समाजवाद
आधुनिक साम्राज्यवादाची कारणे आणि परिणाम कोणते आहे?
1 उत्तर
1
answers
आधुनिक साम्राज्यवादाची कारणे आणि परिणाम कोणते आहे?
0
Answer link
आधुनिक साम्राज्यवाद : कारणे व परिणाम
⭑ आधुनिक साम्राज्यवाद हा वसाहतवादातून जन्मास आला. औद्योगिक क्रांतीने ह्या साम्राज्यवादास मूर्त स्वरूप दिले. वसाहतींतील स्थानिक लोकांचा पराभव करून युरोपीय राष्ट्रांनी आपले वर्चस्व स्थापन केले. त्यांनी आपल्या धर्म व संस्कृतीचाही वसाहतींमध्ये प्रसार केला.
साम्राज्यवादाच्या पहिल्या टप्प्यात युरोपीय राष्ट्रांनी वसाहतीमध्ये कायमस्वरूपी वास्तव्य न करता त्या प्रदेशातील खनिजसंपत्ती मिळविणे, बाजारपेठा काबीज करणे आणि मिळेल त्यामागनि आर्थिक शोषण करणे ह्यावरच लक्ष केंद्रित केले.
साम्राज्यवादाच्या प्रसारामुळे युरापीय राष्ट्रांत सत्तास्पर्धा सुरू झाली. त्याचे पडसाद वसाहतींवर उमटू लागले, त्यामुळे युरोपीय इतिहास हा जागतिक स्वरूपात पुढे आला.
औद्योगिक क्रांती, कच्च्या मालाची गरज, भांडवल गुंतवणूक, अतिरिक्त लोकसंख्येची समस्या, इत्यादी अनेक कारणांमुळे साम्राज्यवादाचा झपाट्याने विस्तार झाला.
आधुनिक साम्राज्यवादाचे वसाहतींवर सर्वकष स्वरूपाचे परिणाम झाले. राजकीय परिणामात वसाहती युरोपीय राष्ट्रांच्या गुलाम बनल्या. हरवलेले राजकीय स्वातंत्र्य वसाहतींना संघर्ष करून मिळवावे लागले. त्याचबरोबर नव्या राजकीय विचारांची ओळखही वसाहतीतील लोकांना झाली. लोकशाही, स्वातंत्र्य, संसद, इत्यादी नव्या विचारांच्या ओळखीतून जागृती घडली.