समाजशास्त्र
अंधश्रद्धा
समाज सेवा
समाजवाद
'कुठे शोधीशी रामेश्वर अन कुठे शोधीशी काशी'या भक्तीगीतामध्ये समाजातील अंधश्रद्धा कशा दाखवून दिल्या आहेत?
1 उत्तर
1
answers
'कुठे शोधीशी रामेश्वर अन कुठे शोधीशी काशी'या भक्तीगीतामध्ये समाजातील अंधश्रद्धा कशा दाखवून दिल्या आहेत?
2
Answer link
कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी
हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी
ह्या ओळींचा अर्थ आता ज्वलंत स्थिती जी आहे त्याच्या सोबत एकदम तंतोतंत जुळत आहे असे तरी मला वाटत आहे, म्हणजे बघा ना कोरोनामुळे धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती. ती धार्मिक स्थळे पुन्हा दर्शना साठी खुली करावी म्हणून काही लोक चक्क आंदोलन करण्यास तयार होती. वेळेचे गांभीर्य नसणाऱ्या आणि आंदोलनासाठी एवढे उतावीळ होणाऱ्या लोकांना एक प्रश्न विचारावासा वाटतो की त्यांनी कधी घरातील देवासमोर हात जोडले का? घरात किती देव आहेत हे सुद्धा काहींना माहीत नसते. ह्यांची देवभक्ती जागी होते ते फक्त धार्मिक स्थळी जाऊन देवांना भेटायला आणि त्याच्या सोबत फोटो काढायला.
सध्याच्या पिढीची देव भक्ती. कोरोनाचा एवढा संसर्ग असून हो लोकांना त्याचे गांभीर्य नाही.
विठुरायाची 60 फूट भव्य मूर्ती दिवे घाटात आहे.
ह्या फोटो कडे बघून देवाला ही वाटेल आपले पंढरपुरातच बरे आहे.
चतुर्थी ला दगडूशेठ गणपती जवळ किती गर्दी असते, गुरुपौर्णिमेला नारायणपूर , रविवारी जेजुरीला. त्या एकाच दिवशी देव असतो का देवळात बाकी च्या दिवशी नसतो का ?
आपल्या सर्वांना एक गोष्ट चांगलीच महिती आहे की देव फक्त भक्तीचा भुकेला आहे आणि आपण मात्र त्याला सोने, चांदी, प्रसाद काय काय देतो. ज्याने हे विश्व उभे केले त्यालाच आपण त्याच्याच वस्तू देतो म्हणजे आपल्या पेक्षा दरिद्री कोण असेल.
मला तरी एक वाटते की कोठेही घरी किंवा देवळात आणि कोणत्याही वारी मनापासून हात जोडले बस झाले.
माणसातील माणुसकी मरत चालली आहे आणि माणूस देव मात्र धार्मिक स्थळे आणि मंदिरात शोधत आहे.
झाड फुलांनी आले बहरून
तू न पाहिले डोळे उघडून
वर्षाकाळी पाऊस धारा
तुला न दिसला त्यात इशारा
काय तुला उपयोग आंधळ्या दीप सुन उशाशी ||
माणसाला 100 मधील 80 टक्के सुख आणि 20टक्के दुःख दिले ना तरी माणूस त्या सुखाकडे पाहत नाही तर दुःखा कडे पाहून अजून दुःखी होतो. जसे आंधळ्या माणसाला दिव्याचा काहीच उपयोग होत नाही तसेच डोळे असूनही ह्या सुखकडे पाहून ही न पाहिल्यासारखे करणाऱ्या मनुष्याला सुखाचा काय उपयोग .
रुद्राक्षांच्या गळ्यात माळा
लविलेस तू भस्म कपाळा
कधी न घेऊन नांगर हाती
पिकविलेस मातीतून मोती
हाय अभाग्या भगवे नेसून घर सन्यासून जाशी ||
आपला वारकरी संप्रदाय नेहमी एकाच गोष्ट सांगतो की काम सोडून फक्त माझेच नाव घ्या असे देव कधीच म्हणत नाही. दिवसभरात कधीही मनापासून देवाचे नाव काढा आणि त्याच्या नावाचा जप कारा. आपण समाधानाने देवाचे नाव घेतले तर देवालाही तेवढाच आनंद. पण लोक देव भक्ती च्या नावाखाली अंगाला भस्म लावून आपल्या जबाबदरीपासून पळू पाहतात. जर संसार बघून ही परमार्थ करता येतो तर पूर्ण घराला वेठीस का धरायचे.
देव बोलतो बालमुखातून
देव डोलतो उंच पिकातून
कधी होऊनी देव भिकारी
अन्नासाठी आर्त पुकारी
अवतीभवती असून दिसेना, शोधितोस आकाशी ||
देव जरी दिसत नसला तरी ती एक अदृश्य शक्ती आहे. आपल्या आजू बाजूला त्याचे अस्तित्व आहे. (मी आस्तिक आहे त्यामुळे मी तरी देवाचे अस्तित्व मान्य करते). पण तरीही लोक त्याला शोधतात आपल्या भाबड्या अपेक्षेप्रमाणे आपण देव म्हणाले की पाहिले आकाशाकडे पाहतो. पण आपल्याला समोरच्या माणसामध्ये मात्र कधीच देव दिसत नाही.
मी माझ्या बुद्धिप्रमाणे आणि मला समजले तसे सांगायचा प्रयत्न केला.
काही चुकले असल्यास क्षमस्व!!!
शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधिशी काशी', या भक्तीगीतामध्ये समाजातील अंधश्रद्धा कशा दाखवून दिल्या आहेत?