कथा साहित्य

नवकथेचे स्वरुप कसे स्पष्ट कराल?

2 उत्तरे
2 answers

नवकथेचे स्वरुप कसे स्पष्ट कराल?

1
नवकथेचे स्वरुप
नवकथेच्या साहित्यप्रवाहाला बळकटी देण्याचे काम १९४५ नंतरच्या अनेक साहित्यिकांनी केले. यामध्ये गूढकथा लिहिणारे रत्नाकर मतकरी, घटनाप्रधान-कथानकप्रधान व लक्षणीय कथा लिहिणारे श्री. दा. पानवलकर, दिलीप चित्रे, जी. ए. कुलकर्णी येतात. •याबरोबरच विद्याधर पुडंलिक, चि. त्र्यं. खानोलकर, कमल देसाई, गौरी देशपांडे, ज्ञानेश्वर नाडकर्णी, रंगनाथ पठारे, भारत सासणे इ. नी आपल्या कथालेखनाने कथासाहित्याचा आकार, घाट कलात्मक बनविला. जी.एं.नी आपल्या कथांतून कर्नाटक, महाराष्ट्र यांच्या सीमाभागातील लोकांचे जीवन चित्रित केले आहे. विद्याधर पुंडलिकांच्या कथेत मनोविश्लेषण येते. ते आपल्या कथेतून सूक्ष्म असे अनुभव रेखाटतात. चि. त्र्यं. खानोलकर आपल्या लेखनात कोकणचा परिसर, तिथली माणसे, त्यांच्या भावना, वासना-विकार, विकृतीचे प्रतिमा व प्रतिकांच्या सहाय्याने लोकविलक्षण आणि झपाटून टाकणारे जीवन चित्रित करतात. त्यांनी लघुकथांबरोबर दीर्घकथाही लिहिल्या. जास्तीत जास्त दीर्घकथा लिहिणारे ज्ञानेश्वर नाडकर्णी आपल्या कथांतून जगावेगळे अनुभव टिपणे, स्वतंत्र प्रतिमा योजणे, वैचित्र्यपूर्ण आशय या गोष्टी हाताळताना दिसतात. रंगनाथ पठारे व भारत सासणे यांनीदेखील वैशिष्ट्यपूर्ण कथा लिहिल्या. १९६० च्या आगेमागे निर्माण झालेल्या या नवकथाकारांनी आपल्या लेखन वैशिष्ट्यांनी कथा साहित्याचा अंतर्बाह्य कायापालट केला.

१९६० अगोदर व नंतरच्या काळात सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींच्या परिवर्तनाचे परिणाम साहित्यामध्येही दिसू लागले. आपल्या प्रश्नांना,अनुभवांना, जाणिवांना घेऊन लेखक साहित्यातून लिहू लागले. त्यातूनच साहित्यात नवे प्रवाह निर्माण झाले. त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण, दलित, महानगरीय, स्त्रियांचे असे प्रवाह निर्माण झाले. प्रत्येक प्रवाह व त्या प्रवाहाशी संबंधित असलेल्या कथाकारांचा विचार आपण इथे करणार आहोत. प्रथम ग्रामीण साहित्याचा विचार आपण करणार आहोत. स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षण घेतलेला तरुण ग्रामीण जीवनजाणीवा साहित्यातून व्यक्त करू लागला. ग्रामीण भागातील प्रश्न, अडचणी, शेतकरी, तिथला निसर्ग या सर्वांना तो साहित्यातून मांडू लागला. यातूनच निर्माण झालेल्या ग्रामीण प्रवाहाचा विचार आपण करणार आहोत.

नवकथाकारानंतरच्या पिढीतील महत्त्वाचे कथाकार म्हणजे जी.ए. कुलकर्णी. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनसामर्थ्याने कथा या प्रकाराला समृद्ध करणारे महत्त्वाचे कथालेखन त्यांनी केले. निळासावळा, पारवा, हिरवे रावे, रक्तचंदन, काजळमाया, रमलखुणा, सांजशकून, पिंगळावेळ हे कथासंग्रह आहेत. त्यांना आपल्या कथासाठी परंपरागत कथास्वरूपाचा म्हणजे बोधकथा, नीतिकथा, प्राणीकथा, रूपककथा, दृष्टांतकथा यांचा स्वीकार केला. वासना आणि अंधश्रद्धा यातून निर्माण होणारे जगण्याचे आंतरिक पेचाचे चित्रण त्यांनी आपल्या कथेतून केले. त्यांनी कथेच्या पारंपरिक स्वरूपात बदल केले नाहीत पण आशयाला वेगळी कलाटणी दिली. त्यांनी आपल्या कथांमधून कर्नाटक व महाराष्ट्र यांच्या सीमाभागातील खालच्या वर्गातील गरीबांचे जीवन चित्रण केले आहे. मानवी जीवन मृत्यूच्या गूढतेचा शोध ते नेहमी आपल्या कथांमधून घेत असत. त्यांच्या कथेची शैली पूर्णतः वेगळी होती. बातावरणनिर्मिती, जीवनचिंतन, व्यक्तिचित्रण त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रतिमा, प्रतिकांचा वापर करुन कथा आशयदृष्ट्या समृद्ध केली. भाषेचा औचित्यपूर्ण वापर, घटना-प्रसंगात न अडकता मानवी मनाचा वेध घेऊन प्रगल्भ निवेदनाद्वारे वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्तीच्या व्यक्तींना कथामधून आणणे अशा वेगवेगळ्या गुणधर्माची कथानिर्मिती त्यांनी केली. वैशिष्ट्यपूर्ण असा आशय आणि शैलीमुळे जी. ए. कुलकर्णी मराठीतील एक श्रेष्ठ कथाकार ठरतात.
उत्तर लिहिले · 3/7/2022
कर्म · 48465
0
नव साहित्याची संकल्पना स्पष्ट करा 
उत्तर लिहिले · 2/5/2024
कर्म · 0

Related Questions

हिरकणी कथे संदर्भात माहिती मिळेल का?
डॉक्टर ए पी जी अब्दुल कलाम यांचे भारत देशाविषयी असणारे स्वप्न थोडक्यात लिहा?
जेव्हा मी जात चोरली होती त्या कथेचे कथानक कसे स्पष्ट कराल?
चित्रकथा सारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर का आहेत?
कथा या साहित्याची संकल्पना स्वरूप कसे स्पष्ट कराल?
कथेचे विविध घटक आणि प्रकार सविस्तर कसे स्पष्ट कराल?
दोस्ती या विषयावर कथा मिळेल का?