1 उत्तर
1
answers
अपघात विमा किती वर्षाचा असतो किती वर्षाचा असतो?
1
Answer link
व्यक्तीला अथवा संघटनेला भावी काळात संभवू शकणारे अनिश्चित स्वरूपाचे मोठे वित्तीय नुकसान विमित रकमेइतके भरून मिळण्यासंबंधीचा कायदेशीर करार म्हणजे विमा होय.
मात्र अशा प्रकारे नुकसानभरपाई मिळण्यासाठी करारानुसार ठरलेली रक्कम (विम्याचे हप्ते) संबंधित व्यक्तीने अथवा संघटनेने भरलेली असावी लागते.
व्यक्ती, परिवार किंवा संघटना यांच्या बाबतींत वित्तीय नुकसान होण्याच्या शक्यता अनेक असू शकतात, त्यामुळे त्यांच्या व्यवहारात निर्माण होऊ शकणारी अनिश्चितता शक्य तितकी कमी करण्यासाठी अथवा ती संपुष्टात आणण्यासाठी त्यांच्या कल्याणाला जबाबदार असणारांकडून विमा घेतला जातो.
विम्यामुळे विभाधारकाला विविध प्रकारांनी संभवणाऱ्या वित्तीय हानीपासून संरक्षण मिळू शकते. उदा., मिळवत्या कुटुंबप्रमुखाचे निधन झाल्यास आयुर्विम्यामुळे त्याच्यावर अवलंबून असणारांना विमित रकमेइतकी नुकसानभरपाई मिळते. वाहनाचा विमा उतरविला असल्यास अपघातामुळे झालेले वाहनाचे नुकसान विमा-कंपनी भरून देते. जर एखाद्या नर्तकीच्या पायाचा विमा उतरविला गेला असेल, व काही कारणाने तिचा पाय क्षतिग्रस्त झाल्यास तिला विमा-कंपनीकडून नुकसानभरपाई मिळू शकते.
नुकसान वाटून घेण्याच्या तत्त्वावर विम्याचे काम चालते. विमाधारकांपैकी ज्यांचे नुकसान होण्याचे टळते अशा बहुसंख्य विमाधारकांकडून ज्या थोडयांचे नुकसान झालेले असते, ते नुकसान अप्रत्यक्षपणे भरून दिले जाते.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.