1 उत्तर
1
answers
मैत्री कशी असावी?
8
Answer link
मैत्री असावी कृष्ण सुदामा सारखी, मैत्री असावी दुर्योधन कर्ण सारखी, मैत्री असावी श्रीराम सुग्रीव सारखी, मैत्री असावी.
यांच्या मैत्री मध्ये कुठलाही स्वार्थ नव्हता.
मित्र असा असावा जो सुखदुःखात कामी पडेल, जो दुर असून सुद्धा तुम्हाला विसरणार नाही, जो तुमचा सन्मान करेल, जो तुमच्याशी कुठलाही छळ करणार नाही असा मित्र असावा, अशे चांगले मित्र फारच कमी मिळतात. काही मित्र त्यांचं काम झाल्यावर नंतर ते तुमच्या कामी पडत नाही, अहंकार गर्व आल्यावर तुम्हाला विसरून जातात, तुमचा अपमान सुद्धा करतात. महाभारतात आचार्य द्रोण आणि द्रुपद यांचं उदाहरण तुमच्या समोर आहे.