1 उत्तर
1
answers
एंजोप्लाॅस्टी म्हणजे काय?
3
Answer link
हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये जर कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण झाले, तर हृदयविकाराचा झटका येतो. तो अडथळा दूर करण्यासाठी ॲंजिओप्लास्टी केली जाते.याची पुर्व तपासणी ॲंजिओग्राफी द्वारे केली जाते
l
अँजिओप्लास्टी म्हणजे काय?
अँजिओप्लास्टी ही एक शस्त्रक्रिया आहे. ज्यात हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणार्या रक्तवाहिन्या उघडल्या जातात. वैद्यकीय भाषेत या रक्तवाहिन्यांना ‘कोरोनरी आर्टरीज’ म्हणतात. हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकसारख्या समस्यांनंतर डॉक्टर बर्याचदा अँजिओप्लास्टीचा अवलंब करतात.
दीड ते दोन तासांत उपचार आवश्यक
या प्रक्रियेस ‘परक्युटेनिअस ट्रान्स्लुमिनल कोरोनरी अँजिओप्लास्टी’ देखील म्हणतात. बर्याच प्रकरणांनमध्ये डॉक्टर अँजिओप्लास्टीनंतर रक्तवाहिन्यांमध्ये ‘कोरोनरी आर्टरी स्टेंट’ देखील बसवतात. हे स्टेंट रक्तवाहिन्यांमधील रक्त प्रवाह पुन्हा सुरळीत करण्याचे कार्य करतात. हृदयविकाराच्या झटक्यानंतर रुग्णावर एक ते दोन तासांत अँजिओप्लास्टी होणे आवश्यक आहे.
हेल्थलाईनच्या अहवालानुसार, एका तासाच्या आत रुग्णावर अँजिओप्लास्टी केल्याने, मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो. हे उपचार जितके लवकर केले जातील, तितका हार्ट फेल्युअरचा धोका कमी होते. अँजिओप्लास्टीचे तीन प्रकार आहेत. बलून अँजिओप्लास्टी, लेसर अँजिओप्लास्टी आणि एथेरॅक्टॉमी अँजिओप्लास्टी.
बलून अँजिओप्लास्टी
बलून अँजिओप्लास्टी दरम्यान, हात किंवा मांडीजवळ एक छोटीशी चीर करून, कॅथेटर नावाची पातळ नळी ब्लॉक केलेल्या धमनीमध्ये घातली जाते. एक्स-रे किंवा व्हिडीओच्या मदतीने डॉक्टर आत जाणाऱ्या नळ्यांचे निरीक्षण करतात. ब्लॉक झालेल्या धमनीपर्यंत पोहोचल्यानंतर कॅथेटर फुगवला जातो. हा फुगा ब्लॉकेज हटवून, धमनी रूंद करतो आणि रक्त प्रवाह सुरळीत करतो.
लेझर आणि एथेरॅक्टॉमी अँजिओप्लास्टी
लेसर अँजिओप्लास्टीमध्ये देखील कॅथेटर वापरला जातो. परंतु, त्यात बलूनऐवजी लेसरचा वापर केला जातो. यामध्ये लेसरला ब्लॉकेजपर्यंत नेले जाते आणि नंतर ब्लॉक धमनी बाष्पीकरणाने मोकळी करण्याचा प्रयत्न केला जातो. जेव्हा बलून किंवा लेसर अँजिओप्लास्टीद्वारे कोणतेही हार्ड ब्लॉकेज काढला जाऊ शकत नाही, तेव्हा एथेरेक्टॉमी शास्त्रक्रिया वापरली जाते.
अँजिओप्लास्टीचे फायदे
सोसायटी फॉर कार्डियोव्हास्क्यूलर अँजियोग्राफी अँड इंटरव्हेंशनच्या अहवालानुसार, अँजिओप्लास्टीद्वारे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवला जाऊ शकतो. ब्लॉक रक्तवाहिन्यांमध्ये रक्त प्रवाह परत सुरळीत करण्याचा हा सर्वात वेगवान मार्ग आहे. अँजिओप्लास्टी जितक्या लवकर होते, हृदयाच्या स्नायूला तितकेच कमी नुकसान होते. हृदयविकाराच्या झटक्याने श्वास लागणे किंवा छातीत दुखणे या समस्यांतून देखील आराम मिळतो. यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता आणि हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो (
अँजिओप्लास्टीचे तोटे
प्रत्येक वैद्यकीय प्रक्रियेमध्ये काही धोका असतो. अँजिओप्लास्टीमध्ये वापरले जाणारे एनेस्थेटिक, डाय किंवा इतर काही पदार्थांपासून रुग्णाला अॅलर्जी असू शकते. याव्यतिरिक्त, ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्यांमधे रक्तस्त्राव, गाठ किंवा जखम होण्याची समस्या देखील उद्भवू शकते. तर, शस्त्रक्रियेनंतर हृदयाचा ठोका अनियमित होण्याचा धोका देखील असतो.
यामुळे रक्तवाहिन्या, हार्ट व्हॉल्व्हचे नुकसान देखील होऊ शकते. हृदयविकाराचा धोका कमी होण्याऐवजी वाढू शकतो. तसेच या प्रक्रियेमुळे मूत्रपिंड देखील खराब होऊ शकते. विशेषत: ज्या लोकांना आधीच मूत्रपिंडाचा आजार आहे, अशा लोकांच्या बाबतीत अधिक काळजी घेतली पाहिजे. शरीरात संसर्ग होण्याचा धोका देखील असतो.
अँजिओप्लास्टीनंतर आरोग्याकडे दुर्लक्ष करणे टाळा
अँजिओप्लास्टी यशस्वी झाल्यानंतर डॉक्टर रुग्णाला पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेण्याचा सल्ला देतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घेतली गेली पाहिजेत. जर तुम्हाला धूम्रपान करण्याचे व्यसन असेल तर, ते पूर्णपणे सोडले पाहिजे. चांगला आणि संतुलित आहार घेतला पाहिजे. रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी नियमितपणे व्यायाम केला पाहिजे.
(