विज्ञान
शिसपेन्सिलमध्ये कोणता रासायनिक पदार्थ वापरतात?
4 उत्तरे
4
answers
शिसपेन्सिलमध्ये कोणता रासायनिक पदार्थ वापरतात?
2
Answer link
शिसपेन्सिल........ ?
शिसपेन्सिल हा शब्द आपल्या बोलीभाषेतील नेहमीचाच शब्द. खरं तर शिसपेन्सिलमधील शिसं हा शब्द शास्त्रीयदृष्टय़ा चुकीचा आहे. कारण या पेन्सिलीतील कागदावर काळ्या रंगाची रेष उमटवणारा पदार्थ शिसे नसून ग्रॅफाइट आहे.
ग्रॅफाइट या ग्रीक शब्दाचा मूळ शब्द ग्राफलीन (लिहिणारा) असा आहे. १४व्या शतकाच्या आधी लिहिण्यासाठी 'शिसे' हा धातू वापरला जायचा. पुढे ग्रॅफाइटचा शोध लागल्यावर लिहिण्यासाठी ग्रॅफाइटचा वापर होऊ लागला पण शिसं हा शब्द तसाच राहिला. ग्रॅफाइट हे रूपांतरित खडकांमध्ये सापडणारं एक खनिज आहे. काही मूलद्रव्य वेगवेगळ्या स्वरूपांत निसर्गात पाहायला मिळतात. ग्रॅफाइट आणि हिरा ही कार्बन या मूलद्रव्याचीच रूपं आहेत. त्यांचे भौतिक गुणधर्म वेगवेगळे आहेत पण रासायनिक गुणधर्म सारखेच आहेत. ग्रॅफाइटचा रंग काळसर राखाडी असतो. ग्रॅफाइटच्या रेणूमध्ये सहा कार्बनचे अणू षटकोनी आकारात विशिष्ट पद्धतीनं जोडलेले असतात.
धन्यवाद...!!
0
Answer link
शिसपेन्सिलमध्ये मुख्यतः ग्राफाईट (Graphite) नावाचा रासायनिक पदार्थ वापरला जातो.
ग्राफाईट हे कार्बनचे एक रूप आहे आणि ते अतिशय मऊ असल्यामुळे कागदावर सहजपणे निशाण उमटवते. शिसपेन्सिलमध्ये ग्राफाईटला चिकणमाती (clay) मिसळून वापरले जाते, ज्यामुळे पेन्सिलच्या शिशाला मजबुती येते.
टीप: शिसपेन्सिलमध्ये लेड (lead) वापरले जात नाही.
अधिक माहितीसाठी आपण खालील लिंक पाहू शकता: