तक्रार

तक्रार निवारण यंत्रणेवर टिप?

1 उत्तर
1 answers

तक्रार निवारण यंत्रणेवर टिप?

0

 तक्रार निवारण यंत्रणा
यूआयडीएआय तक्रार निवारण
युआयडीएआयच्या मुख्यालयात साधारणपणे पुढील पद्धतींनी तक्रारी स्वीकारल्या जातात :

यूआयडीएआय संपर्क केंद्रांच्या माध्यमातून
आधार नावनोंदणी, अद्यतन आणि इतर संबंधित सेवांच्या संदर्भातील प्रश्न व तक्रारींची हाताळणी करण्या करिता यूआयडीएआय यांनी संपर्क केंद्र स्थापन केले आहे. नावनोंदणी केंद्रात नावनोंदणीची प्रक्रिया केल्यानंतर नावनोंदणी करणारा ऑपरेटर रहिवाशाला ईआयडी (नावनोंदणी क्रमांक) असलेली पोच पावती देईल. या ईआयडी चा वापर करून रहिवाशाला खालील माध्यमांतून यूआयडीएआय संपर्क केंद्रात जाता येऊ शकेल.


पोस्टाद्वारे
यूआयडीएआय मुख्य कार्यालय व क्षेत्रीय कार्यालयांत तक्रारी पोस्टाद्वारे / हार्डकॉपी द्वारे प्राप्त होतात. तक्रारींचे परीक्षण होते व त्यावर सहाय्यक महासंचालक यांची मंजूरी मिळाल्यानंतर हार्डकॉपी संबंधित क्षेत्रीय कार्यालय/मुख्य कार्यालयातील संबंधित विभाग, यूआयडीएआय मधील सार्वजनिक तक्रार अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येते. तक्रार कोश, यूआयडीएआय, मुख्य कार्यालय सूचनेच्या अंतर्गत संबंधित क्षेत्रीय कार्यालय/संबंधित विभाग तक्रारदाराला थेट प्रत्युत्तर देऊन तक्रार निरस्त करतात. अंतरिम प्रत्युत्तरे देणे आवश्यक असल्यास, ती संबंधित क्षेत्रीय कार्यालये/मुख्य कार्यालयातील संबंधित विभागातर्फे देण्यात येतात.

भारत सरकारच्या सार्वजनिक तक्रार पोर्टल द्वारे प्राप्त झालेल्या तक्रारी
यूआयडीएआय यांच्याकडे भारत सरकारच्या pgportal.gov.in या पीजी पोर्टल द्वारे तक्रारी प्राप्त होतात. या pgportal मध्ये खालीलप्रमाणे प्रकार आहेतः

डीपीजी (सार्वजनिक तक्रार संचालनालय),
डीएआरपीजी (प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रारी विभाग)
पालक संघटना,
थेट प्राप्ती,
राष्ट्रपती सचिवालय,
पेन्शन,
मंत्री कार्यालय,
पंतप्रधानांचे कार्यालय.
तक्रारींचे परीक्षण केले जाते व त्यांवर यूआयडीएआय चे सार्वजनिक तक्रार अधिकारी असलेल्या सहाय्यक महासंचालक यांची मंजूरी मिळाल्यानंतर त्या संबंधित क्षेत्रीय कार्यालय/ मुख्य कार्यालयातील संबंधित विभागाकडे ऑनलाईन अग्रेषित केल्या जातात. संबंधित क्षेत्रीय कार्यालय/विभाग तक्रारीचे ऑनलाईन निवारण करते. अंतरिम प्रत्युत्तरे देणे आवश्यक असल्यास, ती संबंधित क्षेत्रीय कार्यालय/मुख्य कार्यालयातील संबंधित विभागातर्फे देण्यात येतात.

ईमेल द्वारे
यूआयडीएआय अधिकाऱ्यांना बऱ्याच वेळा तक्रार ई-मेल द्वारे प्राप्त होत असतात. अशा ईमेल्स चे परीक्षण केले जाते व ते संबंधित क्षेत्रीय कार्यालय/मुख्य कार्यालयातील संबंधित विभागाकडे अग्रेषित केले जातात. त्यानंतर तक्रार कोशाकडून सूचना मिळाल्यानंतर संबंधित क्षेत्रीय कार्यालय/मुख्य कार्यालयातील संबंधित विभाग तक्रारदाराला ई-मेल पाठवून तक्रारीचे निवारण करते.

उत्तर लिहिले · 22/2/2023
कर्म · 48555

Related Questions

शाळा/महाविद्यालय सोडल्याचा दाखला न मिळाल्यास तक्रार कोठे करावी ?
चुलत्याने जागेच्या व्यवहारात फसवणूक केली आहे कुठे तक्रार करता येईल?
उताऱ्यात फेरफार क्रमांक न लावता वारस नोंद केली आहे कोणाकडे तक्रार करावी?
सायबर अपराध तक्रार करण्यास कोणती लिंक वापरावी?
तलाठी कार्यालयात किंवा ग्रामसेवक कार्यालयात येत नसेल तर कुठे तक्रार करता येते?
आमच्या शेताचा रस्ता बंद केला खुप वर्षापासुन आम्ही वापरत होतो आता काय करायला पाहीजे कोणाकडे तक्रार करायला पाहीजे ?
मी पोलीस स्टेशनला आर्थिक फसवणुकीची एक तक्रार केली आहे,सगळे पुरावे देखील दिले आहेत,पण पोलीस गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत,तर कोणाला भेटले पाहिजे?