भूगोल
जागतिक प्रमाण वेळ कोणती मानली जाते?
1 उत्तर
1
answers
जागतिक प्रमाण वेळ कोणती मानली जाते?
0
Answer link
ग्रीनविच प्रमाणवेळ (Greenwich Mean Time; संक्षेप : (GMT) ही लंडनच्या ग्रीनविच बरोमधील रॉयल ऑब्झर्व्हेटरीमध्ये पाळली जात असलेली एक प्रमाणवेळ आहे.
पृथ्वीवरील मुख्य रेखावृत्त (०० रेखांश) लंडनच्या ग्रीनविच ह्या उपनगरामधून जात असल्याचे गृहीत धरले आसल्याने ग्रीनविच प्रमाणवेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यूटीसी (युनिव्हर्सल टाईम कोआॅर्डिनेटेड) या जागतिक प्रमाणवेळेसाठी ग्रीनविच येथील स्थानिक वेळ ही आधारभूत धरली जाते. यूटीसी±००:०० ही प्रमाणवेळ ग्रीनविच वेळेशी संलग्न आहे.
जागतिक समन्वित वेळ (इंग्लिश: Coordinated Universal Time) किंवा यूटीसी हे आंतरराष्ट्रीय परमाण्विक वेळेवर आधारलेले वेळ मोजण्याचे एक प्रमाण आहे. ह्या प्रमाणाद्वारे सध्या जगातील सर्व स्थानांवरील प्रमाणवेळ ठरवली जाते. पूर्वी याच कामासाठी ग्रीनविच सरासरी वेळ (GMT) वापरली जाई.. ग्रीनविच सरासरी वेळ ही लंडनमधील ग्रीनिच ह्या स्थळाची स्थानिक वेळ आहे. ही यूटीसीशी मिळतीजुळती आहे. जगातील सर्व आंतरराष्ट्रीय कालविभाग आता यूटीसीच्या संदर्भात मोजले जातात.