Topic icon

भारताचा इतिहास

0
आर्थिक दृष्ट्या संपन्न व लष्करी दृष्ट्या समर्थ देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश पादाक्रांत करून वा व्यापून, त्या ठिकाणी वसाहत स्थापून त्या देशावर राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे, या प्रक्रियेस वसाहतवाद म्हणतात. 

आणखी माहितीसाठी वाचा https://vishwakosh.marathi.gov.in/32348/

उत्तर लिहिले · 3/11/2023
कर्म · 11985
0
इ. स. १९२१ ते इ. स. १९२४ या कालखंडात पुणे जिल्हयातील मुळशी पेटा येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांना जमीन मिळविण्याकरिता सत्याग्रहाचे आंदोलन चालवले.

स्वातंत्र्योत्तरकाळातही भाववाढ विरोधी आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन इत्यादी आंदोलनांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला.

सप्टेंबर १९२९ मध्ये, झाडूवाल्यांशी मानवतेने वागण्याचा पुकारा करीत बापटांनी गळ्यात पेटी लटकावून भजन करीत शहरातून मुंबईच्या चौपाटीपर्यंत मोर्चा काढला. शेवटी त्यांनी पुकारलेल्या संपाची यशस्वी सांगता झाली.

इ.स.१९४४ साली नागपूर येथे सेनापती बापट यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले.
उत्तर लिहिले · 3/11/2023
कर्म · 11985
0
पोर्तुगीजांच्या भारतातील व्यापारी मोहिमा

पोर्तुगीजांच्या भारतातील व्यापारी मोहिमा या पोर्तुगालने भारतात व्यापार करण्यासाठी इ.स. १४९७ सालापासून काढलेल्या मोहिमा होत.

पोर्तुगीजांच्या भारतातील व्यापारी मोहिमा
इ.स. १४९७ – इ.स. १९६१ 







इतिहास

इ.स. १४९७ साली पोर्तुगालचा राजा इमॅन्युअलने आफ्रिका खंडाला प्रदक्षिणा घालण्याची मोहिम आखली. या मोहिमेची जबाबदारी त्याने पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा याच्यावर सोपवली. चार जहाजे आणि एकशे सत्तर प्रशिक्षित खलाशी घेऊन वास्को द गामा मोहिमेवर निघाला. आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याने दक्षिणेच्या टोकापर्यंत तो गेला. या दक्षिणेकडील शेवटच्या टोकाला त्याने 'केप ऑफ स्टॉर्म्स' असे नाव दिले. पुढे पोर्तुगालने ते बदलून 'केप ऑफ गुड होप' असे केले. त्यानंतर वास्को द गामा आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याने मोझांबिक येथे आला. त्यावेळी मोझांबिक हे प्रगत बंदर होते व तिथे मिलिंद या राजाचे शासन होते. या बंदरात वास्को द गामाला काही भारतीय जहाजे नांगरलेली दिसली. त्या जहाजावरील अब्दुल माजिद नावाच्या एका भारतीय खलाशाची मदत घेऊन अरबी समुद्रातून प्रवास करीत वास्को द गामा भारताच्या मलबार किनाऱ्यावर पोहोचला. कालिकतपासून उत्तरेला सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या कप्पड या लहानशा खेड्यात त्याने १७ मे, इ.स. १४९८ रोजी नांगर टाकला व त्यानंतर तीन दिवसांनी तो त्याची जहाजे घेऊन कालिकत बंदरात आला. या मोहिमेमुळे युरोपकडून भारताकडे थेट येणाऱ्या नवीन सागरी मार्गाचा शोध पोर्तुगालच्या या दर्यावर्दीने लावला.

कालिकतचे हिंदू राज्य प्राचीन चेरा साम्राज्याच्या अकरा वारसा राज्यांपैकी एक होते. वास्को द गामा कालिकतला आला त्यावेळी तिथला शासक नेडीयिरुप्पू स्वरूपम 'झामोरीन' या त्याच्या आनुवांशिक बिरुदावलीने ओळखला जात होता. झामोरीनच्या राज्यातील कालिकत हे बंदर असलेले शहर मसाल्याच्या व कापडाच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. सागरी व्यापारामुळे समृद्ध असलेल्या कालिकतचे झामोरीन हे सार्वभौम शासक होते व त्यांनी जवळजवळ आठ शतके त्यांचे स्वतंत्र अस्तित्व कायम राखलेले होते. त्यांनी दिल्लीच्या मुघल प्रभुत्वाला कधीही मान्यता दिलेली नव्हती. ते त्यांच्या आदरातिथ्य, धार्मिक सहिष्णुता आणि सर्व देशांच्या व्यापाऱ्यांना आश्रय देण्याबद्दल प्रसिद्ध होते. परकीय व्यापाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासमवेत व दलालांसमवेत राहता यावे म्हणून झामोरीनच्या प्रभावक्षेत्रातील समुद्रकिनारपट्टीवर त्यांना अनेक सुविधा पुरविण्यात आल्या होत्या.

पोर्तुगालला परतण्यापूर्वी वास्को द गामाने कालिकत येथे तीन महिने वास्तव्य केले. त्याला त्याची ही मोहीम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षे लागली. या मोहिमेत त्याच्या ११५ खलाशांना प्राण गमवावे लागले. त्याचे एक जहाज बुडाले आणि दुसऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले. तो दोन जहाजांसह मायभूमी पोर्तुगालला परतला. त्याच्या दोन्ही जहाजांत भारतीय माल पूर्णपणे भरलेला होता. या मोहिमेत सर्व खर्च वजा जाता वास्को द गामाला साठपट फायदा झाला. वास्को द गामाच्या या यशस्वी मोहिमेचे जगभर दूरगामी परिणाम झाले.

वास्को द गामाने शोधलेल्या नवीन सागरी मार्गामुळे दळणवळणाच्या माध्यमातून पश्चिम युरोपातील देश पूर्वेच्या जवळ आले आणि पाश्चात्त्य सत्तांच्या वसाहतवादाला चालना मिळाली व युरोपच्या भारत व दक्षिण-पूर्व आशियाशी चालणाऱ्या व्यापारावर एकाधिकार प्रस्थापित करण्याची संधी पोर्तुगीजांना मिळाली. यामुळे युरोपच्या पूर्वेकडील देशांशी असलेल्या व्यापारावर इटलीचा जो एकाधिकार होता त्यालाही धक्का बसला. नवीन समुद्री मार्गाच्या शोधाने भारतही जागतिक राजकारणात गुंतला आणि युरोपीय देशांच्या विस्तारवादाला बळी पडला. सर्वप्रथम पोर्तुगीज भारतात व्यापारी म्हणून आले. त्यांच्यापाठोपाठ डच, इंग्रज व फ्रेंच आले.


व्यापारी मोहिमा

पोर्तुगीजांनी केप मार्गाचा शोध लावल्याने भारताकडे जाणाऱ्या नवीन सागरी मार्गांचा वापर करणारे पोर्तुगाल हे पहिले पश्चिम युरोपीय राष्ट्र ठरले. वास्को द गामाच्या भारतातील यशस्वी मोहिमेनंतर पेड्रो अल्वारेझ कॅब्रल याच्या नेतृत्वाखाली पोर्तुगालने दुसरी व्यापारी मोहीम काढली. तो पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथून १३ जहाजांमधून १२०० खलाशांचा तांडा ९ मार्च, इ.स. १५०० रोजी भारताकडे निघाला. पुढे सागर सफरीत वाईट हवामानामुळे जहाजांचा हा काफिला भरकटला व ब्राझीलकडे गेला. तिथून तो भारताकडे वळला आणि १३ सप्टेंबर, इ.स. १५०० रोजी कालिकत येथे पोहोचला.

पोर्तुगीजांनी त्यांची पहिली वखार कालिकत येथे झामोरीनच्या रीतसर परवानगीने बांधली. पो्तुगीजांच्या आधी काही अरब व्यापारीही कालिकत येथे झामोरीनच्या परवानगीने व्यापारासाठी आलेले होते आणि त्यांना झामोरीनच्या दरबारी चांगला मान होता. पण पोर्तुगीजही कालिकत येथे व्यापारासाठी आल्याने व झामोरीनने त्यांना तशी परवानगी दिल्याने अरबांच्या कालिकत येथून आशिया व युरोपदरम्यान चालणाऱ्या व्यापाराच्या एकाधिकाराला धक्का बसला. परिणामी अरब आणि पोर्तुगीज व्यापाऱ्यांत तंटे चालू झाले. अरबांना झामोरीनकडे मान होता. झामोरीनने त्याच्या राज्यात शांतता राखण्यासाठी पोर्तुगीजांनाच खडसावले. त्यामुळे पोर्तुगीजांनी कालिकत आणि कोचीनच्या राज्यात गोंधळ माजविण्याचा प्रयत्न केला. यामुळे जो संघर्ष उद्भवला त्यात कॅब्रल आणि त्याच्या साथीदारांचा पराभव झाला. त्यामुळे पेड्रो अल्वारेझ कॅब्रलला इ.स. १५०१ साली पोर्तुगालला परतावे लागले. जाताना त्याच्याजवळ त्याची केवळ पाच जहाजे शिल्लक राहिलेली होती. जाताना त्याची ही पाचही जहाजे भारतीय मालाने काठोकाठ भरलेली होती. पोर्तुगालला गेल्यानंतर त्यांतून त्याला खूप मोठा नफा मिळाला.

पेड्रो अल्वारेझ कॅब्रलच्यानंतर पोर्तुगालची तिसरी व्यापारी मोहीम जोआस द नोव्हा याच्या नेतृत्वाखाली पोर्तुगालहून निघाली. इ.स. १५०१ सालीच तो कालिकतला पोहोचला. कालिकतला आल्यावर झामोरीनने जोआस द नोव्हा आणि त्याच्या सहकारी व्यापाऱ्यांप्रती सहानुभूती दाखवून त्यांना त्याच्या प्रजेशी शांततेने व्यापार करण्याची परवानगी दिली.

पोर्तुगालची चौथी व्यापारी मोहीम वास्को द गामाच्या नेतृत्वाखाली निघाली. तो दिनांक २९ आॅक्टोबर, इ.स. १५०२ साली दुसऱ्यांदा कालिकत बंदरात उतरला. यावेळी त्याने त्याच्यासोबत वीस मोठी जहाजे व शस्त्रसज्ज नौदल सोबत आणले होते. आल्यावर त्याने कालिकतच्या शासकाच्या मर्जीविरुद्ध कालिकत, कोचीन आणि कण्णूर येथे व्यापारी केंद्रे सुरू केली. वास्को द गामाच्या या दुसऱ्या मोहिमेवेळी सगळ्या मलबार किनाऱ्यावर जी लहान-लहान राज्ये होती, ती सरंजामदार प्रमुखांच्या ताब्यात होती. पोर्तुगीजांच्या विस्तारवादाला आळा घालू शकेल असा एकही प्रबळ राजा त्यावेळी संपूर्ण मलबार किनाऱ्यावर नव्हता. पोर्तुगीजांजवळ भारतीयांपेक्षा प्रभावी शस्त्रे होती व त्यांची जहाजेही समुद्रातील भारतीय जहाजांपेक्षा जास्त शक्तिशाली होती.

व्यापाराच्या माध्यमातून संपत्ती अर्जित करणे आणि ख्रिस्ती धर्मप्रसार करणे ही उद्दिष्ट्ये घेऊनच पोर्तुगालने भारतातील व्यापारी मोहिमा काढल्या होत्या. व्यापारासाठी वसाहती वाढविणे आणि पूर्वेला साम्राज्य प्रस्थापित करणे हे पोर्तुगीजांच्या या व्यापारी मोहिमांचे ध्येय होते. या मोहिमा पोर्तुगालच्या व्यापारी उपक्रमाचा भाग असल्याने आपल्या राष्ट्राच्या तिजोरीत भर घालण्यासाठी व्यापार आणि लूट हे मार्ग त्यांनी अवलंबिले. इ.स. १५०३ नंतर पोर्तुगालने दरवर्षी भारतात व्यापारी मोहिमा काढणे बंद केले.



अल्मेडा

पोर्तुगीजांच्या व्यापारी मोहिमा या पोर्तुगाल सरकारच्या उपक्रमाचाच एक भाग असल्याने पोर्तुगीजांनी भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर जेव्हा त्यांच्या व्यापारी वखारी उभारल्या गेल्या तेव्हा तेथे निवासी प्रशासक नियुक्त करण्याची आवश्यकता तेव्हाच्या पोर्तुगाल सरकारला वाटू लागली. त्यामुळे पोर्तुगीजांच्या भारतातील वसाहतींच्या प्रशासनाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी इ.स. १५०५ साली फ्रान्सिस्को द अल्मेडा हा तीन वर्षांसाठी भारतात आला. त्याच्या दिमतीला अत्यावश्यक तो कर्मचारीवर्ग देण्यात आला व नोकरशाहीचे उच्च पद निर्देशित करणारे भारताचा व्हाइसरॉय हे नामाभिधान त्याला देण्यात आले.

अल्मेडाने अरबांच्या अरबी समुद्रातील एकाधिकाराला आव्हान दिले व त्यांच्यावर सतत आक्रमणे करून त्यांचा पराभव केला. परिणामी अरबी समुद्रात युद्धसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने भारतीय वाणिज्य व व्यापारावर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला. मलबार समुद्रकिनाऱ्यावरील भारतीय शासकांनी अल्मेडाच्या या अरेरावीबद्दल त्याला जाब विचारला तेव्हा अल्मेडाने त्यांनाही प्रत्युत्तर दिले. कालिकतच्या झामोरीनचे आरमार पूर्णपणे नष्ट करण्यात आले. कोचीनच्या हिंदू शासकानेही पोर्तुगीजांच्या मागण्या मान्य केल्या. पोर्तुगीजांनी मलबार किनाऱ्याजवळील लहान लहान बेटे ताब्यात घेतली आणि कोचीन, कन्ननूर व अंजदीव येथे लहान किल्ले बांधले. पोर्तुगीजांच्या या दबावतंत्रामुळे भारताचा व्यापार केप मार्गाकडे वळला. अरबांनंतर इजिप्शियन्सना पोर्तुगीजांच्या अरबी समुद्रातील अस्तित्वाचा जाच होऊ लागला. त्यांच्यात झालेल्या सागरी युद्धात अल्मेडा पराभूत झाला.



अल्बुकर्क

अल्फान्सो द अल्बुकर्क हा पोर्तुगील आरमाराचा उपनौदलप्रमुख म्हणून इ.स. १५०६ साली भारतात आला. त्याने अल्मेडाच्या अरबविरोधी मोहिमातही भाग घेतला होता. अल्मेडानंतर पोर्तुगीजांच्या भारतातील भूप्रदेशाचा व्हाइसरॉय म्हणून त्याने सूत्रे हाती घेतली. याकाळापासून पाच वेळा गोवा इन्क्विझिशन केले गेले.
उत्तर लिहिले · 15/2/2023
कर्म · 9415
1
निकलौस ऑट्टो यांनी शोध लावला


उत्तर लिहिले · 16/1/2023
कर्म · 34195
1

 भारताचा इतिहास लिहिणारे ब्रिटिश इतिहासकार

 भारताच्या इतिहासाबद्दल लिहिणारे एक प्रसिद्ध ब्रिटिश इतिहासकार म्हणजे थॉमस बॅबिंग्टन मॅकॉले. त्यांनी 19व्या शतकात भारतात ब्रिटीश वसाहती प्रशासक म्हणून काम केले आणि 1834 ते 1838 या काळात प्रकाशित झालेल्या त्यांच्या सहा खंडांच्या "हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया" साठी ते प्रसिद्ध आहेत. या कामात मॅकॉले यांनी अत्यंत प्रभावशाली खाते सादर केले. ब्रिटीशांच्या भारतात आगमन झाल्यापासून ते १८ व्या शतकाच्या अखेरीपर्यंतचा भारतीय इतिहास. त्यांनी असा युक्तिवाद केला की ब्रिटीश राजवट भारतासाठी फायदेशीर होती आणि ब्रिटिश प्रभावापूर्वी भारतीय सभ्यता स्थिर होती.

 एरिक जे हॉब्सबॉम हे आणखी एक उल्लेखनीय इतिहासकार आहेत, त्यांनी ब्रिटिश भारताच्या आर्थिक आणि सामाजिक इतिहासावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे "द एज ऑफ एम्पायर: 1875-1914" आणि "द एज ऑफ कॅपिटल: 1848-1875" ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत भारताच्या इतिहासाचे चांगले विहंगावलोकन देतात.

 आणखी बरेच ब्रिटिश इतिहासकार आहेत ज्यांनी भारतावर विपुल लेखन केले आहे, परंतु हे दोघे ब्रिटिश भारताचा दृष्टीकोन तयार करण्यात सर्वात प्रभावशाली मानले जातात.
उत्तर लिहिले · 10/1/2023
कर्म · 5510
0
(१) पाकिस्तानचे संस्थापक मुहम्मद अली जिना यांचे दोनदा लग्न झाले होते. त्यांची पहिली पत्नी एमीबाई जिन्नाह होती, ती लहान असतानाच मरण पावली. त्यांची दुसरी पत्नी  मरियम जिन्नाह होती, जिच्याशी त्यांनी 1918 मध्ये लग्न केले.


(२) वयाच्या 13 व्या वर्षी महात्मा गांधींचा विवाह त्यांच्यापेक्षा सहा महिने मोठ्या कस्तुरबा यांच्याशी झाला. पण लग्नाच्या जवळपास तीन दशकांनंतर महात्मा सरलादेबी या दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडला. सरला आधीच विवाहित होती. त्यावेळी महात्मा 55 वर्षांचे होते आणि सरला 47 वर्षांच्या होत्या.
उत्तर लिहिले · 5/1/2023
कर्म · 5510
0
उद्दिष्ट्ये :

● प्राचीन भारतीय पुरातत्त्वीय साधनांची ओळख करून देणे.

• लिखिन साधनामध्ये धार्मिक व लौकिक साधनांची माहिती देणे.

• परकिय प्रवासवृत्तान्ताची माहिती सांगणे.


प्रस्तावना :

प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासासाठी लिखित व अलिखित दोन प्रकारची साधने आहेत. लिखित साधनांमध्ये भारतीय भाषेतील साधने व परकिय प्रवासवर्णने यांचा समावेश होतो. लिखित साधनाप्रमाणे अलिखित साधने ही अतिशय महत्त्वाची आहेत. कारण त्या साधनामध्ये कोणत्या ही प्रकारचा बदल करता येत नाही. या साधनांच्या आधारे प्राचीन भारताची राजकिय सामाजीक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतीक परिस्थितीची माहिती मिळते.

प्राचीन भारतीय इतिहासाची अलिखित साधने :

प्राचीन भारताच्या इतिहास व संस्कृतीच्या अभ्यासाठी अलिखित साधने अतिशय महत्वाची आहेत. अलिखित साधनाना भौतिक साधने किंवा पुरातत्वीय साधने असेही म्हणतात.


वाड्मयीन साधना पेक्षा भौतिक साधने अधिक विश्वसनीय असतात. कारण त्यामध्ये कोणताही बदल पुन्हा करता येत नाही. अलिखित साधनाचे पुढीलप्रमाणे प्रकार आहेत

१ ) उत्खनन अवशेष : भारतीय पुरातत्वखात्याचा महानिरीक्षक म्हणून कनिंगहॅम यांची नेमणूक सन १८६२ मध्ये झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बोधगया, भारहु, सारनाथ, तक्षशीला इ. ठिकाणी उत्खनन करण्यात आले. लॉर्ड कर्झनने १९०४ मध्ये स्वतंत्र उत्खनन विभाग सुरू केला. त्याच्या प्रमुख म्हणून मार्शलची नियुक्ती केली. डॉ. मार्शल, वोगेळ, स्टाईन, ब्लॉक व स्पुनर यांनी या खात्याची धुरा सांभाळली. डॉ. मार्शलने तक्षशिला, डॉ. स्पूनरने पाटलीपुत्र, राखलदास बॅनर्जीने मोहेंजोदडो, माध्यस्वरूपवत्स दयारामजीने हडप्पा आर. एन. रावने लोथल, बी. बी. लालने कालीबंगण व ओजियाना येथील ठिकाणी उत्खनन केले.

उत्खननात शहराची व्याप्ती इमारती बांधकाम, रस्ते, दिवाबत्ती, सांडपाण्याची व्यवस्था, व्यापारीपेठा, धरणबांधणीची रचना इ. ची माहिती मिळाली. त्याच प्रमाणे दैनंदिन जीवना संदर्भात माहिती देणाऱ्या अनेक वस्तू सापडलेल्या आहेत. त्यामध्ये, धान्य, अलंकार, भांडी, मातीची खपरे, कापडे, शिक्के, मूर्ती, खेळणी, टोपली, शेतीची अवजारे, प्राप्त झाली आहेत. हाडाच्या सांगाड्यावरून प्राणी व मानवाचा वंश याची माहिती मिळाली. भूगर्भशास्त्र, प्रस्तरशास्त्र व कार्बन १४ याच्या आधारे कालमापन निश्चित करण्यात आली. अश्मयुगीन मानवापासून ते गुप्त - सातवाहन काळापर्यंतची माहिती उत्खननातून प्राप्त झाली. त्यामध्ये मानव वंश, व त्याची सामाजिक, धार्मिक, आर्थिक परिस्थितीची माहिती मिळते.

२) स्मारके :- स्मारके म्हणजे भूतकाळातील बांधकामाचे अवशेष होय. स्मारकांना राजकीय दृष्टीकोनापेक्षा सांस्कृतिक दृष्टीकोनातून अधिक महत्व आहे. प्राचीन भारतामध्ये लेणी, किल्ले, गढ्या, मंदिर, स्तुप, गुफा, तोरण, मूर्ती, स्तंभ, घरे, राजवाडे चित्रे इ. च्या स्वरूपात स्मारके आढळतात. स्मारकाच्या आधारे तत्कालीन बांधकाम पद्धती, त्याचे तंत्र, लोकजीवन, धर्म संकल्पना, युध्दतंत्र, शस्त्रे अवजारे, मूर्ती, शिक्षण संस्था व त्यांची शिक्षण पद्धत इ. माहिती मिळते. स्मारके भारतात आणि विदेशातही आहेत. भारतातील स्मारकांचा विचार करताना उत्खननातून प्राप्त झालेल्या ठिकाणांचा व वस्तूंचा विचार करावा लागतो. पाटलीपुत्र उत्खननातून मौर्य राजधानीची, सारनाथ येथील स्तूप व अन्य अवशेषावरून बौद्ध धर्म व सम्राट अशोकाची माहिती मिळते, तक्षशीला येथून विद्यापीठाची, जमालगडी येथून गांधारशैलीच्या शिल्पांची काश्मीरमधील उत्खननातून बौध्द, स्तुप व मठ आणि भींतीवरील मृतिकापटची माहिती मिळते. वारानसी, कौसंबी, श्रीवस्ती, अहिकात्र, मथुरा येतील उत्खननावरून राजकीय व संस्कृतिक विकासाची माहिती मिळते. पूहारपूर महास्थान, बंगार, कोमिल्ला येथील उत्खननावरून बौध्द मंदिराची माहिती मिळते. उद्यगिरी खंडगिरी लेण्यापासून वेरूळ अजिंक्य लेण्यांची माहिती मिळते. गुप्तकालीन मंदिरापासून ते चाणक्य यादवकालीन मंदिरांपर्यंतचे प्राचीन स्मारके आहेत.

भारताबाहेर जावा, कम्बोज, मलायी, बली इ. देशात स्मारके आहेत. कांबोडियामध्ये अंगरकोरवट, जावामध्ये, बोरोबुहुरमंदिर या संर्दभीत विशेष महत्वाची ठरतात. श्रीलंकेतील अनुराधापूर पोलोनरुवा येथे बौध्द धर्मी संर्दभीत माहिती मिळते. प्राचीन स्थापत्य कलेची समृध्दता, गुणग्राहकता, व्यापकता त्यातून दिसून येते.


३) कला :-  पुरातत्वीय सर्वेक्षणाच्याद्वारे ज्ञात झालेल्या विविध प्रकारच्या वस्तु, मुर्ती, शिल्प, चित्र, इत्यादीच्या आधारे तात्कालीन कलेची माहिती मिळते. दगड, लाकूड, धातू, माती या स्वरूपात असंख्य अवशेष प्राप्त झाले आहे. मौर्य, सातवाहन, कुशाण, गुप्त, चाल्यूक्य, वाकाटक, राष्ट्रकुट या राजघराण्याच्या कालखंडात निर्माण झालेल्या कला इतिहासाचे बोलके पुरावे आहे. गुप्तकला, गांधारकला, मथुरा कला, पल्लव कला इ. महत्वाच्या मूर्ती कला होत्या. मूर्तीवरून व चित्रकलेवरून तत्कालीन केशभूषा, वेशभूषा, अलंकार तर देवतांच्या मूर्तीवरून धार्मिक परिस्थितीची माहिती मिळते. आजंठा वेरूळची चित्रकला अप्रतिम आहे. विविध वस्तूमधून तत्कालीन लोकांचे छंद, मनोरंजन, युध्दसाहित्य इ. माहिती मिळते. माती व दगडापासून तयार केलेले शिक्के व मुद्रा प्राप्त झाल्या आहेत. त्यावरील देवदेवता, प्राणी यांची चित्रे व लिपी याची माहिती प्राप्त होते. त्यावरून तत्कालीन धार्मिक संकल्पना, देवदेवतांची कल्पना याचा अभ्यासासाठी उपयोग होतो.

४) नाणी :- प्राचीन भारतात राजे, गणराज्ये, व्यापारी संघटना (श्रेणी) यांनी सोने, चांदी, तांबे, शिसे इ. धातूची नाणी तयार केली. १) प्रचलित नाणी साधी व ओबडधोबड असून एका बाजूस आकृतीचे ( चित्राचे) ठसे असत. अलेक्झांडरच्या स्वारीनंतर नाण्यामध्ये बदल करण्यात आला. नाण्यावर राजाचे नाव, सन व अन्य मजकूर उमटविण्याची पध्दत सुरू झाली. तसेच नाण्याचा आकारमान व वजन निश्चित करण्यात आले. ठसा उमटविलेली भारतीय नाणी खाजगी चलन म्हणून वापरण्यात येत. अशी नाणी विविध श्रेणी व सोनार राजाच्या पूर्वपरवानगीने पाडत असत. या नाण्यावर एकाबाजूला नाणी पाडण्याचे नाव व दुसऱ्या बाजूला राजाचे नाव असत. ज्या प्रदेशात नाणी सापडतात त्यावरून राजाचा साम्राज्यविस्ताराचे ज्ञान होते. नाण्यावरील देवदेवतांच्या प्रतिमांवरून त्या काळातील धार्मिक जीवनाचे ज्ञान मिळू शकते. नाण्याच्या धातूवरून तत्कालीन आर्थिक जीवनाची माहिती मिळते. नाण्यावरील मुद्रावरून राजाची व त्याचे धार्मिक धोरणाची माहीती समजते. नाण्यावरील लिपी मुळे भाषेचे ज्ञान, तसेच लिपीत झालेला बदल याची माहिती मिळते. प्राचीन जनपद व महाजनपदांनी अहत नाणी मोठ्या प्रमाणात पाडली. त्या नाण्यावर प्राणी, नदी, सूर्य, चंद्र, फुले व अनेक धार्मिक चित्र कोरली. इंडो-ग्रीक नाण्यावर राजाची नावे, चित्रे, कोरली. सातवाहन नाण्यावर हात्ती, बैल, राजाची नावे आहेत. कुशाण, गुप्त, राजपुत घराण्यातील राजानी स्वतःची नाणी निर्माण केली. या नाण्याच्या आधारे तत्कालीन राजकीय, आर्थिक, धार्मिक व सामाजीक व सांस्कृती माहिती प्राप्त होती त्यामुळे नाणी इतिहासाचे साधन म्हणून अतिशय महत्वाचे आहे.

५) आलेख : प्राचीन भारताच्या इतिहास लेखनामध्ये आलेखाची महत्वाची भूमिका आहे. हे आलेख पाषाण व ताम्रपट्यावर कोरलेले आहेत. बोझागकोई हा मध्य आशियातील इ. स. पूर्व १५०० च्या दरम्यानचा भारतातील सर्वात प्राचीन शिलालेख आहे. त्यात ऋग्वेदकालीन मित्र, वरुण इ. आर्यसदृश देवतांचा उल्लेख आहे. आर्याच्या मूळवसतीस्थानासंबंधीची माहिती मिळते. सम्राट अशोकाच्या काळात आलेख कोरण्याची पद्धत अधिक विकसीत झाली.

आलेखामध्ये शिलालेख, गिरीलेख, घातूलेख स्तंभलेख गुहालेख, मूर्तिलेख, मंदिरलेख, पत्रलेख, ताम्रपट, भूर्जपत्रे इत्यादींचा समावेश होतो. आलेखामधून राजकर्त्यांचा विजय, किर्ती, दानधर्म, उत्सव, चांगले कार्य, व्यापार विषयक, अदभूत प्रशासकीय, प्रासंगिक, धार्मिक, साहित्यीक इ. संदर्भात वर्णन आहे..


i) शिलालेख :- प्रामुख्याने पर्वतीय प्रदेशात मोठ्या खडकावर कोरलेल्या आलेखाना शिलालेख

म्हणतात. अशोकाच्या चौदा आलेखाचा सर्वप्रथम उल्लेख शिलालेख म्हणून करतात. हे शाहाबजगडी, मानलेहरा, कालसी, गिरनार, सोपारा, धौली, जौगड, येरंगुडी इ. ठिकाणी आहेत. यामध्ये अशोकाच्या विजयाची हृदयपरिवर्तनाची, धर्मप्रचाराची आणि सामाजीक व आर्थिक धोरणाची माहिती मिळते. त्याचे लहान शिलालेख म्हणजे बैराठ जटिंग, रामेश्वर, ब्राम्हगिरी इ. होय. "प्रियदसि” नावाने कोरलेले आलेख हे सम्राट अशोकाचे आहेत, याची माहिती सर्व प्रथम मास्की आलेखावरून मिळते. कारण "प्रियदसि" नावाबरोबर "असोकस" शब्दाचा उल्लेख केलेला आहे. रूद्रदामन व स्कन्दगुप्ताचा जुनागढ शिलालेख, पुष्यमित्र शुंगाचा अयोध्याचा शिलालेख, यामधून त्यांची माहिती मिळते. ओरिसातील भूवनेश्वर जवळ सापडलेल्या हाथीगुंफा शिलालेखातून कलिंगचा राजा खारवेलची व नाशिकजवळ पांडवलेणी शिलालेखातून सातवाहन व शक क्षत्रप यांच्या संघर्षाची माहिती मिळते. अलाहाबादच्या शिलालेखातून समुद्रगुप्ताची माहिती मिळते. कंधार येथे सापडलेल्या शिलालेखावरुन राष्ट्रकुटांची माहिती मिळते. कल्याणीच्या चालूक्याचे शिलालेख नांदेड व उस्मानाबाद जिल्हयात मोठ्या प्रमाणात सापडले आहेत.

(ii) स्तंभ लेख :- एखाद्या ठिकाणी स्तंभ उभा करून त्यावर कोरलेला आलेखाला स्तंभलेख म्हणतात. स्तंभ उभारण्याची परंपरा सिंधू संस्कृति पासूनची आहे. परंतू स्तंभावर आलेख कोरण्याची परंपरा सम्राट अशोकापासून सुरू झाली. अशोकाचे स्तंभलेख नंदनगढ़, लौरिया, दिल्ली, इलाहाबाद येथे प्राप्त झाले. नेपाळमधील सम्मिनदेई, निगलीवा स्तंभलेखातून अशोकाचे बौध्दधर्म यात्रा यासंदर्भात माहिती मिळते. सांची व सारनाथ स्तंभलेखातून बौध्दधर्मातील मतभेद दूर करण्यासाठी अशोकाने केलेल्या प्रयत्नाची माहिती मिळते. अशोकाचे वायव्यप्रांतातील स्तंभलेख खरोष्टी लिपीतील असून बाकी सर्व ब्राम्ही लिपीतील स्तंभलेख आहे.

हेलियोडोरसच्या बेसनगर स्तंभलेखातून बौद्ध धर्माची लोकप्रियता, सामाजिक, धार्मिक इ. माहिती मिळते. अलाहाबाद येथील अशोकाच्या स्तंभावर कवी हरिसेन याने समुद्रगुप्ताचा स्तंभलेख कोरला. यशोवर्माचा मंदसोरचा स्तंभलेख, दुसऱ्या पुलकेशीचा ऐहोळचा स्तंभलेख, स्कंदगुप्ताया भितरीचा स्तंभलेख, उल्लेखनीय आहे. काही स्तंभलेखात संस्कृत नाटकाचे प्रवेश, संगीतशास्त्राचे नियम, विशिष्ट दान दिल्याची माहिती मिळते. विशिष्ट योध्दयाचे प्रतीक म्हणून काही स्तंभ (विरगळ) उभारलेले दिसतात. सतीचे प्रतीक म्हणूनही काही स्तंभ आहेत.

(iii) गुहालेख :- प्राचीन काळात गुहालेख अनेक शासकानी कोरले आहेत. त्यामधून त्यांचे राजकीय जीवन तसेच तत्कालीन सामाजीक, धार्मिक स्थितीची माहिती मिळते. अशोकाच्या धार्मिक सहिष्णूतेची, बराबर गुहालेखातून, दशरथाचे जैनधर्मावरील प्रेमाची नागार्जूनी गुहालेख, सातवाहनाच्या उत्पत्ति, मुळस्थांना विषयाची माहिती नासिक गुहालेखातून, चंद्रगुप्ताच्या गुजरात विजयाची उदयगिरी गुहालेखातून माहिती मिळते. नाणेघाटचा नागनिकाचा लेख, तसेच कार्ले, अमरावती येथील गुहालेख महत्वाचे आहेत.

(iv) मंदिर लेख :- भारतामध्ये, मंदिर व बौध्दधर्माचे स्तुप निर्माण करण्याची परंपरा सुरू झाली, तेव्हापासून काही धार्मिक तत्वे सुरक्षित ठेवण्यासाठी व प्रचारासाठी मंदिराच्या भिंतीवर दरवाज्यावर कोरली गेली. भरहुत स्तुपची चारी भिंतीवर "सुगन रजे" हा लेख शुंग शासकानी कोरले आहेत. भितारी येथील स्कंदगुप्ताचा तर ऐहोल मंदिर परिसरातील पुलकेशीचा आलेख महत्वाचा आहे.

v) मूर्तिलेख :- मूर्तिनिर्मितीबरोबर मूर्तिलेख विकसीत झाले. यामध्ये कनिष्काचे मूर्तीवरील लेख, जैनमूर्तीवरील राजगुप्ताचा लेख, करमदण्डा व मानकुवरच्या मूर्तीवरीह कुमारगुप्ताचा लेख, इ. महत्वाचे मूर्तीलेख आहेत. पिपरवाच्या अभिलेखात गौतम बुध्दाच्या अस्थिची माहिती मिळते.

vi) भूर्जपात्र आलेख : धातुच्या पत्र्याप्रमाणे झाडाच्या पानाचा ही उपयोग केला जात होता. यामध्ये पिप्रा कलश लेख पात्र, नळदमयंतीयांची प्रेमपत्रे प्रसिद्धत आहेत.

vii) ताम्रपट / धातूलेख : प्राचीन काळात राजातर्फे एखाद्या व्यक्तीला दान देताना ते तांब्याच्या पत्र्यावर कोरून दिले जात त्यास ताम्रपट म्हणतात. ताम्रपटावर प्रथम कुलदेवतेची प्रार्थना, वंशावळ व घराण्याचा इतिहास कोरत असे. त्यानंतर तुझ्यासाठी व काय दान दिले याची माहिती असे. संजन ताम्रपट, सांगली व काम्बेचे ताम्रपटातून रामगुप्तची माहिती मिळते. अमोघवर्षांचे संजन ताम्रपट, कुमारगुप्ताच्या काळातील धनैदह ताम्रपट, व बैग्राम ताम्रपट, हर्षवर्धनचा बॉसखेडा ताम्रपट महत्वाचा आहे. कुशीनगर येथील तेरा ओळीच्या ताम्रपटान उदान सुत्राची माहिती मिळते. ताम्रपटावर सर्वसाधारण पणे राजाने जमिनीचे दान केल्याची माहिती असते. राजाकडून देणगीच्या रुपाने ताम्रपटाच्या स्वरुपात मिळालेल्या जमिनीच्या मालकीचा हा दस्तऐवज लोक साभांळून ठेवत असत. राजाकडून अशा प्रकारचे मिळालेले दान त्या व्यक्तिसाठी सामाजिक प्रतिष्ठेची बाब होती.






प्राचीन भारतीय इतिहासाची लिखित साधने :

प्राचीन भारताच्या इतिहासाची माहिती देणारी लिखित साधने अतिशय महत्वाची आहेत. लिखित साधनामध्ये विविधता व समृद्धता आहे. भारतीय भाषेतील साधने आणि अभारतीय / विदेशी साधने असे लिखित साधनाचे दोन प्रकार मानले जातात. भारतीय भाषेमध्ये जी साधने उपलब्ध आहेत त्यांचे विभाजन दोन वर्गात करता येते ते म्हणजे धार्मिक / धर्मग्रंथ आणि धर्मनिरपेक्ष किंवा लौकिक साधने होय. धर्मग्रंथामधून तत्कालीन धर्माचे स्वरूप आणि समाज रचना यांचे चित्रण रेखाटले आहे. धर्मनिरपेक्ष ग्रंथामधून तत्कालीन आर्थिक, राजकीय आणि ऐतिहासीक घटनांचे संदर्भ दिलेले आहेत.

अ) हिंदू धर्माचेधार्मिक साहित्य :-

प्राचीन काळापासून भारतीय समाजामध्ये धर्माला अतिशय महत्वाचे स्थान आहे. धर्माचे विचार प्रसार या उद्देशाने धर्मग्रंथाचे लेखन केले. धर्मग्रंथामधून भारतीय राजनिती समाज, धर्म, संस्कृती याची माहिती मिळते. प्राचीन काळात तीन प्रमुख धर्म होते. त्यांनी जे साहित्य निर्माण केले त्याचे विभाजन हिंदु धर्मग्रंथ, बौध्द धर्मग्रंथ, जैन धर्मग्रंथ असे करता येईल. हिंदु धर्मग्रंथामध्ये वैदिक साहित्य, श्रुती वाडमय, महाकाव्य, पुराण इ. समावेश होतो. वैदिक साहित्यामध्ये श्रुतीवाडमय सुत्रवाडमय असे दोन प्रकार आहेत. श्रुतीवाङ्मयामध्ये वेद / संहिता, ब्राम्हणग्रंथ, आरण्यके, उपनिषेद, वेदांगे यांचा समावेश होतो.

१) संहिता / वेद : प्राचीन भारताची सर्वात मोठी देणगी म्हणजे वेद होय. ते सर्व भारतीय विद्यांचे उगमस्थान आहे. मुळ संस्कृत विद (जाणणे) धातूपासून वेद हा शब्द प्रचलीत झाला. वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. धर्मज्ञान संग्रहित करणाऱ्या ग्रंथाना वेद असे संबोधण्यात येऊ लागले. हे ज्ञान पिढ्यानुपिढ्या अखंड मौखिक परंपरेने चालत आले आहे म्हणून त्याला 'आगम' किंवा 'श्रुति' असे म्हणतात. ऋ / ऋचा म्हणजे श्लोक किंवा छंदोध्द रचना होय. वेदाची रचना लोकांनी केलेली नसून ब्रम्हदेवाच्या मुखातून आलेल्या वाक्यांचा संग्रह होय. वेद हे अपौरूषेय आहेत. वेदातील मंत्रांना संहिता असे म्हणतात. वैदिक वाङ्मयाचे तीन वर्ग पाडता येतील. पहिला वर्ग म्हणजे संहिता होय. (संहिता म्हणजे मंत्रसंग्रह किंवा भिन्न भिन्न देवतांना उद्देशून लिहिलेल्या प्रार्थना होय.) दुसरावर्ग ब्राम्हणग्रंथ किंवा आचारधर्म तिसरा म्हणजे उपनिषदे अथवा तत्वज्ञानविषयक ग्रंथाचा समावेश होय. संहिता म्हणजे वेद होय. वेदामध्ये ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद असे चार प्रकार आहेत. ते पुढील प्रमाणे.

i) ऋग्वेद : जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ रचना असून त्याची निर्मिती इ.स.पू. १५०० ते इ.स.पू. १००० च्या दरम्यान झाली. ऋग्वेद हा शब्द ऋक् + वेद या दोन शब्दापासून बनलेला आहे. ऋक याचा अर्थ श्लोक किंवा छदंबध्द रचना आणि वेद म्हणजे ज्ञान होय, श्लोकमध्ये / छंदबद्ध रचनेत असलेले ज्ञान म्हणजे ऋग्वेद होय. आर्याच्या भारतातील अगमनापूर्वी आणि अगमनानंतरही ऋग्वेदाची रचना केली. अनार्थ ऋचा नष्ट करतील या भितीपोटी आर्यानी ऋचाच्या विषयानुसार चार विभाग केले, त्याला संहिता म्हणतात. त्यांनंतर ऋग्वेद ऋ संहिता नावाने प्रसिद्ध झाला. ऋग्वेदसंहिता म्हणजे इतर तीन वेदांचे उगमस्थान होय.

ऋग्वेदातील मंत्र म्हणणाऱ्या पुरोहिताला 'होता' असे म्हणतात ऋग्वेदात १० मंडले व १०२८ सुक्ते आहेत. ऋग्वेदातील मंडले अनेक ऋषीनी रचली आहेत. पहिल्या नवव्या, दहाव्या मंडळाचे ऋषी अनेक आहेत. दुसरे मंडळ - गृत्समद ऋषी, तिसरे विश्वामित्र, चौथे- वामदेव, पाचवे अत्रिऋषी, सहावे भारद्वाज, सातवे वासिष्ठ आठवे मंडळ कज्ब व - अंगिरसा ऋषीनी रचले आहे. ऋग्वेदातील कठीण भाषेचा अर्थ समजण्यासाठी निघण्टू व निरुक्त हे दोन ग्रंथ तयार करण्यात आले. निघण्टू म्हणजे वैदिक शब्दांचा कोश असून हा ग्रंथ कश्यप महर्षीनी लिहिला आहे. निघण्टूवरील भास्काचार्यांचे भाष्य म्हणजे निरूक्त होय. निघण्टुचे चौदा अध्याय आहेत ऋग्वेदातील प्रत्येक सुक्ताच्या प्रसंगी त्याची रचना करणाऱ्या ऋषीचे नाव आणि गोत्र याची माहिती दिलेली आहे. ऋग्वेदातला मुख्यदेव इंद्र आहे. त्याच प्रमाणे वरुण देव यांना वाहिलेल्या ऋचा आहे. विश्वाची निर्मिती व विकास यासंदर्भात प्रथम या ग्रंथात माहिती मिळते. लोकांचे जीवन, राजेरजवाडे, धर्म, संस्कृती इ. माहिती मिळते. ऋग्वेदाच्या दहाव्यामंडळातीह पुरुषसुक्तात वर्णव्यवस्थेचा उल्लेख आहे.

ii) सामवेद :- सामवेदाची रचना इ.स.पू. १००० ते इ.स.पू. ५०० च्या दरम्यान झाली. साम म्हणजे गायन होय. यज्ञाच्यावेळी गावयाच्या ऋचा संग्रह म्हणजे सामवेद होय. ३६ प्रकारे वेदमंत्र यात सांगितले आहेत. गाण्याच्या चालीवर ऋचा म्हणण्याचे काम ज्या पुरोहिताकडे असे त्यास उदगाता असे म्हणतात. सामवेदामध्ये १५४९ ऋचा आहेत. त्यामधील ७५ ऋचा वगळता बाकीचे उरलेले सर्व ऋचा ऋग्वेदातील आहेत. सामवेदाच्या कौयुम व जैमिनीय अशा दोन संहिता आज उपलब्ध आहेत. आर्थिक व उत्तरार्चिक असे दोन भाग आहेत. आर्थिकात ५०५ रागांचा संग्रह तर उत्तराचिंकात ४०० गान आहेत. यज्ञकर्म व भारतीय संगीत यांचा इतिहास समजण्यास सामवेदाचा उपयोग होतो.

iii) यजुर्वेद :- यजु (यज्ञ) वेद (ज्ञान) यजुर्वेद होय. यज्ञासंदर्भात ज्ञान देणारा ग्रंथ = म्हणजे यजुर्वेद होय. या वेदातील मंत्रांना 'यजस' म्हणतात. यजुर्वेदामध्ये शुक्ल व कृष्ण असे दोन भाग आहेत. कृष्ण यजुर्वेदात मंत्र व त्यावरील गधविवेचनयाचा समावेश आहे. भाषेच्या स्वरूपावरून कृष्ण यजुर्वेद हा शुक्ल यजुर्वेदापेक्षा जुना आहे. कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तरीया, मैत्रायणी, काठक, कपिष्ठलकठ, श्वेताश्वर अशा पाच संहिता आहेत. शुक्ल यजुर्वेदात फक्त मंत्रांचाच समावेश आहे. शुक्ल यजुर्वेदाच्या काण्व व माधंवीन अशा दोन संहिता आहेत. शुक्ल यजुर्वेदाचे ४० अध्याय आहेत. प्रार्थना पद्धतीचा प्रारंभ व वाद, धर्म व त्याचा विकास याची माहिती मिळते या वेदामध्ये कर्मकांडाला प्राधान्य दिलेले आहे. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद यांना 'त्रयी' किंवा 'त्रयी विद्या' असे म्हणतात.

iv) अथर्ववेद : हा अग्निउपाक पुरोहितांचा वेद आहे. त्याचे मुळ नाव अथवभिरस होय. अथवा ऋषीने रचना केल्याने त्याला अथर्ववेद म्हणतात. अथर्ववेदात ४० अध्याय असून, ७३१ सुक्ते व ६००० ऋचा / मंत्र आहेत. याचा एकूण १/३ भाग ऋग्वेदातूनच घेतला आहे. अथर्ववेदाच्या शौनक व पिप्पलाद या दोन शाखा आहेत. यामध्ये जादुटोणा, तंत्रमंत्र, अंधश्रद्ध व्रात्यस्तोम इ. विषयाची माहिती आहे. या शिवाय आयुर्वेद, अर्थशास्त्र यांची सुरूवात यामध्ये आढळते. या वेदामध्ये आर्य-अनार्य याच्या विचारांचा समन्वय स्पष्ट स्वरूपात दिसतो हे महत्वाचे आहे.

२) ब्राम्हणग्रंथ :- ब्रम्हाणे म्हणजे यज्ञकर्मातील एखादया मुद्द्यावर केलेले विवेचन म्हणजे ब्राम्हणे होय. ब्राम्हणांचे वर्णन यज्ञशास्त्रग्रंथ असेही करता येईल ब्राम्हाण ग्रंथ जास्त प्रमाणात गद्यशैलीत असून, धर्म व यज्ञाच्या संदर्भात माहिती आहे. ब्राम्हण ग्रंथातील विचारसरणी गुढवादी, प्रतिकात्मक व रूक्ष आहे. या ग्रंथाचा मुख्य विषय म्हणजे मूळ वेदातील कठीण विभागाचे स्पष्टीकरण करणे होय. त्याचे विधि व अर्थवाद असे दोन भाग आहेत. विधि विभागात यज्ञाचे विधी कसे करावेत तर अर्थवाद विभागात यज्ञकर्म मंत्र यातील हेतू, अर्थ यांचे विवेचन केले आहे. प्रत्येक वेदापासून निरनिराळे ब्राम्हणे तयार झालेले आहेत.

ऋग्वेदाची ऐतरेय व कौषीतकी ही दोन ब्राम्हणे आहेत. ऐतरेय ब्राम्हणात सोमयाग, अग्निहोत्र, राजसूय यज्ञाचे वर्णन आहे. कौषीतकि ब्राम्हणात ऋतुयाग, सोमयाग, अग्नयधान इ. माहिती आहे. सामवेदाची पंचविश (तांड्य) व षड्विंश ही दोन ब्राम्हणे आहेत. पंचविश ब्राम्हणात व्रात्यस्तोम विधीचे वर्णन आहे. यजुर्वेदाची तैत्तिरीय व शतपथ ही दोन ब्राम्हणे आहेत. तैत्तिरीय ब्राम्हण हा कृष्ण यजुर्वेदाच्या संहितेचा उत्तरभाग असून, पुरुषमेधाच्या वर्णनावरून वेदकाली यज्ञसंस्थेत नरमेधाय अंतभीव होत असे. सर्व ब्राम्हणात शतपथ ब्राम्हण हे प्रमुख ब्राम्हण आहे. शुल्क यजुर्वेदाचा ब्राम्हणग्रंथ आहे. शंभर अध्याय आहेत. अथर्ववेदाचे गोपथ ब्राम्हण आहे या मध्ये बराचसा भाग ऐतरेय व शतपथ ब्राम्हणातून घेतला आहे. एकूण सात ब्रम्हणे आहेत ते म्हणजे एतरेय, कौषीतकी, पंचविश, षडविंश, तैत्तिरीय, शतपथ गोपथ इ. होय. ब्राम्हण ग्रंथातून तत्कालीन वैदिकधर्म, सामाजिक, राजकीय, आर्थिक जीवनाची माहिती मिळते.

३) आरण्यके :- ब्राम्हण ग्रंथाची पुरवणी म्हणजे आरण्यके होय. आरण्यके म्हणजे अरण्यात असताना ऋषीमुनीच्या चिंतनातून प्रकटलेले ग्रंथ होय. यज्ञाचे मुळस्वरूप, त्याचे गुढार्थ, तत्वज्ञान याचे विवेचन करणे. उपनिषदाची सुरूवात आरण्यके पासून झाली असे म्हणावयास वाटते.

४) उपनिषदे :- वैदिक आर्याच्या तत्वज्ञानाचे पूर्णरूप म्हणजे उपनिषदे होय. आरण्यकांत ब्राम्हज्ञानाची जेवढी चर्चा झाली, तेवढ्या भागाला उपनिषद म्हणतात. ब्राम्हाणग्रंथाच्या नंतर आरण्यके व उपनिषदे येतात म्हणून त्यांना वेदान्त असेही म्हणतात. वैदिक ज्ञानाचा अंतिम निष्कर्ष व ध्येय यामध्ये सांगीतले आहे. असे शंकराचार्य सांगतात. उपनिषद हा शब्द उप नि सव म्हणजे 'जवळ बसणे' या धातूपासून निघाला असून त्याचा मूळ अर्थ गुढज्ञानाची माहिती घेण्यासाठी छात्राने गुरूजवळ बसणे हा आहे. उपनिषदे ही ब्राम्हणग्रंथाची अंगभूत अंगे आहेत. मुख्य उपनिषेद ही इ.स.पू. १२०० ति ६०० पर्यंतच्या काळात रचली आहेत. जीवात्मा व परमात्मा या दोन विषयाचे तात्विक विवेचन या ग्रंथातून केलेले आहे. 'तत्वमसि' हा उपनिषदांच्या तत्वज्ञानाचा गाभा आहे. भारतीय तत्वज्ञानाची बैठक उपनिषदांनी घातली आहे. आत्मज्ञानासाठी तप, संन्यास, योग इ. मार्ग सांगीतले आहे. वेवरच्या मते २३५ उपनिषदे आहेत. मुक्तिकोपनिषदात १०८ उपनिषदे सांगितली आहे. ईश, केन, कठ, प्रश्न, मुण्डक, माण्डूक्य, तैत्तिरीय, ऐतरेय, छान्दोग्य, बृहदारण्यक ही दशोपनिषदे जूनी व महत्वाची आहेत. कौषीतकी, मैत्रायणी, श्वेताश्वर मिळून त्रयोदश उपनिषदे प्रसिद्ध आहेत.


५) वेदांगे - वेदाची पुरकशास्त्रे म्हणजे वेदांगे होय. वेद परंपरातील सिद्धांत सुत्ररूपाने एकत्र ग्रंथित करण्यात आले या वाड:मयास सुत्रवाडम्य असे म्हणतात. श्रवम परंपरेने आलेले ज्ञान स्मरणात राहण्यासाठी हे वाडमय असल्याने त्यास स्मृती असे म्हणतात. हे ग्रंथ वेदांच्या अंगभूत असल्याने त्यांना वेदांगे म्हणतात. एकूण ६ वेदांगे आहेत. १) शिक्षाया वेदांगामध्ये स्पष्ट उच्चार आणि संहिता पाठ कसा घ्यावा याची माहिती आहे. शिक्षेच्या ग्रंथाना प्रातिशाख्ये असे - म्हणतात. २) कल्पयाचे तीन भाग आहे. श्रौतसूत्र यज्ञ व इष्टी संबंधीचे नियम सांगीतले आहे. गृहसूत्र- यामध्ये इहलोक व परलोक या संबंधीची कर्तव्य सांगीतली आहे. धर्मसूत्र- यामध्ये सामाजिक जीवनासंदर्भातील नियम आहे. शुल्क सुत्र- यामध्ये यज्ञकुंडाच्यी रचनेसंदर्भात माहिती दिलेली आहे. कल्पसूत्रामध्ये धर्म, समाज, राजनिती संदर्भात माहिती सांगीतलेली आहे. ३) व्याकरण यामध्ये व्याकरण विषयक नियमांचे विवेचन केले आहे. पाणितीच्या अष्टाध्यायीलाय वेदांग व्याकरण मानतात. ४) निरुक्त वेदातील कठिण भाषेचा अर्थ सांगितालेला आहे. निरूक्त हा ग्रंथ यास्काचार्या लिहिला. ५) छंद वैदिक मंत्र विशिष्ट छंदातच म्हंटला पाहिजे असा दंडक होता. त्यामुळे या शास्त्राचा विकास झाली. पिंगलाची छन्दसुत्रे ही वेदांगे मानली जातात. ६) ज्योतिष यामध्ये ऋग्वेद ज्योतिष, यजुर्वेद ज्योतिष, अर्थवेद ज्योतिष असे तीन भाग आहेत. ग्रह कालगणना, नक्षत्र, युगकल्पाना इ. माहिती आहे. आर्यभट्ट लल, वराहमिहिर, ब्रम्हागुप्त, भास्कराचार्य इत्यादींना ज्योतिषशास्त्राची प्रगती केली.

६) उपवेद आयुर्वेद, धनुर्विद्या, गांधर्ववेद, शिल्पकला व इतर कला या विषयावरील ग्रंथ म्हणजे उपवेद होय. अर्थशास्त्र हा ग्रंथ उपवेदांत यामध्ये समावेश होतो..

७) धर्मशास्त्रे व स्मृति वाङ्मय प्राचीन भारताच्या कायदेविषयक साहित्याला धर्मशास्त्र म्हणतात. हिंदू कायद्याची मुळ बिजे कल्पसूत्रातील धर्मसुत्र, व गृहसूत्र यामध्ये सापडतात. सर्व धर्मसुत्रांत गौतमाचे धर्मसूत्र हे प्राचीन असावे. बौध्दायन धर्मसूत्र, वाशिष्ठधर्मसुत्र मानवधर्मसुत्र, हारितधर्मसुत्रे इ. धर्मशास्त्रे आहेत. धर्मशास्त्रा प्रमाणेच स्मृतिचे महत्व असाधारण आहे. वारसाहक्क, दानविधान, स्त्रीधन, कुटुंबपद्धत, माहमाना इ. संदर्भात हिंदुकायदा स्मृतिग्रंथ आहेत. मनुस्मृती ही प्राचीन असून याज्ञवलक्य विष्णू नारद पराशर, बृहस्पति इ स्मृतिग्रंथ आहेत.

८) महाकाव्य रामायण व महाभारत ही दोन महाकाव्य आहेत. रामायण हे महाकाव्य वालिमकिने रचले असून ते ७ कांड आणि २४००० श्लोक आहेत. त्याला आदिकाव्य म्हणतात. महाभारताची रचना व्यास यांनी केली. कौरव-पांडव यांच्यातील संघर्ष वर्णन केले आहे. महाभारतामध्ये १ लाख श्लोक आहेत म्हणून त्याला शतसाहस्त्री संहिता म्हणतात.

९) पुराण पुराणांची रचना इ. स. ४०० च्या दरम्यान झाली असावी. १८ पुराणे व १८ उपपुराणे आज उपलब्ध आहेत. विष्णू, वायू, मत्स्य, ब्रम्ह, भविष्य ही पुराणे इतिहायाची साधन म्हणून उपयुक्त आहेत. प्रत्येक पुराणाचे पाच भाग पाडले आहेत. पुराणातून राजकीय, सामाजिक, धार्मिक माहिती मिळते.

ब) धर्मनिरपेक्ष किंवा लौकिक साधने धर्मग्रंथा शिवाय इतर जे साहित्य आहेत ती सर्व धर्मनिरपेक्ष साधने होय. ही साधने संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, द्वाविड कन्नड इ. भाषेत आहेत. या शिवाय प्राकृत भाषेच्या पाली, अर्धमागधी, मागधी, शौरसेनी, महाराष्ट्री इ. अनेक उपप्रकारच्या भाषेतीह साधनामध्ये लेखन झालेले आहे. धर्मनिरपेक्ष साधनामध्ये चरित्रे, काव्य, कथा, कादंबरी, नाटक, शास्त्रीय साधने महत्वाची आहेत.

१) चरित्र ग्रंथ प्राचीन भारतामधील चरित्रग्रंथ हे महत्वाचे साधन आहे. अश्वघोषचे बुद्धचरित्र हा सर्वात प्राचीन चरित्रग्रंथ आहे. बाणभटाच्या हर्षचरित्र मधून हर्षवर्धनाची माहिती मिळते. बाकपतीने कनोजच्या यशोधर्मनच्या जीवनावर गौडवह या चरित ग्रंथाचे लेखन केले. बिलहाणाने चालुक्य राजा विक्रमादित्याच्या जीवनावर विक्रमाकदेवचरित्र, जयसिंहाने कुमारपालचरित्र, भोजप्रबंध इ. महत्वाचे चरित्र ग्रंथ आहेत. त्यामधून ऐतिहासिक माहिती मिळते.

२) काव्य संस्कृत काव्याचा उदय इ. स. पूर्व दुसऱ्या शतकात झाला असावा. संस्कृत काव्याची बीज वैदिक वाङमयात आढळते. आज सर्वांत जुने असे उपलब्ध काव्य म्हणजे अश्वघोषचे बुद्ध चरित्र होय. अश्वघोषचे सौदशनंद, बुद्धचरित्र, कुमारलाटचे सुत्रालंकार, कालिदासचे कुमार संभव, मेधदुत, रघुवंश, भारविचे किरातार्जुनीय इ. प्रमुख काव्य आहेत. या शिवाय काही लौकिकगीते आहेत. त्यामध्ये नलोदय, शृंगारतिलक, इ. समावेश होतो. प्राचीन काळातील कविता संग्रहामध्ये कवीन्द्र समुच्यय, सदुक्तिकरणामृत सुभाषित मुक्तावली इ. काव्य संग्रहाचा समावेश होतो. या काव्यामधून तत्कालीन संस्कृतीचे स्वरूप पहावयास मिळते.

३) नाटक भारतीय नाट्याचे उगमस्थान ऋग्वेदात आहे. वेदकालीन मुकाभिनय व करमणूकीकरता सांगितलेल्या दंतकथा यांच्या संयोगामुळे नाटकाचा उदय झाला असे म्हणता येईल. भारतीय नाट्याची जन्मभूमी शैरसेनची राजधानी मथुरा होय. अश्वघोष हा सर्वात प्राचीन नाटककार असून त्याचे सारीपुत्त प्रकरण हे नाट्य वाडमयातील पहिले नाटक मानले - जाते. भासाने १३ नाटके लिहिली. कालिदासने शाकुंतला, मालविकाग्रिमित्र, विक्रमोर्वशीय ही नाटके लिहिली. विशाखादत्ताने मुद्राराक्षस हे चंद्रगुप्ताच्या जीवनावर नाटक लिहिले आहे. हर्षवर्धनाची नागनंदा, रत्नावली, प्रियदर्शका ही नाटके आहे. भट्टनारायणचे वेणीसंहार,भवभूतिचे मालतीमाधव, महावीरेचरित्र उत्तररामचरित्र इ. नाटके आहेत. नाटकामधून

तत्कालीन राजकीय, सामाजीक, धार्मिक जीवनाची माहिती प्राप्त होती.

४) कथा कादंबरी कथा वाडमयाची सुरूवात वेदामधील पुरूरवा उर्वशीच्या कथापासून झाली. दंतकथा, आख्यायिका, गोष्टी, परिकथा, उपदेखपद कथा इ. कथाचे प्रकार आहेत. अतिप्राचीन कथासंग्रह म्हणजे बौद्धधर्मीयांचे अवदान हा होय. पंचतंत्र, जातककथा, बृहदकथासंग्रह या दंतकथा आहेत. आंध्रप्रदेशाचा प्रधान गुणाढ्याने बृहकथा पैशाच्या भाषेत लिहिली आहे. सोमदेवाचे कथासरितसागर क्षमेन्द्राचे बृहत्कथामंजरी दंडीचे दशकुमारचरित्र सुबन्धुने वासवदात्ता कथा लिहिली. शुकसप्तती या कथेचे फारशी भाषांतर तुतीनाम या नावाने केले आहे. श्रीहर्षांच्या दरबाराचा राजकवी बाणभट्टाने कादंबरी व हर्ष चरित्र दोन ग्रंथ लिहिले. या साहित्यातून लोकजीवन, लोकसमजूती, राजा सामान्य माणसाचे जीवन याची माहिती मिळते. कादंबरी हा प्रकार बाणभट्टाने लोकप्रिय केला.

५) शास्त्रीय वाङ्मय शास्त्रीय वाडमयाची सुरूवात वैदिककाळात झालेली दिसते. शास्त्रीय वाङमयाच्या अनेकशाखा आहेत १) व्याकरण भारतीयांचे आद्यशास्त्र म्हणजे व्याकरण होय. - त्याच्या अभ्यासाची सुरूवात शाकल्याच्या ऋग्वेदाच्या पदाने झाली. निरूक्त हा या विषयावरील पहिला ग्रंथ आहे. पाणिनीचे अष्टाध्याची (शब्दानुशासन) कात्यायनाचे वार्तिक, पंताजलीचे महाभाष्य भर्तुहरीचे वाक्यपदीय इ. महात्वाचे ग्रंथ आहेत. पंतंजलिचे महाभाष्य हैं। सर्वात जुने भाष्य होय. २) कोष भारतामध्ये कोषरचनेची सुरूवात कश्यपमुनीच्या निघण्टू - ग्रंथापासून झाली. धातुपाठ व गणपाठ ही कोशाची पूर्वतयारी असे म्हणावे लागले. प्राचीन काळातील आद्यकोष म्हणजे अमरसिंहाचे नामलिंगानुशासन ( अमरकोश) होय. या ग्रंथावरील सर्वांत प्राचीन टिका लिहिली ते म्हणजे क्षीरस्वामींची उदघाटन होय. सर्वानंदाने टीकासर्वस्व या नावाने ही टिका लिहीली सुभूतीची कामधेनू बृहस्थति रायमुक्तामणीची पदचंद्रिका इ. महत्वाचे ग्रंथ आहे. ३) धर्मशास्त्र प्राचीन भारताच्या कायदेविषयक साहित्याला धर्मशास्त्र है नाव आहे. कल्पसूत्रातील धर्मसुत्रे व गृहसूत्रे यामध्ये कायद्याचा उगम झाली. गौतमाचे धर्मसूत्र, वाशिष्टचे धर्मसूत्र, वैधायनचे धर्मसूत्र, वैष्णावचे धर्मसुत्र इ. महत्त्वाची आहेत. ४) स्मृति धर्मशास्त्रावरील सर्वात लोकप्रिय ग्रंथ म्हणजे मनुस्मृति होय. याज्ञवलक्य स्मृति, नारदस्मृति बृहस्पतिस्मृत इ. ग्रंथ महत्वाचे आहेत. हिंदु कायदा स्मृतिवर आधारलेला आहे. यात कायदे विषयक माहिती आहे. ५) छंदशास्त्र पिंगलाचा छंद सुत्र हा छंदशाष्यावरील - पहिला ग्रंथ होय, भरत, जयदेव, वराहमिहिर, उत्पलाने ही छंदशास्त्राच लेखन केले. ६) नाट्यशास्त्र भरतमुनीचे नाट्यशास्त्र हा यावरील पहिला ग्रंथ होय त्याला नाट्यवेद किंवा पाचवावेद असेही म्हणतात. धनंजयचा दशरूपक विश्वनाथचा साहित्यदर्पन हे नाट्य शास्त्राचे प्रमुख आहेत. धनिकाने अवलोक नावाची टिका लिहिली. नाट्यशास्त्राबद्दलची माहिती आहे. ७) साहित्यशास्त्र साहित्यशास्त्रावरील सर्वात प्राचीन ग्रंथ म्हणजे अग्निपुराण होय. भामह व दडीयांनी साहित्यशास्त्रावर स्वतंत्रपणे ग्रंथनिर्मिती केली. भामहाचे काव्यालंकार, दण्डिचे काव्यादर्श, उद्भटाचे अलंकारसारसंग्रह, वामनचे काव्यालंकारसुत्र रुद्रटचे काव्यालंकार, राजशेखरचे काव्यमीमांसे इ. महत्त्वाचे ग्रंथ आहेत. ८) राज्यशास्त्रराज्यशास्त्रात अर्थशास्त्र, दंडनिती, राजनिती नितीशास्त्र असेही म्हणतात. कायदा, अर्थशास्त्र व समाजशास्त्र इ. माहीती या शास्त्रामध्ये येते. महाभारताच्या शांतिपूर्व धर्मसूत्र, धर्मशास्त्र यामध्ये याची माहिती मिळते. राज्यशास्त्रामधील कौटिलीयाचे अर्थशास्त्र हा महत्त्वाचा ग्रंथ आहे. कामन्दकचे नितिसार सोमेश्वराचे अभिलाषितार्थ चिंतामणी, भोजाचे 'युक्तिकल्पतरू' लक्ष्मीधरचे राजनितीकल्पतरू कृष्णदेवरायचे 'अनुक्तमाल्यद इ. ग्रंथ आहेत. ९) जोतिषशास्त्र भारतीय ज्योतिषाशास्त्राची सुरुवात वैदिक ऋच्यात आढळते. यजुर्वेदात ४३ ऋग्वेदात ३६ श्लोक ज्योतिष शास्त्रात आढळतात. गार्गीसंहिता वृध्दगर्गसंहिता (सर्वात जूना ग्रंथ) सुरिप्यपणती, महाभारतातील काही भागामध्ये, मानवधर्मशास्त्र यामध्ये माहिती आढळते. १०) कामशास्त्र सुसंस्कृत व रसिक नागरिक, राजकन्या उच्चपदवीच्या मुली व गणिका यांच्यासाठी कामशास्त्र आहे असा उल्लेख सापडतो कामशास्त्र ग्रंथामध्ये स्त्रीपुरुष संबंध हा मुख्य विषय असाल तरीही लोकजीवनाची माहिती मिळते. मल्लनाथ वात्स्यायनाचे 'कामसूत्र' हा सर्वात प्राचीन ग्रंथ होय. यशोधर इंद्रपादचे जयमंगल कोकाचे रतिशास्त्र कल्याणमल्लचे अनंगरंग हे महत्त्वाचे ग्रंथ आहेत. जयमंगला हा ग्रंथ कामसुत्रावरील टीका होय ११) वैधक शास्त्र याचा प्रारंभ अर्थवेदातील कौशिकसूत्र मध्ये झाला. अथर्ववेद व शतपथब्राम्हण यामध्ये आरोग्यशास्त्र, शरीरशास्त्र या संदर्भात माहीती आहे प्रथम श्रेणीचा अत्रिय याला मानले जाते. भारतीय वैधकशास्त्राताचे तीन तज्ञ म्हणजे चरक, सुश्रूत वाग्भट इ. होय त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाना संहिता म्हणतात. चरकसंहिता, सुश्रुतसंहिता, अष्टांगहृदयसंहिता (वाग्भटची) इ. महत्वाचे ग्रंथ आहेत. १२) खगोलशास्त्र भारतीय खगोलशास्त्राच्या विकास मुख्यत्वेकरून उत्तरवेदकाळात झाला 'सिध्दांन्त' व कारण या संदर्भात ग्रंथ लिहिले. ब्राह्मणग्रंथामधून विश्वरचनेसंबंधीची मालिका त्यामध्ये उगम झालेली आहे. आर्यभट्टांचा 'आर्यभटीया (आर्य सिध्दांत)' वराहमिहिरचा पंचश्रध्दा न्तिका ब्रह्मगुप्ताने ब्रह्म-स्फुट सिध्दांनत' भास्कराचार्याने सिध्दान्तशिरोमणी हा ग्रंथ लिहिला. १३) गणितशास्त्र आर्यभट्ट ब्रम्हगुप्त भास्कर हे प्रसिध्द खगोलशास्त्रज्ञ आदि गणितीही होते. अंककणित बीजगणित, भूमिती याचा अभ्यास ग्रंथामध्ये आहे. ब्रह्मगुप्ताचा ब्रम्हस्फुटसिध्दांन्त भास्कराचा सिध्दांन्त शिरोमणी हे ग्रंथ आहेत ब्रह्मगुप्ताच्या ग्रंथात कुट्टक हे अध्यायान बीजगणिताचा विषय आहे. भास्कराच्या ग्रंथातील लिलावती अध्यायात अंकगणिताची चर्चा केली आहे. दशमान पध्दतीचा पुरस्कार प्रथम भारतीयांनी केला. शुन्याच्या शोध भारतीयांनी लावला. त्रिकोणितीचा उपयोग खगोलशास्त्रासाठी झाला. शुल्कसुत्रामध्ये भूमितीशास्त्राचा उगम आहे. १४) रसायनशास्त्र भारतीय रसायन शास्त्राचा उदय अर्थवेदकाळा पासून असावा. या विषयावरील प्रमुख ग्रंथ म्हणजे नागार्जूनचा 'सिध्दनागार्जून' होय. त्यामध्ये पाऱ्यासंबंधीचे विचार मांडले आहेत.

६) संगमसाहित्य - दक्षिण भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात उपयुक्त ठरणारे तामिळी भाषेतील संगम साहित्य होय. पांड्य राजाद्वारे मदुराई येथे विद्वानांची साहित्य परिषद भरवली, जात असे. त्यामधून ज्यासाहित्याची निर्मीती झाली त्यास संगम साहित्य असे म्हणतात. पहिली परिषद/ संगम मदुराई / मदुरा येथे भरली. ५४९ लेखकांनी यात लेखन केले. आज एकही ग्रंथ उपलब्ध नाही. दुसरे संगम कपाटपुरम / अलईवई येथे भरले त्यामध्ये ४४९९ लेखकांच्या ग्रंथाचे परिक्षण केले. तामिळी भाषचे व्याकरण 'तोलकाप्पिय' नावाचा एक ग्रंथ उपलब्ध आहे.

उत्तर लिहिले · 16/2/2023
कर्म · 9415