मैत्री

मैत्री म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

मैत्री म्हणजे काय?

1
मैत्री म्हणजे काय 
मैत्री हे एक नाते आहे, देव आपल्याला भाऊ/बहीण देतो...ते कसेही असोत आपल्याला ते नाते मान्य करावे लागते. पण मैत्री हे असे नाते आहे जे आपण स्वतः ठरवून रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट नाते बनवू शकतो.


मैत्रीत स्त्री - पुरुष हा भेदही नसतो. मैत्री हे एक अनमोल नाते आहे. प्रेमापेक्षा मैत्री महत्त्वाची असते, कारण प्रेम तर सगळ्यांना एकदा तरी रडवते आणि मैत्री ही दुःखातही हसवते.

मैत्रीचा प्रकार एक म्हणजे तो आपला जवळचा आणि आपल्या समस्या जाणून घेणारा असावा .२ म्हणजे तो आपला मूड नसताना सुद्धा त्याने आपल्याना हसवण्याचा प्रयत्न करावा. मित्रांचे प्रकार म्हणजे लंगोटी मित्र, हृदयमित्र, पेनमित्र, इंटरनेट मित्र, कॉम्रेड ,  अध्यात्मिक मैत्री  पाळिव प्राणी, मित्र, वगैरे.

इतिहासातील मैत्री :-

तेनाली रामा आणि महाराज कृष्णदेवराय

बिरबल आणि अकबर



व्यक्तिगत मित्राची लक्षणे

ज्याच्या जवळ

. मनातील भावना व्यक्त करताना संकोच वाटत नाही
. पाप पुण्य सांगण्यात व कबुली देण्यास कचरत नाही
. ज्याला आपले पराक्रम आनंदाने सांगावेसे वाटतात
.ज्याच्याविषयी आपल्या मनात कधीच वाईट विचार येत नाही


*मैत्रीची कविता*
मैत्री कधी ठरवून होत नाही
आपण आपल्या वाटवरुन चालत असतो
आपल्याबरोबर तसे अनेक वाटसरु असतात
रस्ते फुटत असतात....

एकमेकांत येऊन रस्ते मिसळत असतात
आपल्या नकळत कुणाची तरी वाट
आपल्या वाटेला येऊन मिळते
आणि नकळत आपण एकाच
वाटेवरुन समांतर चालु लागतो...

नंतर जवळ येतो
एकमेकाला आधार देतो
एकमेकाला सोबत करतो
एकमेकाची दु:खे वाटुन घेतो
आणि आनंदाचे क्षण साजरे करतो...

मैत्री अशी होते..!
काय जादु असते मैत्रीत!
मैत्री शिववते जगण्याचा खरा अर्थ
मैत्री बदलुन टाकते आयुष्याचे सारे संदर्भ
मैत्री देते आपुलकी, प्रेम अन विश्वास
मैत्री भारुन टाकते आपला श्वास अन श्वास...

कधी कधी वाटतं
समुद्राच्या काठावर शिंपल्याची रास पडलेली असावी
आपण भान विसरुन लहान मुलासारखं
त्यात खेळत असावं
शिंपलेच - शिंपले ....
विविध रंगाचे... विविध आकाराचे ... विविध प्रकारचे...
सहजपणे त्यातला एक शिंपला उचलुन घ्यावा
अलगद उघडावा
अन त्यात मोती सापडावा ....!
उत्तर लिहिले · 31/7/2023
कर्म · 48555
0

मैत्री म्हणजे दोन किंवा अधिक लोकांमधील वैयक्तिक नातेसंबंध जे प्रेम, काळजी आणि विश्वासावर आधारित आहे. मैत्रीत सहसा समान आवडी, विश्वास आणि मूल्ये असतात. मित्र एकमेकांच्या आनंदात आणि दुःखात एकमेकांसोबत असतात. ते एकमेकांना मदत करतात, प्रोत्साहित करतात आणि समजून घेतात. मैत्री ही जीवनातील एक महत्त्वाची गोष्ट आहे. ती आपल्याला आनंद, समाधान आणि समर्थन देते.

मैत्रीचे अनेक फायदे आहेत. मैत्री आपल्याला:

आनंदी राहण्यास मदत करते.
तणाव कमी करते.
आत्मविश्वास वाढवते.
सामाजिक कौशल्ये सुधारते.
आरोग्य सुधारते.
दीर्घायुष्य वाढवते.
मैत्री निर्माण करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहे. यामध्ये:

समान आवडी, विश्वास आणि मूल्ये असलेल्या लोकांशी संवाद साधणे.
एकमेकांशी विश्वास ठेवणे.
एकमेकांना मदत करणे.
एकमेकांना समजून घेणे.
एकमेकांच्या गोष्टी ऐकणे.
एकमेकांना माफ करणे.
एकमेकांसोबत वेळ घालवणे.
मैत्री ही एक अनमोल भेट आहे. ती आपल्याला जीवनात आनंद, समाधान आणि समर्थन देते. जर तुम्हाला चांगले मित्र असतील तर तुम्ही भाग्यवान आहात.


उत्तर लिहिले · 31/7/2023
कर्म · 34195

Related Questions

पुस्तकांशी मैत्री करण्याचे फायदे?
आद्यआत्मा आध्यात्म विद्य विज्ञान सुज्ञ प्रज्ञान सत्संग विवेक तसेच आर्त आर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी यांना नवभक्ती, त्यांचे मनोमिलन म्हणजे जीवन आयुष्याचं वस्त्र विणणे याला प्रेम नम्रता एकत्व ची जोड देणं याला जीवन ऐसे नाव ? मनापासून अंतर्मुख होऊन विवेकी विचारातून उत्तर हवे , आषाढी एकादशी आहे
संपत्तीचे अवघड प्रदर्शन पत्र निसर्गाशी मैत्री जोडा ग्राहक संरक्षण?
मैत्री श्रेष्ठ की कर्तव्य कि नातं?
जीवन जगत असताना मैत्री मोठा आधार ठरतो का?
मैत्री कशी असावी?
मित्र कसा असावा?