Topic icon

पैसा

0
श्री गणेशाय नमः 
ॐ श्री हरी 

ॐ नमोजी आद्या | वेदप्रतिपाद्या | जय जय संवेद्या |  
 देवा तूचि गणेशु सकलार्थ मति प्रकाशु म्हणे निवृतिदासु जो जी अवधारी जी |

प्रश्न असा आहे की त्याला उत्तर नाही असे होणार नाही.
मानवाची निर्मिती कशी झाली.. याला इतिहास साक्षी आहे.
सर्व जन्माच्या शेवटी मनुष्य जन्म पावे पोटी याउपरी उत्तम किरिटी मी रचिली नाही...
आता या जन्मी तरी साधी नारायण नाहीतर हीन पशुहून...
निद्रा भोजन भोग भय यह पशु पूरक समान  |
ज्ञान अधिक एक नरन में, ज्ञान बिना पशु जान  ||
मनुष्य जन्म, मनुष्य स्वभाव, माणसाला दोन मने, संवेदना, एकत्र येणं ,बसणं , आधार घेणं देणं , भूख भागवणं , निद्रा घेणं  ,भय दूर  करणं , प्रेम प्रेरणा विवेकी विचार विश्वास स्थैर्य यासाठी सहवास संवाद चर्चा करत हे मानवी जीवन जगण्याचा सतत सक्रीय प्रयत्न झाला आणि तशीच ही वाटचाल सुरू आहे हे लक्षात येते. ....
या जन्मावर शतदा प्रेम करावे....
असे उद्बोधन प्रबोधन प्रवचन कीर्तन आख्यान व्याख्यान होतच असतात. जीवनपद्धती वर टिका टिप्पणी निंदानालस्ती द्वैषवैर मनी बाळगून हिंसा ही होते. 
जीवन म्हणजे काय ? अखंड जनजागृती सुरू आहे 
तरीही माणसाला माणूस प्रिय असावा की नाही ? पण काहीजन निंदानालस्ती द्वैषवैर मनी बाळगून जीवन व्यतीत करत आहेत.
 माणुसकी धर्म वाढवत रहावा यासाठी अनेक संतवचने गुरूवचने सांगितले जातात. तिचे पालन करावे लागेल.
संत ना होते जगतमें तो जल मरता संसार.
सद्गुरू येत असे या जगती सुखमय करण्यासी संसार...
हे सत्कृत्य आचरण नीतीत उतरणारा जीवभाव सर्वांठायीं असावा असे वाटते. 
नीती अनीतीच्या सर्व बाबी विचारात घेऊन राज्यशकट करावे लागते. हे जरी खरे असले तरी माणसाला माणसासारखे वागवावे . माणूस प्रथम ... त्यामुळे सेवा महान आहे. देवांचा देव ही करतो भक्तांची चाकरी ...हा विश्वास स्थिरमन दृढतेचा दाखला आहे.
हे वर्तमान समोर आहे. आजची परिस्थिती वस्तुस्थिती पाहता मानवी जीवन आत्मज्ञानानं भरून टाकतील अशी निर्मल सेवा अमृता सारखी गोड कार्यपद्धती कार्यप्रणाली विकसित करण्यात यावी .
परंतु माणसं डोळस असूनही वाट भरकटत आहेत.
उघडा डोळे बघा नीट...ही आजची परिस्थिती काय आहे ?
नेतेमंडळी ही अराजकता निर्माण कशी होईल व काही सत्तापिपासू बनून जीवनचक्रास अवरोध निर्माण करत आहेत.
आपण सुजाण नागरिक म्हणून परिवर्तन मिलवर्तन घडवून आणलं पाहिजे.
योग्य जाणीवेतून सुंदर कामगिरी करत एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली पाहिजे.
पैसा सत्ता या बाबी गौण आहेत. मनुष्य स्वभाव सद्गुणांची खान आहे ते आचार विचार उच्चार यांनी जीवन वस्त्र तुणले पाहिजे. बहोत सुकृताची जोडी तेणें विठ्ठली आवडी....असे सुकृत कर्म उभे राहिले तर हे ..रुप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी..असं सुंदर दर्शन होईल.
जीवन सुंदर आविष्काराने प्रकट करता येते .
आणि म्हणूनच कथा व्यथा रामायण महाभारत या गोष्टींचे भान नभाएवढं ठेवून माणुसकी धर्म जोपासला जावा .तरच आजचं वास्तव यथार्थ दर्शन होत जाईल. 
चांगल्याला चांगलं म्हणण्याची पद्धत मानविय सद्गुणांनी युक्त रहावी .
माणसाला प्रेम प्रेरणा नम्रता सहनशीलता करूणा दया क्षमा शांती शिस्त समाधान अंगी सद्गुणांची दिव्य रास जपता आली पाहिजे.
हे जीवन पुन्हा , पुन्हा नाही.
सातत्याने प्रबोधन होऊन ही मनाची मानसिकता अतिशय काळंवडली गेली आहे.हे कां असं व्हावं. नरेचि केला हीन किती नर ...माणूसच कारणीभूत आहे.
कोणाचाच कोणावरही विश्वास उरलेला नाही.
सारे मुखवटे घालून षडयंत्री पाताळयंत्री बनलेत, त्यांच्या या कटकारस्थानी धोरणांमुळे हे घातक विष पसरविण्याचे काम होत आहे.
 माणसाला आपले हित कळावे , त्यास स्थिरता विशालता आनंद प्रसन्नता शांतता तत्परता समाधान सुख कशात आहे हे लक्षात येत नाही.
आणि मग काय करू आणि काय करु नये ही संदिग्धता निर्माण झाली आहे.
एक तत्व दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी ही आठवण देखील होत नाही.
या वर्तमानी सर्वोत्तम प्रेम कामगिरी करायची आहे हे सत्कृत्य आचरण नीतीत उतरणारा जीवभाव सर्वांठायीं असावा असे सुकृत कर्म उभे रहावे.
सध्या संवेदना या बोथट झाल्या आहेत.
 आपणांस स्थिरता प्रगल्मता विकास गती हवी आहे आणि ती मिळावी म्हणून प्रामाणिक प्रयत्न आवश्यक आहेत.
आठवावे ते रूप आठवावा तो प्रताप ....हे सत्कृत्य साक्षेपी हवेच हवे . धन्यवाद जी. 






उत्तर लिहिले · 29/7/2024
कर्म · 475
0
व्यापार केला
उत्तर लिहिले · 11/10/2023
कर्म · 0
2




पैसा : विनिमयाचे माध्यम म्हणून स्वीकारण्यात येणारी सर्वमान्य वस्तू म्हणजे पैसा. आधुनिक अर्थव्यवस्था श्रमविभागणी व देवघेव ह्यांवर आधारलेली आहे. उप्तादक घटकांचा मोबदला देण्याकरिता, कर्जाचे व्यवहार पुरे करण्याकरिता पैशाचा उपयोग केला जातो. वस्तू किंवा सेवा यांची देवघेव सर्वमान्य विनिमय माध्यमाद्वारे होण्यापूर्वी वस्तूंची किंवा सेवांची प्रत्यक्षपणे देवघेव होत असे. मीठ देऊन कापड घेणे, गवंडीकामाचा मोबदला धान्याच्या रूपात देणे अशा पद्धतीचे वस्तुविनिमयावर आधारलेले व्यवहार प्रगत मानवजातीस गैरसोयीचे वाटू लागले. त्यानंतरचा टप्पा म्हणजे विनिमयाचे माध्यम म्हणून एखादी वस्तू वापरणे. पिसे, हाडे, धान्य, हत्तीचे दात, वाघाचे कातडे, मेढी, घोडे, हत्ती आदी वस्तूंचा आणि जनावरांचा जगाच्या विविध भागांत विनिमय माध्यम म्हणून उपयोग करण्यात येत असे. पैशाच्या उत्क्रांतीमधील पुढील टप्पे म्हणजे नाणी, कागदी चलन आणि पतपैसा हे होत. नाणी व कागदी चलन सरकारमान्य पैसा होय. बँकनिर्मित पतपैशाचा देवघेवीचे साधन म्हणून उपयोग होत असला, तरी त्यास सरकारी पाठबळ नसते. त्यामुळे तो स्वीकारलाच पाहिजे असे कायदेशीर बंधन नसते.

पैशाची कार्ये
विनिमयाचे माध्यम म्हणून पैशाचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. पैसा सर्वग्राह्य असल्याने वस्तूंची आणि सेवांची खरेदीविक्री पैशाच्या माध्यमाद्वारे सुलभपणे होते. मूल्यमापनाचे साधन हे पैशाचे दुसरे महत्त्वाचे कार्य होय. दैनंदिन व्यवहारांतील शेकडो वस्तूंच्या व विविध सेवांच्या किंमती ठरविण्याचे साधन म्हणून पैशाचा उपयोग होतो. पैसा विलंबित देणी देण्याचे साधन म्हणून कार्य करतो. रोखीचे व्यवहारच नव्हे, तर पूर्वी केलेले व्यवहार पुरे करण्यासाठी किंवा वर्तमानकाळात केलेले व्यवहार भविष्यकाळात पुरे करण्यासाठी पैशाचा उपयोग होतो. पैशाच्या या गुणामुळे दीर्घमुदतीचे व्यवहार करणे शक्य आणि सुलभ होते. संपत्तीचा साठा करण्याचे साधन म्हणून पैशाचा उपयोग होतो. पैशामध्ये खरेदीशक्ती असते. तीमुळे वस्तू व सेवा पैशाच्या साहाय्याने खरेदी करून त्यांचा साठा करण्यापेक्षा पैशाच्या स्वरूपातच संपत्ती ठेवली, तर त्या शक्तीचा केव्हाही उपयोग करता येतो. संपत्तीचे हस्तांतर करणे पैशामुळे सोपे होते.


पैशाची कार्ये
पैसे चार कार्य करतो. मध्यस्त, मोजमाप, परिमाण आणि साठवणूक. यातील पैशाचा 'माध्यम म्हणून वापर' व 'साठवणुकीचे साधन' ही दोन कार्ये एकमेकांच्या विरुद्ध जातात. महागाई असेल, तर पैशाचे साठवणुकीचे माध्यम म्हणून महत्त्व कमी होते. मग लोक इतर मार्ग जसे सोने, स्थावरजंगम मालमत्ता असे वेगळे पर्याय चोखाळतात.
पैशाची व्याख्या
पैसा तो, जो तो करतो ते (money is what money does) अशी पैशाची कार्यकारी व्याख्या केली जाते. या व्याख्येनुसार, अर्थशास्त्रात व्यापक अर्थाने सर्व वित्तीय साधनांना (उदा. चलन, मुदत ठेवी) पैसा म्हणता येईल. बाजारातील पैशाचा पुरवठा म्हणताना या सर्वच वित्तीय साधनांचा त्यामध्ये समावेश होतो. या सर्व पैशाला मिळून पैशाचा प्रवाह (monetary aggregate) असे म्हटले जाते..

अठराव्या शतकात जॉन स्ट्यूअर्ट मिलने आपल्या पोलिटिकल इकॉनॉमी या ग्रंथात या सिद्धांताचा उल्लेख केला असला, तरी बीजगणितातील समीकरणाच्या साहाय्याने सिद्धांताची नेमकी मांडणी अर्व्हिंग फिशर या अमेरिकन अर्थशास्त्रज्ञाने केल्यामुळे त्या सिद्धांताशी त्याचे नाव निगडित झाले आहे. फिशरच्या म्हणण्याप्रमाणे वस्तूंचा पुरवठा कायम राहिला आणि चलनातील पैसा दुपटीने वाढला, तर वस्तूंच्या किंमती दुप्पट होतात आणि पैशाचे मूल्य निमपट होते; तसेच चलनातील पैसा निमपट झाला, तर वस्तूंच्या किंमतीही निमपट होतात आणि पैशाचे मूल्य दुप्पट होते. फिशरच्या मते अन्य वस्तूंचे मूल्य जसे त्या वस्तूला असलेली मागणी व त्या वस्तूचा पुरवठा यांवरून ठरते, त्याप्रमाणे पैशाचे मूल्यदेखील पैशाला असलेली मागणी आणि पैशाचा पुरवठा यांवरून ठरते. वस्तू व सेवा यांच्या खरेदीविक्रीसाठी पैशाची मागणी केली जाते. वस्तूंचा पुरवठा स्थिर राहिला म्हणजे पैशाला असलेली मागणीही स्थिर राहते. सारांश, पैशाचे मूल्य पैशाच्या पुरवठ्यावरून म्हणजे द्रव्यराशीवरून ठरते. फिशरच्या या विवेचनास ‘रोख व्यवहार दृष्टिकोण’असेही म्हटले जाते. फिशरचा दृष्टिकोण पिगू, मार्शल, रॉबर्टसन आदी केंब्रिज अर्थशास्त्रज्ञांना मान्य नाही. त्यांच्या मते लोक पैशाची मागणी करतात, ती वस्तूंची खरेदी करता यावी म्हणून नव्हे. पैशाची मागणी प्रामुख्याने मूल्यसंचयासाठी केली जाते. रोख पैसा जवळ बाळगणे म्हणजे पर्यायाने वस्तू व सेवा जवळ बाळगणे होय. लोक रोख पैसा तीन कारणांसाठी जवळ बाळगतात. दैनंदिन व्यवहार पार पाडण्यासाठी, भविष्यकाळात उद्‌भवणाऱ्या संभाव्य अनपेक्षित अडचणींना तोंड देण्यासाठी आणि सट्टेबाजीच्या हेतूसाठी लोकांना पैसा हवा असतो. पैशाचे मूल्य हे पैसा रोख स्वरूपात ठेवण्यासाठी लोकांची जी पैशाला मागणी असते तीवर अवलंबून असते. लोकांनी आपल्याजवळील द्रव्यसंचय वाढविण्याचे ठरविले, तर वस्तूंच्या खरेदीविक्रीवरील खर्च कमी होईल. परिणामी वस्तूंच्या किंमती खाली येतील, म्हणजेच पैशाचे मूल्य वाढेल. उलटपक्षी लोकांनी आपल्याजवळ कमी प्रमाणात पैसा बाळगण्याचे ठरविले, तर वस्तूंच्या खरेदीविक्रीवरील खर्च वाढेल, वस्तू महागतील आणि पैशाचे मूल्य घटेल. केंब्रिज अर्थशास्त्रज्ञांच्या या विवेचनास 'रोकड शिल्लक सिद्धांत' असेही म्हणतात.

केन्सने फिशर आणि केंब्रिज अर्थशास्त्रज्ञ या दोघांच्या दृष्टिकोणांवर कडाडून टीका केली. प्रारंभी त्याने केंब्रिज दृष्टिकोणाचा पाठपुरावा केला;परंतु १९२९ च्या महामंदीमुळे सनातन द्रव्यराशी सिद्धांताच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आणि केन्सने आपले विश्लेषण पुन्हा पारखून घेतले. पैशाच्या पुरवठ्याचा आणि किंमतींतील बदलाचा संबंध इतका प्रत्यक्ष व सहज नसतो, असे केन्सने दाखवून दिले. केन्सला पूर्ण रोजगारीचे गृहीतकृत्य मान्य नाही. त्याच्या म्हणण्याप्रमाणे पूर्ण रोजगाराची पातळी गाठली जाईपर्यंत पैशाच्या पुरवठ्यातील वाढ वस्तूंच्या उत्पादनात वाढ घडवून आणील आणि त्यानंतर मात्र किंमती वाढू लागतील. ही प्रक्रिया एकदम घडून येणार नाही, टप्प्याटप्प्याने येईल. पैशाचा पुरवठा वाढला की व्याजदर खाली येईल, गुंतवणुकीस प्रोत्साहन मिळेल, उत्पादन वाढेल, अर्थव्यवस्था हळूहळू पूर्ण रोजगारीची पातळी गाठण्याचा प्रयत्न करील. दरम्यान देशातील उत्पादन खर्च वाढेल आणि मग किंमती वाढू लागतील, असे केन्सने म्हटले आहे. पैशाचा पुरवठा वाढला किंवा पैसे अधिक प्रमाणात खर्च होऊ लागले, की लागलीच भाववाढ होत नाही. ही प्रक्रिया इतक्या सहजासहजी घडून येत नाही, यावर केन्सने भर दिला आहे.

केन्सने अधिक खोलवर जाऊन किंमती मुळात का वाढतात किंवा घसरतात, याचा शोध घेतला आहे. लोकांचे उत्पन्न वाढले वा कमी झाले म्हणजेच क्रयशक्तीत बदल घडून आला की, मागणीत चढउतार होतात आणि त्यांचा वस्तूंच्या किंमतीवर परिणाम होतो. उत्पन्नाची पातळी कायम राखण्याकरिता समाजाची बचत व गुंतवणूक समान असली पाहिजे. कोणत्याही कारणाने गुंतवणूक बचतीपेक्षा कमी झाली, तर राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी घसरते, रोजगारी कमी होते आणि किंमती खाली येऊ लगतात. याउलट गुंतवणुकीचे प्रमाण बचतीहून जादा असेल, तर उत्पन्न व रोजगारी वाढते, समाजाची क्रयशक्ती वाढते आणि किंमती वर जातात. किंमतींची पातळी स्थिर राखण्यासाठी द्रव्यराशी सिद्धांतावर आधारलेल्या चलननीतीपेक्षा उत्पन्न-खर्च सिद्धांतावर आधारलेली राजकीय नीती अधिक प्रभावी ठरते, असे केन्सने दाखवून दिले आहे. अर्थशास्त्रीय विचारांवर केन्सच्या विश्लेषणाचा पगडा बराच काळ होता. १९६०च्या सुमारास शिकागो विद्यापीठात सनातन सिद्धांताला पुन्हा उजाळा मिळाला आहे. नोबेल पारितोषिक विजेते मिल्टन फ्रीडमन यांनी या बाबतीत पुढाकार घेऊन पैशाचा पुरवठा आणि किंमतींची पातळी यांमधील अन्योन्य संबंधांवर बोट ठेवले आहे. द्रव्यराशी सिद्धांताकडे सिद्धांत म्हणून न पाहता एक दृष्टिकोण म्हणून पाहिले पाहिजे, असे त्यांनी सुचविले आहे.

 

 


उत्तर लिहिले · 25/1/2023
कर्म · 48555
0
पैसा विनिमयाचे माध्यम आणि मूल्यमापनाचे साधन ही प्राथमिक कार्यों करतो. (२) पैसा विलंबित देणी देणे, मूल्यसंचयन करणे आणि मूल्य हस्तांतरण करणे ही दुय्यम कार्ये करतो.




ब) पैशाची दुय्यम कार्ये :

पैशाच्या प्राथमिक कार्याव्यतिरिक्त जी कार्ये आहेत, त्यांना दुय्यम किंवा सहाय्यक कार्ये असे म्हणतात. पैशाच्या दुय्यम कार्यामध्ये पुढील कार्याचा समावेश होतो.

१. मूल्य संग्रहाचे साधन म्हणून कार्य करणे: पैसा हे मूल्यसंग्रहाचे महत्त्वाचे साधन मानले जाते. वस्तू किंवा संपत्तीपेक्षा पैशाच्या स्वरूपात संपत्ती संग्रहित करणे अतिशय उपयुक्त ठरते. पैशामध्ये खरेदीशक्ती क्षमता असल्याने कोणतीही वस्तू अगर सेवा आपणास घेता येते. शिवाय पैशामध्ये रोखता हा गुणधर्म असल्यामुळे धनसंचय किंवा पैसा संग्रही करणे. भविष्यकालीन तरतूद म्हणून नेहमीच हितावह ठरते. म्हणूनच लोक पैसा साठवून ठेवतात.

२. विलंबित देणी देण्याचे महत्त्वाचे साधन : पैसा हे विलंबित देणी भागविण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. आधुनिक काळात प्रत्येक अर्थव्यवस्थेत उत्पादन, उपभोग, वाटप इत्यादी क्षेत्रात व्यापारी व उपभोक्ते यांच्यामध्ये रोखीच्या व्यवहाराबरोबरच उधारीचे व्यवहार नेहमीच चालतात. असा उधारीवर घेतलेल्या मालाचे अगर वस्तूंचे पैसे भविष्यकाळात केवळ पैशाच्या साहाय्यानेच परत करता

७येतात. उद्योग, व्यवसाय अगर शेतीत कर्जावू घेतलेले पैसे परत करण्याचे एक साधन म्हणजे पैसा होय. थोडक्यात, आधुनिक बँकांच्या प्रधान कार्याशी निगडीत असे हे कार्य मानता येईल.

३. संपत्ती किंवा मूल्यांचे हस्तांतर करणे: पैशाच्या साहाय्याने आधुनिक काळात संपत्तीचे हस्तांतर शक्य होते. समाजात अनेक व्यक्ती आपले घर, जमीन, वाहन विकून पैसे प्राप्त करतात. इतकेच नव्हे अशा प्रकारे एका ठिकाणच्या मालमत्तेची विक्री करून दुसऱ्या ठिकाणी तशा प्रकारची मालमत्ता खरेदी करणे, केवळ पैशामुळेच शक्य होते. म्हणूनच आधुनिक काळात आर्थिक विकास प्रक्रियेत संपत्ती स्थलांतर व त्यायोगी समाजाचा सर्वांगीण विकास घडून येतो. म्हणून पैशाचे मूल्यांच्या हस्तांतरणाचे कार्यही अत्यंत महत्त्वाचे आहे, असे आपणास म्हणता येईल.
उत्तर लिहिले · 11/1/2023
कर्म · 48555
0
पैसा म्हणजे
पैसा : विनिमयाचे माध्यम म्हणून स्वीकारण्यात येणारी सर्वमान्य वस्तू म्हणजे पैसा. आधुनिक अर्थव्यवस्था श्रमविभागणी व देवघेव ह्यांवर आधारलेली आहे. उप्तादक घटकांचा मोबदला देण्याकरिता, कर्जाचे व्यवहार पुरे करण्याकरिता पैशाचा उपयोग केला जातो.

पैशाची कार्ये
विनिमयाचे माध्यम म्हणून पैशाचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. पैसा सर्वग्राह्य असल्याने वस्तूंची आणि सेवांची खरेदीविक्री पैशाच्या माध्यमाद्वारे सुलभपणे होते. मूल्यमापनाचे साधन हे पैशाचे दुसरे महत्त्वाचे कार्य होय. दैनंदिन व्यवहारांतील शेकडो वस्तूंच्या व विविध सेवांच्या किंमती ठरविण्याचे साधन म्हणून पैशाचा उपयोग होतो. पैसा विलंबित देणी देण्याचे साधन म्हणून कार्य करतो. रोखीचे व्यवहारच नव्हे, तर पूर्वी केलेले व्यवहार पुरे करण्यासाठी किंवा वर्तमानकाळात केलेले व्यवहार भविष्यकाळात पुरे करण्यासाठी पैशाचा उपयोग होतो. पैशाच्या या गुणामुळे दीर्घमुदतीचे व्यवहार करणे शक्य आणि सुलभ होते. संपत्तीचा साठा करण्याचे साधन म्हणून पैशाचा उपयोग होतो. पैशामध्ये खरेदीशक्ती असते. तीमुळे वस्तू व सेवा पैशाच्या साहाय्याने खरेदी करून त्यांचा साठा करण्यापेक्षा पैशाच्या स्वरूपातच संपत्ती ठेवली, तर त्या शक्तीचा केव्हाही उपयोग करता येतो. संपत्तीचे हस्तांतर करणे पैशामुळे सोपे होते.


पैसाची व्याख्या 
पैसा ही आर्थिक देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून सर्वसाधारण संमतीने स्वीकारलेली वस्तू आहे . हे एक माध्यम आहे ज्यामध्ये किंमती आणि मूल्ये व्यक्त केली जातात. हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आणि देशातून दुसऱ्या देशात फिरते, व्यापार सुलभ करते आणि हे संपत्तीचे प्रमुख उपाय आहे.
उत्तर लिहिले · 4/1/2023
कर्म · 48555
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही