व्यवस्थापन
सहकारी साखर कारखान्यात व्यवस्थापन हे प्रदूषणकारी आणि विकारी अहंकारी नसावे, तर कसे असावे?
2 उत्तरे
2
answers
सहकारी साखर कारखान्यात व्यवस्थापन हे प्रदूषणकारी आणि विकारी अहंकारी नसावे, तर कसे असावे?
0
Answer link
माझ्या मते , प्रदूषण अंदर का हो या बाहर का , दोनोंही हानिकारक है |
काही प्रस्थापित सतत च्या सत्तेमुळे अहंकारी बनतात..मनात एक जनात दुसरेच ..
सभासद हा वर्तमान समोर ठेवतो ,वास्तव यथार्थ वर्णन करून सांगतो त्यालाही प्रस्थापित धुडकावून लावतो असे विकारी अहंकारी नसावे.
बहुजन हिताय बहुजन सुखाय असेच सूत्र ते कायमदायम समर्थपणे पुढे पुढे जात रहिल असं असावे .
पारदर्शकता तर हवीच .जे काही आहे ते प्रेमानं जगणं सुंदर करून समतोल समन्वय समन्यायी असावे .मी ,म्हणतो तेच असं कसं म्हणता... सर्व समभाव समर्थ असावा. सहकाराचे ब्रीद वाक्य जाणा ... काहींची मालकी होऊन कारखाने व्यवस्थापन त्यांचेच .. चांगल्याला चांगलं म्हणा हे सत्कृत्य आचरण नीतीत उतरणारा जीवभाव लावावा ..
यंदा २३-२४ हंगामात ऊस तोडणी फारच बेशिस्त झाली हे म्हणणं आहे पण ते वास्तव मानतच नाहीत...
खाजगी मालकीचे कारखाने ऊस तोडणीत अग्रेसर आणि आपला विश्वास असलेला कारखाना ऊस तोडणी नियोजनात बेदखल ... असं जीवनगाणं असलं तर नुकसान भरपाई...ऊस पिक वाळण़ं ...पाणी टंचाई.. पाऊसमान कमी.. लोकांचा जीवापाड जपलेला ऊस वाळून कसा चालेल ? याबाबत योग्य सुच्चारू धोरण असावं ? हे सांगणं सुद्धा आवडत नाही अशी परिस्थिती आहे... कारखाना सभासदांच्या मालकीचा, तो समन्वय समन्यायी राखला तरच ऊस घालणारे तरतील याबाबत आपले मत नोंदवा व एकरूप होऊन एकनिष्ठ बांधिलकी प्रेमभाव ठेवण्यासाठी व्यवस्थापनाने दखल घेतली पाहिजे... हा प्रस्ताव सादर केला इतकेच ... धन्यवाद... जय हिंद..जय सहकार ..जय महाराष्ट्र
0
Answer link
सहकारी साखर कारखान्यात व्यवस्थापन प्रदूषणकारी आणि विकारी अहंकारी नसावे, तर ते कसे असावे याबद्दल काही सूचना:
- पारदर्शकता आणि उत्तरदायित्व: व्यवस्थापनाने कारखान्याच्या कामकाजात पारदर्शकता ठेवावी. महत्त्वाचे निर्णय घेताना भागधारक आणि सभासदांना विश्वासात घ्यावे.
- पर्यावरणपूरक दृष्टिकोन: कारखान्याच्या व्यवस्थापनाने पर्यावरणावर होणारा नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी प्रयत्न करावे. प्रदूषण नियंत्रण मानकांचे पालन करणे, कचरा व्यवस्थापन सुधारणे, आणि ऊर्जा वापर कार्यक्षम करणे यावर लक्ष केंद्रित करावे.
- सहभागी व्यवस्थापन: व्यवस्थापनात कामगार, शेतकरी आणि स्थानिक समुदायाचा सहभाग असावा. त्यांच्या समस्या व सूचना विचारात घेऊन निर्णय घ्यावेत.
- नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर: पाणी, जमीन आणि ऊर्जा यांसारख्या नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर करावा. पुनर्वापर आणि संवर्धन यावर भर द्यावा.
- सामुदायिक विकास: कारखान्याने आपल्या परिसरातील लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी योगदान द्यावे. शिक्षण, आरोग्य, आणि रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावे.
- अधिकारशाही टाळावी: व्यवस्थापनात लोकशाही दृष्टिकोन असावा. अहंकार आणि अधिकारशाही वृत्ती टाळावी.
अशा प्रकारे, सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि पर्यावरणपूरक बनू शकते.