व्यायाम

नियमित व्यायाम करण्याचे फायदे कोणते आहेत?

2 उत्तरे
2 answers

नियमित व्यायाम करण्याचे फायदे कोणते आहेत?

2


नियमित व्यायाम करण्याचे १० फायदे


“शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम” असे आपली वडीलधारी माणसे नेहमी आपल्याला सांगत असतात कारण व्यायामाने शरीर तंदुरूस्त राहते आणि मन ताजेतवाने राहते. व्यायाम हा आपला नित्यनेमाचा कार्यक्रम असला पाहिजे असे आपण अनेकवेळा शाळेतील पुस्तकात वाचले असेल आणि इतरही अनेक कार्यक्रमातून आपल्याला ऐकायला, वाचायला मिळत असते परंतु एवढे वाचून किंवा ऐकूनसुद्धा नियमितपणे व्यायाम करणाऱ्यांची संख्या समाजात कमीच आहे. पहाटे किंवा सकाळी लवकर उठून फिरायला जाणाऱ्या किंवा व्यायामाला जाणाऱ्या लोकांची संख्या ही एकूण लोकसंख्येच्या मानाने फारच कमी आहे असे दिसते. लोकांनी नियमितपणे व्यायाम करावा व त्यांना व्यायामाचे महत्व समजावे म्हणून व्यायामाचे १० प्रमुख फायदे या लेखात दिले आहेत.

1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते:
व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे शरीरातील वृध्दत्वाकडे जाणारी प्रक्रिया मंद होत असते. अशा व्यक्तींचे जीवन केवळ दीर्घच असते असे नव्हे तर ते तुलनात्मकरित्या वेदनांपासून मुक्त आणि अनेक प्रकारच्या पीडांपासून दूर असते.

2) नितळ त्वचा, चमकदार केस आणि निरोगी नखे:
व्यायाम करणार्‍यांच्या शरीरात रक्तप्रवाह वेगाने वाहत असतो आणि त्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम शरीरावर होतातच पण ते त्वचा, केस, आणि नखांवर प्रतिबिंबित होत असतात. नियमित व्यायाम करणार्‍यांचे केस भराभर वाढतात व त्याच्यावर उत्तम चकाकी असते. अशा व्यक्तींची त्वचा नितळ असते आणि नखांची वाढसुध्दा निरोगीपणे होत असते.

3) शरीरातील अवयवांचा एकमेकांशी उत्तम समन्वय साधला जातो:
आपल्या शरीरामध्ये मेंदू, हृदय, हात, पाय इत्यादी अनेक अवयवांची जोडी (दोन) असते – डावे आणि उजवे. त्यांच्यात जेवढा चांगला समन्वय असेल तेवढा जीवनाचा दर्जा चांगला असतो. नियमितपणे व्यायाम केल्याने डाव्या आणि उजव्यामध्ये चांगला समन्वय साधला जातो.

4) शरीराची कार्यक्षमता वाढते:
नियमितपणे व्यायाम करणार्‍यांच्या शरीरातील चयापचय क्रिया उत्तम चालत असते आणि त्यामुळेच त्यांची उर्जा पातळी चांगली असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा कितीही भार पडला तरी तो त्यांना सहन होतो आणि ते उत्तम कार्यक्षमतेने काम करू शकतात.

5) मन सकारात्मक राहते:
व्यायाम करणार्‍यांची विचार करण्याची पध्दत सकारात्मक असते त्यामुळे त्यांची उत्पादकताही चांगली असते. कमी उर्जेमध्ये आणि कमी वेळेमध्ये उत्तम काम करण्याची क्षमता त्यांच्यात विकसित झालेली असते. कोणत्याही गोष्टीचा आळस येत नसल्यामुळे कोणतेही काम करायला ते सदैव तत्पर असतात.

6) शरीरातील हाडे मजबूत बनतात:
व्यायाम करणार्‍या व्यक्तीची हाडे मजबूत असतात त्यामुळे पडणे, धडपडणे, मुरगळणे, आखडणे, करक लागणे अशा गोष्टींचा त्रास त्यांना होत नाही. परिणामी अशा छोट्या-छोट्या तक्रारींसाठी शारीरिक ऊर्जा वाया जाण्याचे प्रमाण त्यांच्यात कमी असते.

7) रोग प्रतिकारशक्ती वाढते:
नियमित व्यायाम केल्याने शरीराची रोग प्रतिकारशक्ती चांगली राहते आणि त्यामुळे वारंवार होणारे अपचन, सर्दी, खोकला, फ्ल्यू यांसारख्या सतत होणाऱ्या संसर्गजन्य रोगापासून शरीराचा बचाव साधला जातो. याचबरोबर अशा व्यक्ती कर्करोग, हृदयविकार, रक्तदाब, पित्त अशा गंभीर विकारांपासूनही मुक्त असतात.

8) आकर्षक व प्रभावी व्यक्तिमत्त्व घडते:
व्यायाम करणाऱ्यांचे शरीर सुडौल असते. उंची, जाडी, वजन यांचा योग्य समतोल त्यांच्या शरीरात साधलेला असतो. त्यामुळे त्यांचे दिसणे हेही मोठे चैतन्यदायी असते. त्याचबरोबर त्यांच्या हालचाली डौलदार आणि सहज असतात. बेंगरुळपणाचा (आळशीपणाचा) त्यात अभाव असतो.

9) हृदयविकारांपासून मुक्ती मिळते:
व्यायाम करणार्‍याचे हृदय निरोगी असते. त्यामुळे हृदयाचे ठोके सामान्य असतात. फुफ्फुसांवरही ताण पडला तर सहन होतो. त्यांचा श्‍वास चांगला असतो. अशा व्यक्तींच्या रक्तवाहिन्या निर्दोष असतात, रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि त्यांना अती कमी अथवा उच्च रक्तदाबाचा त्रास होत नाही. त्यामुळे त्यांना विविध हृदयविकारांपासून मुक्ती मिळते.

10) तणावाचा सामना करता येतो आणि आत्मविश्वास वाढतो:
व्यायाम करणार्‍यांना तणावाचा चांगला सामना करता येतो कारण त्यांच्या शरीरातील विविध हार्मोन्सचे स्रवणे सामान्य असते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास आणि आनंद या दोन्हीत वाढ झालेली असते. ते मानसिकदृष्ट्यासृध्दा उत्तम जीवन जगत असतात.


उत्तर लिहिले · 5/12/2022
कर्म · 51830
0
नियमित व्यायामाचे अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे आहेत. त्यापैकी काही खालीलप्रमाणे:

शारीरिक फायदे:

  • वजन नियंत्रण: नियमित व्यायाम केल्याने वजन नियंत्रणात राहते. कॅलरीज बर्न (burn) होतात आणि चरबी कमी होते.
  • हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य: व्यायाम केल्याने हृदय मजबूत होते, रक्तदाब (blood pressure) नियंत्रणात राहतो आणि हृदयविकारांचा धोका कमी होतो. (अमेरिकन हार्ट असोसिएशन)
  • मधुमेह नियंत्रण: नियमित व्यायामाने रक्तातील शर्करा (blood sugar) नियंत्रित राहते, ज्यामुळे मधुमेह (diabetes) नियंत्रणात राहण्यास मदत होते.
  • हाडे आणि स्नायू मजबूत: व्यायाम केल्याने हाडे आणि स्नायू मजबूत होतात, ज्यामुळे शारीरिक क्षमता वाढते.
  • रोगप्रतिकारशक्ती सुधारते: नियमित व्यायामामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि आजारांपासून बचाव होतो.

मानसिक फायदे:

  • तणाव कमी होतो: व्यायामामुळे तणाव कमी होतो आणि मनःस्थिती सुधारते.
  • नैराश्य कमी होते: नियमित व्यायाम नैराश्याची लक्षणे कमी करण्यास मदत करतो.
  • झोप सुधारते: व्यायामामुळे रात्रीची झोप सुधारते आणि शांत वाटते.
  • एकाग्रता वाढते: नियमित व्यायामाने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते.
  • आत्मविश्वास वाढतो: व्यायाम केल्याने शारीरिक क्षमता वाढते आणि आत्मविश्वास वाढतो.

इतर फायदे:

  • ऊर्जा पातळी वाढते: नियमित व्यायामामुळे दिवसभर उत्साही वाटते.
  • दीर्घायुष्य: नियमित व्यायाम केल्याने आयुष्य वाढते.

त्यामुळे, निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी नियमित व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 230

Related Questions

व्यायामाच्या वेळेत वाढ करावी का?
वजन कमी करण्यासाठी योग्य व्यायाम कोणता?
मी कितीही विचार केला तरी मला कधीच सातत्य ठेवता येत नाही. ना अभ्यासाला, ना व्यायामाला, काय करू मी?
घरच्याच कामातून व्यायाम होतो, मग योगा कशाला करावा?
दररोज किती तास व्यायाम करावा?
सायकल वापरण्याचे विविध फायदे कोणते आहेत?
तो व्यायाम करीत असे या वाक्याचा काळ कोणता?