घरातून काम

गाई घरा आल्या या पाठातील लेखकांचा गुरे राखण्याचा अनुभव?

1 उत्तर
1 answers

गाई घरा आल्या या पाठातील लेखकांचा गुरे राखण्याचा अनुभव?

2

कविवर्य वासुदेव गोविंद ऊर्फ वा. गो. मायदेव (जन्म - जन्म २६ जुलै १८९४) हे रविकिरण मंडळातील कवींचे म्हणजे, माधवराव पटवर्धन ऊर्फ माधव ज्यूलियन, यशवंत, गिरीश, श्री. बा. रानडे आदींचे समकालीन कवी. गंभीर विचारवृत्तीच्या; तसेच बालांसाठीच्या विपुल कविता मायदेव यांनी लिहिल्या. त्या काळी लहान मुलांमध्ये मायदेव यांच्या बालकविता विशेष आवडीच्या असत.

कवी वनमाळी या टोपणनावानेही ते साहित्यक्षेत्रात परिचित होते.
'काव्यमकरंद', 'भावतरंग', 'भावनिर्झर', 'सुधा', 'भावविहार' हे त्यांचे काव्यसंग्रह; तर 'बालविहार', 'किलबिल', 'शिशुगीत', 'क्रीडागीत' हे बालगीतसंग्रह प्रसिद्ध आहेत.

आय़ुष्याची अखेर वगळता मायदेव यांचे बहुतांश आयुष्य पुण्यात गेले. फर्गसन महाविद्यालयात शिक्षण झाल्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या हिंगण्यातील स्त्री-शिक्षण संस्थेत ते नोकरीसाठी रुजू झाले. या संस्थेचे ते आजीव सभासद होते. येथेच त्यांनी दीर्घ काळ शिकविले. मायदेव यांनी त्या काळी प्रेमविवाह केला होता. मात्र, त्यांचा संसार शेवटी शेवटी मनस्तापदायक झाल्याचे म्हटले जाते.

मायदेव यांच्यावर एक सावत्र भाऊ व चार सावत्र बहिणी अशी पाच भावंडांची जबाबदारी होती. या भावंडांचा शैक्षणिक खर्च, त्यांच्या विवाहांचा खर्च मायदेव यांना करावा लागला होता. प्रापंचिक खर्चात कपात करून या खर्चाला त्यांनी प्राधान्य दिले होते. या कारणामुळे त्यांच्या संसारात कुरबुरी होत असल्याचेही म्हटले जाते.  

मायदेव म्हटले की, कवितांची आवड असणाऱया जु्न्या पिढीतील वाचकांना हटकून आठवणार ती त्यांची 'गाइ घरा आल्या' ही सुंदर कविता. सकाळी चरायला गेलेल्या गाई संध्याकाळी घरी आल्या तरी गाई राखायला गेलेला 'वनमाळी' मात्र काही घरी आलेला नसतो. कातरवेळ उलटते, रात्रही होते, तरी वनमाळी न आल्यामुळे आईच्या जिवाची जी उलघाल होते, तिचे वर्णन मायदेव यांनी या कवितेत अतिशय साध्या-सोप्या शब्दांत केले आहे. ही कविता हीच मायदेव यांची ओळख होती. १९२९ साली त्यांनी ती लिहिली. १९१५ ते १९२९ या कालखंडात त्यांच्या हातून ज्या कविता लिहून झाल्या, त्या सर्व कविता 'भावतरंग' या संग्रहात वाचायला मिळतात. 'गाइ घरा आल्या' ही कविता याच संग्रहात आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भा. रा. तांबे यांच्या कवितांचेही संपादन मायदेव यांनी केले होते.  

ना. दा. ठाकरसी विद्यापीठासाठी लाखो रुपयांच्या देणग्या मायदेव यांनी मिळवून दिल्या होत्या. भौतिक लाभाची कोणतीच अपेक्षा न बाळगणारी जी एक पिढी स्वातंत्र्यपूर्व काळात होती, त्या पिढीच्या प्रतिनिधींपैकीच मायदेव हे एक होते.  

मायदेव यांचे बहुतांश आयुष्य पुण्यात गेले. सुरवातीला हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेच्या आवारातील दोन खोल्यांत त्यांचे वास्तव्य होते. नंतरचा त्यांचा काळ डेक्कन जिमखान्यावरील त्यांच्या बंगल्यात गेला. आयु्ष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांना पुण्याहून मुंबईला स्थलांतर करावे लागले. गिरगावातील चाळीत एका छोट्याशा खोलीत ते राहत, खानावळीत जेवत व महिन्याचा खर्च ४०-५० रुपयांत भागवत असत ! अशा विपन्नावस्थेतच ३० मार्च १९६९ रोजी त्यांची अखेर झाली.

* * *

मायदेव यांची कविता

.............................
गाइ घरा आल्या
.............................
गाइ घरा आल्या । घणघण घंटानाद
कुणीकडे घालू साद । गोविंदा रे? ।। १ ।।
गाइ घरा आल्या । धूळ झाली चहूंकडे
घनश्याम कोणीकडे । माझा गेला? ।। २।।
गाइ घरा आल्या । वासरे हंबरती ।।
कुणीकडे बालमूर्ती । कृष्ण माझा? ।।३।।
गाइ घरा आल्या । ब्रह्मानंद वासरांना
काय करू माझा कान्हा । चुकला का? ।।४।।
गाइ घरा आल्या । घोटाळती पाडसांशी
हाय! नाही हृषीकेशी । माझ्यापाशी ।।५।।
गाइ घरा आल्या । पाडसास हुंगीतात
माझा मात्र यदुनाथ । दुरावला! ।।६।।
गाइ घरा आल्या । आंवरेना मुळी पान्हा
राहणार भुका तान्हा । वासुदेव ।।७।।
गाइ घरा आल्या । दूध वाहे झुरूझुरू
माझ्या जीवा हुरूहूरू । मुकुंदाची ।।८।।
गाइ घरा आल्या । दूधवाट राहियेली
कुणी माझा वनमाळी । गुंतवीला ।।९।।
गाइ घरा आल्या । झाली बाई कातरवेळ
आजुनी का घननीळ । ये ना घरा? ।।१०।।
गाइ घरा आल्या । लावियेली सांजवात
बाळा दामोदरा रात । झाली न का? ।।११।।
गाइ घरा आल्या । पाल चूकचूक करी ।
राख अंबे माझा हरी । असे तेथे ।।१२।।

* * *


गायी घरा आल्या, देव मावळला
बाळ नाही आला कैसा, अंगाई अंगाई

गाईच्या पान्ह्यासाठी वासरे हंबरती
खेळून बाळ येती तिन्हीसांजा, अंगाई अंगाई

तिन्हीसांजा झाल्या, दिवे लागले घरात
गायी चाटती गोठ्यांत वासरांना, अंगाई अंगाई

बाहेर अंधार पसरे काळाकुट 
बाळा झोप नीट पाळण्यात, अंगाई अंगाई
उत्तर लिहिले · 14/12/2021
कर्म · 121725

Related Questions

महाराष्ट्रातील एखाद्या गावातील धाब्यांच्या घरांविषयी क्षेत्रभेटीद्वारे अधिक माहिती घ्या. 1) प्रस्तावना 2) उद्दिष्टे 3) विषयांची मांडणी 4) सर्जनशीलता 5) निष्कर्ष?
पहाटेचे घराबाहेर पडताना आलेला अनुभव कोणता?
घराची कागदपत्रे आईच्या नावावर कसे करायचे,वडिलांच्या नाव काढून करता येईल का?
जमिनीचा आणि घराचा '8 अ उतारा' वेगळा असतो का?
माझी घराची जागा रुंदी 30 फूट आहेत मला चुलते आहेत त्यांनी त्यांच्या 15 फूट जागेत घर बांधले आहे आता राहिलेली 15 फूट माझी स्वतःची आहे तर चुलते म्हणत्यात तुझ्या जागेतली 2 फुटाची वाट ठेव ये जा करण्यासाठी तर मी ठेवावी का नको?
मोबाईल वरून घरबसल्या पैसे कसे कमावयचे?
कॉम्प्युटरवरून घर बसले पैसे कसे कमवायचे?