1 उत्तर
1
answers
चंद्रगुप्त मौर्य कोणत्या वर्णातील होते?
2
Answer link
भारतात सर्वात जुने ऐतिहासिक म्हणवले जाणारे पुरावे आहेत ते सम्राट अशोकाचे स्तंभ आणि त्यावरील लेख. (त्यापूर्वीची प्रागैतिहासिक गुहाचित्रे उपलब्ध आहेत परंतु त्यांचा कालखंड निर्धारित करणे आज आव्हानात्मक आहे).
अशोक स्तंभ
भारतीय इतिहासात पहिला सम्राट समजला जाणारा चंद्रगुप्त मौर्य हा उपरोल्लेखित स्तंभलेख कोरविणाऱ्या सम्राट अशोकाचा पितामह. त्यामुळे अशोकाच्या पूर्वीच्या काळातील असल्याने त्याचे लेख, स्तंभ इत्यादि सापडत नाहीत. आज चंद्रगुप्त मौर्याबद्दल जी काही माहिती मिळते ती केवळ हिंदू, जैन, बौद्ध यांच्या धार्मिक ग्रंथ आणि मुद्राराक्षसासारख्या काही ग्रंथांमधूनच जी अतिशय तोकडी असून त्यात एकवाक्यता नाही. त्यामुळे चंद्रगुप्त मौर्याबद्दल आणि त्यातही विशेषतः मगधच्या सिंहासनावर विराजमान होण्यापूर्वीच्या त्याच्या आयुष्याबाबत आज काही निश्चितपणे सांगणे कठीण आहे. तस्मात् त्याच्या वर्णाबद्दल ठामपणे काही विधान करणे असंयुक्तिक ठरेल पण तरीही ऐतिहासिक साहित्यात मौर्यांच्या वर्णासंबंधित जे उल्लेख आहेत ते इथे सादर करण्याचा मी प्रयत्न करतो ज्यावरून काही अंदाज बांधता येतील.
हिंदू पुराणं, कथासरीत्सागर इत्यादि पुरातन ग्रंथांमध्ये चंद्रगुप्त मौर्याचे वर्णन असले तरीही त्याचा वर्ण दिलेला नाही. तो मौर्यवंशीय असल्याचे फक्त नमूद केलेले दिसते ज्या आधारावर त्याचा वर्ण ठरवणे अशक्य आहे.
केवळ भविष्य पुराणात चंद्रगुप्ताची वंशावळ मिळते ती गौतम बुद्ध - शाक्यमुनी - शुद्धोदन - शाक्यसिंह - बुद्धसिंह - चंद्रगुप्त मौर्य - बिंदूसार - अशोक अशी. अर्थातच गौतम बुद्धांचा पुत्र राहुल याचा निर्वंश झाल्याने ही वंशावळ खरी असणे संभवनीय नाही.
पुरीच्या गोवर्धन मठाचे विद्यमान शंकराचार्य श्री निश्चलानंद सरस्वती म्हणतात की वैदिक परंपरेत वैकल्पिक वर्ण असा एक प्रकार आहे. जेव्हा जन्माने त्या त्या वर्णात उत्पन्न झालेल्या व्यक्ती आपापल्या वर्णांनुसार विहित कर्तव्य करत नाहीत, तेव्हा इतर वर्णातल्या कोणालातरी वैकल्पिक म्हणून उभं करुन ते कार्य पार पाडलं जातं. ज्याकाळी क्षत्रिय राजे पथभ्रष्ट झाले त्यावेळी आचार्य चाणक्यासारख्या द्रष्ट्या आणि महत्वाकांक्षी आचार्याने चंद्रगुप्त नामक युवकास राज पद सांभाळण्यास सक्षम बनवले. चंद्रगुप्त क्षत्रिय नव्हता असं मानल्यास, त्यावेळच्या राजकीय परिस्थितीनुसार एका सामर्थ्यशाली आणि नीतिमान् क्षत्रियाची धर्माला आणि देशाला गरज होती. पण असलेल्या क्षत्रियांपैकी कोणीही या कार्यासाठी परिपूर्ण नसल्यामुळे, त्यांना विकल्प या स्वरूपात चाणक्यांनी चंद्रगुप्ताला तयार केलं. त्यामुळे चंद्रगुप्त हा वैकल्पिक क्षत्रिय होता हे लक्षात घेऊन ही समस्या सुटू शकते.
बौद्ध आणि जैन चंद्रगुप्तास हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या पिप्पलीवनाच्या मोरीय जनपदाचा वंशज असल्याचे लिहितात. बौद्ध ग्रंथ तर चंद्रगुप्त मौर्य हा गौतम बुद्धाप्रमाणेच सूर्यवंशी क्षत्रिय होता असे म्हणतात.
महावंश आणि दिव्यावदान या उत्तरकाळात रचलेल्या बौद्ध वाङ्मयात चंद्रगुप्त मौर्य क्षत्रिय होता असेच प्रतिपादित केले आहे.
८ व्या शतकात क्षत्रिय राजा विशाखदत्त रचित मुद्राराक्षस नाटकात त्याला वृषल म्हटले आहे पण आईवडील इत्यादिंची नावे न देता मौर्यवंशीय म्हटले आहे. वृषल या शब्दाचे २ अर्थ होतात ज्यांपैकी एक म्हणजे शूद्र आणि दुसरा म्हणजे सर्वश्रेष्ठ राजा असे. इतिहास अभ्यासक श्री गोरक्षनाथ बंडामहाराज देगलूरकर म्हणतात की यातील राजा असा अर्थ न धरता चंद्रगुप्त शूद्र असल्याचे धरणे अयोग्य ठरेल.
इसवीसन १७१३ च्या सुमारास मुद्राराक्षसावर ढुंढीराज याने टीका लिहिली ज्यात त्याने नुसता वृषल हा शब्द बघून त्यास नंद राजा सर्वार्थसिद्धी आणि मुरा या शूद्र स्त्रीचा दासीपुत्र म्हटले आहे. पण प्रत्यक्षात कुठेही सर्वार्थसिद्धी नामक नंदवंशीय राजा दिसत नाही त्यामुळे हे विधान विश्वासार्ह म्हणता येत नाही.
उपरोक्त सर्व मुद्दे बघता चंद्रगुप्त मौर्य शूद्र असल्याच्या मताचे समूळ खंडन करता येईल. याशिवाय कुठेही ब्राह्मण अथवा वैश्य वर्णात चंद्रगुप्ताने जन्म घेतल्याचे उल्लेख नाहीत. तेव्हा सम्राट चंद्रगुप्त मौर्यास बौद्ध, जैन ग्रंथांप्रमाणे सूर्यवंशी किंवा शंकराचार्यांच्या मतानुसार वैकल्पिक जरी म्हटले तरीही क्षत्रियच