तक्रार
उताऱ्यात फेरफार क्रमांक न लावता वारस नोंद केली आहे कोणाकडे तक्रार करावी?
1 उत्तर
1
answers
उताऱ्यात फेरफार क्रमांक न लावता वारस नोंद केली आहे कोणाकडे तक्रार करावी?
3
Answer link
उताऱ्यात कोणतीही नोंद करताना त्याचा फेर पडतोच. तुम्ही आधी व्यवस्थित चौकशी करून पहा नक्की फेर नोंदवला नाही का? फेरफार क्रमांक न लावता कोणतीही अगदी वारस नोंद असेल तर नोंद होत नाही. जर अशी घटना घडली असेल तर आधी स्थानिक तलाठी कार्यालयाशी संपर्क करा. त्यांच्याकडूनही शंकेचे निरसन झाले नाही तर मंडळअधिकारी, तहसिलदार , प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्या पर्यंत योग्य कागदपत्रे घेऊनच तक्रार करता येईल.