आरोग्य
सकाळी पाणी केव्हा प्यावे?
2 उत्तरे
2
answers
सकाळी पाणी केव्हा प्यावे?
2
Answer link
सकाळी उठल्यानंतर लगेच 3 कप पाणी प्यावे. रोज याच प्रमाणात पाणी प्या. जेवल्यानंतर 2 तासांनंतर पाणी प्यायले पाहिजे. तसेच पाणी पिल्यानंतर 45 मिनीटांनंतर नाश्ता करावा.
सकाळी उठल्यानंतर ब्रश झाला की पाणी पिणं हे आरोग्याच्याआणि स्वच्छतेच्या दृष्टीने अधिक चांगले आहे. सकाळचं कोणतंही पेय घेण्याआधी एक ग्लास पाणी पिऊन दिवसाची सुरूवात करणे आरोग्यदायी आहे. बऱ्याचदा सकाळी रिकाम्या पोटी जे पाणी आपण पितो ते कोमट असावं, गरम असावं की गार असावं असा प्रश्न आपल्याला पडतो. या प्रश्नाचं उत्तरही सकाळी रिकाम्या पोटी १ ग्लास कोमट पाणी पिण्याचे फायदे.
१. शरीर स्वच्छ होते...
दररोज सकाळी उठल्यानंतर कोणतंही पेय घेण्याच्या आधी पाणी घेतल्यास तुमचं शरीर आतून स्वच्छ होण्यास मदत होते. रिकाम्यापोटी पाणी पिणं हा शरीर नैसर्गिक दृष्ट्या डिटॉक्स करण्याचा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे शरीररातील विषारी द्रव्ये शरीराबाहेर ढकलली जातात आणि शरीर आतून शुद्ध होण्यास मदत हाेते.
२. सर्दीचा त्रास असणाऱ्यांसाठी उत्तम
ज्या लोकांना वारंवार सर्दी होण्याचा त्रास होतो, त्यांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्यावे. कारण बऱ्याचदा नाक चोंदणे, शिंका येणे हा त्रास सकाळच्या सुमारास होतो. गरम पाणी पिल्यास शरीरातील कफ मोकळा होण्यास मदत होते आणि सर्दीचा त्रास कमी होत जातो.
३. वजन कमी होण्यास फायदेशीर
जे लोक वजन कमी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांनी हा उपाय केलाच पाहिजे. यामुळे शरीरातील चयापचय क्रियेचे कार्य उत्तम होते. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होते आणि मग शरीरावर कुठेही अतिरिक्त चरबी साचून राहत नाही. याचा फायदा निश्चितच वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी होतो.
४. पचनक्रियेसाठी उत्तम
अपचनाचा त्रास असणाऱ्यांसाठी हा एक सोपा आणि उत्तम उपाय आहे. अशा लोकांनी दररोज कोमट पाणी प्यायल्याने पोट व्यवस्थित साफ होतेच शिवाय बद्धकोष्ठता, पित्त, अपचन, मळमळ, गॅसेस हे त्रासही कमी होतात.
५. त्वचेसाठीही उत्तम
रात्रभर आपण पाणी प्यायलेलं नसतं. त्यामुळे सकाळी सगळ्यात आधी पाणी पिणं गरजेचं आहे. कारण असं केल्यामुळे त्वचेचं डिहायड्रेशन होणं थांबतं. त्वचा हायड्रेटेड राहते. तिचा तजेलदारपणा टिकून राहतो. कोरडी त्वचा असणाऱ्यांसाठीही हा उपाय चांगला आहे.
सकाळी इतर कोणतंही पेय घेण्याआधी जर कोमट पाणी घेतलं तर त्याचे आरोग्याला होणारे फायदे की यामुळे शरीरात दिवसभर होणाऱ्या एन्झाईम्सचं सिक्रीशन योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात होतं. त्याचा पचनशक्तीवर सकारात्मक परिणाम होतो. याशिवाय युरिनरी ट्रॅक विषयीच्या समस्या देखील या उपायामुळे कमी होतात. कारण अशा पद्धतीने नियमित पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स शरीराबाहेर पडायला मदत होते. पाणी हे कोमट असावंच असं नाही. ऋतुमानानुसार आपण पाणी कोमट प्यावं की नाही हे ठरवू शकतो.