व्यवस्थापन
जल व्यवस्थापनेचे स्वरूप लिहा?
1 उत्तर
1
answers
जल व्यवस्थापनेचे स्वरूप लिहा?
0
Answer link
सुमारे पंचवीस वर्षापुर्वी जलव्यवस्थापन / जलनियोजन / जलसाक्षरता हे शब्द सुद्धा आपल्याकडे म्हणजे जनसामान्याकडे ,प्रचारात नव्हते . त्यावेळी ह्या शब्धांचा फारतर शब्दशः अर्थाची आपण कल्पना करू शकलो असतो .परंतु २१ शतकाची सुरुवातच पाणी समस्येपासून झाली आहे. पाण्यावरून जागतिक किंवा महायुद्धे होतील असे भाकीत अनेक पंडितांनी वर्तवली आहेत .आता त्यातील सत्य, तथ्य, अगत्य कळू लागले आहे. वाढलेल्या लोकसंखेमुळे अन्नाची मागणी, पेयजल, शेतीजल, औद्योगीक जल ह्या समस्या वाढल्या आहेत. आता तर मोठे जलाशय प्रकल्पांची मागणी होत आहे. त्यातूनच मोठ्या कालव्यांतील भूपृष्ठीय जलवाहतूक, मत्स्योत्पादन ,जलविद्युत निर्मिती, नौका विहार, पर्यटन विकास, सामाजिक वनीकरण व वन्य पशुसंवर्धन, आर्द्रता नियमन, जागतिक पर्यावरण इ. विषय हळू हळू पुढे येऊ लागले आहेत. अशा सर्व पार्श्वभूमीचा विचार केल्यास ह्या सर्व समस्या किंवा मागण्या पाणी आधारितच आहेत .
अवकाशीय / खगोलशास्त्रीय संशोधनात नेहमी ऐकायला मिळते की, अमुक एका ग्रहावर पाण्याचे अस्तित्व असल्याच्या खुणा दिसून आल्या. त्यामुळे तेथे जीवाच्या अस्तित्वाची शक्यता असावी .....वगैरे. याचा अर्थ पाणी हेच जीवन आहे. पाण्या वाचून जीवाचे अस्तित्वच संभवत नाही. अशा ह्या पाण्याचे नियोजन करण्याची वेळ आली आहे.
खरे तर पृथ्वीवर मुबलक पाणी आहे. परंतु पिण्याजोगे किंवा वापराण्याजोगे पाणी फक्त ३ % च आहे. त्यातील २.१% पाणी उत्तर व दक्षिण ध्रुवीय प्रदेश व उंच पर्वतराजी इत्यादी धरून बर्फ स्वरुपात आहे व फक्त ०.९ % पाणी पिण्याकरिता व वापरण्याकरिता आपल्या हाताशी आहे आणि म्हणूनच ह्या ०.९ पाण्याकरिता महायुद्धे होऊ शकतील .कारण लोकसंखेच्या प्रमाणात हे पाणी त्या त्या भागात विखुरलेले नाही. पर्जन्यमानही भौगोलिक परिस्थिती प्रमाणे वेगवेगळे आहे. मोठ्या नद्यांची खोरी सर्वत्र नाहीत. याचाच अर्थ पाणी सर्वत्र सारखे प्रमाणात विखुरलेले नाही. अश्या ह्या नैसर्गिक परंतु असमान पाणी वाटपामुळे युद्धे होऊ शकतील .त्यापेक्षा पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन केल्यास शांतता व समृद्धी वाढू शकते .पाण्याचे नियोजन दोन प्रकारे होऊ शकते. १) प्रत्येक्ष गरजेनुसार, लोकसंखे नुसार वाटप. 2) योग्य प्रकारे ”काटकसरीने, बचतीने वापर ”. विजेची बचत म्हणजे विजेची निर्मिती “असे एक घोष वाक्य आहे त्या धर्तीवरच “काटकसरीने पाणी वापर म्हणजे ज्यादा पाण्याचा पुरवठा .”असे म्हणता येयील .
काटकसरीने पाणी वापरसुद्धा दोन प्रकारे होऊ शकतो. १) पाणी वाया न जाऊ देता प्रमाण बद्धतेने वापरणे. 2) कमी पाण्याची पिके ,कमी पाण्याचे उद्योग धंदे इ. निवडणे. पिण्याच्या पाण्यातील सांड पाण्या पासून शेतीला पाणी पुरवठा किंवा गटारीच्या पाण्याचा खत व पाणी म्हणून शेतीत उपयोग करणे. ही सुद्धा पाणी बचतच आहे. औद्योगिक वापरातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचे पुनर प्रक्रियेने शेती योग्य पाणी बनविणे. हे ही शक्य होणार आहे. त्या करिता जागतिक पातळीवर व प्रत्येक नागरिकाने आप आपल्या पातळी वर हा प्रयत्न कर्तव्य म्हणून केला पाहिजे .मानवता धर्माचा तो एक अत्यावशक भाग असल्याचे जनप्रबोधन झाले पाहिजे.