रामायण
शीस पेन्सिल मध्ये कोणता रामायण दैनपदार्थ वापरतात?
मूळ प्रश्न: शिसपेन्सिलमध्ये कोणता रासायनिक पदार्थ वापरतात?
शिसपेन्सिल........ ?
शिसपेन्सिल हा शब्द आपल्या बोलीभाषेतील नेहमीचाच शब्द. खरं तर शिसपेन्सिलमधील शिसं हा शब्द शास्त्रीयदृष्टय़ा चुकीचा आहे. कारण या पेन्सिलीतील कागदावर काळ्या रंगाची रेष उमटवणारा पदार्थ शिसे नसून ग्रॅफाइट आहे.
ग्रॅफाइट या ग्रीक शब्दाचा मूळ शब्द ग्राफलीन (लिहिणारा) असा आहे. १४व्या शतकाच्या आधी लिहिण्यासाठी 'शिसे' हा धातू वापरला जायचा. पुढे ग्रॅफाइटचा शोध लागल्यावर लिहिण्यासाठी ग्रॅफाइटचा वापर होऊ लागला पण शिसं हा शब्द तसाच राहिला. ग्रॅफाइट हे रूपांतरित खडकांमध्ये सापडणारं एक खनिज आहे. काही मूलद्रव्य वेगवेगळ्या स्वरूपांत निसर्गात पाहायला मिळतात. ग्रॅफाइट आणि हिरा ही कार्बन या मूलद्रव्याचीच रूपं आहेत. त्यांचे भौतिक गुणधर्म वेगवेगळे आहेत पण रासायनिक गुणधर्म सारखेच आहेत. ग्रॅफाइटचा रंग काळसर राखाडी असतो. ग्रॅफाइटच्या रेणूमध्ये सहा कार्बनचे अणू षटकोनी आकारात विशिष्ट पद्धतीनं जोडलेले असतात.
धन्यवाद...!!
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers