नातेसंबंध

माझे एका जवळच्या मित्राबरोबर भांडण झाले आहे (चूक त्याचीच आहे असे बाकीचे मोठी माणसे म्हणतात) व माझे बाकीचे सर्व मित्र पण त्याच्याच बाजूने आहेत पहिल्यासारखे माझ्याबरोबर बोलत नाहीत काय करावे बोलावे का नको? पण मला या गोष्टीमुळे खूप नैराश्य आले आहे काय करावे कृपया उपाय कोणता करावा?

2 उत्तरे
2 answers

माझे एका जवळच्या मित्राबरोबर भांडण झाले आहे (चूक त्याचीच आहे असे बाकीचे मोठी माणसे म्हणतात) व माझे बाकीचे सर्व मित्र पण त्याच्याच बाजूने आहेत पहिल्यासारखे माझ्याबरोबर बोलत नाहीत काय करावे बोलावे का नको? पण मला या गोष्टीमुळे खूप नैराश्य आले आहे काय करावे कृपया उपाय कोणता करावा?

5
तुम्ही तुमच्या मित्राला बोला. बाकी सर्व मित्रांना ही बोला. पूर्वी जसे त्यांच्यासोबत राहत होत्या तसेच राहा. फक्त आता सावधगिरी बाळगा. 

तसेच पूर्वीसारखी म्हणा़वी तशी सहजता तुमच्या नात्यात येणार नाही आणि आली, तरी त्यास बराच वेळ लागेल.

 असो, पण तुमची चूक आहे,की नाही हे तुमच तुम्ही ठरवा. तुम्हाला स्वतःला काय वाटतय. भांडणाच मुळ काय शोधून काढून तो पाँईंट डिफाईन केल्यास ,(मग चूक कुणाचीही असो.) मनातला तो कडवटपणा जाईल.

 आपली बाजू समजून सांगा. मित्राची ही बाजू समजून घ्या. समोरचा चूक असेलही पण त्या चुकीचे कारण काय होत पाहा. त्या भांडणाचा तेढ मनातून काढून टाका. तुमचे नाते सहज होईल व नैराश्य ही कमी होईल. 

चूक कुणाचीही असो तुम्ही समोर होऊन मित्राशी बोला. मित्राची माफी मागा. मित्र माफी मागला नाही ,तरी त्यास मनातून माफ करा. असं केल्याने तुम्ही बरोबर जरी असलात, तरी तुम्हाला चूकीचच समजले जाईल. पण,  शेवटी काय तर नातं महत्वाच आहे. 

आपण काय आहोत आपल्याला माहिती असते.  यामुळे बाकीचा विचार करायचा नाही.

टिप : हे माझे वैयक्तिक मत आहे, बाकी तुम्हाला जे योग वाटेल ते करा. 
उत्तर लिहिले · 10/10/2022
कर्म · 25790
1
तुम्ही तुमच्या मित्राला बोला
 कारण 

चूक त्याची असो की तुमची 

चूक मान्य करायला मोठ मन (वाघच काळीज ) लगते हो

तुम्ही बोलाल नाही तरी कुणाचं काही नाही अडत  हो. फक्त आज होणारे काम उद्यावर जाईल

मित्राचे प्रेम, मित्राची दुनियाच वेगळी असते हो.

अक्सर बडे बडे देशो मे छोटी छोटी बते होती रहती है.
उत्तर लिहिले · 8/10/2022
कर्म · 7460

Related Questions

सकारात्मक नातेसंबंध राखून ठेवण्यासाठी काय ठेवावा?
नवरा म्हणजे नेमक कोण?
मामाच्या मुलाची बायको माझी कोण?
बहिणीच्या नवऱ्याच्या भावाला काय बोलतात?
माझ्या आईच्या मामाची मुलगी माझी कोण?
एका पुरुषाची ओळख करून देताना त्यांच्या सोबतची स्त्री म्हणाली हा माझ्या सुनेच्या सासऱ्याचा एकुलता एक मुलगा आहे,तर तो पुरुष नात्याने त्या स्त्रीचा कोण असेल?
जगात निःस्वार्थ नात कोणतं आहे?