मैत्री
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
Answer link
आद्य आरंभ आई माझी माय माऊली जिच्या ठायी एक तत्व आद्य पूर्ण असा जो ईश्वर ज्याची ओळख करून सहजतेने विशालतेकडे झेपावत जाणं शक्य आहे.
त्याकरिता आपण आपली भूमिका स्पष्ट मांडली पाहिजे.
होय , त्यासाठी आई कडून आशिर्वाद घेऊन आत्म तत्व काय आहे, त्याचं शिक्षण झाले तर मला तुम्हांला माहिती मिळेल अशी एक देवता जी विद्या सरस्वती आहे तिच्याकडून जाणकारी प्राप्त होते . मानवाला कान नाक डोळे तोंड पाय त्वचा आदि सजग संवेदनशील असे मिळाले आहेत. त्याद्वारे आपल्याला जाणकारी ओळख करून देण्यात हे मन मेंदू मनगट मजबूत करावे लागते. विद्या सरस्वती ही काया मने वाचे आपणांस उघड्या डोळ्यांनी शिक्षण देते. या निसर्गातील पशुपक्षी कीटक झाडे वनस्पती वनराई तसेच हे डोंगर दर्यां निर्झर धबधबे जलप्रवाह नदी ओहळ सागर आकाश आदि द्वारे शिक्षण उपलब्ध आहे. हे उद् भव पाहून ओळख ही दृढ विश्वासाने कायमदायम होते आणि मनी समर्थपणे रूजते. कारण देवाचेच देणं जे वर्तमान आज ही आहे पूर्वीही होते व निसर्ग पुढेही तेच चालू ठेवेल. कारण कणाकणात देवकणांची ऊर्जा ताकद शक्ति बळ अजर अमर आहे हा विश्वास आहे.
हे सुज्ञानी लोक जाणतात आणि मग हे विज्ञान नियमांचा आधार घेत आपले कौशल्य वाढीस लागते. हे एकच एक तत्व दृढ आहे तर मग आपण विवेक विचारधारा जपुन काही मिलवर्तन परिवर्तन घडवून आणू शकतो . हा विश्वास स्थिरमनाचा भाग माणसाला स्वस्थ कसा बसू देईल . जर निसर्ग कायमदायम समर्थपणे आपले चक्र सुरू ठेवतोय तर माझी निरिक्षणे नोंदवली पाहिजेत व बदल करता येणार अशी बुद्धी त्यांनेच दिली आहे. तिचा वापर करून मला प्रतिसाद मिळतोय का याचा विचार मागोवा हे ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञान हे प्रज्ञान एकमेकांना पूरक होईल ही जिज्ञासा जागी झाली. यात आर्तता आहे व अर्थार्जन ही आहे . मग आपले ज्ञान तेजाचे प्रतीक हे झळकले पाहिजे अशी निर्मल ओढ लागली.
ही आर्तता आर्थार्थी जिज्ञासू वृत्तीने ज्ञानी बनली तरच मिलवर्तन एक सद्भाव सद्विचार पुढे परिवर्तन घडुन येईल ही खात्री झाली. यातूनच नवविधा भक्ती भाव मिळत गेला .आणि माणूस या वर्तमानी सर्वोत्तम प्रेम कामगिरी करत एकनिष्ठ राहण्याची किमया साधताना तहानभूक विसरला . उपासतापास सुरू झाले . व्रतवैकल्ये साधनं समोर आली. एक नवीन दृश्य पाहून आनंदित वृत्तीने सर्व मनोकामना संकल्प कृतिशील वाटचालीने निश्चितच पूर्ण होतील हे जाणून तो हरीला भजू लागला . आता हरी हा व्यथा दूर करणारा , हर्ता कर्ता करविता आहे .ही मूळ माऊली आई आहे .आणि आत्मा ईश्वरी देहादेही एक तत्व दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी...अशी ही आठवण ...कधी विसर ना व्हावा...संतसंग देई सदा ...असा भाव... भाव तोचि देव भावेविण देव न कळे नि :संदेह ... ही भावना स्थिर झाली , आणि हृदयांहृदयी हा अंश देवकणं प्रत्येक मानवी हृदयांत
लपला आहे तोच आत्मा हा पांडुरंगाचा एक अंश आहे त्यालाच आपण सतत सक्रीय सहभाग घेऊन कार्यप्रवण करण्यासाठी सतत ध्यानी मनी जागृती स्वप्नी नामामृताने अंभ्यग्यस्नान घालावे लागेल . भजन पूजन कीर्तन सत्संग सेवेने हा अंश चमकदार बनतो व मुखकमलावर एक गोड तेज येते . असा चैतन्य लावण्याचा गाभा प्रकाशित राहील हे पाहिले पाहिजे. आयुष्याचा ताणाबाणा बुनियाद विणं ही रेशीम वस्त्राप्रमाणे मजबूत व्हावी . हातात काम मुखाने राम..
हे विठ्ठल, विठ्ठल जय हरी नाम अमृत कुपी साधुसंतांना सापडली .
म्हणून तो हा विठ्ठल बरवा,तो हा माधव बरवा करीत पायी वारी करत आहे कारण तो देव एक करूनी घ्यावा, त्याशिवाय सुख समाधान नाही. ही खात्री आहे की, विटेवरचा पांडुरंग हा वाटसरूंना , चुकलेल्या लोकांना , थकलेल्या जीवाला, असाह्य वेदनांना पळवून लावणारा तसेच आंधळ्या पांगळ्यांना ही डोंगर पार करायला बळ देतोय ,असा विश्वास वाटतो.
आणि म्हणूनच जनजागृती व्हावी यासाठी समर्पित भावनेने सेवा देणारे सत्यार्थी भावार्थी आपल्यात सामावून घेत मनं जोडण्याची किमया साधत ही आषाढी एकादशी निमित्त जी वारी आहे तिला एक आगळं वेगळं महत्त्व आहे, देवशयनी एकादशी या व्रताचा ही महिमा आहे, तुझे नाम घेता देवा होई समाधान...असं ते प्रेमानं जगणं सुंदर करीत पुढे वाट चालत आहे.सर्व दुःख यातना सहन करत तो भजनात किर्तनात एकरसी एकनिष्ठ एकजीवी दैदिप्यमान प्रेम कामगिरी विश्वासाने पार पाडतो आहे.. कारण विठ्ठल मी पाहिला... आजि सोनियाचा दिनु, वर्षे अमृताचा घनु, हरि पाहिला रे हरि पाहिला रे, सबाह्य अभ्यंतरी व्यापक हा मुरारी...
वि म्हणजे विनाश ना होणारा अटळ अजर अमर अखंड एकच एक जो विशुद्ध आहे..
ठ्ठ म्हणजे जिकडे तिकडे चोहीकडे मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश असा ठासून भरलेला
ल म्हणजे ज्याला अंत लय नाही असा...हा पांडुरंग
तो पूर्ण अंश प्रभु परमात्मा आहे..
वारी वारी जन्ममरणांते वारी,हारी पडलो आता संकट निवारी !!!
या वर्तमानी सर्वोत्तम प्रेम कामगिरी आहे आणि म्हणूनच या वारीत .... १. कुणालाही निमंत्रण नाही
२. कुठलीचं भंपकबाजी नाही.
३.कोणाचा कोणावर राग रूसवा नाही
४. कोण खायला घालेल की नाही हे माहित नाही
५.खिशात एक रूपया या दमडीची गरज नाही
६.कुठेही गालबोट लागत नाही
७.इहलोकी एवढां मोठा सोहळा जगाच्या पाठीवर कुठेही नाही
८. कोठेच कुणाजवळ गर्वाचा किंवा अहंकाराचा लवलेश नाही
९. असा नेत्रदिपक सोहळा , ऊर भरून आनंद प्रसन्नता लाभणारा सोहळा
१०. श्रीमंतच नाही तर गर्भश्रीमंतीचा सोहळा,कुबेराला ही लाजवेल असा दिमाखदार सोहळा
११. हा सगळा वारीचा अट्टाहास का ?
तर फक्त....
मुख दर्शन व्हावे आता,
तू सकळं जनांचा दाता ||
घे कुशीत या माऊली तुझ्या
पायरी ठेवीतो माथा. !!!
या आषाढी एकादशीच्या दिवशी आपले मन नमन करून सहजतेने विशालतेकडे पहात ... देवा तूचि गणेशु, सकलार्थ मति प्रकाशु... भला करो कर्तार,सबका सबविधी हो कल्याण !!!
दुरितांचे तिमीर जावो,विश्व स्वधर्म सूर्ये पाहो ...
जो जो वांछिल ते ते लाहो सकळ प्राणिजात !!
विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय जय राम कृष्ण हरी !!
0
Answer link
संपत्तीचे अवघड प्रदर्शन पत्र निसर्गाशी मैत्री जोडा ग्राहक संरक्षण या विषयावर एक निबंध खालीलप्रमाणे आहे:
संपत्तीचे अवघड प्रदर्शन पत्र निसर्गाशी मैत्री जोडा ग्राहक संरक्षण
सध्याच्या जगात, संपत्तीचे प्रदर्शन आणि निसर्गाचे संरक्षण या दोन गोष्टी एकमेकांशी विरोधात असल्यासारख्या वाटतात. संपत्तीचे प्रदर्शन म्हणजे गुंतवणुकीतील वाढ, तर निसर्गाचे संरक्षण म्हणजे पर्यावरणाचा संरक्षण करणे. या दोन गोष्टी एकमेकांशी विरोधात असल्याचे दिसून येते कारण संपत्तीचे प्रदर्शन वाढवण्यासाठी अनेकदा पर्यावरणावर परिणाम करणारे व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली जाते.
परंतु, संपत्तीचे प्रदर्शन आणि निसर्गाचे संरक्षण या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जुळवून घेणे शक्य आहे. यासाठी, गुंतवणूकदारांनी निसर्गाशी मैत्रीपूर्ण व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्यावर भर दिला पाहिजे. निसर्गाशी मैत्रीपूर्ण व्यवसाय म्हणजे असे व्यवसाय जे पर्यावरणावर कमी परिणाम करतात आणि पर्यावरण संवर्धनात योगदान देतात.
ग्राहक संरक्षण हा या संदर्भात एक महत्त्वाचा घटक आहे. ग्राहकांनी निसर्गाशी मैत्रीपूर्ण व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. यामुळे, निसर्गाशी मैत्रीपूर्ण व्यवसायांना आर्थिक पाठिंबा मिळेल आणि ते आपले पर्यावरणीय धोरण सुरू ठेवू शकतील.
संपत्तीचे अवघड प्रदर्शन पत्र निसर्गाशी मैत्री जोडा ग्राहक संरक्षण यासाठी काही विशिष्ट उपाययोजना खालीलप्रमाणे आहेत:
गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणूक धोरणात निसर्गाशी मैत्रीपूर्ण व्यवसायांचा समावेश करावा.
ग्राहकांनी निसर्गाशी मैत्रीपूर्ण व्यवसायांमध्ये खरेदी करावी.
सरकारने निसर्गाशी मैत्रीपूर्ण व्यवसायांसाठी प्रोत्साहनात्मक धोरणे राबवावीत.
या उपाययोजनांमुळे, संपत्तीचे प्रदर्शन आणि निसर्गाचे संरक्षण या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जुळवून घेणे शक्य होईल.
या विषयावर काही अतिरिक्त विचार खालीलप्रमाणे आहेत:
संपत्तीचे प्रदर्शन आणि निसर्गाचे संरक्षण या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जुळवून घेण्यासाठी, गुंतवणूकदारांना आणि ग्राहकांना दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे.
निसर्गाशी मैत्रीपूर्ण व्यवसायांमध्ये गुंतवणूक केल्याने, गुंतवणूकदारांना पर्यावरणीय लाभांसह आर्थिक लाभ देखील मिळू शकतात.
सरकारने निसर्गाशी मैत्रीपूर्ण व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी, पर्यावरणीय अहवालीकरण आणि पारदर्शकता यासारखी धोरणे राबवली पाहिजेत.
एकंदरीत, संपत्तीचे अवघड प्रदर्शन पत्र निसर्गाशी मैत्री जोडा ग्राहक संरक्षण हा एक महत्त्वाचा विषय आहे. या विषयावर जागरूकता वाढवून आणि उपाययोजनांवर काम करून, आपण संपत्तीचे प्रदर्शन आणि निसर्गाचे संरक्षण या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जुळवून घेऊ शकतो.
य
1
Answer link
मैत्री म्हणजे काय
मैत्री हे एक नाते आहे, देव आपल्याला भाऊ/बहीण देतो...ते कसेही असोत आपल्याला ते नाते मान्य करावे लागते. पण मैत्री हे असे नाते आहे जे आपण स्वतः ठरवून रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट नाते बनवू शकतो.
मैत्रीत स्त्री - पुरुष हा भेदही नसतो. मैत्री हे एक अनमोल नाते आहे. प्रेमापेक्षा मैत्री महत्त्वाची असते, कारण प्रेम तर सगळ्यांना एकदा तरी रडवते आणि मैत्री ही दुःखातही हसवते.
मैत्रीचा प्रकार एक म्हणजे तो आपला जवळचा आणि आपल्या समस्या जाणून घेणारा असावा .२ म्हणजे तो आपला मूड नसताना सुद्धा त्याने आपल्याना हसवण्याचा प्रयत्न करावा. मित्रांचे प्रकार म्हणजे लंगोटी मित्र, हृदयमित्र, पेनमित्र, इंटरनेट मित्र, कॉम्रेड , अध्यात्मिक मैत्री पाळिव प्राणी, मित्र, वगैरे.
इतिहासातील मैत्री :-
तेनाली रामा आणि महाराज कृष्णदेवराय
बिरबल आणि अकबर
व्यक्तिगत मित्राची लक्षणे
ज्याच्या जवळ
. मनातील भावना व्यक्त करताना संकोच वाटत नाही
. पाप पुण्य सांगण्यात व कबुली देण्यास कचरत नाही
. ज्याला आपले पराक्रम आनंदाने सांगावेसे वाटतात
.ज्याच्याविषयी आपल्या मनात कधीच वाईट विचार येत नाही
*मैत्रीची कविता*
मैत्री कधी ठरवून होत नाही
आपण आपल्या वाटवरुन चालत असतो
आपल्याबरोबर तसे अनेक वाटसरु असतात
रस्ते फुटत असतात....
एकमेकांत येऊन रस्ते मिसळत असतात
आपल्या नकळत कुणाची तरी वाट
आपल्या वाटेला येऊन मिळते
आणि नकळत आपण एकाच
वाटेवरुन समांतर चालु लागतो...
नंतर जवळ येतो
एकमेकाला आधार देतो
एकमेकाला सोबत करतो
एकमेकाची दु:खे वाटुन घेतो
आणि आनंदाचे क्षण साजरे करतो...
मैत्री अशी होते..!
काय जादु असते मैत्रीत!
मैत्री शिववते जगण्याचा खरा अर्थ
मैत्री बदलुन टाकते आयुष्याचे सारे संदर्भ
मैत्री देते आपुलकी, प्रेम अन विश्वास
मैत्री भारुन टाकते आपला श्वास अन श्वास...
कधी कधी वाटतं
समुद्राच्या काठावर शिंपल्याची रास पडलेली असावी
आपण भान विसरुन लहान मुलासारखं
त्यात खेळत असावं
शिंपलेच - शिंपले ....
विविध रंगाचे... विविध आकाराचे ... विविध प्रकारचे...
सहजपणे त्यातला एक शिंपला उचलुन घ्यावा
अलगद उघडावा
अन त्यात मोती सापडावा ....!
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
Answer link
मैत्री श्रेष्ठ की कर्तव्य कि नातं. -
मैत्री म्हटलं की सुदामा कृष्णा चे मैत्रीचं नात्याला तोड नाही.मित्र सर्वानाच असतात . परंतु शेवटपर्यंत टिकून असतात ते बालमित्र .वाढत्या वयानुसार स्थल काल परत्वे मैत्रीचे नाते वृध्दिंगत होत असते.जिथे वैचारिक साम्य असते. सहवास एकमेकांच्या भेटीगाठी शिवाय चैनच पडत नाही. जिवनाच्या प्रवासात अनेक मित्र भेटले. जिवाला जिव लावणारे सख्खे भाऊ सुध्दा मित्र असु शकतात. जेव्हा विवाह होतो आणि दोघेही स्वतंत्ररीत्या अलिप्त होतात.तेव्हा याच भाऊबंदकी असलेल्या मैत्री च्या नात्यात दुरावा निर्माण होतो. एकमेकांना जपणारे भाऊ एकमेकांच्या अंगावर उठतात. ते केवळ संपत्ती साठी किंवा हिस्से वाटणी साठी. नातं किंवा मैत्री असं होत असते का ? एवढं कसं अंतर विचारात निर्माण होतो. मुलगा वडील हे सूध्दा मित्र असू शकतात. या नात्यात मी दुरावा बघीतलं आहे. दुरावा मतभिन्नता जलन स्पर्धा ज्या नात्यात नाही . असं नातं म्हणजे मैत्री . पण असं नातं शंभरात एखादंच .आई मुलगा. भाऊ बहिण. वडील मुलगा. मुलगी वडील. जावई सासरे .अशा रक्ताच्या नात्यात बरेचदा मैत्री असते. मैत्री जेवढी दृढ तेवढंच नाते दृढ. मग ते रक्ताचे असो की रक्ता बाहेरचे. प्रश्न असा निर्माण होतो की पारदर्शकता अधिक कोणत्या नात्यात असते. म्हणतात ना मैत्री पिंपळाच्या पानासारखी असावी जितकी जिर्ण तेवढीच पारदर्शकता. आणि हे सत्य आहे.वेळ प्रसंगानुसार जिवाला जिव लावणारे. सुख दुःखात सहभागी होणारे सर्वच नात्यात कुठे ना कुठे मैत्री भावना असते. पण मैत्री एवढ्यावरच थांबत नाही. या नात्यात कुठेतरी अहंभाव महत्त्व मी पणा ज्याला आपण क्रेडिट म्हणतोय ते घेणारे आलेच. प्रत्येक जणच ज्याच्या घरी ते खाऊन घेऊन प्रत्येकच जण आप आपल्या ठिकाणी सुखी असतो. मोह माया मी पणा हटवादी प्रवृत्ती मी म्हणतो तेच खरे. माझ्यामुळेच झालं चांगले पार पडलं आटोपले या सर्व गोष्टी मेत्रीत नात्यात होत असतात का ? अगदी जवळचे मित्र सुध्दा आपला मित्र आपल्या पेक्षा जास्त गुणवत्ता प्राप्त करतो का .आपल्या समोर जातो का . असं श्रेष्ठ होणे समोर जाणं प्रसिद्धी मिळणे. या सर्व बाबी मैत्रीत खटकतं असतात. माणसाचा तो स्थायी भावच आहे आपल्या स्वता पैक्षा समोर गेलेले प्रगती केलेली डोळ्यात सहन होत नाही. पाय मागे ओढण्याचा प्रयत्न केला जातो. केवळ ताटा खालच मांजर बणून असावे. हीच भावना असते. मग वेगवेगळे डावपेच करणं. काहीतरी भिन्न परीस्थिती निर्माण करणे. कमजोर करण्याचं प्रयत्न करणे. छुपे डावपेच करणं. समोर चांगले मागे काहीतरी वेगळेच खेळ चालले असतात. कुरघोडी करणे. यामुळे मैत्रीतील विश्र्वासाहर्ता संपवितात आणि तसेच तो मी नव्हेच ची भुमिका घेणे.मैत्रीतील शुध्दता सुंदरता संपवितात .जे सुंदर आहे ते स्वच्छ आहे. जे स्वच्छ आहे ते शुद्ध आहे. आणि जे शुध्द आहे ते पारदर्शक असते. जसं पाण्यात चेहरा शुध्द दिसतो . काच हे पारदर्शक आहे. आकाश निरभ्र आहे. हवेच अस्तीत्व जाणवतं पण दिसत नाही. तसंच नातं मैत्रीचं असायला हवं. अपवाद वगळता निरपेक्ष पारदर्शकता भाव फारच कमी. अगदी शुन्य. बरेच लोक शुन्याला किंमत नाही . असे म्हणतात. तोच शुन्य एक च्या उजवीकडे बसला तर एकचे मुल्य दहा होते. पुढे हाच क्रम चालू असला तर ते अनंता पलीकडे वाढते.असच मेत्रीत व्हायला पाहिजे. असंच व्हायला पाहिजे. पण असं फार कमी प्रमाणात होत असते. ज्याला अंत नाही असं पारदर्शक नातं म्हणजे मैत्री. एक एक मित्र सोबत असल की ते अनंता पलीकडे जाते . परंतु तो भाव जपता आलं पाहिजे. एकदा काय झालं दोघेही गावातच राहणारे.दोघे मित्र एक डाक्टर तर दुसरा शिक्षक दोघेही बालमित्र. शिक्षक मित्राची प्रकृती बिघडली. त्याची पत्नी घाबरली . ती डाक्टर मित्राकडे गेली. यांची प्रकृती फार गंभीर आहे.कृपया बघता का घरी आहेत चलता का.. डाक्टर मित्राने नकार दिला. तिच्या डोळ्यात अश्रु आले. ती नाराज झाली. मित्रा विषयीच प्रेम संपुष्टात आले. शिक्षकांनी डाक्टरची बाजू घेत पत्नीला समजावीले. अगं तो व्यस्त असेल. पेशंट असतील . वेळ नसेल. म्हणत प्रसंग सावरलं ती म्हणाली तुमचा तो मित्र डाक्टर म्हणून नाही. परंतु मित्र म्हणून आलं असतं . पण साधा एक फोन किंवा चौकशी करू शकत होतं. हे चुकीचे नाही का . मग कसला मित्र कसलं नातं. शिक्षक मित्र अनूत्तरीत झालं. पतीला म्हणाली या ठिकाणी तुमच्या ऐवजी त्यांची प्रकृती बिघडली असती तर तुम्ही प्रथमता निरोप मिळता क्षणी धाव घेतले असते. असो काही प्रसंग मैत्रीच्या नात्याला संशयित करतात. म्हणूनच म्हणतात मैत्री ही पिंपळाच्या पानासारखी असावी जितकी जिर्ण तेवढीच पारदर्शकता असावी .तोच दुसरा प्रसंग नदीच्या पाण्यात डोहात बुडणार्या माणसाला किनार्या वरून पाहा पाहा म्हणणारे अनेक असतात. परंतु स्वताच जिव धोक्यात टाकून जिव वाचविणारा अनोळखी मित्र एकादाच असतो.त्याला जिवन दान देतो. दोन्ही प्रसंगात व्यक्ती एकच मित्र भिन्न. कोणता मित्र श्रेष्ठ ? कोणता भाव पारदर्शकता दाखविते. असे अनेक उदाहरणे सांगता येतील. दोघेही पती पत्नी असणारे डाक्टर दांपत्य आपल्याच जिव्हाळ्याच्या नात्यातील माणसाच्या प्रसंगानुरूप उपयोगी पडत नसेल तर त्यांच्या वैद्यकीय शिक्षणाच काय उपयोग. शिक्षक असेल आणि कुटुंबातील मुलांना घडविण्यात सहकार्य होत नसेल तर त्याचा परीवाराला काय उपयोग . परंतु मेत्रीत नात्यात हा भाव असतो का . शिक्षणासाठी शहरात राहून हाटेल चेडब्बे खाणारे अनेक मुलं असतात. त्यांना मैत्रीतील किंवा नात्यातील लोक किती जवळ करतात. कुठे आहे पारदर्शकता. नांत कोणतेही असो निरपेक्ष भाव निरपेक्ष पारदर्शकता असायलाच पाहिजे.जपायलाच पाहिजे . म्हणूनच मैत्री पिंपळाच्या पानासारखी........ . सर्व सुखी भवन्तु सर्व सुखी निरामय.