विज्ञान
0
Answer link
विज्ञानाच्या अभ्यासाच्या पद्धती विविध आहेत आणि त्या काळानुसार बदलत राहतात. या पद्धती पूर्ण आहेत का असा प्रश्न विचारणे थोडेसे चुकीचे ठरेल. कारण विज्ञान हे सतत विकसित होणारे क्षेत्र आहे. नवीन शोध, तंत्रज्ञान आणि माहितीच्या प्रकाशात, विज्ञानाच्या पद्धतीतही बदल होत राहतात.
मुख्य अभ्यास पद्धती:
* निरीक्षण: कोणतीही घटना किंवा वस्तू काळजीपूर्वक पाहणे आणि नोंद करणे.
* प्रयोग: नियंत्रित परिस्थितीत घटनांचा अभ्यास करून त्यांचे कारणे शोधणे.
* तर्कशास्त्र: उपलब्ध माहितीच्या आधारे निष्कर्ष काढणे.
* गणितीय मॉडेलिंग: गणिताच्या साहाय्याने घटनांचे वर्णन करणे आणि भविष्यवाणी करणे.
* सिमुलेशन: संगणकाच्या साहाय्याने वास्तविक घटनांचे अनुकरण करणे.
पूर्णत्वाचा प्रश्न:
* विकासशील प्रक्रिया: विज्ञान हे सतत शिकण्याची प्रक्रिया आहे. नवीन शोधांमुळे जुनी माहिती बदलू शकते.
* मर्यादा: कोणतीही पद्धती सर्व परिस्थितींमध्ये योग्य नसते. काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी नवीन पद्धती विकसित कराव्या लागतात.
* मानवी घटक: शास्त्रज्ञांचे पूर्वग्रह, भावना आणि वैयक्तिक अनुभवही परिणाम करू शकतात.
निष्कर्ष:
विज्ञान हे सत्य शोधण्याचा प्रयत्न आहे. या प्रयत्नात विविध पद्धतींचा वापर केला जातो. कोणतीही पद्धती पूर्ण नसली तरी, त्यांच्या संयुक्त प्रयत्नातून आपल्याला विश्वाबद्दल अधिक चांगले ज्ञान मिळते.
अधिक माहितीसाठी:
* वैज्ञानिक पद्धती: ही विज्ञानाची मूलभूत पद्धती आहे. यामध्ये प्रश्न विचारणे, कल्पना करणे, प्रयोग करणे, डेटा विश्लेषण करणे आणि निष्कर्ष काढणे या प्रक्रियांचा समावेश होतो.
* विज्ञान शाखा: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित इत्यादी विज्ञान शाखांमध्ये वेगवेगळ्या अभ्यास पद्धती वापरल्या जातात.
नोट: ही माहिती सामान्य स्वरूपाची आहे. विज्ञानाच्या अभ्यासाच्या पद्धतींबद्दल अधिक सखोल माहितीसाठी तुम्ही संबंधित पुस्तके किंवा लेख वाचू शकता.
0
Answer link
आद्य आरंभ आई माझी माय माऊली जिच्या ठायी एक तत्व आद्य पूर्ण असा जो ईश्वर ज्याची ओळख करून सहजतेने विशालतेकडे झेपावत जाणं शक्य आहे.
त्याकरिता आपण आपली भूमिका स्पष्ट मांडली पाहिजे.
होय , त्यासाठी आई कडून आशिर्वाद घेऊन आत्म तत्व काय आहे, त्याचं शिक्षण झाले तर मला तुम्हांला माहिती मिळेल अशी एक देवता जी विद्या सरस्वती आहे तिच्याकडून जाणकारी प्राप्त होते . मानवाला कान नाक डोळे तोंड पाय त्वचा आदि सजग संवेदनशील असे मिळाले आहेत. त्याद्वारे आपल्याला जाणकारी ओळख करून देण्यात हे मन मेंदू मनगट मजबूत करावे लागते. विद्या सरस्वती ही काया मने वाचे आपणांस उघड्या डोळ्यांनी शिक्षण देते. या निसर्गातील पशुपक्षी कीटक झाडे वनस्पती वनराई तसेच हे डोंगर दर्यां निर्झर धबधबे जलप्रवाह नदी ओहळ सागर आकाश आदि द्वारे शिक्षण उपलब्ध आहे. हे उद् भव पाहून ओळख ही दृढ विश्वासाने कायमदायम होते आणि मनी समर्थपणे रूजते. कारण देवाचेच देणं जे वर्तमान आज ही आहे पूर्वीही होते व निसर्ग पुढेही तेच चालू ठेवेल. कारण कणाकणात देवकणांची ऊर्जा ताकद शक्ति बळ अजर अमर आहे हा विश्वास आहे.
हे सुज्ञानी लोक जाणतात आणि मग हे विज्ञान नियमांचा आधार घेत आपले कौशल्य वाढीस लागते. हे एकच एक तत्व दृढ आहे तर मग आपण विवेक विचारधारा जपुन काही मिलवर्तन परिवर्तन घडवून आणू शकतो . हा विश्वास स्थिरमनाचा भाग माणसाला स्वस्थ कसा बसू देईल . जर निसर्ग कायमदायम समर्थपणे आपले चक्र सुरू ठेवतोय तर माझी निरिक्षणे नोंदवली पाहिजेत व बदल करता येणार अशी बुद्धी त्यांनेच दिली आहे. तिचा वापर करून मला प्रतिसाद मिळतोय का याचा विचार मागोवा हे ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञान हे प्रज्ञान एकमेकांना पूरक होईल ही जिज्ञासा जागी झाली. यात आर्तता आहे व अर्थार्जन ही आहे . मग आपले ज्ञान तेजाचे प्रतीक हे झळकले पाहिजे अशी निर्मल ओढ लागली.
ही आर्तता आर्थार्थी जिज्ञासू वृत्तीने ज्ञानी बनली तरच मिलवर्तन एक सद्भाव सद्विचार पुढे परिवर्तन घडुन येईल ही खात्री झाली. यातूनच नवविधा भक्ती भाव मिळत गेला .आणि माणूस या वर्तमानी सर्वोत्तम प्रेम कामगिरी करत एकनिष्ठ राहण्याची किमया साधताना तहानभूक विसरला . उपासतापास सुरू झाले . व्रतवैकल्ये साधनं समोर आली. एक नवीन दृश्य पाहून आनंदित वृत्तीने सर्व मनोकामना संकल्प कृतिशील वाटचालीने निश्चितच पूर्ण होतील हे जाणून तो हरीला भजू लागला . आता हरी हा व्यथा दूर करणारा , हर्ता कर्ता करविता आहे .ही मूळ माऊली आई आहे .आणि आत्मा ईश्वरी देहादेही एक तत्व दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी...अशी ही आठवण ...कधी विसर ना व्हावा...संतसंग देई सदा ...असा भाव... भाव तोचि देव भावेविण देव न कळे नि :संदेह ... ही भावना स्थिर झाली , आणि हृदयांहृदयी हा अंश देवकणं प्रत्येक मानवी हृदयांत
लपला आहे तोच आत्मा हा पांडुरंगाचा एक अंश आहे त्यालाच आपण सतत सक्रीय सहभाग घेऊन कार्यप्रवण करण्यासाठी सतत ध्यानी मनी जागृती स्वप्नी नामामृताने अंभ्यग्यस्नान घालावे लागेल . भजन पूजन कीर्तन सत्संग सेवेने हा अंश चमकदार बनतो व मुखकमलावर एक गोड तेज येते . असा चैतन्य लावण्याचा गाभा प्रकाशित राहील हे पाहिले पाहिजे. आयुष्याचा ताणाबाणा बुनियाद विणं ही रेशीम वस्त्राप्रमाणे मजबूत व्हावी . हातात काम मुखाने राम..
हे विठ्ठल, विठ्ठल जय हरी नाम अमृत कुपी साधुसंतांना सापडली .
म्हणून तो हा विठ्ठल बरवा,तो हा माधव बरवा करीत पायी वारी करत आहे कारण तो देव एक करूनी घ्यावा, त्याशिवाय सुख समाधान नाही. ही खात्री आहे की, विटेवरचा पांडुरंग हा वाटसरूंना , चुकलेल्या लोकांना , थकलेल्या जीवाला, असाह्य वेदनांना पळवून लावणारा तसेच आंधळ्या पांगळ्यांना ही डोंगर पार करायला बळ देतोय ,असा विश्वास वाटतो.
आणि म्हणूनच जनजागृती व्हावी यासाठी समर्पित भावनेने सेवा देणारे सत्यार्थी भावार्थी आपल्यात सामावून घेत मनं जोडण्याची किमया साधत ही आषाढी एकादशी निमित्त जी वारी आहे तिला एक आगळं वेगळं महत्त्व आहे, देवशयनी एकादशी या व्रताचा ही महिमा आहे, तुझे नाम घेता देवा होई समाधान...असं ते प्रेमानं जगणं सुंदर करीत पुढे वाट चालत आहे.सर्व दुःख यातना सहन करत तो भजनात किर्तनात एकरसी एकनिष्ठ एकजीवी दैदिप्यमान प्रेम कामगिरी विश्वासाने पार पाडतो आहे.. कारण विठ्ठल मी पाहिला... आजि सोनियाचा दिनु, वर्षे अमृताचा घनु, हरि पाहिला रे हरि पाहिला रे, सबाह्य अभ्यंतरी व्यापक हा मुरारी...
वि म्हणजे विनाश ना होणारा अटळ अजर अमर अखंड एकच एक जो विशुद्ध आहे..
ठ्ठ म्हणजे जिकडे तिकडे चोहीकडे मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश असा ठासून भरलेला
ल म्हणजे ज्याला अंत लय नाही असा...हा पांडुरंग
तो पूर्ण अंश प्रभु परमात्मा आहे..
वारी वारी जन्ममरणांते वारी,हारी पडलो आता संकट निवारी !!!
या वर्तमानी सर्वोत्तम प्रेम कामगिरी आहे आणि म्हणूनच या वारीत .... १. कुणालाही निमंत्रण नाही
२. कुठलीचं भंपकबाजी नाही.
३.कोणाचा कोणावर राग रूसवा नाही
४. कोण खायला घालेल की नाही हे माहित नाही
५.खिशात एक रूपया या दमडीची गरज नाही
६.कुठेही गालबोट लागत नाही
७.इहलोकी एवढां मोठा सोहळा जगाच्या पाठीवर कुठेही नाही
८. कोठेच कुणाजवळ गर्वाचा किंवा अहंकाराचा लवलेश नाही
९. असा नेत्रदिपक सोहळा , ऊर भरून आनंद प्रसन्नता लाभणारा सोहळा
१०. श्रीमंतच नाही तर गर्भश्रीमंतीचा सोहळा,कुबेराला ही लाजवेल असा दिमाखदार सोहळा
११. हा सगळा वारीचा अट्टाहास का ?
तर फक्त....
मुख दर्शन व्हावे आता,
तू सकळं जनांचा दाता ||
घे कुशीत या माऊली तुझ्या
पायरी ठेवीतो माथा. !!!
या आषाढी एकादशीच्या दिवशी आपले मन नमन करून सहजतेने विशालतेकडे पहात ... देवा तूचि गणेशु, सकलार्थ मति प्रकाशु... भला करो कर्तार,सबका सबविधी हो कल्याण !!!
दुरितांचे तिमीर जावो,विश्व स्वधर्म सूर्ये पाहो ...
जो जो वांछिल ते ते लाहो सकळ प्राणिजात !!
विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय जय राम कृष्ण हरी !!
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही