अंधश्रद्धा
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
Answer link
अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. 'आमचा देवाधर्माला विरोध नाही, पण देवाधर्माच्या नावावर शोषण व लुबाडणूक करणाऱ्यांविरुद्ध ही प्रबोधनात्मक चळवळ आहे' ही भूमिका घेऊन झंझावती चळवळीला सुरुवात झाली. अशी भूमिका घेऊन काम करणारी या क्षेत्रातील जगातील ही पहिली चळवळ आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ!
मराठी भाषकांचे स्वतंत्र राज्य १ मे १९६० रोजी निर्माण होऊन ६० वर्षे उलटली आहेत. एक प्रगत राज्य अशी ओळख असण्याबरोबरच, पुरोगामी राज्य अशी ठाशीव ओळख निर्माण करण्यात महाराष्ट्र राज्य यशस्वी ठरले आहे. गेल्या सातशे वर्षांपासून वारकरी संप्रदायाच्या समतावादी चळवळीने ही ओळख निर्माण केली आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत चोखाबा, संत सावता माळी, संत जनाबाई ते अगदी अलीकडचे संत गाडगे महाराज आणि संत तुकडोजी महाराज, या संतांनी अथक प्रयत्नांनी वर्णवर्चस्वाचा दाह कमी करून मानवतावादी, समतावादी समाज-माणूस घडवण्याचा प्रयत्न केला. सोबतच अंधश्रद्धांची बजबजपुरी आणि धर्माचा दुरुपयोग करणाऱ्या धर्ममार्तंडांची मगरमिठी प्रबोधनातून कमी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
ब्रिटिश साम्राज्यकाळात महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर या समाजसुधारकांनी वेगळ्या मार्गाने वैचारिक प्रबोधनाद्वारे महाराष्ट्राचे पुरोगामित्व समृद्ध केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे आणि इतरही अनेक समाजसुधारकांनी यात मोलाची भर घातली. तरीही अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा, धार्मिक श्रद्धांच्या आवरणाखाली जनमानसात खोलवर रुतून बसल्या होत्या. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या (सुशिक्षित कुटुंबात असूनही) सामान्य मुलाच्या मानसक्षेत्रात बुवाबाजी, भुताखेतांपासून ते ज्योतिषापर्यंत साऱ्याच अंधश्रद्धांचा भयंकर पगडा धुमाकूळ घालत होता. इतका की दहाव्या वर्गात शिकत असताना मला भूत लागले आणि ते मांत्रिकाने उतरवले. अनेक बाबांचे चमत्कार 'याचि देही याचि डोळा' अनुभवून, त्यांच्या चरणी लीन होण्यातच धन्यता मानत राहिलो.
माझे वडील हे एकेकाळी विनोबा भावे यांचे सचिव होते. त्यामुळे लहानपणापासून विनोबांचा सहवास लाभला. त्यांच्या भूदान, ग्रामदान चळवळीचा स्पर्श झाला. पुढे जयप्रकाश नारायण यांच्या तरुण शांती सेनेत दाखल झालो. आचार्य दादा धर्माधिकारींच्या समृद्ध विचार परंपरेत घडू लागलो, तरी अंधश्रद्धा कायम होत्या. खूप वाचन असूनही वेगवेगळ्या विषयांवर भाषणे देत असूनही, प्राध्यापक होऊनही, आयुष्यात खूप विद्वान माणसेही भेटूनही; भूत, मंत्रतंत्र, भानामती, ज्योतिष, चमत्कार या अंधश्रद्धांवर खात्रीशीर बोलणारा सत्य संशोधनात्मक माहिती देणारा मात्र कुणीच भेटला नाही.
पुण्याच्या किर्लोस्कर प्रेसमध्ये (साप्ताहिक मनोहरसाठी) संपादकीय विभागात दाखल झालो. नवे वैचारिक दालन खुले झाले. डॉ. अब्राहम कोवूर यांच्या 'बिगॉन गॉडमेन', 'गॉड डेमन्स अॅण्ड स्पिरीट्स' या दोन पुस्तकांनी माझ्या मनातील अंधश्रद्धा आणि उच्च दर्जाच्या आध्यात्मिक प्रश्नांची वैज्ञानिक उत्तरे प्राप्त करून देण्यात मोलाचा वाटा उचलला. माझ्यात आमूलाग्र परिवर्तन झाले. एवढ्या विद्वानांचा सहवास लाभूनही, एवढे वैचारिक वाचन व ज्ञान प्राप्त करूनही, आपण अंधश्रद्धेच्या क्षेत्रात एवढे अज्ञानी होतो आणि त्यापायी आपण व आपल्या कुटुंबाने प्रचंड मानसिक, शारीरिक, आर्थिक नुकसान सोसले आहे, असे इतर कुणाबाबत घडू नये असे तेव्हा प्रकर्षाने वाटले.
डिसेंबर १९८२ मध्ये पत्रकाराची नोकरी सोडून पूर्णवेळ अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात झोकून दिले. अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. 'आमचा देवाधर्माला विरोध नाही, पण देवाधर्माच्या नावावर शोषण व लुबाडणूक करणाऱ्यांविरुद्ध ही प्रबोधनात्मक चळवळ आहे' ही भूमिका घेऊन झंझावती चळवळीला सुरुवात झाली. अशी भूमिका घेऊन काम करणारी या क्षेत्रातील जगातील ही पहिली चळवळ आहे. आम्ही अ. भा. अंनिसची चळवळ सुरू करण्याआधी अनेक प्रबोधनकारांनी, विद्वानांनी अंधश्रद्धांवर ताशेरे ओढले होत, हल्ले केले होते; पण धार्मिक कर्मकांडांशी संबंधित अंधश्रद्धांपर्यंतच ही मांडणी मर्यादित होती. भूत, भानामती, मंत्रतंत्र, करणी, जादूटोणा, देवी-देव संचार, बाबांचे चमत्कार, फलज्योतिष, श्रद्धा प्रक्रियेतून निर्माण होणारे संपूर्ण समर्पण व इत्यादी विषयांची शास्त्रशुद्ध व वैज्ञानिक मांडणी कुणी केली नव्हती. म्हणूनच माझ्या आयुष्यात या जगात भूत नसते, भानामती नसते, देवी-संचार खोटा आहे, असे ठामपणे व शास्त्रशुद्ध संशोधनाचा हवाला देऊन सांगणारे कुणी भेटले नव्हते.
वक्ता या नात्याने विषयाच्या खोलात शिरून समग्र मांडणी करण्याची सवय लागल्यामुळे, अंधश्रद्धासंबंधित विषयांवरील संशोधनात्मक अभ्यासाचा मागोवा घेऊ लागलो. सुरुवातीच्या टप्प्यातच चार-पाच प्रांतांत दौरे केले. अनेक विद्यापीठांत व्याख्यानांसाठी जाण्याची संधी मिळाली. मानसशास्त्र, समाजशास्त्र, वैद्यकशास्त्र वा इतर विषयात अंधश्रद्धांच्या विविध अंगामध्ये काय संशोधने झालीत, याचा शोध घेऊ लागल्यावर, आश्चर्याचे धक्के बसू लागले. भारतीय विद्यापीठात या विषयांचा शून्य अभ्यास होता. वैद्यकशास्त्रातील मानसोपचार शाखा (सायकियाट्री) ही या विषयावर उपचार करणारी एकमेव शाखा. त्या शाखेतही या क्षेत्रात काहीच काम झालेले नाही. भूत, भानामती, अंगात येणे या साऱ्या भारतीय समाजाला झपाटणाऱ्या विषयांतही काहीच संशोधन नाही, हे लक्षात आल्यावर भयानक आव्हानाची जाणीव झाली.
माझ्या आधी या क्षेत्रात काम करणाऱ्या रॅशनॅलिस्ट असोसिएशन आणि तत्सम संघटना बाबांचे चमत्कार, देव उखडून टाकणे, धर्म नाकारणे या मर्यादित मांडणीतच पिंगा घालत राहिले. थोडीबहुत मांडणी डॉ. अब्राहम कोवूरांनी पुस्तकात केली तेवढीच, पण ती फार मर्यादित होती. मला मानसशास्त्राचा सखोल अभ्यास करावा लागला. या क्षेत्रात झालेली जगभरातील संशोधने धुंडाळावी लागली. भारतासारखे अंधश्रद्धांचे विविध प्रकार जगभर आढळत नाहीत. त्यामुळे या संशोधन उपलब्धतेलाही मर्यादा होत्या. भारतात आढळणाऱ्या सगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धांचा सखोल अभ्यास करून; त्या मागच्या मानसिक कारणांचा, वैज्ञानिक नियमांचा शोध घ्यावा लागला. मी स्वतःच एकेकाळी प्रचंड अंधश्रद्ध वातावरणात वाढल्यामुळे, अनुभवल्यामुळे या गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेणे सुलभ झाले. या संशोधनात्मक अभ्यासातून आणि प्रत्यक्ष हाताळणीतून या विषयांची मांडणी निर्माण करावी लागली. समस्या हाताळणीची, भांडाफोडीची नवीन तंत्रे निर्माण करावी लागली.
भूत, भानामती, बुवाबाजी, जादूटोणा, मंत्रतंत्र, श्रद्धा प्रक्रिया, फलज्योतिष, चमत्कार भांडाफोड (चमत्कार रहस्यात रॅशनॅलिस्ट चळवळीची काही अंशी मदत झाली), स्त्रियांचे लैंगिक शोषण, या सगळ्या विषयांची सखोल मांडणी करावी लागली. काही वर्षांनंतर ही सारी मांडणी पुस्तकांमध्ये ग्रंथित करता आली. भारतातील ४-५ प्रांतातील अंधश्रद्धांचाच अभ्यास करता आला, पण त्या आधारे केलेली एवढी सखोल मानसशास्त्रीय व वैज्ञानिक मांडणी जगात कोणत्याही पुस्तकात उपलब्ध नाही. कारण या प्रकारच्या अंधश्रद्धा इतरत्र अस्तित्वात नाहीत.
अ. भा. अंनिसच्या चळवळीचे दुसरे अत्यंत यशस्वी वैशिष्ट्य (शंभर टक्के, आतापर्यंत ३८ वर्षांत एकदाही अपयश नाही) म्हणजे भांडाफोड तंत्राचा शोध. अतिशय यशस्वी, अचूक पण अहिंसक भांडाफोड तंत्र विकसित करू शकलो. कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी उत्तम, टप्याटप्याने विकसित होत जाणारा अभ्यासक्रम निर्माण करून त्यांना प्रशिक्षित करू शकलो. आम्ही आतापर्यंत अक्षरशः हजारो बुवा, मांत्रिक, देवी-देव अंगात आणणारे, ज्योतिषी यांचा भांडाफोड केला आहे. त्यांचे व्यवसाय बसवले आहेत. पण एकाही ठिकाणी मी वा माझ्या कार्यकर्त्यांनी मार खाल्ला नाही अथवा कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ दिला नाही आणि भांडाफोड केलेल्या व्यक्तीलाही त्याच्याविरुद्ध त्याचेच भक्त खवळून मारायला उठल्यावर मार पडू दिला नाही. एक लाखाचे आव्हान आणि अंगावर आल्यावर शिंगावर घेण्याची प्रवृत्ती व सातत्याने चालणारे भांडाफोड यातून चळवळीने आजूबाजूच्या मध्य प्रदेश, गोवा, गुजरात, उत्तर प्रदेश या प्रांतातही धडक मारली. महाराष्ट्राच्या कोकण ते विदर्भ कानाकोपऱ्यातही पोहोचली. त्यामुळे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते चळवळीत दाखल होऊ लागले.
प्रत्येक प्रांताचा स्वतंत्र संघटन ढाचा निर्माण करण्याचा निर्णय घेतला गेला. तो ठरवताना 'किर्लोस्कर'चे संपादक मुकुंदराव किर्लोस्कर यांनी महाराष्ट्राचे अध्यक्ष होण्याचे मान्य केले. माझे मार्गदर्शक डॉ. बाबा आढाव यांच्या सूचनेनुसार डॉ. नरेंद्र दाभोलकरांना (मी व्यक्तिशः त्यांना ओळखत नव्हतो) कार्याध्यक्ष व्हा असे सांगण्यासाठी, मी आणि डॉ. रूपा कुळकर्णी साताऱ्याला गेलो. त्यांनी होकार दिला. नागपूरला दहा दिवसांचे सक्रिय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजिले होते. त्यात सहभागी व्हा असे सुचवले.
डॉ. दाभोलकर दहापैकी पाच दिवस शिबिराला आले. १९८५-८६चा तो काळ होता. त्यावेळी त्यांना या विषयाची व्याप्ती लक्षात आली. १९८७ साली ते कार्याध्यक्ष म्हणून अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महाराष्ट्र राज्य शाखेत दाखल झाले. तोवर महाराष्ट्राच्या २६ जिल्ह्यांपैकी २१ जिल्ह्यांत सक्रियपणे काम उभे राहिले होते. मी महिन्याचे २६ दिवस दौरा करत होतो. दोन वर्षांनंतर डॉ. दाभोलकरांना स्वतंत्र काम करावेसे वाटले, तेव्हा आपण वेगळ्या नावाने काम सुरू करा, अशी विनवणी केली. १९९० साली डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती' नावानेच नवी समिती निर्माण करून कामाला सुरुवात केली. मात्र अंधश्रद्धेसारख्या महत्त्वाच्या सामाजिक क्षेत्रात वाद नको, म्हणून कालांतराने मी पूर्ण वेळ काम करण्याचे थांबवले. अर्थात सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ, प्रशिक्षण देतच राहिलो.
गेली ३८ वर्षे आम्ही काम करतो आहोत. आक्रमक पद्धतीने काम करून हजारो भांडाफोड केले. बहुदा त्याचा परिणाम म्हणूनच २००६ साली पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला; पण पुण्याच्या प्रेक्षकांनी आणि कार्यकत्यांनी भरपूर चोप देऊन हल्लेखोरांना पोलिसांच्या स्वाधीन केले. पुढे कार्यक्रम शांततेत पार पडला. महाराष्ट्रात एकाच नावाने दोन संघटना काम करू लागल्या. माझ्या संघटनेत डॉ. दाभोलकर असतानाच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याविषयी काही बैठका झाल्या. पुढे ते सरकार दरबारी त्यांच्या समितीच्यावतीने प्रयत्न करत राहिले. दोन वेगवेगळी मते जायला नकोत म्हणून मी नेहमीच शांत राहिलो. अर्थात आम्हाला घडवणाऱ्या आचार्य दादा धर्माधिकारींचे चिरंजीव न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी हे डॉ. दाभोलकरांसोबत कायदा प्रक्रियेत असल्यामुळे मी तसा निर्धास्त होतो.
२००५च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत या कायद्याला सर्वपक्षीय आमदारांनी कडाडून विरोध केला, तेव्हा पहिल्यांदा मी मसुदा वाचला. तेव्हा त्यात आमूलाग्र बदलाची गरज आहे हे लक्षात आल्यावर, मी पुढाकार घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे यांची उत्तम साथ मिळाली. शंभरपेक्षा अधिक आमदारांना विश्वासात घेऊन व सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची सक्रिय मदत घेऊन कायद्यात आमूलाग्र बदल केले. विरोधकांचाही पाठिंबा मिळवता आला व नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात २८८ आमदार असणाऱ्या विधानसभेत १६ डिसेंबर २००५ रोजी जादूटोणा विरोधी बिल संमत झाले. पुढे ते राजकारणात अडकले. आमचे सहकारी डॉ. दाभोलकर हे विलासराव देशमुख यांच्या लातूर मतदारसंघातच उपोषणाला बसले. परिणामी विलासरावांनी पुढे कायद्याकडे लक्षच दिले नाही. २०१३ साली डॉ. नरेंद्र दाभोलकरांची निर्घृण हत्या झाली. महाराष्ट्र सरकारने अधिसूचना काढायचा निर्णय जाहीर केला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे हे यावर ठाम होते. पण अनेक मंत्र्यांनी आणि सत्तारूढ पक्षातील अनेक आमदारांची अनुकूलता नव्हती. यावेळी पुन्हा सरकारच्या पाठिंब्याने शिवसेनेचे तत्कालीन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना भेटून पाठिंबा मिळवण्यात यशस्वी झालो. डिसेंबर २०१३च्या अधिवेशनात दोन्ही सभागृहात जादूटोणाविरोधी कायदा सर्वपक्षीय संमतीने संमत झाला आणि माणसाच्या सर्वांगांना स्पर्श करणारा एक क्रांतिकारी प्रभावी कायदा करण्यात पुरोगामी महाराष्ट्र राज्य यशस्वी झाले.
कायद्याच्या राबवणुकीसोबतच प्रबोधनाची नितांत गरज असल्यामुळे अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पत्रानुसार महाराष्ट्र सरकारने जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती निर्माण केली. अध्यक्ष सामाजिक न्यायमंत्री, सहअध्यक्ष श्याम मानव, इतर सदस्य अशी समिती गठीत करून जोरदार प्रबोधनाला सुरुवात झाली. जिल्हास्थळी ३५ सभा, ४०० शाळा-कॉलेजांत कार्यक्रम, ३५ जिल्ह्यांतही पोलिस अधिकारी प्रशिक्षण, वक्ता प्रशिक्षण... असा कार्यक्रम धडाक्यात पार पडला. दरम्यान सरकार बदलले. नागपूरचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. दरवर्षी दहा कोटी रुपये बजेट उपलब्ध करून देऊ, उत्तम काम करू असे त्यांनी निःसंदिग्ध आश्वासन दिले. त्यामुळे तीन वर्षे मंत्रालयात खेटे घालण्यात वेळ घालवला. पुढे जाणे थांबवले. पाच वर्षे 'जैसे थे' अशी स्थिती झाली. नवे सरकार २०१९ मध्ये आले. अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले. त्यांना भेटताच तातडीने चक्रे फिरली. मंत्रालयात बैठक झाली. जादूटोणाविरोधी कायदा प्रचार प्रसार समितीचे अध्यक्ष; सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंढे व सहअध्यक्ष श्याम मानव असे ठरले. दहा कोटी रुपयांचे बजेट उपलब्ध करून दिले. १ एप्रिल २०२०पासून कामाला सुरुवात करण्याचे ठरले.
पण मार्च महिन्यात कोव्हिड-१९चा प्रादुर्भाव, नंतर लॉकडाउन घोषित झाला आणि सारेच थांबले. थोडी परिस्थिती सामान्य झाली की या सरकारच्या काळात कामाला झपाट्याने सुरुवात होईल. जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रसार कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत, नागरिकांपर्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन पोहचवता येईल आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने जर महाराष्ट्रातल्या प्रत्येकामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची बीजे रोवण्यात आपण यशस्वी झालो, तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पुरोगामी राज्य ठरेल आणि त्याची आर्थिक व इतर आघाडीवरदेखील अधिक प्रगती होऊ शकेल. स्वतःवर, स्वकर्तृत्वावर विश्वास असणाऱ्या नागरिकांचा अभिक्रमशील महाराष्ट्र घडेल. उद्या कदाचित हा 'जादूटोणा विरोधी कायदा' साऱ्या देशाचा कायदा बनेल!
(
1
Answer link
सापेक्ष आर्द्रता ही एक टक्केवारी आहे जी दिलेल्या तापमानात हवेतील पाण्याच्या बाष्पाचे प्रमाण दर्शवते आणि त्याच तापमानावरील पाण्याच्या वाफेच्या जास्तीत जास्त संभाव्य प्रमाणाच्या तुलनेत. उदाहरणार्थ, 25 टक्के सापेक्ष आर्द्रता म्हणजे हवा तिच्या संभाव्य पाण्याच्या वाफ क्षमतेच्या एक चतुर्थांश आहे.
3
Answer link
कोकणातील एका खेड्यात नुकतीच घडलेली एक घटना, झाडे लावल्यावर आठ वर्षे उलटली तरी आंबे लागले नाहीत. म्हणून, त्या शेतकऱ्याने एक यज्ञ करून बकऱ्यांचा बळी दिला.
अशीच गाजलेली दूसरी एक घटना. गुप्त धन मिळावे म्हणून एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून स्वतःच्या पोटच्या लहान मुलीला बळी देण्याची एक खेडूत तयारी करीत असताना पोलिसांनी त्याला पकडले. अशा या घटनांनी मन उद्विग्न बनते. जग एकविसाव्या शतकात शिरलेले असताना आपल्या समाजात है असे भयानक प्रकार का घडत आहेत?
या अंधश्रद्धेने आपल्या देशाचा घात केला आहे. प्रगतीच्या मार्गात फार मोठे अडथळे निर्माण केले आहेत. आता हेच बघा ना, झाडाला आंबे का लागत नाहीत, हे शोधण्याचा प्रयत्न व्हायला हवा. या बाबतीत सध्या खूप संशोधनही झाले आहे. त्याचा उपयोग करून, खतपाणी घालून पीक सकस व जास्त कसे येईल, हे पाहिले पाहिजे. या मार्गानेच देशाची प्रगती होईल. पण तसे घडत नाही.
आजारापासून बरे व्हावे म्हणून किंवा परीक्षेत यश मिळावे म्हणून गंडेदोरे बांधणारे कमी आढळत नाहीत. गंड्यादोर्यांनी शरीरातील रोगजंतू मरत नाहीत किंवा परीक्षेतील प्रश्नांची उत्तरेही लिहिता येत नाहीत. तरीही लोक गंड्यादोर्यांच्या मागे धावतात. अशाने त्यांच्या आयुष्यातील दुःखे नष्ट होत नाहीत, संकटे दूर होत नाहीत, अडचणी संपत नाहीत.
उलट, त्यात भरच पडते. मग असे लोक नशिबाला दोष देत गप्प बसतात. म्हणजे त्यांच्या आयुष्यात प्रगती होत नाही. आपला समाज मागेच राहतो. अशी ही अंधश्रद्धा म्हणजे आपल्याला मिळालेला फार मोठा शाप आहे.
या शापातून मुक्त होण्यासाठी, अंधश्रद्धा नाहीशी करण्यासाठी आपल्याला नेटाने प्रयत्न करायला हवेत. आपले प्रयत्न यशस्वी व्हायचे असतील, तर प्रथम आपल्याला अंधश्रद्धा म्हणजे काय, हे समजून घ्यावे लागेल. अंधश्रद्धा म्हणजे काय, हे स्पष्टपणे कळले तरच ती नष्ट करणे शक्य होणार आहे. म्हणून अंधश्रद्धा म्हणजे काय, हे आधी आपण समजून घेऊ.
या जगात घडणाऱ्या घटना या विशिष्ट निसर्गनियमाने घडतात. निसर्गनियमांविरुद्ध कोणीही काहीही करू शकत नाही. उदाहरणार्थ, पाण्याला उष्णता दिली की विशिष्ट तापमानानंतर पाण्याची वाफ होते, हा निसर्गनियम आहे. हा नियम कोणीही बदलू शकत नाही, कोणत्याही जातिधर्माच्या माणसाने कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी पाण्याला उष्णता दिली तर पाण्याची वाफ होणारच, त्याचे बर्फ होणार नाही.
पाण्याला उष्णता न देता, केवळ मंत्राने पाण्याची वाफ करतो. असे एखादा म्हणाला तर ते थोतांड असते, हे नक्की! असे असतानाही एखात्याकडे ही शक्ती आहे, तो उष्णतेशिवाय पाण्याची वाफ करु शकतो. असे आपण मानू लागलो, तशी श्रद्धा बाळगली तर अंधश्रद्धा ठरेल.
मांजर आडवे गेल्याने काम होत नसेल, तर ही घटना जगभर सर्व माणसांच्या बाबतीत अशीच घडली पाहिजे. ती तशी घडत नाही. म्हणजे तो निसर्गनियम नव्हे. म्हणून ती अंधश्रद्धा ठरते.
आपण आता आपली विचारपद्धतीच बदलली पाहिजे. प्रत्येक घटनेमागील कारण आपण शोधले पाहिजे. स्वतःच्या बुद्धीला पटेल तेच स्वीकारले पाहिजे. अशी वृत्ती आपण जोपासली तरच आपल्याला प्रगती करता येईल. नाहीतर जग पुढे जाईल आणि आपण मात्र मागेच राहू.
2
Answer link
कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी
हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी
ह्या ओळींचा अर्थ आता ज्वलंत स्थिती जी आहे त्याच्या सोबत एकदम तंतोतंत जुळत आहे असे तरी मला वाटत आहे, म्हणजे बघा ना कोरोनामुळे धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती. ती धार्मिक स्थळे पुन्हा दर्शना साठी खुली करावी म्हणून काही लोक चक्क आंदोलन करण्यास तयार होती. वेळेचे गांभीर्य नसणाऱ्या आणि आंदोलनासाठी एवढे उतावीळ होणाऱ्या लोकांना एक प्रश्न विचारावासा वाटतो की त्यांनी कधी घरातील देवासमोर हात जोडले का? घरात किती देव आहेत हे सुद्धा काहींना माहीत नसते. ह्यांची देवभक्ती जागी होते ते फक्त धार्मिक स्थळी जाऊन देवांना भेटायला आणि त्याच्या सोबत फोटो काढायला.
सध्याच्या पिढीची देव भक्ती. कोरोनाचा एवढा संसर्ग असून हो लोकांना त्याचे गांभीर्य नाही.
विठुरायाची 60 फूट भव्य मूर्ती दिवे घाटात आहे.
ह्या फोटो कडे बघून देवाला ही वाटेल आपले पंढरपुरातच बरे आहे.
चतुर्थी ला दगडूशेठ गणपती जवळ किती गर्दी असते, गुरुपौर्णिमेला नारायणपूर , रविवारी जेजुरीला. त्या एकाच दिवशी देव असतो का देवळात बाकी च्या दिवशी नसतो का ?
आपल्या सर्वांना एक गोष्ट चांगलीच महिती आहे की देव फक्त भक्तीचा भुकेला आहे आणि आपण मात्र त्याला सोने, चांदी, प्रसाद काय काय देतो. ज्याने हे विश्व उभे केले त्यालाच आपण त्याच्याच वस्तू देतो म्हणजे आपल्या पेक्षा दरिद्री कोण असेल.
मला तरी एक वाटते की कोठेही घरी किंवा देवळात आणि कोणत्याही वारी मनापासून हात जोडले बस झाले.
माणसातील माणुसकी मरत चालली आहे आणि माणूस देव मात्र धार्मिक स्थळे आणि मंदिरात शोधत आहे.
झाड फुलांनी आले बहरून
तू न पाहिले डोळे उघडून
वर्षाकाळी पाऊस धारा
तुला न दिसला त्यात इशारा
काय तुला उपयोग आंधळ्या दीप सुन उशाशी ||
माणसाला 100 मधील 80 टक्के सुख आणि 20टक्के दुःख दिले ना तरी माणूस त्या सुखाकडे पाहत नाही तर दुःखा कडे पाहून अजून दुःखी होतो. जसे आंधळ्या माणसाला दिव्याचा काहीच उपयोग होत नाही तसेच डोळे असूनही ह्या सुखकडे पाहून ही न पाहिल्यासारखे करणाऱ्या मनुष्याला सुखाचा काय उपयोग .
रुद्राक्षांच्या गळ्यात माळा
लविलेस तू भस्म कपाळा
कधी न घेऊन नांगर हाती
पिकविलेस मातीतून मोती
हाय अभाग्या भगवे नेसून घर सन्यासून जाशी ||
आपला वारकरी संप्रदाय नेहमी एकाच गोष्ट सांगतो की काम सोडून फक्त माझेच नाव घ्या असे देव कधीच म्हणत नाही. दिवसभरात कधीही मनापासून देवाचे नाव काढा आणि त्याच्या नावाचा जप कारा. आपण समाधानाने देवाचे नाव घेतले तर देवालाही तेवढाच आनंद. पण लोक देव भक्ती च्या नावाखाली अंगाला भस्म लावून आपल्या जबाबदरीपासून पळू पाहतात. जर संसार बघून ही परमार्थ करता येतो तर पूर्ण घराला वेठीस का धरायचे.
देव बोलतो बालमुखातून
देव डोलतो उंच पिकातून
कधी होऊनी देव भिकारी
अन्नासाठी आर्त पुकारी
अवतीभवती असून दिसेना, शोधितोस आकाशी ||
देव जरी दिसत नसला तरी ती एक अदृश्य शक्ती आहे. आपल्या आजू बाजूला त्याचे अस्तित्व आहे. (मी आस्तिक आहे त्यामुळे मी तरी देवाचे अस्तित्व मान्य करते). पण तरीही लोक त्याला शोधतात आपल्या भाबड्या अपेक्षेप्रमाणे आपण देव म्हणाले की पाहिले आकाशाकडे पाहतो. पण आपल्याला समोरच्या माणसामध्ये मात्र कधीच देव दिसत नाही.
मी माझ्या बुद्धिप्रमाणे आणि मला समजले तसे सांगायचा प्रयत्न केला.
काही चुकले असल्यास क्षमस्व!!!
शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधिशी काशी', या भक्तीगीतामध्ये समाजातील अंधश्रद्धा कशा दाखवून दिल्या आहेत?
2
Answer link
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात काहीही फरक करता येत नाही. तर्काला मूठमाती दिल्यावर श्रद्धा जन्माला येते आणि तर्काची हत्या केल्यावर अंधश्रद्धा जन्माला येते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा तर्क, विज्ञान, बुद्धीप्रामाण्याला मानत नाहीत. त्यामुळे हे दोन्हीही एकच आहे
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील मुख्य फरक म्हणजे भक्ति असेल तर श्रद्धा आणि भीती असेल तर अंधश्रद्धा निर्माण होते.पण भक्ति कोणाची करावि हा पण गंभीर प्रश्न आहे,
जो स्वताला वाचवु शकत नाही त्याची आराधना कश्यासाठी ???
1 : उपवास म्हणजे नेमके काय . . उपाशी पोटी राहून त्या परमेश्वराचे आर्त नामस्मरण करेने
कि उपवास आहे म्हणून नुसते हे खाऊ का ते
खाऊ इकडेच लक्ष देणे . . आपणच आपल्याला
विचारून पहा उपवासाच्या दिवशी जर आपल्याला खरच भूक लागली तर आपले मन
कुठे जाते . . परमेश्वराकडे कि भुके कडे ?
बर हे ठरवले कोणी कि उपवासाच्या दिवशी अमुक अमुक खावे. . किंवा खाऊ नये ?
2 : काही लोक मांसाहार करून मंदिरात जात
नाहीत . . पण तीच लोक आपल्या घरातल्या
देवाऱ्या समोर लाज नसल्यागत मांसाहार
करतात. . जो भाव मंदिरातल्या देवा समोर
असतो तोच भाव आपल्या घरातल्या
देवाऱ्या समोर का नसतो . . ?
3 : आपण पाहतोच कि नवरात्री मध्ये बरेच भक्त
कडक उपवास करतात. .
९ दिवस सात्विक
भोजन घेतात पण तिकडे कोलकात्यामध्ये
नवरात्रीत मांसाहार करतात . . तिकडे कसा चालतो. . . ?
4 : बर्याचदा आपण काही ठिकाणी
देवदर्शना साठी तासोन तास थांबतो . . तोच
देव तुमच्या घरातल्या देवालयात सुधा
असतो . . घरातच मनोभावे हात जोडले तर तो
देव काय भेद भाव करणार आहे का? का
तासान तास रांगे मध्ये उभ राहेच. . ? का
घरातला देव वेगळा आणि तिथला देव वेगळा
आहे का?
5 : जर गो ( गाई) माते मध्ये 33 करोड देव आहेत
तर काही लोक जेव्हा तिला कापतात तेव्हा
ते 33 करोड देव कुठे गायब होतात. . ?
6 : वेषांतर करून अहिलेवर बलात्कार करणारा
इंद्र चालतो , अनुसयेचा विनयभंग करणारे
ब्रम्हा ,विष्णु ,महेश चालतात , कृष्ण लिला
च्या नावाखाली स्रियांचे कपडे
पळविणारा कान्हा चालतो . संशयावरून
सितेला अग्निपरीक्षा द्यायला सांगणारा
राम चालतो , यांच्या मानानो रावणाचा
काहीच अधर्म दिसत नाही. रावणच काय
संपुर्ण असुरांनी चोरी ,बलात्कार
,व्याभिचार कपट केल्याचे उदाहरण वेदात
,पुराणात , सर्व महाकाव्यात , आढळत नाही.
पण देवांनी वरील सर्व अनैतिक मार्गाचा
अवलंब केला आहे . ज्या - ज्या देवांनी हा
गुन्हा केला आहे . त्यांचे दहनं का करीत
नाहीत . . ?
7 : 33 करोड देवानमध्ये देव्या किती आणि देव किती आहेत . . ?
8 : बर्याचदा काही भाविकांचा देव
दर्शनाला जाताना अपघात होतो तो
का. . ? ते तर त्याच्या दर्शनाला चालेले
असतात मंग तो त्यांच्याशी असा
दुष्मनासारखे का वागतो . . ?
9 : जेव्हा काही लोकांनी आपली देवळे
तोडली देवमूर्त्या भग्न केल्या तेव्हा
सर्वशक्तीमान भगवंताने स्वताचा बचाव का केला नाही. . ?
10 : वानरसेनेने बनवलेला राम सेतू आज का
तरंगत नाही ?
एवढे सांगण्याचा उद्देश हाच की. . कोणी
काही हि सांगतो म्हणून आपण विशास ठेवत
आलोय . . पण आता आपण खोलात जाउन
विचार करायचा . . चिकित्सा करायची . .
पूर्ण विचार करूनच निर्णय घ्यायचा .
कारण
" कसलाही विचार न करता . . डोळे मिटून
कोणावर तरी किंवा कशावर तरी . .
जो विश्वास ठेवला जातो . .
त्याला * अंधश्रद्धा * असे म्हणतात . "