वैद्यकीयशास्त्र आजार

अटॅक कशामुळे येतो?

3 उत्तरे
3 answers

अटॅक कशामुळे येतो?

2
हार्ट अटॅक का व कशामुळे येतो..? कोरोनरी धमनीद्वारे हृद्यास रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो. जेंव्हा हृदयाला पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये काही कारणांनी अडथळा निर्माण होऊन हृदयाचा रक्तपुरवठा खंडीत होतो व त्यामुळे हृदयाचे स्नायू (Heart Muscles) निकामी होतात तेंव्हा हार्ट अटॅक म्हणजेच हृद्यविकाराचा झटका येतो.

Heart Attack : हृदयविकाराचा झटका म्हणजे काय? कशामुळे येतो हृदयविकाराचा झटका?
छातीच्या मध्यभागी किंवा तुमच्या हातांमध्ये, कमरेच्या वरती, जबडा, मान किंवा ओटीपोटात 5 मिनिटांपेक्षा जास्त काळ दुखत असल्यास, अस्वस्थ वाटणे, थकवा किंवा चक्कर येणे ही लक्षणे हृदयविकाराचा संकेत असू शकतात.


Heart Attack : हृदयविकाराचा झटका म्हणजे काय? कशामुळे येतो हृदयविकाराचा झटका?
heart attack
 व्यक्तीचा अशा हार्ट अटॅकने मृत्यू कसा होऊ शकतो असा प्रश्न सर्वांना पडला. कारण सिद्धार्थ फक्त 40 वर्षांचा होता. तो दररोज जिममध्ये भरपूर व्यायाम करायचा. त्याची गणना चित्रपट जगतातील फीट अँड फाईन व्यक्तींमध्ये होत होती. खरंतर हृदयविकाराच्या झटका ही गोष्ट अनेकदा होत असते, परंतू काही वेळा हा झटका इतका धोकादायक असतो की उपचाराआधीच एका क्षणात मृत्यू होतो.


पण हृदयविकाराचा झटका का येतो?


हृदय हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. हा एक स्नायू आहे जो पंप म्हणून काम करतो. आपल्या हृदयाचा आकार हाताच्या मुठीच्या बरोबरीचा आहे. ह्रदय छातीच्या डाव्या बाजूला आणि दोन फुफ्फुसांच्या दरम्यान स्थित आहे. ते सतत आकुंचन आणि प्रसरण होत असतं. आकुंचन आणि प्रसरण करण्याच्या क्रियेमुळे, आपल्या शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये सतत रक्ताचा प्रवाह असतो.

हृदय किती काळ व्यवस्थित काम करते?

हृदय स्वतः एक स्नायू आहे, म्हणून त्याचे कार्य करण्यासाठी त्याला रक्ताची आवश्यकता असते. हृदयाला रक्त देणाऱ्या रक्तवाहिन्यांना कोरोनरी धमन्या म्हणतात. या धमन्या हृदयासाठी खूप महत्वाच्या आहेत. जोपर्यंत या धमन्या हृदयाला आवश्यक रक्त पाठवत राहतात आणि त्याला ऑक्सिजन मिळत राहतो, तोपर्यंत ह्रदय व्यवस्थित काम करत राहतो. जेव्हा रक्त आणि ऑक्सिजन योग्य प्रकारे हृदयापर्यंत पोहोचत नाही, तेव्हा त्याचा हृदयाच्या कार्यावर परिणाम होतो. ते निष्क्रीय देखील होऊ शकते. सहसा, हृदयविकाराचा झटका आल्यास छातीत असह्य वेदना होतात.

हृदयविकाराचा झटका का येतो?

आता प्रश्न हा उद्भवतो की हृदयविकाराचा झटका का येतो. म्हणजेच हार्ट अटॅक का येतो? हृदयविकाराचा झटका म्हणजे रक्ताच्या अभावामुळे काही भाग नष्ट होण्याची प्रक्रिया घडते. त्याची अनेक कारणं असू शकतात. जर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये वंगण कमी झालं, तर रक्त हृदयापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकत नाही. या अडथळ्यामुळे हृदयामध्ये रक्ताची कमतरता होऊन वेदना सुरू होतात. याला एनजाईना पेक्टोरिस म्हणतात. कधीकधी या सर्व परिस्थिती ऑक्सिजनमध्ये देखील अडथळा निर्माण होतो. जर हृदयाच्या आत रक्ताभिसरण थांबले तर तो भाग निष्क्रिय होतो. जर शरीर हा भाग पुन्हा सक्रिय करु शकत नसेल तर अशा स्थितीला हृदयविकाराचा झटका म्हणतात.

हार्ट अटॅक अधिक धोकादायक का?

धमनीमध्ये जास्त प्लेक जमा झाल्यानंतर, जर पीडिताने धावण्याचे काम केले तर त्याचे गंभीर परिणाम होतात. शरीराला अधिक ऊर्जा देण्यासाठी हृदय खूप वेगाने धडधडायला लागते. परंतु या काळात अरुंद धमनीमध्ये लाल रक्तपेशी जमा होऊ लागतात आणि रक्ताचा प्रवाह थांबतो.

बंदिस्त धमनी हृदयाला पुरेसे रक्त आणि ऑक्सिजन पुरवत नाही. तेव्हाच आपलं हृदय ऑक्सिजनची मागणी करायला लागतं. हृदयाचे ठोके जलद होतात. श्वासोच्छवासाचे प्रचंड वेगाने होतो. ऑक्सिजनसाठी हतबल असलेले हृदय मेंदूला आपत्कालीन संकेत पाठवतं. दुसरीकडे, घाम येणे, मळमळ असे प्रकार सुरु होतात. असे झाल्यास, विलंब न करता त्वरित रुग्णालयात जावं. हृदयविकाराची अनेक लक्षणे आहेत. तुम्हाला हृदयात वेदना जाणवेल. डाव्या हाताला वेदना होईल आणि ही वेदना अगदी असह्य आहे.

हृदयविकाराची लक्षणे काय आहेत?

जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा काही विशेष लक्षणे दिसू लागतात. सर्वप्रथम हृदयात वेदना जाणवते. डाव्या हाताला वेदना होतात. या वेदना असह्य असतात. डावा हात सुन्न होऊ लागतो. श्वास घेण्यास त्रास होतो. नाडी वेगाने हलू लागते. अस्वस्थता जाणवू लागल्याने जीव गुदमरतो.

खूप धूम्रपान आणि फॅटी खाण्याचे परिणाम

सामान्यतः हृदय अतिशय निरोगी आणि मजबूत पेशींनी बनलेले असतं. पण आळशी जीवनशैली, चरबीयुक्त अन्न खाणं आणि खूप धूम्रपान करणं, त्याचप्रमाणे अनुवंशिक कारणांमुळे हृदयाचं आरोग्य बिघडू लागते.

तपासणी कधी करावी?

35 वर्षांपेक्षा जास्त वयाचा किंवा उच्च कोलेस्टेरॉल, बीपी, मधुमेह, लठ्ठपणा किंवा हृदयाशी संबंधित समस्यांचा कौटुंबिक इतिहास असलेल्या अशा व्यक्तीने नियमितपणे हृदय तपासणी केली पाहिजे. लक्षणं दिसण्यापूर्वी 2 डी इको आणि टीएमटी यासारख्या चाचण्या हृदयाच्या अडथळ्याचे निदान करण्यात मदत करतात. 35 वर्षांपेक्षा जास्त वयाचा किंवा उच्च कोलेस्टेरॉल, बीपी, मधुमेह, लठ्ठपणा किंवा हृदयाशी संबंधित समस्यांचा कौटुंबिक इतिहास असलेल्या अशा व्यक्तीने नियमितपणे हृदय तपासणी केली पाहिजे. जर एखाद्याला छातीत दुखणे, श्वास लागणे, थकवा, अनियमित किंवा हृदयाचे ठोके इत्यादी लक्षणे असतील तर त्यांनी त्वरित हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

प्रत्येकवेळी छातीत दुखणे हे हृदयविकाराचे लक्षण आहे का?

दरवेळी छातीत दुखणं हे हृदयविकाराचे लक्षण नाही. जर तुम्हाला तुमच्या छातीच्या मध्यभागी किंवा तुमच्या हातांमध्ये, कमरेच्या वरती, जबडा, मान किंवा ओटीपोटात 5 मिनिटांपेक्षा जास्त काळ दुखत असल्यास, श्वासोच्छवासासह, शरीर थंड पडतंय असं वाटणं शिवाय घाम येणं, अस्वस्थ वाटणे, थकवा किंवा चक्कर येणे ही लक्षणे हृदयविकाराचा संकेत असू शकतात. तथापि, जर छातीत दुखणे क्षणिक असेल किंवा सुईच्या टोचण्यासारखे असेल तर ते इतर कारणांमुळे देखील होऊ शकते. छातीत दुखत असेल तर नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


उत्तर लिहिले · 4/12/2021
कर्म · 121765
1
हार्ट अटॅक का व कशामुळे येतो ?

 कोरोनरी धमनीद्वारे हृद्यास रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो. 
जेंव्हा हृदयाला पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये काही कारणांनी अडथळा निर्माण होऊन हृदयाचा रक्तपुरवठा खंडित होतो व त्यामुळे हृदयाचे स्नायू (Heart Muscles) निकामी होतात तेंव्हा हार्ट अटॅक म्हणजेच हृदयविकाराचा झटका येतो.
उत्तर लिहिले · 4/12/2021
कर्म · 25830
0

हृदयविकाराचा झटका (Heart attack) अनेक कारणांमुळे येऊ शकतो, त्यापैकी काही मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • धमन्यांमध्ये चरबी साठणे (Plaque buildup): धमन्यांमध्ये चरबीयुक्त पदार्थ साठल्यामुळे त्या अरुंद होतात. या स्थितीला Atherosclerosis म्हणतात. यामुळे हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो. Mayo Clinic Link
  • रक्त गोठणे (Blood clot): चरबी साठल्यामुळे धमनीमध्ये रक्त गोठू शकते, ज्यामुळे रक्तप्रवाह पूर्णपणे थांबतो आणि हृदयविकाराचा झटका येतो.
  • धमनी फाटणे (Artery rupture): कधीकधी, रक्तवाहिनीच्या भिंती फाटल्यामुळे रಕ್ತ गोठून रक्त प्रवाह थांबतो आणि अटॅक येतो.
  • उच्च रक्तदाब (High blood pressure): उच्च रक्तदाबामुळे धमन्यांवर अतिरिक्त ताण येतो, ज्यामुळे त्या कमकुवत होतात आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
  • उच्च कोलेस्ट्रॉल (High cholesterol): उच्च कोलेस्ट्रॉलमुळे धमन्यांमध्ये चरबी जमा होते, ज्यामुळे त्या अरुंद होतात.
  • धूम्रपान (Smoking): धूम्रपान रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवते आणि रक्त गोठण्याची शक्यता वाढवते.
  • मधुमेह (Diabetes): मधुमेहामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
  • स्थूलपणा (Obesity): जास्त वजन आणि स्थूलपणामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
  • अनुवांशिकता (Genetics): जर कुटुंबात कोणाला हृदयविकाराचा इतिहास असेल, तर तुम्हाला हृदयविकाराचा धोका जास्त असतो.
  • तणाव (Stress): जास्त तणावामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

हे काही मुख्य घटक आहेत जे हृदयविकाराच्या झटक्यास कारणीभूत ठरू शकतात.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 840

Related Questions

लिव्हरसाठी पैसे देणारी संस्था कोणती आहे?
खेडेगावात जन्म-मृत्यूची नोंद कोण ठेवतो एक्झिट बनाने का?
विद्यार्थी वैयक्तिक माहिती व वैद्यकीय तपासणी?
एंजोप्लाॅस्टी म्हणजे काय?
अंगावरून पांढरे जाणे म्हणजे काय?
चिकित्सा म्हणजे काय?
रक्तगटाचा शोध कोणी लावला?