बांधकाम

२ गुंठे शेती जागेत बांधकाम करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात?

1 उत्तर
1 answers

२ गुंठे शेती जागेत बांधकाम करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात?

3
शेतीत घरबांधणीसाठी परवानगीची आवश्यकता नाही.
परंतु  बँक कर्जासाठी परवानगीची आवश्यकता असते. त्यासाठी बिगरशेती करावी लागते.
ग्रामीण भागामध्ये बांधकाम परवाना काढावयाचा असल्यास तो आपल्याला नगर रचना विभाग या सरकारी कार्यालयाकडून काढता येतो.
                  नगर रचना विभागाकडे बांधकाम परवानगी प्रकरण परवानाधारक स्थापत्य अभियंता किंवा वास्तूविशारद यांच्या मार्फत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. 
                  ग्रामीण भागामध्ये गावठाण हद्दीबाहेरील व गावठाण हद्दीमधील बांधकाम परवानगी मिळते. बांधकाम परवानगीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे.
१. गावठाण हद्दीबाहेर बांधकाम परवानगी 
१. गावठाण हद्दीबाहेर जागा असल्याबाबतचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र.
२. ७/१२ उतारा ,बिनशेती आदेश आणि मंजूर रेखांकनाची प्रत.
३. सिटी सर्व्हे झाला असल्यास सिटी सर्व्हेचा उतारा व सनद नकाशा.
४. बांधकाम करावयाच्या क्षेत्रासमोरील रस्त्याची रुंदी.
५. वास्तुविशारद यांनी विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार तयार केलेल्या बांधकाम नकाशाच्या ५ प्रती, त्यावर वास्तुविशारद व अर्जदार यांची स्वाक्षरी.
६. बांधकाम नकाशामध्ये प्लॅन, इलेव्हशन, क्रॉस सेकशन, जिन्याची रुंदी, छताची उंची, सामासिक अंतरे, अनुज्ञेय चटईक्षेत्र निर्देशांक सूची दर्शवणे आवश्यक आहे.
७. बांधकाम परवानगी प्रकरण उपविभागीय अधिकारी / तहसीलदार यांचेकडून नगर रचना विभाग यांचेकडे दाखल करणे.
८. बांधकाम परवानगी प्रकरण प्राप्त झाल्यानंतर छाननी फी रु. २/- प्र. चौ. मी. विकास शुल्क २% व रेखांकनास अंतिम मंजुरी घेतली नसल्यास ३०% दराने अधिमूल्य शुल्क भरणे आवश्यक आहे.
९. मा . जिल्हाधिकारी अथवा संबंधीत महसूल अधिकारी यांनी दिलेल्या कोणत्याही आदेशावर व्यथित झालेल्या व्यक्तीला विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमधील नियम क्र. ४६ नुसार मा. सहसंचालक, नगर रचना विभाग यांचेकडे अपील करता येते.
१०. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमधील तरतुदींचा अर्थ लावण्यामध्ये काही विवाद असल्यास त्याबाबतची स्पष्टता करण्यासाठी व्यथित व्यक्तीला विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीच्या नियम क्र. ४४ नुसार मा. संचालक, नगर रचना, महाराष्ट राज्य यांचेकडे अर्ज सादर करावा.
२. गावठाण हद्दीमधील बांधकाम 
१. गावठाण हद्दीमध्ये जागा असल्याबाबतचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र.
२. ग्रामपंचायत कार्यालयाकडील नमुना ८ दाखला / खरेदीखत.
३. सिटी सर्व्हे झाला असल्यास सिटी सर्व्हेचा उतारा व सनद नकाशा / ग्रामसेवक यांचेकडील जागेच्या चतु;र्सिमा व रस्त्याची रुंदी दर्शवणारा नकाशा.
४. बांधकाम करावयाच्या क्षेत्रासमोरील रस्त्याची रुंदी.
५. वास्तुविशारद यांनी विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार तयार केलेल्या बांधकाम नकाशाच्या ५ प्रती, त्यावर वास्तुविशारद व अर्जदार यांची स्वाक्षरी.
६. बांधकाम नकाशामध्ये प्लॅन, इलेव्हशन, क्रॉस सेकशन, जिन्याची रुंदी, छताची उंची, सामासिक अंतरे, अनुज्ञेय चटईक्षेत्र निर्देशांक सूची दर्शवणे आवश्यक आहे. 
७. बांधकाम परवानगी प्रकरण गटविकास अधिकारी यांचेकडून नगर रचना विभाग यांचेकडे दाखल करणे . 
८. बांधकाम परवानगी प्रकरण प्राप्त झाल्यानंतर छाननी फी रु. २/- प्र. चौ. मी. विकास शुल्क २% भरणे.
९. मा. जिल्हाधिकारी अथवा संबंधीत महसूल अधिकारी यांनी दिलेल्या कोणत्याही आदेशावर व्यथित झालेल्या व्यक्तीला विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमधील नियम क्र. ४६ नुसार मा. सहसंचालक, नगर रचना विभाग यांचेकडे अपील करता येते.
१०. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमधील तरतुदींचा अर्थ लावण्यामध्ये काही विवाद असल्यास त्याबाबतची स्पष्टता करण्यासाठी व्यथित व्यक्तीला विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीच्या नियम क्र.४४ नुसार मा. संचालक, नगर रचना, महाराष्ट राज्य यांचेकडे अर्ज सादर करावा.
उत्तर लिहिले · 18/9/2022
कर्म · 11785

Related Questions

बांधकाम मजूराच्या समस्या विषद करा?
ओपन स्पेस वर बांधकाम करू शकतो का?
बांधकाम व्यवसाय चालू कसा करायचा आहे?
दगडी बांधकाम प्रकार?
विट बांधकाम तोडण्याचे काम कसे दिले जाते?
1 ब्रास दगडी बांधकामासाठी साहित्य (मटेरियल) कोणते लागेल?
जंगलतोड आणि बांधकाम जंगल तोड आली म्हणून काय करणार?