भूगोल

महानगर म्हणजे काय? त्याच्या प्रमुख समस्या कोणत्या आहेत?

1 उत्तर
1 answers

महानगर म्हणजे काय? त्याच्या प्रमुख समस्या कोणत्या आहेत?

1
महानगर म्हणजे काय
ग्रामीण जीवनपद्धतीपेक्षा वेगळ्या जीवनपद्धतीची आणि खेड्यापेक्षा अधिक व दाट लोकसंख्या असलेल्या मानवी वसाहतीस नगर किंवा शहर आणि त्याहीपेक्षा अधिक लोकसंख्येच्या व जीवनाच्या आणि संस्कृतीच्या अनेकविध अंगोपांगाचे दर्शन घडविणारी मानवी वसाहत म्हणजे महानगर असे स्थूलमानाने म्हणता येईल. वसाहतींच्या आकारमानातील फरक दर्शविण्यासाठी रोजच्या व्यवहारांत पाडा, वस्ती, वाडी, गाव, खेडेगाव, नगर, शहर, महानगर इ. अभिधाने वापरतात. बहुतेकांच्या बाबतीत त्यामध्ये वास्तव्य करीत असलेली लोकसंख्या हे गमक मानण्यात येते. तथापि नगरांच्या आकारमानाविषयीही जगात सर्वत्र एकवाक्यता आढळत नाही. स्वीडन व डेन्मार्क या देशांत केवळ २०० लोक असणारी वसाहत नगर या संज्ञेस पात्र ठरते. मलायात व चिलीत निदान १,००० लोकसंख्या असणे हे शहराचे गमक मानण्यात येते, तर कॅनडा व अर्जेटिनामध्ये हेच गमक २,००० भारत व घानामध्ये ५,००० स्वित्झर्लंड, तुर्कस्तानमध्ये १०,००० जपानमध्ये ३०,००० आणि कोरियात ४०,००० लोकसंख्या असणाऱ्या वसाहतींनाच नगर अथवा शहर म्हणतात. भारतात १९६१ च्या जनगणनेपासून ५,००० लोकसंख्य़ा असणारे, दर चौ. किमी. निदान १,००० लोकवस्तीची घनता असलेले आणि एकूण काम करणाऱ्या लोकांपैकी ७५ टक्क्यांहून अधिक लोक बिगर शेती व्यवसायात काम करणारे असलेले ठिकाण नगर किंवा शहर मानण्यात येऊ लागले

महानगर समस्या

शहरीकरण म्हणजे सर्वसमावेशक प्रगतीची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक चालकशक्ती असल्याचे मानले जाते. पण शहरीकरण आपल्याबरोबर अनेक नव्या समस्याही घेऊन येते.

स्थलांतर

शहरीकरण वाढीच्या प्रक्रियेत स्थलांतर ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. जगाच्या बहुतेक विकसनशील देशांमधे शहरी वाढीचा दर तुलनेने उच्च आहे. शहरीकरणात ग्रामीण लोकांनी शहरांकडे केलेले स्थलांतर हा एक महत्त्वाचा घटक राहिलेला आहे.

गृहनिर्माण

वाढत्या शहरी लोकसंख्येसाठी गृहनिर्माण हे सर्वात मोठे आव्हान आहे. शहरी मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नाशी तुलना करता घरांच्या वाढत्या किंमतींमुळे कमी उत्पन्न गटातील लोकांना परवडणारी घरे घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे ते अशा ठिकाणी राहातात जेथे योग्य वेंटिलेशन, प्रकाश, पाणीपुरवठा, सांडपाणी इत्यादींपासून ते वंचित असतात. उदाहरणार्थ दिल्लीमध्ये सध्याचा अंदाजाप्रमाणे येत्या दशकात 5,00,000 घरांचा तुटवडा असेल. युनायटेड नेशन्स सेंटर फॉर ह्यूमन सेटलमेंटस् (यूएनसीएचएस) ने "गृह दारिद्र्य" अशी एक नवी संकल्पना मांडली आहे, ज्यात असे लोक मोडतात की जे "सुरक्षित आणि निरोगी निवारा, जसे नळाच्या पाण्याचा पुरवठा, किमान स्वच्छता, ड्रेनेज, घरगुती कचरा वाहून नेण्याची तरतूद" या किमान गोष्टींपासून वंचित असतात.

सुरक्षित पिण्याचे पाणी

शहरातील पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत दूषित असतात. कारण शहरातील पाणी मुळातच अपुरे असते आणि भविष्यात, अपेक्षित लोकसंख्या वाढीसाठी पुरेशा पाण्याच्या उपलब्धतेचा प्रश्न तीव्र असतो.

अस्वच्छता

अस्वच्छता ही शहरी भागात, विशेषत: झोपडपट्टीतील आणि अनधिकृत वसाहतींमधील तर पाचवीला पुजलेली आहे. यामुळे अनेक प्रकारच्या अस्वच्छतेमुळे पसरणाऱ्या रोगराई, जसे की डायरिया, मलेरिया इत्यादीचा प्राधुर्भाव होतो. असुरक्षित कचरा विल्हेवाट ही शहरी क्षेत्रातील एक गंभीर समस्या आहे आणि कचरा व्यवस्थापन तर एक कायम मोठे आव्हान आहे.

आरोग्य आणि शिक्षण

शिक्षण आणि आरोग्य हे मानवी विकासाचे (Human Development) महत्त्वाचे संकेतक (indicators) मानले गेले आहेत. शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही बाबतीत ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी गरीबांची आरोग्य स्थिती जास्तच प्रतिकूल असते.
उत्तर लिहिले · 29/3/2023
कर्म · 7460

Related Questions

मानवी भूगोलाच्या शाखांची नांवे लिहा?
प्राकृतिक भूगोलाची व्याख्या सांगून स्वरूप व व्याप्ती स्पष्ट करा?
मानवी भूगोलाच्या शाखा?
पनवेल कुठे आहे?
Scs चा अर्थ काय आहे विषय भूगोल?
जागतिक प्रमाण वेळ कोणती मानली जाते?
कर्कवृत्त किती राज्यातून जाते?