4 उत्तरे
4 answers

सदोष म्हणजे काय सांगेल का कोणी महाशय?

12
सदोष म्हणजे दोष असलेला, चुकीचा असलेला.

आपण "सदोष" हा शब्द अधिक करून कायद्याच्या भाषेत तसेच बातम्यांमध्ये ऐकत असतो की, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तत्सम अधिकारी वा कर्त्यावर केला पाहिजे.
अर्थात, मृत्यू घडवून आणल्यामुळे किंवा ज्याच्यामुळे मृत्यू घडून येणे संभवनीय आहे, अर्थात एखाद्या कृतीमुळे मृत्यूस कारणीभूत होण्याचा संभव आहे आणि याची जाणीव असूनही अशी कृती करून मृत्यू घडवतो, त्यास सदोष मनुष्यवध केला असे म्हणतात.

वरील स्पष्टीकरण वरून आपणास सदोष या शब्दाची प्रचिती आली असावी.
उत्तर लिहिले · 11/7/2019
कर्म · 458560
2
दोष म्हणजे अपराध, गुन्हा.

दोषी म्हणजे अपराधी, गुन्हेगार यालाच समानार्थी शब्द आहे सदोष.

दोषी = सदोष म्हणजे दोष असलेला, दोषासह असलेला अथवा अपराधी असलेला, दोषी आढळलेला.
उत्तर लिहिले · 11/7/2019
कर्म · 11720
0

सदोष या शब्दाचा अर्थ दोषयुक्त किंवा त्रুটিपूर्ण असा होतो. ज्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, काहीतरी बरोबर नाही, किंवा काहीतरी तुटलेले आहे, अशा वस्तूला किंवा गोष्टीला सदोष म्हणता येईल.

उदाहरणार्थ:

  • सदोष उत्पादन (Defective product): एखादे उत्पादन तयार करताना त्यात काहीतरी चूक झाली असेल, तर ते सदोष ठरते.
  • सदोष युक्तिवाद (Defective argument): जेव्हा युक्तिवादामध्ये काहीतरी त्रुटी असते, ज्यामुळे तो कमजोर होतो.
  • सदोष वस्तू (Defective item): खराब झालेली किंवा तुटलेली वस्तू.

थोडक्यात, सदोष म्हणजे 'दोष असलेला'.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 740

Related Questions

वाक्याचे चार प्रकार लिहा?
वाक्याचे चार प्रकार कोणते?
"मी शाळेत जाणार" या वाक्यातील काळ कोणता आहे?
रामा शाळेत आला नाही या वाक्यातील 'आला' या शब्दाची जात कोणती आहे?
सूचनेनुसार आपत्कृती व व्याकरण यांमधील आकृत्या आढळतात?
मराठीच्या व्याकरणाचा सुवर्णकाळ कोणत्या राजघराण्याच्या काळाला म्हटले जाते?
निमंत्रण पत्राला उत्तर कसे देतात?