पाककृती
मासवडी कशी बनवतात ? कृती सांगा ?
1 उत्तर
1
answers
मासवडी कशी बनवतात ? कृती सांगा ?
3
Answer link
मासवडी. मासवडी हि रेसिपी एक महाराष्ट्रीयन डिश असून हि एक तिखट रेसिपी आहे. जी महाराष्ट्रामध्ये मुख्यता मराठवाडा आणि पुणे ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बनवली जाते. तसेच हि रेसिपी महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये आणि देशाच्या काही भागामध्ये म्हणजे जेथे महाराष्ट्रीयन लोक राहायला आहेत तेथे देखील हि डिश आवडीने खाल्ली जाते. मासवडी हे नाव ऐकले कि वाटते हि रेसिपी एक मांसाहारी डिश आहे. परंतु हि एक शाकाहारी डिश आहे जी सुखे खोबरे, बेसन, शेंगदाणा कुट, तिळाचा कुट आणि काही इतर साहित्यापासून बनते.
मासवडी बनवताना सर्वप्रथम खोबरे, तीळ, शेंगदाणे, कांदा, हे सर्व साहित्य भाजून घेवून ते मिक्सरला फिरवले जाते आणि त्यामध्ये तिखट मीठ घालून त्याचे सारण बनवले जाते आणि मग कढई मध्ये कडीपत्ता, जिरे, लसून याची फोडणी देवून त्यामध्ये पाणी घालून पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये बेसन पीठ घातले जाते आणि त्याचा गोळा बनवून ते चांगले शिजवले जाते आणि मग ते थोडे गार झाले कि प्लास्टिक पेपर वर थापले जाते त्यावर सारण घातले जाते आणि त्याची गुंडाळी करून त्याच्या वड्या पाडल्या जातात.
मासवडी वडी हि रेसिपी लहान मुलांच्यापासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना आवडू शकेल कारण हि रेसिपी दिसायला देखील आकर्षक दिसते आणि खाल्ल्यानंतर देखील चविष्ट लागते. हि रेसिपी आपण मसाल्याच्या आमटी सोबत चपाती आणि रोटीला लावून खावू शकतो. मासवडी हि घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजे २५ ते ३० मिनिटामध्ये बनते. चला तर आता आपण मासवडी कशी बनवायची ते पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ १० ते १५ मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ १० ते १५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ २० ते ३० मिनिटे
पाककला महाराष्ट्रीयन
बनवण्याची पध्दत सोपी
मासवडी कशी बनवतात ?
मासवडी बनवताना सर्वप्रथम खोबरे, तीळ, शेंगदाणे, कांदा, हे सर्व साहित्य भाजून घेवून ते मिक्सरला फिरवले जाते आणि त्यामध्ये तिखट मीठ घालून त्याचे सारण बनवले जाते आणि मग कढई मध्ये कडीपत्ता, जिरे, लसून याची फोडणी देवून त्यामध्ये पाणी घालून पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये बेसन पीठ घातले जाते आणि त्याचा गोळा बनवून ते चांगले शिजवले जाते आणि मग ते थोडे गार झाले कि प्लास्टिक पेपर वर थापले जाते त्यावर सारण घातले जाते आणि त्याची गुंडाळी करून त्याच्या वड्या पाडल्या जातात.
मासवडी बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य –
बेसन : मासवडी बनवण्यासाठी बेसन पीठ हा महत्वाचा घटक आहे कारण कढई मध्ये कडीपत्ता, जिरे, लसून याची फोडणी देवून त्यामध्ये पाणी घालून पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये बेसन पीठ घातले जाते आणि त्याचा गोळा बनवून ते चांगले शिजवले जाते आणि मग ते थोडे गार झाले कि प्लास्टिक पेपर वर थापले जाते त्यावर सारण घातले जाते आणि त्याचा वड्या पडल्या जातात.
खोबरे, शेंगदाणा कुट आणि तिळाचा कुट : खोबरे, शेंगदाणा कुट आणि तिळाचा कुट हे महत्वाचे साहित्य आहे कारण हे साहित्य वापरून सारण बनवले जाते.
मासवडी कशी बनवायची –
मासवडी हा एक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे जो पुणे आणि मराठवाडा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. मासवडी हि रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजे २५ ते ३० मिनिटामध्ये बनू शकते. चला तर मग आता आपण मासवडी रेसिपी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ १० ते १५ मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ १० ते १५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ २० ते ३० मिनिटे
पाककला महाराष्ट्रीयन
बनवण्याची पध्दत सोपी
मासवडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य –
मासवडी बनवण्यासाठी लागणारे सर्वच साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते असे नाही. तर आपल्याला काही साहित्य बाजारातून देखील विकत आणावे लागते. चला तर मग आता आपण मासवडी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
आवरणासाठी लागणारे साहित्य
१ वाटी बेसन किंवा हरभरा डाळीचे पीठ.
१ वाटीला थोडे जास्त पाणी.
१/४ चमचा जिरे.
३ चमचे तेल.
१ चमचा पेस्ट.
हळद आणि हिंग.
मीठ ( चवीनुसार ).
सारणासाठी लागणारे साहित्य
अर्धी वाटी खिसलेले वाळलेले खोबरे.
२ ते ३ चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट.
३ चमचे तीळ.
२ चमचे लसून पेस्ट.
१ चमचा लाल मिरची पावडर.
अर्धा चमचा गोडा मसाला.
१/३ चमचा हळद.
४ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर.
मीठ ( चवीनुसार ).
साखर ( चवीनुसार ).
मासवडी बनवण्यासाठी केली जाणारी कृती –
मासवडी हि घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळामध्ये म्हणजेच २५ ते ३० मिनिटामध्ये बनते आणि चवीला देखील खूप छान लागते. चला तर मग आता आपण वर दिलेले साहित्य वापरून मासवडी कशी बनवायची ते पाहूयात.
मासवडी बनवताना सर्वप्रथम आपण सर्न बनवून घेवूया आणि सारण बनवण्यासाठी प्रथम खोबरे आणि तील कोरडे मध्यम आचेवर भाजून घ्या आणि आणि ते मिक्सरवर बारीक करून घ्या.
आणि मग खोबऱ्याचे मिश्रण भांड्यामध्ये काढा आणि त्यामध्ये शेंगदाणा कुट, लसून पेस्ट, कोथिंबीर, १ चमचा तेल, लाल तिखट, गोडा मसाला, हळद, चवीनुसार मीठ आणि साखर घाला आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून बाजूला ठेवा.
आता गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि कढई गरम झाली कि त्यामाडे तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये जिरे घाला आणि जिरे चांगले फुलले कि त्यामध्ये लगेच लसून घाला आणि लसून काही सेकंद भाजा लसून करपू देवू नका. आता यामध्ये लगेच हळद, हिंग घाला आणि मिक्स करा मग त्यामध्ये पाणी आणि चवीनुसार मीठ घाला आणि या मिश्रणाला एक उकळी अनु द्या.
या मिश्रणाला एक चांगली उकळी आली कि त्यामध्ये बेसन पीठ घाला आणि ते चमच्याने चांगले एकत्र होईपर्यंत हलवा. या पिठाचा गोळा झाला कि त्याला झाकण लावून ५ ते ६ मिनिटे चांगले वाफवून किंवा शिजवून घ्या ( बेसन यामध्ये घातले कि गुठळ्या होऊ देवू नका ).
पीठ चांगले शिजले कि गॅस बंद करा आणि ते थोडे गार होऊ द्या.
आत हे पीठ थोडे गार झाले कि प्लास्टिक पेपर वर थापा आणि मग त्यावर पातळ सारण घाला आणि त्याची उरली करून त्याच्या वड्या पडा.
मासवडी सर्व्ह करण्यासाठी तयार झाली.
मासवडी कश्यासोबत खातात –
हि रेसिपी आपण मसाल्याच्या आमटी सोबत चपाती आणि रोटीला लावून खावू शकतो.