1 उत्तर
1
answers
राज्य कामगार विमा मंडळाची स्थापना कधी झाली?
1
Answer link
असंघटित क्षेत्रात घाम गाळणारे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्यासाठी केंद्रीय आणि राज्यपातळीवर कामगार विमा रुग्णालये चालविली जातात.
कामगारांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी कामगारांच्या वेतनातून दरमहा ठराविक रक्कम कपात केली जाते. मात्र अपुऱ्या निधीमुळे या रुग्णालयांची अवस्था दयनीय झाली आहे. ही बाब लक्षात घेता,
आता कामगार विमा महामंडळातली राज्य सरकारची मध्यस्थी संपुष्टात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. महामंडळाऐवजी आता राज्य कामगार विमा सोसायटी स्थापन केली जाणार असून, विमा लाभार्थींकडून जमा होणारी रक्कम आता थेट सोसायटीच्या खात्यात वळती होणार आहे.
केंद्र सरकारने २०१० मध्ये राज्य कामगार विमा अधिनियम १९४८ मध्ये सुधारणा केली होती. त्यातील कलम ५८ (५) नुसार राज्यातील कामगार विमा महामंडळ स्थापन करण्याची तरतूद विहित होती. त्याआधारे राज्य सरकारने २१ जून २०१६ ला महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.