Topic icon

रामायण

0

दिलेल्या वाक्यामध्ये 'अंजलीने' या शब्दाची जात नाम (Noun) आहे.

स्पष्टीकरण:

  • 'अंजली' हे एका विशिष्ट व्यक्तीचे नाव आहे.
  • ज्या शब्दाने एखाद्या व्यक्ती, वस्तू, स्थळ किंवा कल्पनेचे नाव दर्शविले जाते, त्या शब्दाला नाम म्हणतात.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 220
0
श्री गणेशाय नमः 
ॐ श्री हरी 

ॐ नमोजी आद्या | वेदप्रतिपाद्या | जय जय संवेद्या |  
 देवा तूचि गणेशु सकलार्थ मति प्रकाशु म्हणे निवृतिदासु जो जी अवधारी जी |

प्रश्न असा आहे की त्याला उत्तर नाही असे होणार नाही.
मानवाची निर्मिती कशी झाली.. याला इतिहास साक्षी आहे.
सर्व जन्माच्या शेवटी मनुष्य जन्म पावे पोटी याउपरी उत्तम किरिटी मी रचिली नाही...
आता या जन्मी तरी साधी नारायण नाहीतर हीन पशुहून...
निद्रा भोजन भोग भय यह पशु पूरक समान  |
ज्ञान अधिक एक नरन में, ज्ञान बिना पशु जान  ||
मनुष्य जन्म, मनुष्य स्वभाव, माणसाला दोन मने, संवेदना, एकत्र येणं ,बसणं , आधार घेणं देणं , भूख भागवणं , निद्रा घेणं  ,भय दूर  करणं , प्रेम प्रेरणा विवेकी विचार विश्वास स्थैर्य यासाठी सहवास संवाद चर्चा करत हे मानवी जीवन जगण्याचा सतत सक्रीय प्रयत्न झाला आणि तशीच ही वाटचाल सुरू आहे हे लक्षात येते. ....
या जन्मावर शतदा प्रेम करावे....
असे उद्बोधन प्रबोधन प्रवचन कीर्तन आख्यान व्याख्यान होतच असतात. जीवनपद्धती वर टिका टिप्पणी निंदानालस्ती द्वैषवैर मनी बाळगून हिंसा ही होते. 
जीवन म्हणजे काय ? अखंड जनजागृती सुरू आहे 
तरीही माणसाला माणूस प्रिय असावा की नाही ? पण काहीजन निंदानालस्ती द्वैषवैर मनी बाळगून जीवन व्यतीत करत आहेत.
 माणुसकी धर्म वाढवत रहावा यासाठी अनेक संतवचने गुरूवचने सांगितले जातात. तिचे पालन करावे लागेल.
संत ना होते जगतमें तो जल मरता संसार.
सद्गुरू येत असे या जगती सुखमय करण्यासी संसार...
हे सत्कृत्य आचरण नीतीत उतरणारा जीवभाव सर्वांठायीं असावा असे वाटते. 
नीती अनीतीच्या सर्व बाबी विचारात घेऊन राज्यशकट करावे लागते. हे जरी खरे असले तरी माणसाला माणसासारखे वागवावे . माणूस प्रथम ... त्यामुळे सेवा महान आहे. देवांचा देव ही करतो भक्तांची चाकरी ...हा विश्वास स्थिरमन दृढतेचा दाखला आहे.
हे वर्तमान समोर आहे. आजची परिस्थिती वस्तुस्थिती पाहता मानवी जीवन आत्मज्ञानानं भरून टाकतील अशी निर्मल सेवा अमृता सारखी गोड कार्यपद्धती कार्यप्रणाली विकसित करण्यात यावी .
परंतु माणसं डोळस असूनही वाट भरकटत आहेत.
उघडा डोळे बघा नीट...ही आजची परिस्थिती काय आहे ?
नेतेमंडळी ही अराजकता निर्माण कशी होईल व काही सत्तापिपासू बनून जीवनचक्रास अवरोध निर्माण करत आहेत.
आपण सुजाण नागरिक म्हणून परिवर्तन मिलवर्तन घडवून आणलं पाहिजे.
योग्य जाणीवेतून सुंदर कामगिरी करत एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली पाहिजे.
पैसा सत्ता या बाबी गौण आहेत. मनुष्य स्वभाव सद्गुणांची खान आहे ते आचार विचार उच्चार यांनी जीवन वस्त्र तुणले पाहिजे. बहोत सुकृताची जोडी तेणें विठ्ठली आवडी....असे सुकृत कर्म उभे राहिले तर हे ..रुप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी..असं सुंदर दर्शन होईल.
जीवन सुंदर आविष्काराने प्रकट करता येते .
आणि म्हणूनच कथा व्यथा रामायण महाभारत या गोष्टींचे भान नभाएवढं ठेवून माणुसकी धर्म जोपासला जावा .तरच आजचं वास्तव यथार्थ दर्शन होत जाईल. 
चांगल्याला चांगलं म्हणण्याची पद्धत मानविय सद्गुणांनी युक्त रहावी .
माणसाला प्रेम प्रेरणा नम्रता सहनशीलता करूणा दया क्षमा शांती शिस्त समाधान अंगी सद्गुणांची दिव्य रास जपता आली पाहिजे.
हे जीवन पुन्हा , पुन्हा नाही.
सातत्याने प्रबोधन होऊन ही मनाची मानसिकता अतिशय काळंवडली गेली आहे.हे कां असं व्हावं. नरेचि केला हीन किती नर ...माणूसच कारणीभूत आहे.
कोणाचाच कोणावरही विश्वास उरलेला नाही.
सारे मुखवटे घालून षडयंत्री पाताळयंत्री बनलेत, त्यांच्या या कटकारस्थानी धोरणांमुळे हे घातक विष पसरविण्याचे काम होत आहे.
 माणसाला आपले हित कळावे , त्यास स्थिरता विशालता आनंद प्रसन्नता शांतता तत्परता समाधान सुख कशात आहे हे लक्षात येत नाही.
आणि मग काय करू आणि काय करु नये ही संदिग्धता निर्माण झाली आहे.
एक तत्व दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी ही आठवण देखील होत नाही.
या वर्तमानी सर्वोत्तम प्रेम कामगिरी करायची आहे हे सत्कृत्य आचरण नीतीत उतरणारा जीवभाव सर्वांठायीं असावा असे सुकृत कर्म उभे रहावे.
सध्या संवेदना या बोथट झाल्या आहेत.
 आपणांस स्थिरता प्रगल्मता विकास गती हवी आहे आणि ती मिळावी म्हणून प्रामाणिक प्रयत्न आवश्यक आहेत.
आठवावे ते रूप आठवावा तो प्रताप ....हे सत्कृत्य साक्षेपी हवेच हवे . धन्यवाद जी. 






उत्तर लिहिले · 29/7/2024
कर्म · 475
0

'गीता रामायण' बाबुराव गोखले यांनी लिहिले आहे.

हे रामायणावर आधारित एक लोकप्रिय मराठी काव्य आहे.

बाबुराव गोखले हे एक प्रसिद्ध मराठी कवी आणि लेखक होते.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 220
0
रामायणात दोन पोपट नर-मादीची गोष्ट आहे. तुलसीदासांच्या 'रामचरितमानस' मध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे.
कथेनुसार, हे पोपट पूर्वी वाल्मीकि ऋषींच्या आश्रमात राहत होते. एकदा मादी पोपट (शुक) गर्भवती असताना, एका पारध्याने त्यांना पकडण्यासाठी जाळे टाकले. नर पोपट (शुक) जाळ्यात अडकला, पण मादी पोपट जाळ्याच्या बाहेर होती. तिला तिच्या पतीला संकटात पाहून खूप दुःख झाले आणि तिने स्वतःला जाळ्यात झोकून दिले.
त्याच वेळी, वाल्मीकि ऋषी तिथे आले आणि त्यांनी त्या दोन निष्पाप पक्ष्यांची कहाणी ऐकली. त्यांना त्या पक्ष्यांबद्दल खूप वाईट वाटले आणि त्याच করুণेने त्यांच्या मुखातून रामायणाची पहिली कविता बाहेर पडली - 'मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः। यत् क्रौञ्चमिथुनादेकमवधीः काममोहितम्॥'
या घटनेमुळे वाल्मीकि ऋषींना रामायण लिहिण्याची प्रेरणा मिळाली, असे मानले जाते.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 220
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0

राम गणेश गडकरी यांनी अनेक नाटके लिहीली, त्यापैकी काही प्रमुख नाटके खालील प्रमाणे:

  • एकच प्याला - हे नाटक व्यसनाधीनतेच्या दुष्परिणामांवर आधारित आहे.
  • प्रेमसंन्यास - हे नाटक प्रेम आणि त्याग या विषयांवर आधारित आहे.
  • पुण्यप्रभाव - हे नाटक मानवी स्वभाव आणि नैतिक मूल्यांवर आधारित आहे.
  • भावबंधन - हे नाटक सामाजिक बंधने आणि भावना यावर भाष्य करते.
  • राजसंन्यास (अपूर्ण) - हे नाटक त्यांनी सुरु केले होते, परंतु ते पूर्ण करू शकले नाही.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 220
1
होय. दशरथनन्दन श्रीरामांच्या अवतारापूर्वीपासूनच रामनामाचे अस्तित्व आहे. राम हे नाम परब्रह्माचे वाचक आहे.

ऋग्वेदात राम या शब्दाचा प्रयोग आहे.

१] ऋग्वेद - १०.९३.१४

प्र तद्दुःशीमे पृथवाने वेने प्र रामे वोचमसुरे मघवत्सु।

ये युक्त्वाय पञ्च शतास्मयु पथा विश्राव्येषाम्॥

२] भगवान विष्णूंच्या फक्त सातव्या अवताराचे नाव राम नाही. सहाव्या अवताराचेही नाव राम हेच आहे. (श्रीपरशुराम)

३] याशिवाय, रामतापनीयोपनिषद् , रामरहस्योपनिषद् या उपनिषदांची नावेच श्रीरामांवरुन आहेत.

[ उपनिषदे ही वेदांचाच भाग आहेत. ]
उत्तर लिहिले · 18/12/2021
कर्म · 121765