व्यायाम

वजन कमी करण्यासाठी योग्य व्यायाम?

3 उत्तरे
3 answers

वजन कमी करण्यासाठी योग्य व्यायाम?

1
उत्तर लिहिले · 22/3/2024
कर्म · 40
1
वजन कमी होण्याचे वयाम

उत्तर लिहिले · 19/9/2023
कर्म · 20
0

खर सांगायचं म्हणजे मी काहीं तत्वनेता नाही, 
फक्त माझ्या वाचनात आले त्या अनुभवावरून सांगतो.

कोणाचेही वजन एक दोन दिवसात वाढलेले नाही,
त्यामुळे वजन कमी करणे एक दोन दिवसात होणार नाही. त्यासाठी योग्य वेळ कालावधी द्यावीच लागते.

त्यात पण सातत्य ठेवावे लागते.
नियमित कोणताही कसलाही व्यायम अथवा अन्य काही कसरत करा.


1) चालणे 2) धावणे 3) खेळ खेळणे 4)पोहणे 
5) गड किल्ले चढने 6) डान्स 7) योगासने 8)दोरीवरच्या उड्या 9) सायकलिंग (सायकल चालवणे)  10) आहारावर नियंत्रण 

सुरुवत थोडी थोडी करा.  10 मिनिट, 15 मिनिट,
 नंतर सराव झालं तर जास्त वेळ द्या 20 मिनिट, 30 मिनिट, एक तास, दोन तास

चालने : दररोज एक तास चालण्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते. चालणे हा एक असा व्यायाम आहे ज्यामध्ये आपल्याला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची गरज लागत नाही. चालताना मन शांत आणि मुड चांगला करण्यासाठी आपण गाणे देखील ऐकू शकतो.

धावणे
 सुरुवातीला फक्त काही दिवस चालण्याचे काही दिवस चालल्यानंतर, धावणे किंवा जॉगिंगचा समावेश केला जाऊ शकतो. वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना धावणे हा व्यायामाचा एक उत्तम पर्याय आहे असे मानले जाते. धावण्याचे संपूर्ण शरीरावर विविध प्रकारचे परिणाम होतात आणि त्वरीत कॅलरी बर्न करून वजन कमी करण्यात मदत होते. सांख्यिकी दर्शविते की अर्ध्या तासाची धाव साधारणपणे २९५ कॅलरीज पर्यंत बर्न करू शकते.

खेळ : कुढल्याही प्रकारचा खेळ खेळल्याने आपल्या शरीराचा व्यायाम होतो. त्यामुळे आपण तंदुरुस्त राहू शकतो. परंतु सध्याच्या जीवनशैलीमध्ये आपल्याकडे खेळण्यासाठी वेळच राहिला नाही. मात्र, वेळ काढून आपण क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल सारख्या खेळ खेळले पाहिजेत. यामुळे तुमची मनःस्थिती चांगली राहते आणि तुम्ही तंदुरुस्त राहता.

पोहणे : जर आपल्याला पोहायला येत असेल तर आपण दररोज अर्धा तास तरी पोहले पाहिजे. पोहणे हा एक चांगला व्यायाम आहे. यामुळे तुमचे वजन वेगाने कमी होईल.


पुश-अप: ही आणखी एक कसरत आहे जी तुम्हाला वजन कमी करण्यात मदत करू शकते. पुश-अपमुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि स्नायूंच्या ताकदीव्यतिरिक्त लठ्ठपणा कमी होतो असे मानले जाते. म्हणून, असा दावा केला जाऊ शकतो की ही प्रक्रिया सातत्याने वापरल्याने वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना मदत होऊ शकते.

झुम्बा : आजकाल झुम्बाचा व्यायाम करण्यावर अधिक भर दिला जातो. झुम्बा केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. झुम्बा आपण कोणत्याही वेळला करू शकतो.

दोरीवरच्या उड्या : जर आपण घराबाहेर जाऊन व्यायाम करू शकत नसतोल तर आपण दोरीवरच्या उड्या मारून वजन कमी करू शकतो. दोरीवरच्या उड्यांमुळे वजन कमी होण्यास मदत होते.

उत्तर लिहिले · 19/9/2023
कर्म · 7440

Related Questions

मी कितीही विचार केला तरी मला कधीच सातत्य ठेवता येत नाही.ना अभ्यासाला,ना व्यायामाला काय करू मी?
घरच्याच कामातून व्यायाम होतो, मग योगा कशाला करावा?
दररोज किती तास व्यायाम करावा?
सायकल वापरण्याचे विविध फायदे कोणते आहे?
तो व्यायाम करीत?
तो व्यायाम करतो .या वाक्याचे रीती भूतकाळ कसे कराल?
तो व्यायाम करीत असे या वाक्याचा काळ कोणता असेल?