धर्म

धर्म म्हणजे काय धर्माचे वैशिष्टे कोणते आहेत?

2 उत्तरे
2 answers

धर्म म्हणजे काय धर्माचे वैशिष्टे कोणते आहेत?

0
ही व्याख्या अयोग्य आहे असे मला वाटते. धर्म म्हणजे कोणीतरी एक अज्ञात शक्ती आहे व ती हे विश्व चालवते असे म्हणने व समजने मला स्वतःला अंधश्रध्दा वाटते. हा विचार मी आस्तिक असुनही करत आहे कारण एकदाका "तोच" हे सर्व चालवतो असे ठरविले की मग संपले. तिथे मग जगात घडनारी प्रत्येक गोष्ट त्यानेच घडविली व तेच बरोबर आहे असे समजने. मग ह्या व्याखेनुसार मुंबईत अशातच झालेला अतिरेकी प्रकार पण काही जण बरोबर ठरवतील कारण ती "त्याचीच" आज्ञा समजली जाईल.

हिंदु धर्मानुसार जर आपण व्याख्या करायला जाऊ तर एका वाक्यातली सोपी व्याख्या मी करेन.

"धर्म म्हणजे सत्याचे ज्ञान"

विश्व कोणी तरी चालवतो व आपल्या सर्वांच्या नाड्या त्या देवाच्या वा अज्ञात शक्तीच्या हातात आहेत असे आपण जेव्हां माणतो तेंव्हा आपण धर्माला अर्धवट समजुन घेतले आहे.

जेंव्हा आपल्या सर्व प्राथमिक गरजा भागल्या जातात तेंव्हा माणुस "स्वतः बद्दल विचार" करायला लागतो. जेंव्हा विचार धार्मीक दृष्ट्या होतो तेंव्हा तो अंतर्मुख व्ह्यायला लागतो. व प्रश्न पडायला लागतात. " मी कोण", " माझे नंतर काय होणार्","मॄत्यू आहे का"? वैगरे वैगरे. हे प्रश्न जेंव्हा पडतात तेंव्हा त्याचे उत्तर द्यायला "धर्म" कामी येतो.

कुठल्याही धर्माला निर्मान व्हायला दोन मुख्य बाबी लागतात.
१. त्या धर्माचे तत्वज्ञान
२. त्या धर्मांची दैनंदिनी म्हणजेच कर्मकांड

नुसत्या कर्मकांडावर आधारीत धर्म म्हणजे अंधश्रध्दा तर नुसत्या तत्वज्ञानावर आधारीत धर्म म्हणजे वैचारीक बुध्दीभेद वा नुसतेच वैचारिक तत्वज्ञान.

वेंदातानुसार धर्म म्हणजेच सत्य आणी धार्मिक म्हणजे त्या सत्याकडे जाणारा माणूस.

आपल्या स्वतः मधील काही गोष्टींना दुर करुन माणूस हा त्या सत्याकडे जाउ शकतो. त्या सत्याचे जेंव्हा ज्ञान होईल तेंव्हा तो ज्ञानी होइल.

देव तुम्हाला दिसला का? ह्या प्रश्नावर उत्तर देताना रामकृष्णांनी हो सांगीतले व पुढे विवेकानंदाना "आत्मसाक्षात्कार" घडवुन आणन्यास मदत केली. हा आत्मसाक्षात्काराकडे जाणारा मार्ग म्हणजेच हिंदु पध्दती नुसार धर्म. आणि म्हणूनच विवेकानंदानीं "सत्याची वा देवाकडे जाण्याची रेसीपी" लिहून नाही ठेवली कारण हा "आत्म" साक्षात्कार आहे जो फक्त अनुभुती घेउनच मिळू शकतो.

विवेकानंद एके ठिकानी म्हणतात, "Religion is the manifestation of the divinity already within man." And to the question of what form this manifestation of divinity takes, the answer was "in consciousness".

वेदांता नुसारा धर्म म्हणजे आपल्याच मध्ये असलेल्या शक्ती कडे जाण्याचा रस्ता.

उदाहरणच द्यायचे झाले तर अधांरात तेवनार्‍या दिव्या कडे पाहील्यावर तुम्हाला असे वाटते की त्या दिव्याची वात म्हणजेच सर्वकाही. पण त्या वातीला एनर्जी पुरवीनार्‍या तेला कडे तुमचे दुर्लक्ष होते. ते तेल म्हणजेच कदाचित अंतिम सत्याचा एक भाग आहे.

धर्माची व्याखा करायला मी कोणी मोठा ज्ञानी माणूस नाही. पण हे प्रश्न जेंव्हा सतावित असतात तेंव्हाच आपण "स्वतःला" ओळखन्याच्या मार्गावर चालन्यास प्रवृत्त होतो.


ॐ वाड़ मे मन्सि प्रतिष्ठिता |
मनो मे वाचि प्रतिष्ठितमाविरावीर्म एधि |
वेदस्य म आणीस्थः श्रृतं मे मा प्रहासी: |
अनेनाधीते नाहोरात्रान्सन्दधाम्यॄतं वदिष्यामि |
सत्यं वदिष्यामि | तन्मामवतु |
तद्वक्तारम्वतु | अवत मामवतु वक्तारमवतु वक्तारम् ||
ॐ शान्ति: | शान्ति: || शान्ति: |||

अर्थात -
माझ्या वाणीचे मूळ माझ्या मनात असो आणी माझ्या मनाचे मूळ माझ्या वाणीत असो. हे ब्रह्म मला ज्ञान करुन दे. माझ्यात वेदांना (वेद म्हणजे ज्ञान) आणं. मी ऐकलेले कधीही विसरु नको असे कर. ह्या अभ्यासासाठी माझे सर्वस्व मी पणाला लावेन. मी शास्त्रसंमत व आचारसमंत सत्याचा अवलंब करेन. हे बह्म माझे रक्षण करो.

वेगवेगळ्या भारतीय दर्शनांमध्ये प्रसंगपरत्वे धर्म या शब्दाचा अर्थ मांडण्यात आलेला आहे. तो तो अर्थ त्या त्या प्रक्षेपामध्ये योग्य आहे, म्हणजेच ते सर्व अर्थ योग्य आहेत असा सरळ तर्क लावता येईल. धृ म्हणजे धारण करणे असा या संस्कृत धातूचा आधार घेतला, तर ज्या विशिष्ट गुण विशेषामुळे एखाद्या वस्तूला, सजीवास त्याचे वेगळेपण प्राप्त झाले असते, त्या गुणविशेषास धर्म असे म्हणता येईल. धर्म या शब्दाचा भाषा, संस्कृती, इतिहास, सभ्यता, समाज इत्यादीशी संबंध जोडला तर त्याचा अर्थ त्या त्या प्रक्षेपामध्ये बदलतो. पण तरीही धर्म या शब्दाचा मूळ ‘अर्थ धारण करावा तो धर्म’ हाच आहे.

धर्म म्हणजे सहज प्रवृत्ती, उपजत वृत्ती. धर्म म्हणजे अंगभूत गुणविशेष. व अशी सहज प्रवृत्ती, उपजत वृत्ती, अंगभूत गुणविशेष हे बाहेरून आणता येत नाहीत. हे मुळचेच असतात.
उत्तर लिहिले · 23/2/2023
कर्म · 9415
0
धर्म म्हणजे काय धर्माचे वैशिष्ट्ये कोणती 
धर्म म्हणजे सहज प्रवृत्ती, उपजत वृत्ती. धर्म म्हणजे अंगभूत गुणविशेष. व अशी सहज प्रवृत्ती, उपजत वृत्ती, अंगभूत गुणविशेष हे बाहेरून आणता येत नाहीत. हे मुळचेच असतात. उदाहरणार्थ -

निर्जीव वस्तूंची उदाहरणे

उदा १ - पाणी व या वस्तूचा अंगभूत गुण - शीतलता
उदा २ - हवा व या वस्स्तूचा अंगभूत गुण - चंचलता
उदा ३ - अग्नि या वस्तूचा अंगभूत गुण - दाहकता
उदा ४ - पाषाण वस्तूचा अंगभूत गुण - जडता

सजीवांची काही उदाहरणे

उदा १ - वाघ - भूक लागली असता आणि प्रतिस्पर्धी वाघ अथवा प्राण्यापासून संभाव्य धोका टाळण्यासाठी हिंसा करणे. (अस्तित्व टिकवण्यासाठी हिंसा करणे)
उदा २ - वाघ - कितीही भूक लागली असेल व व शिकार मिळाली नसेल व मिळणार नाही असे समजले, असे जरी असेल तरीही वाघ गवत खात नाही. (अखाद्य न खाणे)
उदा ३ - गाय-वासरू - वात्सल्य
उदा ४ - गरुड - आकाशात विहार करणे
उदा ५ - मासा - पाण्यामध्ये झोप घेणे

मनुष्याशी निगडित काही उदाहरणे

उदा १ - स्त्री - ममत्व, वात्सल्य. ही एक अजब वृत्ती आहे. कुमारिकेमध्ये कदाचित हा गुण सुप्तावस्थेत असू शकेल, पण एकदा का ती कुमारिका प्रसूता झाली की तिला ममतेचा पान्हा फुटतो. हा गुणविशेष भावनिक व शारीरिक अशा दोन्ही पातळ्यांवर व्यक्त होतो. ममत्व, मातृत्व ही स्त्रीमधील उपजत सहज अंगभूत वृत्ती आहे. ही वृत्ती कुणी नष्ट करण्याचा प्रयत्‍न करेल तरीही ती होणार नाही. व प्रसंगी स्त्री बाळासाठी निकराने स्वतच्या जीवाशी देखील खेळते. स्वतचा जीव संकटात टाकुन बाळाला वाचवणा-या माता आपल्याला अनेक माहीत आहेत. यास मातृ-धर्म असे म्हणतात. थोडक्यात स्वतच्या बाळासाठी जे जे योग्य आहे ते ते करण्याच उत्‍स्फूर्त प्रेरणा म्हणजे मातृ-धर्म होय.
उदा २ - पिता - पितृ-धर्म. एखाद्या तरुणास, अपत्य झाल्यावर), त्याच्या भावविश्वामध्ये जे काही बदल होतात, त्यानुसार त्या तरुणास स्वतच्या अपत्याविषयी जी ओढ लागते. त्यास व त्या अनुषंगाने त्या अपत्याच्या पालनपोषणासाठी व संस्कारांसाठी तो स्वतःच्या दिनचर्येत, तसेच सामाजिक वर्तणुकीत बदल करतो त्यास पितृ-धर्म असे म्हणतात. ही मूलभूत प्रवृत्ती आहे. योग्य वेळ आली की आपोआप आविष्कृत होत असते. म्हणजे आणखी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एखाद्या पित्याच्या स्वतच्या अपत्यासाठी होणारी उत्स्फूर्त प्रेरणा व त्याद्वारे त्यास होणारा कर्तव्यबोधत्यास पितृधर्म असे म्हणतात.
उदा ३ - पुत्र - पुत्रधर्म
उदा ४- मित्र - मित्र-धर्म
उदा ५ - राजा, राज्य - राजधर्म

वरील उदाहरणे मनुष्याशी निगडिडीत आहेत. यात एकच मनुष्य वेळोवेळी अनेक प्रकारच्या धर्मांचे आचरण करू शकतो. तो मनुष्य कोणत्या भूमिकेमध्ये आहे यावर त्याचा धर्म ठरतो. उदाहरणादाखल नुकताच प्रदर्शित झालेला बाहुबली २ हा सिनेमा व त्यातील पात्र शिवगामी देवीला एक शासक म्हणून राजधर्म पाळायचा होता व त्याचवेळी भल्लालची आई या नात्याने तिला मातृधर्म पाळायचा होता. आंधळ्या पुत्रप्रेमापोटी निष्पाप बाहुबलीस प्राण गमवावे लागले व याचाच अर्थ तिच्याकडून राजधर्माचे पालन झाले नाही. इथे कोणत्या धर्माचे पालन करावयास हवे होते, ते तिने योग्यरीत्या ठवायला हवे होते. कोणत्या ही पूर्वग्रहाशिवाय तिने एक शासक या नात्याने, बाहुबली व त्याची पत्‍नी यांस त्यांचे मत मांडण्याची संधी द्यायला हवी होती. तर मुद्दा असा आहे की जर जे करणे नीती व न्यायास अनुसरून आहे, ते करणे म्हणजे त्या त्या परिस्थितील धर्म होय.

धर्म म्हणजे रिलिजन नाही. धर्म व रिलिजन, अगदीच काय तर संप्रदाय यांचा दूरदूरचाही संबंध नाही. धर्म म्हणजे उपजत वृत्ती, धर्म म्हणजे सहज प्रवृत्ती, धर्म म्हणजे अंगभूत गुण, धर्म म्हणजे योग्य. धर्म म्हणजे सत्य. धर्म म्हणजे सदोदित सत्य. धर्म म्हणजे नित्य. धर्म म्हणजे अंतःप्रेरणा, धर्म म्हणजे नीती, धर्म म्हणजे न्याय.


धर्माची वैशिष्ट्ये

खरा धर्म तोच आहे जो मानवतेची शिकवण देतो. मानवांमध्ये एकता, प्रेम आणि सौहार्द प्रस्थापित करणारा धर्म हाच खरा धर्म आहे. धर्म ही केवळ उपासना पद्धती नाही. तो नक्कीच जगण्याचा एक मार्ग आहे. भारतात संयम, क्षमा, आत्मसंयम, चोरी न करणे, पवित्रता, इंद्रियांवर नियंत्रण, बुद्धिमत्ता, विद्या, सत्यता आणि क्रोध असे दहा गुण धर्माचे वर्णन केले आहेत. ही वैशिष्ट्ये सर्व धर्मांमध्ये सामान्यतः स्वीकारली जातात. हे गुण मानवतेचे वैशिष्ट्य आहेत.

त्यामुळे मानवतावादालाच खरा धर्म म्हणता येईल
उत्तर लिहिले · 23/2/2023
कर्म · 48555

Related Questions

सण सोहळे उपास व्रत वैकल्ये तसेच आदर सत्कार पूजाअर्चा यांनी परंपरेचा साज चढविला आहे,त्यात भर म्हणून वाढदिवस मुंज बारसे हे उत्सव साजरे करत रितीरिवाज तयार झाले ,यात्रा जत्रा रौप्य अमृत हिरक महोत्सव साजरे होतात हे चित्र प्रेमाभक्तिने निर्मल निरंकुश निरागस असावे असा मनुष्य स्वभाव धर्म आवश्यक वाटतो काय ?
सगळ्यात श्रेष्ठ धर्म कोणता?
जैन धर्मातील 24 वे तीर्थकार कोण?
मंत्र जपाने तुम्हाला आलेले अनुभव कोणते आहे?
कोणता भारतीय धर्म संपूर्ण जगात फार मोठ्या संख्येने स्वीकारल्या गेला?
भारताने 1971 मध्ये युद्ध जिंकले होते म्हणून धर्म वर्षी डॅश डॅश दिवस विजय दिवस म्हणून पाळला जातो?
धर्म म्हनजे काय?