पैसा
स्वभाव
महाभारत
रामायण
सत्ता
उद्बोधन, प्रबोधन, कीर्तन, प्रवचन, टीकाटिप्पणी, निंदानालस्ती, वादविवाद स्पर्धा सर्वच ठिकाणी आहे. कथा, व्यथा, संवेदना आहेत. महाभारत, रामायण ऐकून देखील मनुष्य स्वभाव का बदलला नाही? आजची नेतागिरी आणि विकास नीती पर्व नेमकं काय करते? पैसा, सत्ता, अहंकार यांचे निर्मूलन कधी होईल? विवेकी उत्तर हवे.
2 उत्तरे
2
answers
उद्बोधन, प्रबोधन, कीर्तन, प्रवचन, टीकाटिप्पणी, निंदानालस्ती, वादविवाद स्पर्धा सर्वच ठिकाणी आहे. कथा, व्यथा, संवेदना आहेत. महाभारत, रामायण ऐकून देखील मनुष्य स्वभाव का बदलला नाही? आजची नेतागिरी आणि विकास नीती पर्व नेमकं काय करते? पैसा, सत्ता, अहंकार यांचे निर्मूलन कधी होईल? विवेकी उत्तर हवे.
0
Answer link
श्री गणेशाय नमः
ॐ श्री हरी
ॐ नमोजी आद्या | वेदप्रतिपाद्या | जय जय संवेद्या |
देवा तूचि गणेशु सकलार्थ मति प्रकाशु म्हणे निवृतिदासु जो जी अवधारी जी |
प्रश्न असा आहे की त्याला उत्तर नाही असे होणार नाही.
मानवाची निर्मिती कशी झाली.. याला इतिहास साक्षी आहे.
सर्व जन्माच्या शेवटी मनुष्य जन्म पावे पोटी याउपरी उत्तम किरिटी मी रचिली नाही...
आता या जन्मी तरी साधी नारायण नाहीतर हीन पशुहून...
निद्रा भोजन भोग भय यह पशु पूरक समान |
ज्ञान अधिक एक नरन में, ज्ञान बिना पशु जान ||
मनुष्य जन्म, मनुष्य स्वभाव, माणसाला दोन मने, संवेदना, एकत्र येणं ,बसणं , आधार घेणं देणं , भूख भागवणं , निद्रा घेणं ,भय दूर करणं , प्रेम प्रेरणा विवेकी विचार विश्वास स्थैर्य यासाठी सहवास संवाद चर्चा करत हे मानवी जीवन जगण्याचा सतत सक्रीय प्रयत्न झाला आणि तशीच ही वाटचाल सुरू आहे हे लक्षात येते. ....
या जन्मावर शतदा प्रेम करावे....
असे उद्बोधन प्रबोधन प्रवचन कीर्तन आख्यान व्याख्यान होतच असतात. जीवनपद्धती वर टिका टिप्पणी निंदानालस्ती द्वैषवैर मनी बाळगून हिंसा ही होते.
जीवन म्हणजे काय ? अखंड जनजागृती सुरू आहे
तरीही माणसाला माणूस प्रिय असावा की नाही ? पण काहीजन निंदानालस्ती द्वैषवैर मनी बाळगून जीवन व्यतीत करत आहेत.
माणुसकी धर्म वाढवत रहावा यासाठी अनेक संतवचने गुरूवचने सांगितले जातात. तिचे पालन करावे लागेल.
संत ना होते जगतमें तो जल मरता संसार.
सद्गुरू येत असे या जगती सुखमय करण्यासी संसार...
हे सत्कृत्य आचरण नीतीत उतरणारा जीवभाव सर्वांठायीं असावा असे वाटते.
नीती अनीतीच्या सर्व बाबी विचारात घेऊन राज्यशकट करावे लागते. हे जरी खरे असले तरी माणसाला माणसासारखे वागवावे . माणूस प्रथम ... त्यामुळे सेवा महान आहे. देवांचा देव ही करतो भक्तांची चाकरी ...हा विश्वास स्थिरमन दृढतेचा दाखला आहे.
हे वर्तमान समोर आहे. आजची परिस्थिती वस्तुस्थिती पाहता मानवी जीवन आत्मज्ञानानं भरून टाकतील अशी निर्मल सेवा अमृता सारखी गोड कार्यपद्धती कार्यप्रणाली विकसित करण्यात यावी .
परंतु माणसं डोळस असूनही वाट भरकटत आहेत.
उघडा डोळे बघा नीट...ही आजची परिस्थिती काय आहे ?
नेतेमंडळी ही अराजकता निर्माण कशी होईल व काही सत्तापिपासू बनून जीवनचक्रास अवरोध निर्माण करत आहेत.
आपण सुजाण नागरिक म्हणून परिवर्तन मिलवर्तन घडवून आणलं पाहिजे.
योग्य जाणीवेतून सुंदर कामगिरी करत एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली पाहिजे.
पैसा सत्ता या बाबी गौण आहेत. मनुष्य स्वभाव सद्गुणांची खान आहे ते आचार विचार उच्चार यांनी जीवन वस्त्र तुणले पाहिजे. बहोत सुकृताची जोडी तेणें विठ्ठली आवडी....असे सुकृत कर्म उभे राहिले तर हे ..रुप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी..असं सुंदर दर्शन होईल.
जीवन सुंदर आविष्काराने प्रकट करता येते .
आणि म्हणूनच कथा व्यथा रामायण महाभारत या गोष्टींचे भान नभाएवढं ठेवून माणुसकी धर्म जोपासला जावा .तरच आजचं वास्तव यथार्थ दर्शन होत जाईल.
चांगल्याला चांगलं म्हणण्याची पद्धत मानविय सद्गुणांनी युक्त रहावी .
माणसाला प्रेम प्रेरणा नम्रता सहनशीलता करूणा दया क्षमा शांती शिस्त समाधान अंगी सद्गुणांची दिव्य रास जपता आली पाहिजे.
हे जीवन पुन्हा , पुन्हा नाही.
सातत्याने प्रबोधन होऊन ही मनाची मानसिकता अतिशय काळंवडली गेली आहे.हे कां असं व्हावं. नरेचि केला हीन किती नर ...माणूसच कारणीभूत आहे.
कोणाचाच कोणावरही विश्वास उरलेला नाही.
सारे मुखवटे घालून षडयंत्री पाताळयंत्री बनलेत, त्यांच्या या कटकारस्थानी धोरणांमुळे हे घातक विष पसरविण्याचे काम होत आहे.
माणसाला आपले हित कळावे , त्यास स्थिरता विशालता आनंद प्रसन्नता शांतता तत्परता समाधान सुख कशात आहे हे लक्षात येत नाही.
आणि मग काय करू आणि काय करु नये ही संदिग्धता निर्माण झाली आहे.
एक तत्व दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी ही आठवण देखील होत नाही.
या वर्तमानी सर्वोत्तम प्रेम कामगिरी करायची आहे हे सत्कृत्य आचरण नीतीत उतरणारा जीवभाव सर्वांठायीं असावा असे सुकृत कर्म उभे रहावे.
सध्या संवेदना या बोथट झाल्या आहेत.
आपणांस स्थिरता प्रगल्मता विकास गती हवी आहे आणि ती मिळावी म्हणून प्रामाणिक प्रयत्न आवश्यक आहेत.
आठवावे ते रूप आठवावा तो प्रताप ....हे सत्कृत्य साक्षेपी हवेच हवे . धन्यवाद जी.
0
Answer link
उद्बोधन, प्रबोधन, कीर्तन, प्रवचन, टीकाटिप्पणी, निंदानालस्ती, वादविवाद स्पर्धा सर्वच ठिकाणी आहेत. कथा, व्यथा, संवेदना आहेत. महाभारत, रामायण ऐकून देखील मनुष्य स्वभाव का बदलला नाही? या प्रश्नाचे उत्तर खालीलप्रमाणे:
- मनुष्य स्वभावाची गुंतागुंत: मनुष्य स्वभाव हा अत्यंत गुंतागुंतीचा असतो. तो अनेक घटकांनी बनलेला असतो, जसे की आनुवंशिकता, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभाव, अनुभव आणि शिक्षण. रामायण, महाभारत यांसारख्या कथा श्रवण केल्याने तात्पुरता प्रभाव पडू शकतो, परंतु दीर्घकाळ टिकणारा बदल घडवण्यासाठी आंतरिक प्रेरणा आणि सतत प्रयत्नांची गरज असते.
- ज्ञान आणि आचरणातील फरक: मनुष्य ज्ञानाने परिपूर्ण असला तरी, ते ज्ञान आचरणात आणणे कठीण असते. उपदेश ऐकणे सोपे आहे, पण त्यानुसार वागणे अधिक कठीण आहे.
- मोह आणि आसक्ती: पैसा, सत्ता आणि अहंकार हे मानवी स्वभावाचे अविभाज्य भाग आहेत. यांपासून पूर्णपणे मुक्त होणे अत्यंत कठीण आहे.
आजची नेतागिरी आणि विकास नीती पर्व नेमकं काय करते?
- राजकीय ध्रुवीकरण: आजकाल नेते केवळ सत्ता मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे समाजाला एकत्र आणण्याऐवजी त्यांच्यात फूट पाडण्याचे काम ते करतात.
- आर्थिक असमानता: विकास नीतीमुळे काही लोकांकडे अमाप पैसा जमा होतो, तर गरीब अधिक गरीब होतात. यामुळे समाजात असंतोष निर्माण होतो.
- पर्यावरणाचा ऱ्हास: विकास प्रकल्पांमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते, ज्याचा परिणाम दीर्घकाळ मानवावर आणि निसर्गावर होतो.
पैसा, सत्ता, अहंकार यांचे निर्मूलन कधी होईल?
- पैसा, सत्ता आणि अहंकार यांचे निर्मूलन करणे हे एक आदर्शवादी ध्येय आहे. ते पूर्णपणे कधीच शक्य नाही, कारण हे मानवी स्वभावाचे भाग आहेत. तथापि, शिक्षण, जागरूकता आणि सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून यांवर नियंत्रण ठेवता येऊ शकते.
- शिक्षणाचे महत्त्व: मुलांना लहानपणापासूनच नैतिक आणि सामाजिक मूल्यांची शिकवण देणे आवश्यक आहे.
- जागरूकता: लोकांना त्यांच्या हक्कांबद्दल आणि कर्तव्यांबद्दल जागरूक करणे आवश्यक आहे.
- सामाजिक सुधारणा: समाजात समानता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
विवेकी विचार:
समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करणे आवश्यक आहे. वैयक्तिक पातळीवर नैतिकता, प्रामाणिकपणा आणि करुणा यांसारख्या मूल्यांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.