पाककृती

तर्रीबाज मिसळ कशी बनवता येईल? कोणी त्याची पाककृती सांगेल का?

2 उत्तरे
2 answers

तर्रीबाज मिसळ कशी बनवता येईल? कोणी त्याची पाककृती सांगेल का?

1





झणझणीत तर्रीबाज मिसळपाव





झणझणीत मिसळ हा खवय्यांचा लाडका मेनू आहे. औरंगाबाद शहरात मिसळपावची लहान-मोठे अनेक हॉटेल्स आहेत. प्रत्येकाचा वकुब वेगळा असला तरी दर्जेदार मिसळपावमुळे काही हॉटेल्स गर्दीने ओसंडून वाहतात. चवदार मिसळ आणि लालजर्द तर्री सर्वांना आवडते. त्यामुळे शहरात वडापावसोबतच आता मिसळपावची लोकप्रियता वाढली आहे.

मटकी-फरसाणचे जमलेले चवदार मिश्रण आणि त्याच्यावर लालजर्द तर्री...अहाहा! प्रत्येक खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटण्यासाठी मिसळपावचे एवढे वर्णन पुरेसे ठरावे. कोल्हापूर आणि पुणे शहरातील मिसळपावचे अनेक ‘अड्डे’ राज्यात प्रसिद्ध आहेत. औरंगाबाद शहरात मिसळ गेल्या अनेक वर्षांपासून मिळत असली तरी ती ‘सर्वव्यापी’ झाली नव्हती. जु्न्या शहरातील हॉटेल मेवाडच्या झणझणीत मिसळची चव अनेकांच्या जिभेवर अजूनही रेंगाळत असेल. शहराच्या विस्तारासोबत हॉटेल्सची संख्या वाढली आणि मिसळपावचे अनेकानेक पर्याय निर्माण झाले. सिडको-हडको, गारखेडा, रेल्वे स्टेशन परिसरात खमंग मिसळची चांगली हॉटेल्स सुरू झाली. मुंबईचा वडापाव ज्या झपाट्याने शहरात पसरला तेवढा वेग मिसळपावचा नसला तरी सध्या हा मेनू सर्वात लोकप्रिय आहे. मिसळची चव पाककृतीवर बेतलेली आहे. मोड आलेली मटकी आणि फरसाणचे गणित चुकले की मिसळीचा लगदा होण्याची भिती अधिक. त्यामुळे प्रत्येक पदार्थांत गुणवत्ता राखल्यास चांगली मिसळ तयार होते, असा प्रसिद्ध विक्रेत्यांचा अनुभव आहे. अर्थात, घरच्या घरी मिसळ तयार करुन खाणारेही अनेकजण आहेत. हॉटेल्सच्या मिसळचा तिखटपणा आणि तेलाचा दर्प काही खवय्यांना सहन होत नाही. मात्र, घरची मिसळ आणि हॉटेलातील मिसळ यांच्या चवीत बरेच अंतर असते. कांदा-कोथिंबीर टाकलेली तिखटजाळ मिसळ खाण्याचा आनंद कितीतरी वेगळा आहे. हा आनंद हॉटेल्समध्येच मिळतो. औरंगाबाद शहरात ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेऊन उत्तम मिसळ देणारी हॉटेल्स आहेत. काही ठेलेवजा छोटी हॉटेल्ससुद्धा आहेत. सिडको बसस्थानकाजवळील नवनाथ हॉटेलची मिसळ खवय्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. तिखटपणा सहन करू न शकणारे ग्राहक मिसळीवर दही मागवतात. मात्र, मिसळ खाण्याचा मोह टाळत नाही. दिवसभर नवनाथमध्ये खवय्यांची वर्दळ असते. इथे इतर अनेक पदार्थ असले तरी मिसळपाव वैशिष्ट्य आहे. उस्मानपुरा भागातील कृष्णा कोल्हापुरी मिसळ अल्पावधीत लोकप्रिय ठरली.
मिसळचे उत्तम मिश्रण आणि दोन भलेमोठे पाव, कांदा, लिंबू, मसाला पापड असा जामानिमा असल्यामुळे खवय्ये ‘कृष्णा’च्या प्रेमात पडले आहेत.
घामाघूम होऊन मिसळ ओरपण्याचा आनंद शेकडो खवय्ये घेतात. मिसळीवर तर्री घेऊन आणखी झणझणीतपणा अनुभवण्याचा काहींचा बेत असतो. हा तिखटजाळ रस्सा त्यांना आकर्षित करतो. या दोन हॉटेल्सप्रमाणे गारखेडा आणि औरंगपुरा भागातही मिसळची छोटी हॉटेल्स वाढली आहेत. झणझणीत मिसळपावचा बेत झाल्यानंतर ताक पिण्याचा शिरस्ता असतो. हा सगळा जामानिमा जमल्यास तृप्तीचा ढेकर आल्याशिवाय राहत नाही.
घ्या घ्या मिसळ घ्या
मिसळ चवदार करण्यात प्रत्येक पदार्थाचे महत्त्व आहे. मोड आलेली मटकी, ओले खोबरे, कापलेला कांदा-टोमॅटो, चिवडा, फरसाण, बारीक शेव, लसूण, लाल तिखट, काळा मसाला आणि वर टाकण्यासाठी कोथिंबीर. या सगळ्या पदार्थांचे योग्य प्रमाण राखल्यास चवदार मिसळ तयार होते. एखाद्या पदार्थाचे कमी-अधिक प्रमाण मिसळ फसण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे योग्य प्रमाण राखूनच मिसळ तयार करतो, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली. मिसळ-ब्रेड असे नवे कॉम्बिनेशन अलीकडे दिसते. मात्र, खवय्यांना ब्रेड नको तर पाव पाहिजे असतो. त्यामुळे तुपात परतवलेला पाव काही ठिकाणची खासियत आहे. काहींना मिसळची चव वाढवण्यासाठी दही पाहिजे असते. पोट बिघडू नये म्हणूनही काहीजण दही मागवतात. प्रत्येकाची खाण्याची तऱ्हा निराळी असली तरी प्रत्येकाला मिसळ हवी असते.


उत्तर लिहिले · 23/12/2021
कर्म · 121765
0

साहित्य:

  • 1 कप मटकी
  • 1/2 कप वाटाणा
  • 1/4 कप चवळी
  • 2 मोठे कांदे (बारीक चिरलेले)
  • 1 टोमॅटो (बारीक चिरलेला)
  • 1 इंच आले (किसलेले)
  • 4-5 लसूण पाकळ्या (बारीक ठेचलेल्या)
  • 1 चमचा लाल मिरची पावडर
  • 1/2 चमचा हळद
  • 1 चमचा धने-जिरे पावडर
  • 1/2 चमचा गरम मसाला
  • चवीनुसार मीठ
  • तेल
  • कोथिंबीर (बारीक चिरलेली)

तर्रीसाठी:

  • 4 मोठे कांदे
  • 1/2 वाटी सुके खोबरे (किसलेले)
  • 1 इंच आले
  • 5-6 लसूण पाकळ्या
  • 1 चमचा लाल मिरची पावडर
  • 1/2 चमचा हळद
  • 1 चमचा धने-जिरे पावडर
  • 1/2 चमचा गरम मसाला
  • 1 चमचा तेल

इतर साहित्य:

  • फर्साण
  • पाव
  • लिंबू

कृती:

  1. मटकी, वाटाणा आणि चवळी रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.
  2. दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी काढून कुकरमध्ये मऊ होईपर्यंत शिजवून घ्या.
  3. एका कढईत तेल गरम करून त्यात कांदा, आले आणि लसूण घालून लालसर होईपर्यंत परता.
  4. त्यात टोमॅटो, लाल मिरची पावडर, हळद, धने-जिरे पावडर, गरम मसाला आणि मीठ घालून तेल सुटेपर्यंत परता.
  5. शिजवलेली मटकी, वाटाणा आणि चवळी घालून मिक्स करा आणि 10-15 मिनिटे उकळू द्या.
  6. कोथिंबीर घालून गॅस बंद करा.

तर्री बनवण्यासाठी:

  1. कांदा, सुके खोबरे, आले आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
  2. कढईत तेल गरम करून त्यात वाटलेला मसाला घालून लालसर होईपर्यंत परता.
  3. त्यात लाल मिरची पावडर, हळद, धने-जिरे पावडर, गरम मसाला आणि मीठ घालून तेल सुटेपर्यंत परता.
  4. आवश्यकतेनुसार पाणी घालून 5-7 मिनिटे उकळू द्या.

सर्व्ह करण्यासाठी:

  1. एका वाटीत मिसळ घ्या.
  2. त्यावर तर्री ओतून फर्साण, कोथिंबीर आणि लिंबूचा रस घालून सजवा.
  3. पावासोबत गरमागरम सर्व्ह करा.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 440

Related Questions

जेली कशी तयार करतात?
हाजमा हजम मसाला फ्लेवर पाणीपुरी कशी तयार करतात? हजमा हजम मसाला कोठे तयार करतात आणि कोठे मिळतो? फ्लेवर पाणीपुरीबद्दल पूर्ण माहिती मिळेल का? हजमा हजम मसाला तयार करण्याची पद्धत कोणती आहे?
मासवडी कशी बनवतात? कृती सांगा?
पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?
बटाटा वापरून कोणकोणते पदार्थ बनवता येतात?
हळद चांगली कि भेसळयुक्त कशी ओळखावी?
कोल्हापूर आणि झणझणीत तिखट यांचे काय नाते आहे?