धर्म
धर्म म्हनजे काय?
1 उत्तर
1
answers
धर्म म्हनजे काय?
1
Answer link
धर्म म्हणजे उपजत वृत्ती, धर्म म्हणजे सहज प्रवृत्ती, धर्म म्हणजे अंगभूत गुण, धर्म म्हणजे योग्य. धर्म म्हणजे सत्य. धर्म म्हणजे सदोदित सत्य. धर्म म्हणजे नित्य.
धर्म म्हणजे सहज प्रवृत्ती, उपजत वृत्ती. धर्म म्हणजे अंगभूत गुणविशेष. व अशी सहज प्रवृत्ती, उपजत वृत्ती, अंगभूत गुणविशेष हे बाहेरून आणता येत नाहीत. हे मुळचेच असतात. उदाहरणार्थ -
निर्जीव वस्तूंची उदाहरणे
संपादन करा
उदा १ - पाणी व या वस्तूचा अंगभूत गुण - शीतलता
उदा २ - हवा व या वस्स्तूचा अंगभूत गुण - चंचलता
उदा ३ - अग्नि या वस्तूचा अंगभूत गुण - दाहकता
उदा ४ - पाषाण वस्तूचा अंगभूत गुण - जडता
,****************************************
धर्म म्हणजे काय
मनुष्याच्या सामाजिक जीवनाचा सामाजिक दृष्टिकोन म्हणजे धर्म होय. मनुष्याने त्याचे सामाजिक जीवन कसे जगले पाहिजे यावर हा सामाजिक दृष्टिकोन प्रकाश टाकतो व त्यातून मनुष्याचे सामाजिक उत्तरदायित्व किंवा बंधन निर्माण करतो. या सामाजिक बंधनातून जी सामाजिक जीवनशैली निर्माण होते ती धर्म संस्कृती म्हणून समाजात प्रस्थापित होते. या धर्मसंस्कृतीचा विवाह हा एक भाग आहे. त्या दृष्टीने विवाह हा धर्मसंस्कार आहे. धर्मसंस्कार म्हणजेच सामाजिक संस्कार होय. धर्मसंस्कार हा सामाजिक संस्कार असल्याने धर्माचा संबंध समाजाशी असतो, देवाशी नव्हे! देव प्रार्थना ही वैयक्तिक बाब असते. ती सामाजिक बाब होऊ शकत नाही. धर्मात कुठेही ईश्वरी कर्मकांडाला स्थान असता कामा नये. अशा कर्मकांडाला सामाजिक अधिष्ठान लाभता कामा नये. धर्म म्हणजे समाजधर्म असा शब्द तोंडातून पटकन बाहेर पडला पाहिजे. पण धर्म म्हणजे देवधर्म असाच शब्द तोंडातून बाहेर पडतो. कारण धर्माचा मूलभूत सामाजिक अर्थ बाजूला करून धर्मात देव आणला गेला. पण देव मानणारे धर्म तरी एक आहेत का? तर उत्तर नाही असेच आहे. जगात देवाला मानणारे आस्तिक धर्म अनेक आहेत. याचाच अर्थ देवाच्या बाबतीत कुठेच एकवाक्यता नाही. मग एकवाक्यता नसलेल्या देवाच्या अशा धार्मिक आधारावर समाज व राष्ट्र कसे चालणार? हाच मूलभूत विचार धर्मनिरपेक्ष राष्ट्र या संकल्पनेमागे आहे. भारतीय राज्यघटनेत धर्माची हीच सामाजिक संकल्पना समाविष्ट केली गेली आहे व त्यामुळे भारत हा संविधानानुसार धर्मनिरपेक्ष देश आहे. त्यामागे खूप मोठा धार्मिक अर्थ आहे जो अर्थ सामाजिक आहे. त्यामुळे कोणत्याही सरकारी कार्यालयात देवाधर्माचे कार्यक्रम होणे किंवा सरकारने देवाच्या धार्मिक प्रार्थनास्थळांना व त्यांच्या बांधकामांना प्रोत्साहन देणे हे घटना विरोधी आहे.