तत्वज्ञान धर्म

बौद्ध धर्माचे तत्वज्ञान व प्रसार कसा झाला?

1 उत्तर
1 answers

बौद्ध धर्माचे तत्वज्ञान व प्रसार कसा झाला?

0


तत्त्वज्ञान व शिकवण

बुद्ध तत्त्वज्ञान
भगवान बुद्धांनी ‘पाली’ या लोकभाषेतून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण, आचार-विचार सांगितले. बुद्धांनी धर्माची शिकवण व आचरण यासाठी त्रिशरण, चार आर्यसत्य, अष्टांगिक मार्ग (मध्यम मार्ग) व पंचशील सांगितलेले आहेत.

चार आर्यसत्ये


गौतम बुद्ध चार आर्य सत्यांची शिकवण देतांना, नालंदा, बिहार भारत.
भगवान गौतम बुद्ध म्हणतात, ‘‘मानवी जीवन हे दुःखमय आहे, दुःखाची निर्मिती तृष्णेतून (वासना, इच्छा, आसक्ती, आवड) होते, म्हणून या तृष्णेवर आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे. मानवी व्यवहाराच्या मुळाशी चार आर्यसत्ये आहेत.

  1. दुःख - मानवी जीवन हे दुःखमय आहे.
  2. तृष्णा - मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे दुःखाचे कारण आहे.
  3. दुःख निरोध - दुःखाचे निराकरण वा अंत सर्व प्रकारची आसक्ती सोडण्याने होते.
  4. प्रतिपद् - दुःख निवारण्यासाठी सदाचाराचा मार्ग (अष्टांग मार्ग) आहे.
महान बौद्ध विद्वान व बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, या चार आर्यसत्यामधील पहिले व शेवटचे ही दोनच आर्यसत्त्वे महत्त्वाची आहेत. पहिले - दुःख आहे आणि शेवटचे प्रतिपद् - दुःख निवारण्याचा (अष्टांग) मार्ग आहे.


पंचशील


बुद्धांनी आपल्या अनुयायांना खालील पाच शीलांची शिकवण दिलेली आहे.

  1. अहिंसा :- मी जीवहिंसेपासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
  2. चोरी :-मी चोरी करण्यापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
  3. कामवासना :-मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
  4. खोटे बोलणे:-मी खोटे बोलण्यापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
  5. मादक वस्तू :- मद्य, मादक तसेच इतर सर्व मोहांत पाडणाऱ्या मादक वस्तूंच्या सेवनापासून अलिप्त रहाण्याचीं शपथ घेतो.या बौद्ध तत्त्वांचा, शिकवणुकीचा मानवाने जीवनात अंगीकार केला तर मानवी अस्तित्व असताना नक्कीच तो दुःखमुक्त होऊन आदर्श जीवन जगू शकतो.

अष्टांगिक मार्ग

महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तनाचे विवेचन करतांना नीती व सदाचाराला महत्त्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी तसेच निवार्णाच्या समीप पोहोचण्यासाठी हा ‘अष्टांग मार्ग’ किंवा ‘मध्यम मार्ग’ सांगितला.


धम्मचक्रातील आठ आरे हे बुद्धांचा अष्टांगिक मार्ग दर्शवतात.
अष्टांगिक मार्ग
अष्टांग मार्ग हा सदाचाराचा मार्ग होय. ह्या आठ गोष्टींच्या पालनामुळे मानवाचे जीवन सुखमय होते.

  1. सम्यक दृष्टी :- निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे.
  2. सम्यक संकल्प :- म्हणजे योग्य निर्धार, विचार.
  3. सम्यक वाचा :- करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्न करणे.
  4. सम्यक कर्मांत :- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.
  5. सम्यक आजिविका :- वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे.
  6. सम्यक व्यायाम :- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे.
  7. सम्यक स्मृती :- तात्त्विक गोष्टींचे स्मरण करून चित्तास (मनाला) जागृत ठेवणे.
  8. सम्यक समाधी :- कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तीपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे.
दहा पारमिता

बुद्धांनी सांगितलेल्या या दहा पारमिता ह्या शील मार्ग होत.

  1. शील :- शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे असलेला मनाचा कल.
  2. दान :- स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त, देह अर्पण करणे.
  3. उपेक्षा :- निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे.
  4. नैष्क्रिम्य :- ऐहिक सुखाचा त्याग करणे.
  5. वीर्य :- हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे.
  6. शांति :- शांति म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे.
  7. सत्य :- सत्य म्हणजे खरे, माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये.
  8. अधिष्ठान :- ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय.
  9. करुणा :- सर्व प्राणिमात्र, मानवाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता.
  10. मैत्री :- मैत्री म्हणजे सर्व प्राणी, मित्र, शत्रूविषयी देखील नव्हे तर सर्व जीवनमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे.
                                 प्रसार

बौद्ध धर्माने शिक्षण प्रसारास प्रोत्साहन दिले. बौद्ध विहार व मठ यांनी शिक्षण प्रसाराची केंद्रे म्हणून कार्य केले. बौद्ध भिक्खु हे मोठे विद्वान होते. बौद्ध धर्मास ज्या भारतीय सम्राटांनी व राजांनी पाठिंबा दिला त्यांनीही शिक्षणास प्रोत्साहन दिले.
उत्तर लिहिले · 31/1/2023
कर्म · 9415

Related Questions

सण सोहळे उपास व्रत वैकल्ये तसेच आदर सत्कार पूजाअर्चा यांनी परंपरेचा साज चढविला आहे,त्यात भर म्हणून वाढदिवस मुंज बारसे हे उत्सव साजरे करत रितीरिवाज तयार झाले ,यात्रा जत्रा रौप्य अमृत हिरक महोत्सव साजरे होतात हे चित्र प्रेमाभक्तिने निर्मल निरंकुश निरागस असावे असा मनुष्य स्वभाव धर्म आवश्यक वाटतो काय ?
सगळ्यात श्रेष्ठ धर्म कोणता?
जैन धर्मातील 24 वे तीर्थकार कोण?
मंत्र जपाने तुम्हाला आलेले अनुभव कोणते आहे?
कोणता भारतीय धर्म संपूर्ण जगात फार मोठ्या संख्येने स्वीकारल्या गेला?
भारताने 1971 मध्ये युद्ध जिंकले होते म्हणून धर्म वर्षी डॅश डॅश दिवस विजय दिवस म्हणून पाळला जातो?
धर्म म्हणजे काय धर्माचे वैशिष्टे कोणते आहेत?