कायदा विमा खरेदी

LICचे IPO कसे खरेदी करावे?

1 उत्तर
1 answers

LICचे IPO कसे खरेदी करावे?

2


एलआयसी IPO ; शेअर खरेदीसाठी असा करा अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

LIC IPO Updates : भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) आज बुधवारी प्रारंभिक समभाग विक्री योजनेचा तपशील जाहीर केला. केंद्र सरकार एलआयसीमधील ३.५ टक्के हिश्श्याची विक्री करणार आहे. शेअर बाजारातील नकारात्मक घडामोडींमुळे आयपीओचे आकारमान कमी करण्यात आले.
:
एलआयसी आयपीओची आज घोषणा झाली
४ मे २०२२ पासून गुंतवणुकीसाठी खुला होणार .
गुंतवणूकदार ९ मे २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा

LIC IPO : एलआयसी आयपीओसाठी आॅनलाइन अर्ज करता येईल.

LIC IPO : एलआयसी आयपीओसाठी आॅनलाइन अर्ज करता येईल.


 : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) प्रारंभिक समभाग विक्री योजनेची आज घोषणा करण्यात आली आहे. हा आयपीओ येत्या ४ मे २०२२ पासून गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. ९ मे २०२२ पर्यंत गुंतवणूकदार यासाठी अर्ज करु शकतात. आॅनलाईन पद्धतीने आयपीओसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

LIC चा २१ हजार २५७ कोटींचा जम्बो 'आयपीओ'; पॉलिसीधारकांना मिळणार सवलत
एलआयसीने आयपीओसाठी प्रती शेअर ९०२ ते ९४९ रुपये असा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. या योजनेत किमान १५ शेअरचा एक लाॅट आहे. केंद्र सरकार ३.५ टक्के शेअरची विक्री करणार असून त्यातून २०,५५७.२३ कोटींचा निधी उभारणार आहे. वैयक्तिक गुंतवणूकदार आणि एलआयसी कर्मचाऱ्यांना प्रती शेअर ४५ रुपयांची सवलत देण्यात आली आहे. एलआयसी पाॅलिसीधारकांना प्रत्येक शेअरवर ६० रुपयांचा डिस्काउंट देण्यात आला आहे.


LIC IPO ; विमा क्षेत्रातील बाप कंपनी आहे एलआयसी, आकडेवारी वाचून व्हाल थक्क
एलआयसीच्या आयपीओत भाग्यवान गुंतवणूकदारांची घोषणा १२ मे २०२२ रोजी होणार आहे. १६ मे २०२२ रोजी या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात शेअरचे वाटप केले जाईल. १७ मे २०२२ रोजी एलआयसीच्या शेअरचे भांडवली बाजारात पदार्पण होण्याची शक्यता आहे.

काही ठळक नोंदी

- एलआयसी पाॅलिसीधारक त्यांच्यासाठी राखीव शेअरसाठी आॅनलाइन अर्ज करु शकतात.


- या पाॅलिसीधारकांचा पॅनकार्ड तपशील एलआयसीकडे अपडेट असणे आवश्यक आहे.

- पात्र पाॅलिसीधारकांना २००००० रुपयांपर्यंत गुंतवणुकीसाठी अर्ज करता येईल


- एलआयसी कर्मचाऱ्यांना त्यांच्यासाठी राखीव शेअरसाठी अर्ज करता येईल.

LICचा मेगा IPO: एका क्लिकवर जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे, या तारखा विसरू नका
एलआयसीच्या आयपीओसाठी अशा प्रकारे अर्ज करु शकतात.


- तुमचे नेट बँकिंग असेल तर त्यातून तुम्ही एलआयसीच्या शेअर खरेदीसाठी अर्ज करु शकता.

- नेट बँकिंग सुविधेमध्ये IPO/e-IPO हा पर्याय आहे.


- या पर्यायाला क्लिक केल्यानंतर त्यात तुमचा डिमॅट खात्याचा तपशील भरावा. जसे कि डिपाॅझिटरीची माहिती, बँक खात्याचा तपशील भरावा.

- त्यानंतर तुम्ही सादर केलेल्या माहितीची छाननी होईल.


- छाननी झाल्यानंतर गुंतवणूकदाराला Invest in IPO हा पर्याय निवडायचा आहे.

- कोणत्या कंपनीच्या आयपीओसाठी गुंतवणूक करणार आहात त्याची निवड करावी.


- यात किती शेअरसाठी अर्ज करत आहात त्यांची संख्या आणि बोली किंमत हा तपशील काळजीपूर्वक भरावा.

- कोणतीही बोली सादर करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी अटी आणि शर्थी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

- सर्व माहिती तपासून घेतल्यानंतर अर्ज सादर करावा.
    

उत्तर लिहिले · 3/5/2022
कर्म · 48465

Related Questions

विमा व्यवसाय घोषवाक्य?
माझ्या गाडीचा विमा 1वर्षाचा आहे जर त्या वर्षात गाडीला काही झाले नाही तर विम्याचे पैसे परत मिळतात का?
विमा म्हणजे काय?
अपघात विमा किती वर्षाचा असतो किती वर्षाचा असतो?
राज्य कामगार विमा मंडळाची स्थापना कधी झाली?
विमा पॉलिसी पैसे उशिरा काढल्यानंतर व्याज मिळते का?
आपण टुव्हिलरचा विमा उतरवतो.मग अपघात झाल्यावर विमा कसा मिळवायचा ?