तत्वज्ञान धर्म

बौद्ध धर्माचे तत्वज्ञान कोणते आहे?

2 उत्तरे
2 answers

बौद्ध धर्माचे तत्वज्ञान कोणते आहे?

1
बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाची माहिती प्रत्येकाला हवी – दलाई लामा
बौद्ध धर्म हा जातीवर आधारित भेदभाव करीत नसून संपूर्ण मानव जातीत बंधुभाव व प्रेम निर्माण करतो. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाची बौद्ध धर्म हा जातीवर आधारित भेदभाव करीत नसून संपूर्ण मानव जातीत बंधुभाव व प्रेम निर्माण करतो. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाची माहिती असायलाच हवी. 

बौद्ध धर्म: तत्त्वज्ञान
बौद्ध धर्म-काही बौद्ध धर्म म्हणजे विचार आणि चौकशीचा एक प्रथा आहे जो देव किंवा आत्मा किंवा कोणत्याही अलौकिक गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. म्हणून, सिद्धांत जात नाही, तो एक धर्म असू शकत नाही.

उत्तर लिहिले · 19/2/2023
कर्म · 9415
0
बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान हे बहुतांशी विज्ञानवादी / विज्ञाननिष्ठ आहे. खालील बाबींत विज्ञान व बौद्ध धर्मात समानता आहे. विज्ञान व बौद्ध धर्माचा एकच उद्देश आहे - ‘सत्याचा शोध’.

देव (ईश्वर) नाही

विश्वामध्ये देव वा ईश्वर नावाची कसलीही गोष्ट, वस्तू किंवा प्राणी अस्तित्वात नाही. बौद्ध धम्मामध्ये देवाला स्थान नाही. तथागत भगवान बुद्धांनी देव नाही हा सिद्धान्त अनेक दृष्टीने पटवून दिला आहे. विज्ञानाच्या सिद्धांताप्रमाणे जगात देव नाही. कारण, त्याचा आकार कसा, स्थान याबद्दल याबद्दल कोणालाही माहिती नाही. देव ही मानवी मनाची काल्पनिक संकल्पना आहे.

आत्मा नाही

विज्ञानानुसार शरीरामध्ये कोठेही आत्म्याचे स्थान नाही, हा सिद्धान्त तथागत भगवान बुद्धांनी इसवी सनाच्या सहा शतके आधी सांगितला. शरीर चार महाभूतांनी बनलेले आहे. त्यांमध्ये पृथ्वी, आप, तेज आणि वायू यांचा समावेश आहे. मनुष्यप्राणी जेव्हा मरतो तेव्हा ही चारही महाभूते निसर्गातील आपापल्या घटकामध्ये विलीन होतात. त्यामुळे शरीरामध्ये आत्मा नाही हे सिद्ध होते. मानवाच्या शरीरामध्ये आत्मा नावाचा कोणताही भाग आढळत नाही.

अनैसर्गिक मार्गांनी जन्म नाही

नैसर्गिक प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कुणाचाही जन्म होत नाही. त्यामध्ये टेस्ट ट्यूब बेबी किंवा आणखी नवीन विज्ञानाच्या नवीन अविष्कार याचा समावेश असतो, कारण आपोआप काहीही होत नाही. म्हणजेच अनैसर्गिक मार्गाने कोणाचाही जन्म होत नाही. या कसोटीला बौद्ध धम्म तंतोतंत उतरतो. बुद्धांना एका ब्राह्मणाने प्रश्न विचारला की, ‘आपण कोण आहात?’ तेव्हा तथागत म्हणतात की, ‘राजा शुद्धोधन आणि महामाया यांचा मी औरस पुत्र आहे. परंतु स्वतःच्या प्रयत्नांनी मी बौद्धिक प्रगती केलेली आहे. तेव्हा तू मला फार तर प्रबुद्ध मानव समज.’

परिणाम सर्वत्र सारखेच

विज्ञानामध्ये एखादे संशोधन झाले तर त्याचा जो परिणाम होईल किंवा जाणवेल तो जगाच्या पाठीवर कुठेही सारखाच जाणवेल त्यामध्ये कमी अधिक परिणाम किंवा प्रमाण असणार नाही. त्याप्रमाणे बौद्ध धम्माचे आचरण केल्यास, धम्म अनुसरल्यास त्याचा परिणाम सर्वत्र सारखाच जाणवतो.

दैववाद (नशीब) अमान्य

भगवान बुद्धांनी कर्म सिद्धान्त सांगितला. त्यांच्या म्हणण्यानुसार दैव, देव, नशीब, नियती या सर्व संकल्पना चुकीच्या आहेत. तुम्ही ज्याप्रमाणे वर्तन कराल त्याप्रमाणे तुम्हाला फळ मिळेल, असे विज्ञान सांगते. भगवान बुद्धांच्या कर्म सिद्धांताप्रमाणे आदर्श समाज घडवायचा असेल तर कुशल कर्म करावे म्हणजेच दैववाद, नशीब यांवर अवलंबून राहू नये. स्वकर्म चांगले तर त्याचा परिणाम चांगला ही नीती बौद्ध धम्माचा गाभा आहे.

जगाची उत्क्रांती

उत्क्रांती वादाचा जनक चार्ल्स डार्विन १९व्या शतकात होऊन गेला. विज्ञानाच्या आधारे जगाचा हळूहळू विकास होत गेला. विश्व कोणी निर्माण केले नाही हा डार्विनचा १९व्या शतकातील विज्ञानवादी सिद्धान्त अगोदर २५०० वर्षापूर्वी इ.स.पू. ६व्या शतकात भगवान बुद्धांनी संपूर्ण जगाला सांगितला आहे. याचाच अर्थ बौद्ध धर्म हा विज्ञानवादी धर्म आहे आणि विज्ञानवाद हा बुद्ध धर्माचाच प्रतिध्वनी होय.

विज्ञानाची नम्रता

भगवान बुद्ध म्हणतात, ‘‘मी सांगतो म्हणून तुम्ही खरे मानू नका, तर या आणि पहा तुमच्या बुद्धीला पटेल तरच धम्माचा स्वीकार करा. तसेच धम्म हा सर्वांसाठी खुला आहे. त्यामध्ये जात, पंथ, लिंग इत्यादी कोणताही भेद नाही.” विज्ञानाने केलेले संशोधन हे अंतिम आहे, असे विज्ञान मानीत नाही, म्हणजे बौद्ध आचारसंहिता व विज्ञान यामध्ये हे साम्य आहे.

अनित्य

जगामध्ये सतत बदल होत असतात ते स्थिर (नित्य) असे नसते. ग्रह, तारे, पृथ्वी वगैरे विश्वात काही नित्य नाही. असे विज्ञान स्पष्ट सांगते. भगवान बुद्धांनी सुद्धा सर्व अनित्य आहे. सर्व बदलत असते, सर्व सजीवांमध्येही क्षणाक्षणाला बदल होत असतो.

अकारण काहीही नाही

प्रत्येक गोष्टीला कारण असते, आपोआप कुठलीही गोष्ट होत नाही असा विज्ञानाचा सिद्धान्त आहे. निसर्गामध्ये चमत्कार अद्भुत शक्ती, मंत्र इत्यादी अस्तित्वात नाही हाच सिद्धान्त भगवान बुद्धांनी प्रतित्य समुपाद या नावाने मांडला. त्यात बुद्धांनी सांगितले की, प्रत्येक गोष्टीला कारण असते. कारणाशिवाय काहीही होत नाही. यालाच धम्मात कार्यकारणभाव सिद्धान्त म्हणतात. बौद्ध धर्माचा प्रत्येक सिद्धान्त विज्ञानाच्या कसोटीला उतरतो. जगाच्या पाठीवर घडणारी प्रत्येक घटना ही ही कुठल्याना कुठल्या कारणामुळे घडत असते हे सांगत असतानाच गौतम बुद्धांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून या जगातील सर्व गोष्टींचा विचार केलेला दिसतो. कुठली गोष्ट नित्य नाही व ती कायम टिकणारी नाही. जी प्रत्येक गोष्ट जगामध्ये निर्माण होते ती अनित्य असून तिचा नाश होतो त्यामुळे सम्यक दृष्टिकोन ठेवून आपण प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे निसर्गाचे चक्र हे कायम असून माणसाची आसक्ती हे त्याच्या दुःखाचे मूळ कारण आहे असे प्रतिपादन गौतम बुद्धांनी केले.
बौद्ध तत्त्वज्ञान

दहा नियम : सत्य : नेहमी खरे बोलावे. अहिंसा : हिंसा करु नये. अस्थैर्य : स्थिर राहायचे नाही. अपरिग्रह : दुसऱ्या वर विसंबून राहायच नाही. ब्रह्मचर्य : वेश्या व्यवसाय करायचे नाही. व्यसन,

          व्यभिचार करायचे नाही. 
मध्यम : दुपारी बाराच्या अगोदर जेवायचे. मध्यम

          जेवायचे. ठराविक वेळी एकदाच जेवायचे.
गर्दी : गर्दीच्या ठिकाणी जायचे नाही. नाच-गाणी : नाच - गाणी क्रिकेट करायचे नाही. झोप : मध्यम गादीवर झोपायचे. स्पर्श : सोने, चांदी आणि पैसे याला स्पर्श

             करायचे नाही. 
पाच आंतरिक शक्ती १) आत्मविश्वास २) एकाग्रता ३) स्मरण शक्ती ४) उत्साह ५) विद्या चार प्रकारचे माणस १) अंधारातून अंधाराकडे जाणारे. २) अंधारातून प्रकाशाकडे जाणारे. ३) प्रकाशा कडून अंधाराकडे जाणारे. ४) प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारे.

           बौद्ध पुजा पाठ
१) सरणत्तय २) पंचशील ३) बुद्ध वंदना ४) धम्म वंदना ५) संघ वंदना ६) पुजा ७) सबसुखगाथा ८) धम्मपालनगाथा ९) रतनसुत्त १०) जप : ओम मनी पदमे हूॅ.

उत्तर लिहिले · 20/2/2023
कर्म · 48555

Related Questions

सण सोहळे उपास व्रत वैकल्ये तसेच आदर सत्कार पूजाअर्चा यांनी परंपरेचा साज चढविला आहे,त्यात भर म्हणून वाढदिवस मुंज बारसे हे उत्सव साजरे करत रितीरिवाज तयार झाले ,यात्रा जत्रा रौप्य अमृत हिरक महोत्सव साजरे होतात हे चित्र प्रेमाभक्तिने निर्मल निरंकुश निरागस असावे असा मनुष्य स्वभाव धर्म आवश्यक वाटतो काय ?
सगळ्यात श्रेष्ठ धर्म कोणता?
जैन धर्मातील 24 वे तीर्थकार कोण?
मंत्र जपाने तुम्हाला आलेले अनुभव कोणते आहे?
कोणता भारतीय धर्म संपूर्ण जगात फार मोठ्या संख्येने स्वीकारल्या गेला?
भारताने 1971 मध्ये युद्ध जिंकले होते म्हणून धर्म वर्षी डॅश डॅश दिवस विजय दिवस म्हणून पाळला जातो?
धर्म म्हणजे काय धर्माचे वैशिष्टे कोणते आहेत?