1 उत्तर
1
answers
रॉकी हा पर्वत कोणत्या देशात आहे?
1
Answer link
*रॉकी पर्वत
उत्तर अमेरिका खंडाच्या पश्चिम भागातील एक प्रमुख पर्वतश्रेणी. दक्षिणेस अ. सं. सं. तील मेक्सिको राज्यापासून उत्तरेस वायव्य अलास्कापर्यंत पसरलेल्या या पर्वतश्रेणीची लांबी ४,८०० किमी.,रुंदी ११२ किमी. ते ६४४ किमी. व सस. पासून उंची १,५०० मी. ते ४,३९८ मी. पर्यंत आढळते.
कोलोरॅडो राज्यातील मौंट एल्बर्ट (उंची ४,३९८ मी.) हे या पर्वतश्रेणीतील सर्वोच्च शिखर आहे. पूर्वेकडील विशाल मैदानी प्रदेश व पश्चिमेकडील रुंद द्रोणी प्रदेश आणि पठारी प्रदेश यांदरम्यान रॉकी पर्वताचा विस्तार आहे. या पर्वतश्रेणीमुळे पॅसिफिक महासागराकडे वाहत जाणाऱ्या नद्यांपासून आर्क्टिक व अटलांटिक या महासागरांकडे वाहत जाणाऱ्या नद्या अलग केल्या गेल्या आहेत.
धन्यवाद...!!