व्यायाम घर

घरच्याच कामातून व्यायाम होतो, मग योगा कशाला करावा?

3 उत्तरे
3 answers

घरच्याच कामातून व्यायाम होतो, मग योगा कशाला करावा?

0

घरच्याच कामातून व्यायाम होतो, मग योगा कशाला ? मैत्रिणींनो, असे अनेक योगाविषयीचे गैरसमज दूर करा...


"काय करावे बाई, घरीच एवढे काम असते की त्यातूनच आमचा मस्तपैकी व्यायाम होऊन जातो. मग कशाला पुन्हा योगाचा वेगळा क्लास लावायचा " अशा आशयाची चर्चा महिलांमध्ये नेहमीच रंगलेली दिसते. कामातूनच व्यायाम होतो, असे म्हणत अनेकजणी योगा करणे टाळतात. पण हा चुकीचा समज असून महिलांनी योगाविषयी असलेले असे अनेक गैरसमज त्यांच्या डोक्यातून काढून टाकण्याची गरज आहे.

घरच्याच कामातून व्यायाम होतो, मग योगा कशाला ? मैत्रिणींनो, असे अनेक योगाविषयीचे गैरसमज दूर करा...


महिलांनी अमूक आसन केले तर त्रास होईल, तमूक व्यायाम केला तर चुकीचे ठरेल, असे त्यांना वारंवार सांगितले जाते. पण असे कोणतेही गैरसमज मनात न ठेवता महिलांनी घराबाहेर पडून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास करावा.
प्रत्येक वयोगटातील महिलांना योगाभ्यासाची गरज आहे.
योगा करणे सोडून दिले तर वजन खूप पटापट वाढते, असा महिलांमध्ये असणारा समज अत्यंत चुकीचा आहे.
घरातली कामे करून दमून जाणे आणि वर्कआऊट किंवा योगा करून रिलॅक्स होणे, यातील फरक आजही बहुतांश महिलांना समजतच नाही. धुणे, भांडी करणे, फरशी पुसणे किंवा झाडू मारणे हे उत्तम व्यायाम प्रकार आहेत. त्यामुळे ही कामे नित्यनेमाने केली तर तुम्हाला कोणत्याच व्यायामाची गरज पडत नाही, असे वारंवार आपल्या घरातल्या वयस्कर महिलांकडून आपण ऐकलेले असते आणि तेच कुठेतरी आपल्या डोक्यात अगदी घट्ट रूतून बसते. असे समजणे तर चुकीचे आहेेच, पण त्यासोबतच योगाविषयी महिलांच्या मनात असलेले इतर अनेक समजही किती चुकीचे आहेत, हे औरंगाबाद येथील योगतज्ज्ञ डॉ. चारूलता रोजेकर यांनी महिलांना समजून सांगितले आहे.



 

योगाविषयी महिलांच्या मनात असलेले गैरसमज
१. काम केल्याने आपोआपच योगा होतोकाम हाच योगाभ्यास हा समज अत्यंत चुकीचा आहे. घरातील कामे करून तुमचे शरीर थकते. त्यातून तुमचा कोणताही व्यायाम होत नाही. घरकाम करणे हे 'एर्क्झशन' आहे. त्यातून 'एक्सरसाईज' अजिबातच होत नाही. त्यामुळे काम करणे वेगळे आणि योगा करणे वेगळे.

२. पाळी सुरू असताना योगा करू नयेपाळीविषयी तर महिलांच्या डोक्यात कायमच वेगवेगळे गैरसमज असतात. पाळी सुरू असताना अमूक गोष्ट करू नये, तमूक गोष्ट टाळावी, अशा सुचनांचा आपल्यावर कायमच भडीमार होत असतो. याच सुचनांमधून निर्माण झालेला एक गैरसमज म्हणजे पाळी सुरू असताना योगा करू नये. याविषयी सांगताना डॉ. चारूलता रोजेकर म्हणाल्या की, पाळीत हलके- फुलके व्यायाम, योगासन करण्यास काहीही हरकत नाही. जास्त ब्लड फ्लो सुरू असेल, तर मात्र मासिक पाळीच्या काळात योगा करणे टाळावे. 


 

३. गरोदरपणात योगा नको गं बाई....हा महिलांच्या डोक्यात असलेला सगळ्यात मोठा गैरसमज. गर्भावस्थेत आपण स्वत:ला जपलेच पाहिजे. पण म्हणून शरीराला काहीच व्यायाम न होऊ देणे, हे देखील अगदीच अयोग्य आहे. गर्भसंस्कार केंद्रात गर्भवतींना विशेष योगाभ्यास शिकविला जातो. अनेकदा नॉर्मल डिलीव्हरी होण्यासाठी गर्भसंस्कार वर्गात घेतली गेलेली आसने व श्वसन प्रकारच उपयुक्त ठरले, असे अनेक महिलांचे म्हणणे आहे. गर्भावस्थेत योगाभ्यास केला तर गर्भाशयाचे मुख बंद होत नाही, हा देखील गैरसमज महिलांच्या डोक्यात असतो. पण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य व्यायाम केला, तर अशी कोणतीही समस्या निर्माण होत नाही. 



 

४. महिलांनी सुर्यनमस्कार घालू नयेसुर्यनमस्कार घालणे हे पुरूषांचेच काम, अशी अनेक महिलांची धारणा असते. पुरूषप्रधान संस्कृतीतून हे महिलांच्या मनात रूजविण्यात आले आहे. आजही अनेक महिलांचा यावर विश्वास आहे. पण सुर्यनमस्कार हा एक उत्तम व्यायाम असून तो ज्याप्रकारे पुरूषांसाठी फायदेशीर आहे, तसाच महिलांसाठीही आहे. त्यामुळे महिलांनी न बिचकता सुर्यनमस्कार घालावेेत.

५. गायत्री मंत्र म्हणू नयेगायत्री मंत्र महिलांनी म्हटले तर त्याचा त्यांच्या शरीरावर विपरित परिणाम होतो, असा एक गैरसमज आहे. तो महिलांनी आधी डोक्यातून काढून टाकावा. कोणत्याही मंत्रोच्चाराने मनाला शांती मिळते, मन एकाग्र करण्यास मदत होते. त्यामुळे योगाभ्यास करताना जर ध्यान करण्याआधी गायत्री मंत्र म्हणायला सांगितला तर महिलांनी अजिबातच टाळाटाळ करू नये. 




उत्तर लिहिले · 22/2/2023
कर्म · 51830
0
नक्की वाचा

घरातील काम केले म्हणजे व्यायाम झाला



उत्तर लिहिले · 22/3/2024
कर्म · 70
0

नमस्कार! घरच्या कामातून व्यायाम होतो हे खरं आहे, पण योगा करण्याचे अनेक फायदे आहेत जे घरच्या कामातून मिळत नाहीत.

योगाचे फायदे:
  • शारीरिक लवचिकता आणि ताकद: योगासनांमुळे शरीराची लवचिकता वाढते आणि स्नायू मजबूत होतात.

    (संदर्भ: National Center for Biotechnology Information - NCBI)

  • मानसिक शांती: योगामुळे तणाव कमी होतो आणि मानसिक शांती मिळते. प्राणायाम आणि ध्यानामुळे चित्त शांत होते.

    (संदर्भ: NCBI)

  • सुधारित श्वसन: योगासनांमध्ये श्वासावर लक्ष केंद्रित केले जाते, ज्यामुळे श्वसन प्रणाली सुधारते.

    (संदर्भ: Johns Hopkins Medicine)

  • एकाग्रता: योगामुळे एकाग्रता वाढते, ज्यामुळे कामे अधिक कार्यक्षमतेने करता येतात.
  • रोगप्रतिकारशक्ती: नियमित योगा केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
घरच्या कामातून होणारे फायदे:
  • शारीरिक हालचाल: घरच्या कामांमुळे शरीराची हालचाल होते, ज्यामुळे काही प्रमाणात व्यायाम होतो.
  • ऊर्जा वापर: कामांमुळे कॅलरीज बर्न होतात, ज्यामुळे वजन नियंत्रणात मदत होते.

योगा आणि घरकाम दोन्हीचे स्वतःचे फायदे आहेत. योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते, तर घरकामांमुळे शारीरिक हालचाल होते. त्यामुळे, केवळ घरच्या कामांवर अवलंबून न राहता योगा करणे अधिक फायदेशीर ठरू शकते.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 230

Related Questions

जुन्या घराच्या पायावर नवीन पत्राचे छत लावण्याचे काम करू शकतो का?
शेतामध्ये घरासाठी एन ए परवानगी लागते का? शेतामध्ये पोल्ट्री फार्म शेड, कांदा चाळ बांधायची आहे. त्यासाठी शेडची जमीन एन ए परवानगी घ्यावी लागेल का?
घराचे वारस कोण असू शकते?
घराच्या चारी बाजूने अतिक्रमण केले असेल तर कोणाकडे तक्रार करावी, नगरपालिका हद्दीत?
घराजवळ रोडवर बोर मारण्यासाठी कोणाची परवानगी काढावी लागते? ग्रामपंचायत परवानगी देईल का?
आजी म्हणजे कुटुंबाचं आगळं आणि घराचा आधार?
कौलारू घराच्या छपराचा उतार किती अंशाचा असतो?