नातेसंबंध

नवरा म्हणजे नेमक कोण?

1 उत्तर
1 answers

नवरा म्हणजे नेमक कोण?

1

नवरा म्हणजे नेमके काय 

नवरा म्हणजे कुटुंबाचा भक्कम आधारस्तंभ असतो. नवरा म्हणजे सह्याद्री. भक्कम पर्वता सारखे कुटुंबाचे ऊन, वारा, पावसापासून संरक्षण करतो. मुलांच्या भविष्यासाठी जबर तो पत्नीच्या सुखासाठी नेहमीच प्रयत्नात असतो आणि नात्यांची वीण कायमस्वरूपी ठेवण्यासाठी तो नेहमी तडजोड करतो, तो म्हणजे नवरा.




नवरा म्हणजे समुद्राचा 
भरभक्कम काठ 
संसारात उभा राहतो

पाय रोवून ताठ ll

कितीही येवो प्रपंच्यात
दुःखाच्या लाटा
तो मात्र शोधीत राहतो
सुखाच्या वाटा ll   

सर्वांच्या कल्याणा करता
पोटतिडकीने बोलत राहतो
न पेलणारं ओझं सुद्धा
डोक्यावर घेऊन चालत राहतो ll

कधी कधी बायकोलाही
त्याचं दुःख कळत नसतं
आतल्या आत त्याचं मन
मशाली सारखं जळत असतं ll

नवरा आपल्या दुःखाचं
कधीच प्रदर्शन मांडत नाही
खूप काही बोलावसं वाटतं
पण कुणाला सांगत नाही ll

बायकोचं मन हळवं आहे
याची नवऱ्याला जाणीव असते
दुःख समजून न घेण्याची
अनेक बायकात उणीव असते ll

सारं काही कळत असून
नवऱ्याला अपमान गिळावे लागतात
वेदनांना काळजात दाबून
पुन्हा कष्ट उपसावे लागतात ll

सगळ्यांच्या आवडी जपता जपता
मन मारीत जगत असतो
बायको , पोरं खूष होताच
तो सुखी होत असतो ll

इकडे आड तिकडे विहीर
तशीच बायको आणि आई
वाट्टेल तसा त्रास देतात
कुणालाच माया येत नाही ll

त्याने थोडी हौसमौज केली तर
धुसफूस धुसफूस करू नका
नवऱ्या विरुद्ध विनाकारण
दारू गोळा भरू नका ll

दोस्ता जवळ आपलं मन
त्यालाही मोकळं करावं वाटतं
हातात हात घेऊन कधी
जोर जोरात रडावं वाटतं ll

समजू नका नवरा म्हणजे
नर्मदेचा गोटा आहे
पुरुषाला काळीज नसतं
हा सिद्धांत खोटा आहे ll

मी म्हणून टिकले इथं
दुसरी पळून गेली असती
बायकोनं विनाकारण
नवऱ्याला धमकी दिलेली असती ll

घरात तुमचं लक्षच नाही
हा एक उगीच आरोप असतो
बाहेर डरकाळ्या फोडणारा
घरी म्यांव म्यांव करीत बसतो ll

सारख्या सारख्या किरकिरीनं
त्याचं डोकं बधिर होतं
तडका फडकी बाहेर जाण्यास
खूप खूप अधीर होतं ll

घरी जायचं असं म्हणताच
त्याच्या पोटात गोळा येतो
घरात जाऊन बसल्या बसल्या
तोंडात आपोआप बोळा येतो ll

नवरा म्हणा , वडील म्हणा
कधी कुणाला कळतात का ?
त्यांच्या साठी कधी तरी
कुणाची आसवं गळतात का ? ll

पेला भर पाणी सुद्धा
चटकन कुणी देत नाही
कितीही पाय दुखले तरी
मनावर कुणी घेत नाही ll

वेदनांना कुशीत घेऊन
ओठ शिउन ' तो ' पडून राहतो
सर्वांच्या सुखासाठी
एकतारी भजन गातो ll

बायको आणि मुलांनी
या संताला समजून घ्यावं
फार काही नकोय त्याला
दोन थेंब सुख द्यावं ll

मग बघा लढण्यासाठी
त्याला किती बळ येतं
नवऱ्याचं मोठेपण हे
किती जणांच्या लक्षात येतं ? llकितीही रागवला
तरी मायेन तोच जवळ घेतो...
कधी रागाने बाहेर गेला तरी त्याचे पाय आपोआप घराकडे वळतात ..
मनातले भाव त्याला डोळ्यातूनच कळतात ..
किती दुःखी असला तरी सार गिळून घेतो कोण आहे तिला आपल्या शिवाय म्हणून एक गजरा घेऊन येतो ...
नवरातो नवराच असतो....
.
काळजी का करतेस मी आहे न तुला
म्हणून किती धीर देतो
सा-या अडचणी आपल्या मनात ठेऊन बायकोकडे
हास-या नजरेन पाहतो...
.
जस घरावर छत असत तसच आपल्या डोक्यावर नव-याच झाकण असत
किती सुरक्षित असतो आपण त्यांच्या
सावलीत ...
ऊन्हाचे चटके तो खातो
पण सावली आपल्या डोक्यावर देतो..
नवरा तो नवराच असतो....
.
आपन चार अलंकार घालून म्हणतो
मान माझी मंगळसुत्र तुझ
कपाळ माझी बिंदी तुझ्या नावाची ..
.तो कधी म्हणतो का ?
कष्ट माझे पगार तुझा...
शरीर माझ आयुष्य तुझ .....
जन्म आईच्या उदरात पडलो तुझ्या पदरात ..
तू जिवन संगिनी म्हणून गोड मानत असतो ....
नवरा शेवटी नवराच असतो...
.
संसाराचा रथ दोन चाकांवर चालतो त्यासाठी दोघांनाही समतोल सांभाळावा लागतो....
एक चाक डगमगल तर एका चाकावर रथ हाकणं फार अवघड होतं
.
बायको शिवाय घराला घरपण नाही तसच नव-या शिवाय बायको पूर्ण नाही
तो कळस आहे घराचा छत आहे
परिवाराचा...
चटके तो खातो आपण मात्र सावलीत राहतो
नवरा तो नवराच असतो ..
.
आयुष्यातल्या सगळ्या पोकळ्या भरता येतील पण नव-याची पोकळी कधीच भरून निघू शकणार नाही.....
म्हणून एकमेकांना मायेची हाक द्या
प्रेमाची साथ द्या जिवन क्षणभंगूर आहे जगण्याचा आनंद घ्या....
उत्तर लिहिले · 23/12/2022
कर्म · 48555

Related Questions

सकारात्मक नातेसंबंध राखून ठेवण्यासाठी काय ठेवावा?
मामाच्या मुलाची बायको माझी कोण?
माझे एका जवळच्या मित्राबरोबर भांडण झाले आहे (चूक त्याचीच आहे असे बाकीचे मोठी माणसे म्हणतात) व माझे बाकीचे सर्व मित्र पण त्याच्याच बाजूने आहेत पहिल्यासारखे माझ्याबरोबर बोलत नाहीत काय करावे बोलावे का नको? पण मला या गोष्टीमुळे खूप नैराश्य आले आहे काय करावे कृपया उपाय कोणता करावा?
बहिणीच्या नवऱ्याच्या भावाला काय बोलतात?
माझ्या आईच्या मामाची मुलगी माझी कोण?
एका पुरुषाची ओळख करून देताना त्यांच्या सोबतची स्त्री म्हणाली हा माझ्या सुनेच्या सासऱ्याचा एकुलता एक मुलगा आहे,तर तो पुरुष नात्याने त्या स्त्रीचा कोण असेल?
जगात निःस्वार्थ नात कोणतं आहे?