, जसे की तुम्हाला आरोग्य देखील फायदेशीर असेल, इतर लोकांना मदत करण्याची शक्यता देखील निर्माण होते.

मी तुमच्या संदेशाप्रमाणे रक्तदान करण्याची संधी देत आहे. तुमच्या शहरातील रक्तदान केंद्रांची माहिती तुम्हाला तुमच्या व्यावसायिक डाक नावाने पाठवली जाईल. तुम्हाला हे अवसर न विसरून द्या आणि तुमचे मित्राही हे संदेश वाचल्याची विनंती करा.

धन्यवाद,
उत्तर लिहिले · 30/3/2023
कर्म · 165
1
हो, मराठी व्याकरणासाठी नागेश गायकवाड हे चांगले लेखन असून त्यांनी व्याकरण चांगल्याप्रकारे आणि समजेल अशाप्रकारे योग्य ती माहिती दिली आहे. 

Pdf download करण्यासाठी Telegram मध्ये "समानार्थी शब्द मराठी" या Telegram channel ला Search करा. Join व्हा. Files मध्ये जाऊन तीन मराठी व्याकरणाच्या महत्वपूर्ण pdf download करा.

Link : https://t.me/samanarthishabdmarathi
उत्तर लिहिले · 24/2/2023
कर्म · 0
2
वस्तू एक आहे की अनेक आहेत ते सूचित करणाऱ्या शब्दाच्या गुणधर्मास व्याकरणात 'वचन' असे म्हणतात. मराठी प्रमाणेच बहुसंख्य भाषात वचनांचे एकवचन आणि अनेकवचन असे दोन प्रकार असतात, काही थोड्या भाषात द्विवचन अथवा इतरही व्यवस्था पहावयास मिळतात.
मराठीत एकवचन आणि अनेकवचन अशी दोन रूपे असली तरी काही शब्दांच्या बाबतीत अनेकवचनात शब्दाचे रूप बदलत नाही.
वचनाचे प्रकार : १. एकवचन २. अनेकवचन
१. एकवचन : जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा एकवचन असे म्हणतात.
उदा. मासा, गाय, फूल, मुलगा इ.
२. अनेकवचन : जेव्हा एकापेक्षा अधिक वस्तूंचा बोध होतो तेव्हा अनेकवचन असे म्हणतात.
उदा. मासे, गाई, फुले, मुलगे इ.
लिंगभेदाप्रमाणे काही सर्वनामांचे एक-अनेकवचन पुढीलप्रमाणे.
वचन/लिंग पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग
एकवचन तो, ती, ते
अनेकवचन अनुक्रमे ते त्या ती.
लिंगभेदाप्रमाणे नामांचे एक-अनेकवचन करण्याचे नियम खाली दिले आहेत.
पुल्लिंगी शब्दांचे एकवचन-अनेकवचन
नियम १: आ-कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन ए-कारान्त होते.
उदा० एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन
रस्ता-रस्ते, आंबा-आंबे, ससा-ससे, लांडगा-लांडगे, महिना-महिने, दाणा-दाणे.
अपवाद :
काका-काका, आजोबा-आजोबा
काकेमामे हा शब्द कुत्सित अर्थाने वापरला जातो.
नियम २ : आ-कारान्त नामांव्यतिरिक्त इतर सर्व पुल्लिंगी नामांची रूपे दोन्ही वचनांत सारखीच असतात.
उदा०
एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन
उंदीर-उंदीर, पाय-पाय, चिकू-चिकू, देश-देश, हार-हार, पक्षी- पक्षी, केस-केस, कागद-कागद.
स्त्रीलिंगी शब्दांचे एक-अनेकवचन
नियम ३ : अ-कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन करताना कधी आ-कारान्त होते तरे कधी ई-कारान्त होते.
उदा. एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन खाट-खाटा गंमत गमती चूक चुका गाय गाई मान माना तलवार तलवारी कळ कळा मांजर मांजरी धार धारा मोलकरीण मोलकरणी
नियम ४ : ई-कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन सामान्यतः या-कारान्त होते.
उदा. एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन कळी कळ्या आई आया बांगडी बांगड्या सुई सुया बी बिया सुरी सुऱ्या स्त्री स्त्रिया वाटी वाट्या अपवाद दासी दासी दृष्टी दृष्टी युवती युवती मूर्ती मूर्ती
नियम ५ : ऊ-कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन वा-कारान्ती होते.
उदा. एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन जाऊ जावा जळू जळवा ऊ उवा अपवाद वस्तू वस्तू वाळू वाळू वधू वधू बाजू बाजू
नियम ६ : सामान्यतः आ-कारान्त स्त्रीलिंगी नामांची रुपे दोन्ही वचनात सारखीच राहतात.
उदा. एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन कन्या कन्या शिक्षिका शिक्षिका वीणा वीणा मैना मैना घंटा घंटा पूजा पूजा
नपुसकलिंगी शब्दांचे एकवचन-अनेकवचन
नियम ७ : अ-कारान्त/ऊकारान्त नपुंसकलिंगी नामांचे अनेकवचन ए-कारान्त होते.
उदा. एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन फूल- फुले, पाखरू- पाखरे,बदक -बदके ,वासरू- वासरे,मत- मते ,लेकरू- लेकरे
नियम ८ : ए-कारान्त नपुसकलिंगी नामांचे अनेकवचन ई-कारान्त होते.
उदा. एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन गाणे गाणी खेडे खेडी
केळे- केळी, नाणे -नाणी, भजे -भजी ,तळे -तळी
अपवाद
सोने -सोने, रुपे -रुपे, लाटणे- लाटणी
'तो' या पुल्लिंगी सर्वनामाचे अनेकवचन 'ते' असे होत असून, 'तो आंबा' याचे अनेकवचन 'ते आंबे' असे होते. नपुंसकलिंगात 'ते' हे एकवचनी सर्वनाम असल्याने, 'पुल्लिंगी' शब्दांचे अनेकवचन 'नपुंसकलिंगी' होते तसेच 'नपुंसकलिंगी' एकवचनाचे अनेकवचन स्त्रीलिंगी होते 
संदर्भ
शालेय अभ्यासक्रमातील व्याकरणाचे पाठ्यपुस्तक, स्कॉलरशिप परीक्षेचे पुस्तक.
उत्तर लिहिले · 5/2/2023
कर्म · 11785