बांधकाम

दगडी बांधकाम प्रकार?

1 उत्तर
1 answers

दगडी बांधकाम प्रकार?

1
बांधकामाचे दगड प्रकार
बांधकामाचे दगड : बांधकामाचे सर्वांत जुने साहित्य म्हणून दगडाचा उल्लेख करता येईल. नैसर्गिक ओबडधोबड आकारातील दगडांच्या साहाय्याने मानवास आसरा मिळत होता व जसजशी प्रगती होत गेली तसतशी दगडाची घडण, मांडणी व त्यावर कोरीव काम करण्याची, तसेच त्याला पॉलिश करण्याची कला प्रगत होत गेली. मुबलक प्रमाणात उपलब्धता आणि टिकाऊपणा यांमुळे दगडाचा वापर करण्याची प्रवृत्ती वाढत गेली. दगडाचा उपयोग मुख्यत: इमारती, स्मारके, पूल, धरणे, बंदरे, विमानतळ, रस्ते, रेल्वेमार्ग इत्यादींच्या बांधकामात होतो.

उत्पत्ती, अंतर्गत रचना आणि प्रमुख घटकद्रव्ये यांनुसार दगडांचे वर्गीकरण केले जाते. उत्पत्तीनुसार अग्निज, गाळाचे आणि रूपांतरित असे प्रकार पडतात. यांमधील अग्निज प्रकारात पातालिक, उपपातालिक व ज्वालामुखी असे उपप्रकार येतात [⟶अग्निज खडक]. अंतर्गत रचनेनुसार स्तरित व अस्तरित असे दोन प्रकार पडतात, तर घटकद्रव्यांनुसार सिलिकायुक्त, कॅल्शियमयुक्त व मृण्मय असे तीन प्रकार होतात.

 प्रमुख प्रकार : (१) ग्रॅनाइट : पातालिक अग्निज प्रकारातील हा दगड असून तो कठीण, बळकट व टिकाऊ असतो. पुलांचे आधारस्तंभ, बंदरातील धक्के, धरणे इ. प्रचंड बांधकामांसाठी तसेच खडी तयार करण्यासाठी तो वापरतात. सूक्ष्म कण असलेला हा दगड स्मारके, शिलालेख इत्यादींसाठी उपयुक्त असून त्यावर कोरीवकाम व पॉलिश सुलभतेने होते. या प्रकारातील खोंडालाइट (ओरिसा) आणि चार्नोकाइट (दक्षिण भारत) या जाती प्रसिद्ध आहेत. [⟶ग्रॅनाइट].

(२) पट्टिताश्म: दगड रूपांतरित प्रकारचा असून विविध रंगछटांत व स्तरांत उपलब्ध असल्याने तो फरशीकामासाठी उपयुक्त असतो. [⟶पट्टिताश्म].

(३) दक्षिण ट्रॅप व बेसाल्ट: अग्जिन प्रकारातील ज्वालामुखी जातीचा हा दगड कठीण, मजबूत व टिकाऊ असून सामान्य इमारतकाम, फरशीकाम व खडी यांसाठी वापरतात. लाल व पिवळ्या रंगांच्या जाती मृदू असून त्या स्मारकीय शिल्पासाठी वापरतात. अजिंठा, वेरूळ व घारापुरी येथील लेणी या प्रकारच्या खडकांतच कोरलेली आहेत. [⟶दक्षिण ट्रॅप बेसाल्ट].

(४) वालुकाश्म: गाळाच्या प्रकारच्या या दगडांमध्ये नानाविध रंगछटा उपलब्ध असून पूल, धरणे, बंदराचे धक्के आदि बांधकामांसाठी अस्फुट स्तररेषांचे मोठाले वालुकाश्म वापरतात. स्मारकीय शिल्पासाठी सूक्ष्म कणांचे आकर्षक रंगाचे व मृदू दगड वापरतात. उत्तर प्रदेश, मध्ये प्रदेश व राजस्थान येथील या दगडांच्या खाणी प्रसिद्ध आहेत. [⟶वालुकाश्म].

(५) चुनखडक: (अ) कंकर: अशुद्ध स्वरूपात याचे लहान (७ ते १॰ सेंमी व्यासाच्या) खड्यांचे थर सापडतात. यापासून चुनकळी व सिमेंट तयार करतात, तसेच खडीसाठीही हा दगड वापरतात. [⟶कंकर].

(ब) फरश्यांचा चुनखडक: हा प्रकार सघन व जाड स्फटिकयुक्त रचनेचा असतो. बांधकामास व फरशीसाठी उपयुक्त असून नानाविध रंगछटांत उपलब्ध आहे. शहाबाद, पोरबंदर, कडप्पा, कुर्नूल इ. ठिकाणचे दगड प्रसिद्ध आहेत.

(क) संगमरवरी दगड: रूपांतरित प्रकारातील हा दगड सूक्ष्म स्फटिकयुक्त रचनेचा असतो. विविध रंगछटांत उपलब्ध असून तो कठीण, सघन व टिकाऊ स्वरूपाचा म्हणून सुप्रसिद्ध आहे. त्याला उत्तम प्रकारे पॉलिश करता येते. स्मारकीय शिल्पे, शिलालेख व पुतळे करण्यासाठी संगमरवराचा विशेष वापर होतो. संगमरवराच्या प्रमुख खाणी उत्तर प्रदेशात व राजस्थानात आहेत. आगऱ्याची मोती मशीद व ताजमहाल हे संगमरवरी दगडांचे असून अनेक वर्षे त्यांवर हवेचा फारसा परिणाम झालेला नाही. [⟶चुनखडक संगमरवर].

(६) पाटीचा दगड: (स्लेट). मृण्मय व स्तरित प्रकारचा हा दगड पत्रित रचनेचा असून त्याचे पातळ तक्ते काढता येतात. त्यांचे पृष्ठभाग गुळगुळीत असतात. ब्रिटन आदि देशांतून बारीक कणांच्या तक्त्यांचा कौलासाठी उपयोग करतात. भारतातील पाटीचे दगड बहुतांशी जाड कणांचे व मृदू असून फरशीकाम, भिंतीचे तळसरीकाम इत्यादींसाठी उपयुक्त आहेत. कडप्पा व कुर्नूल येथील निळसर पाटीच्या दगडाच्या खाणी प्रसिद्ध आहेत. [⟶पाटीचा दगड].

(७) जांभा: या प्रकारचा दगड मृदू असून त्यातील जास्त जलांशामुळे त्यावर रापविण्याची क्रिया करणे आवश्यक असते. इमारतीकाम, दगडी तोंड-बांधणी, खडी आदि कामांसाठी तो वापरतात 

उत्तर लिहिले · 22/5/2022
कर्म · 48555

Related Questions

बांधकाम मजूराच्या समस्या विषद करा?
२ गुंठे शेती जागेत बांधकाम करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात?
ओपन स्पेस वर बांधकाम करू शकतो का?
बांधकाम व्यवसाय चालू कसा करायचा आहे?
विट बांधकाम तोडण्याचे काम कसे दिले जाते?
1 ब्रास दगडी बांधकामासाठी साहित्य (मटेरियल) कोणते लागेल?
जंगलतोड आणि बांधकाम जंगल तोड आली म्हणून काय करणार?