मैत्री

मैत्री श्रेष्ठ की कर्तव्य कि नातं?

1 उत्तर
1 answers

मैत्री श्रेष्ठ की कर्तव्य कि नातं?

0


 मैत्री श्रेष्ठ की कर्तव्य कि नातं. - 


मैत्री म्हटलं की सुदामा कृष्णा चे मैत्रीचं नात्याला तोड नाही.मित्र सर्वानाच असतात . परंतु शेवटपर्यंत टिकून असतात ते बालमित्र .वाढत्या वयानुसार स्थल काल परत्वे मैत्रीचे नाते वृध्दिंगत होत असते.जिथे वैचारिक साम्य असते. सहवास एकमेकांच्या भेटीगाठी शिवाय चैनच पडत नाही. जिवनाच्या प्रवासात अनेक मित्र भेटले. जिवाला जिव लावणारे सख्खे भाऊ सुध्दा मित्र असु शकतात. जेव्हा विवाह होतो आणि दोघेही स्वतंत्ररीत्या अलिप्त होतात.तेव्हा याच भाऊबंदकी असलेल्या मैत्री च्या नात्यात दुरावा निर्माण होतो. एकमेकांना जपणारे भाऊ एकमेकांच्या अंगावर उठतात. ते केवळ संपत्ती साठी किंवा हिस्से वाटणी साठी. नातं किंवा मैत्री असं होत असते का ? एवढं कसं अंतर विचारात निर्माण होतो. मुलगा वडील हे सूध्दा मित्र असू शकतात. या नात्यात मी दुरावा बघीतलं आहे. दुरावा मतभिन्नता जलन स्पर्धा ज्या नात्यात नाही . असं नातं म्हणजे मैत्री . पण असं नातं शंभरात एखादंच .आई मुलगा. भाऊ बहिण. वडील मुलगा. मुलगी वडील. जावई सासरे .अशा रक्ताच्या नात्यात बरेचदा मैत्री असते. मैत्री जेवढी दृढ तेवढंच नाते दृढ. मग ते रक्ताचे असो की रक्ता बाहेरचे. प्रश्न असा निर्माण होतो की पारदर्शकता अधिक कोणत्या नात्यात असते. म्हणतात ना मैत्री पिंपळाच्या पानासारखी असावी जितकी जिर्ण तेवढीच पारदर्शकता. आणि हे सत्य आहे.वेळ प्रसंगानुसार जिवाला जिव लावणारे. सुख दुःखात सहभागी होणारे सर्वच नात्यात कुठे ना कुठे मैत्री भावना असते. पण मैत्री एवढ्यावरच थांबत नाही. या नात्यात कुठेतरी अहंभाव महत्त्व मी पणा ज्याला आपण क्रेडिट म्हणतोय ते घेणारे आलेच. प्रत्येक जणच ज्याच्या घरी ते खाऊन घेऊन प्रत्येकच जण आप आपल्या ठिकाणी सुखी असतो. मोह माया मी पणा हटवादी प्रवृत्ती मी म्हणतो तेच खरे. माझ्यामुळेच झालं चांगले पार पडलं आटोपले या सर्व गोष्टी मेत्रीत नात्यात होत असतात का ? अगदी जवळचे मित्र सुध्दा आपला मित्र आपल्या पेक्षा जास्त गुणवत्ता प्राप्त करतो का .आपल्या समोर जातो का . असं श्रेष्ठ होणे समोर जाणं प्रसिद्धी मिळणे. या सर्व बाबी मैत्रीत खटकतं असतात. माणसाचा तो स्थायी भावच आहे आपल्या स्वता पैक्षा समोर गेलेले प्रगती केलेली डोळ्यात सहन होत नाही. पाय मागे ओढण्याचा प्रयत्न केला जातो. केवळ ताटा खालच मांजर बणून असावे. हीच भावना असते. मग वेगवेगळे डावपेच करणं. काहीतरी भिन्न परीस्थिती निर्माण करणे. कमजोर करण्याचं प्रयत्न करणे. छुपे डावपेच करणं. समोर चांगले मागे काहीतरी वेगळेच खेळ चालले असतात. कुरघोडी करणे. यामुळे मैत्रीतील विश्र्वासाहर्ता संपवितात आणि तसेच तो मी नव्हेच ची भुमिका घेणे.मैत्रीतील शुध्दता सुंदरता संपवितात .जे सुंदर आहे ते स्वच्छ आहे. जे स्वच्छ आहे ते शुद्ध आहे. आणि जे शुध्द आहे ते पारदर्शक असते. जसं पाण्यात चेहरा शुध्द दिसतो . काच हे पारदर्शक आहे. आकाश निरभ्र आहे. हवेच अस्तीत्व जाणवतं पण दिसत नाही. तसंच नातं मैत्रीचं असायला हवं. अपवाद वगळता निरपेक्ष पारदर्शकता भाव फारच कमी. अगदी शुन्य. बरेच लोक शुन्याला किंमत नाही . असे म्हणतात. तोच शुन्य एक च्या उजवीकडे बसला तर एकचे मुल्य दहा होते. पुढे हाच क्रम चालू असला तर ते अनंता पलीकडे वाढते.असच मेत्रीत व्हायला पाहिजे. असंच व्हायला पाहिजे. पण असं फार कमी प्रमाणात होत असते. ज्याला अंत नाही असं पारदर्शक नातं म्हणजे मैत्री. एक एक मित्र सोबत असल की ते अनंता पलीकडे जाते . परंतु तो भाव जपता आलं पाहिजे. एकदा काय झालं दोघेही गावातच राहणारे.दोघे मित्र एक डाक्टर तर दुसरा शिक्षक दोघेही बालमित्र. शिक्षक मित्राची प्रकृती बिघडली. त्याची पत्नी घाबरली . ती डाक्टर मित्राकडे गेली. यांची प्रकृती फार गंभीर आहे.कृपया बघता का घरी आहेत चलता का.. डाक्टर मित्राने नकार दिला. तिच्या डोळ्यात अश्रु आले. ती नाराज झाली. मित्रा विषयीच प्रेम संपुष्टात आले. शिक्षकांनी डाक्टरची बाजू घेत पत्नीला समजावीले. अगं तो व्यस्त असेल. पेशंट असतील . वेळ नसेल. म्हणत प्रसंग सावरलं ती म्हणाली तुमचा तो मित्र डाक्टर म्हणून नाही. परंतु मित्र म्हणून आलं असतं . पण साधा एक फोन किंवा चौकशी करू शकत होतं. हे चुकीचे नाही का . मग कसला मित्र कसलं नातं. शिक्षक मित्र अनूत्तरीत झालं. पतीला म्हणाली या ठिकाणी तुमच्या ऐवजी त्यांची प्रकृती बिघडली असती तर तुम्ही प्रथमता निरोप मिळता क्षणी धाव घेतले असते. असो काही प्रसंग मैत्रीच्या नात्याला संशयित करतात. म्हणूनच म्हणतात मैत्री ही पिंपळाच्या पानासारखी असावी जितकी जिर्ण तेवढीच पारदर्शकता असावी .तोच दुसरा प्रसंग नदीच्या पाण्यात डोहात बुडणार्या माणसाला किनार्या वरून पाहा पाहा म्हणणारे अनेक असतात. परंतु स्वताच जिव धोक्यात टाकून जिव वाचविणारा अनोळखी मित्र एकादाच असतो.त्याला जिवन दान देतो. दोन्ही प्रसंगात व्यक्ती एकच मित्र भिन्न. कोणता मित्र श्रेष्ठ ? कोणता भाव पारदर्शकता दाखविते. असे अनेक उदाहरणे सांगता येतील. दोघेही पती पत्नी असणारे डाक्टर दांपत्य आपल्याच जिव्हाळ्याच्या नात्यातील माणसाच्या प्रसंगानुरूप उपयोगी पडत नसेल तर त्यांच्या वैद्यकीय शिक्षणाच काय उपयोग. शिक्षक असेल आणि कुटुंबातील मुलांना घडविण्यात सहकार्य होत नसेल तर त्याचा परीवाराला काय उपयोग . परंतु मेत्रीत नात्यात हा भाव असतो का . शिक्षणासाठी शहरात राहून हाटेल चेडब्बे खाणारे अनेक मुलं असतात. त्यांना मैत्रीतील किंवा नात्यातील लोक किती जवळ करतात. कुठे आहे पारदर्शकता. नांत कोणतेही असो निरपेक्ष भाव निरपेक्ष पारदर्शकता असायलाच पाहिजे.जपायलाच पाहिजे . म्हणूनच मैत्री पिंपळाच्या पानासारखी........ . सर्व सुखी भवन्तु सर्व सुखी निरामय.
उत्तर लिहिले · 24/12/2022
कर्म · 48555

Related Questions

पुस्तकांशी मैत्री करण्याचे फायदे?
आद्यआत्मा आध्यात्म विद्य विज्ञान सुज्ञ प्रज्ञान सत्संग विवेक तसेच आर्त आर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी यांना नवभक्ती, त्यांचे मनोमिलन म्हणजे जीवन आयुष्याचं वस्त्र विणणे याला प्रेम नम्रता एकत्व ची जोड देणं याला जीवन ऐसे नाव ? मनापासून अंतर्मुख होऊन विवेकी विचारातून उत्तर हवे , आषाढी एकादशी आहे
संपत्तीचे अवघड प्रदर्शन पत्र निसर्गाशी मैत्री जोडा ग्राहक संरक्षण?
मैत्री म्हणजे काय?
जीवन जगत असताना मैत्री मोठा आधार ठरतो का?
मैत्री कशी असावी?
मित्र कसा असावा?