समाजवाद
समाजवादाची मूलतत्त्वे कोणती आहे?
1 उत्तर
1
answers
समाजवादाची मूलतत्त्वे कोणती आहे?
0
Answer link
समाजवादाची मूलतत्त्वे
समाजवादी विचारांची वाढ युरोपातील अनेक चिंतनशील व विचारवंत नेत्यांच्या विचारमंथनातून झाली आहे. सामान्यतः समाजवादाच्या सिद्धांतात पुढील अत्यावश्यक तत्त्वांचा समावेश करण्यात येतो :
(१) समाजवादी व्यवस्थेमध्ये व्यक्तीपेक्षा समाजावर जास्त भर देण्यात येतो आणि व्यक्तिहितापेक्षा सर्व समाजाच्या हिताला अधिक महत्त्व देण्यात येते.
(२) समाजवादी व्यवस्थेत भांडवलशाहीची देशातून हकालपट्टी करण्याचे उद्दिष्ट मान्य करण्यात येते, कारण भांडवलदार व उद्योजकांना कामगारवर्गाचे नैसर्गिक शत्रू मानण्यात येते. समाजवादी व्यवस्थेत राज्य हे आम जनतेचे पालक व देशातील सर्वांच्या हिताचे रक्षक समजण्यात येत असल्याने जनतेला भांडवलशहाच्या जुलमापासून वाचविणे हे त्यांचे आद्य कर्तव्य ठरते. हे कर्तव्य पार पाडण्यासाठी भांडवलशाही संपूर्णतः नष्ट करणे आवश्यक बनते.
(३) समाजवादी व्यवस्थेत स्पर्धा दूर करण्यात येते.
(४) समाजवादामध्ये समतेला मूलभूत स्थान असते. त्यामुळे भांडवलशाहीतील विषमतेचा धिक्कारअभिप्रेत असतो. थोडक्यात म्हणजे, समाजवादी व्यवस्थेत सर्वांना समान बनविण्याचे आणि सर्वांना एकाच स्तरावर आणण्याचे अभिप्रेत असते...