3 उत्तरे
3
answers
चिकित्सा म्हणजे काय?
3
Answer link
चिकित्सा म्हणजे थेरपी किंवा वैद्यकीय उपचार म्हणजे आरोग्याच्या समस्येचा प्रयत्न करण्याचा उपाय म्हणजे सामान्यत: वैद्यकीय निदानानंतर. नियमानुसार, प्रत्येक थेरपीचे संकेत आणि contraindication असतात. थेरपीचे बरेच प्रकार आहेत. सर्व उपचार प्रभावी नाहीत. बरेच थेरपी अवांछित प्रतिकूल परिणाम देऊ शकतात.
रोग झाल्यावर त्याच्या उपचाराच्या पद्धतीला चिकित्सापद्धती म्हणतात. आधुनिक काळात,जीवनात गुंतागुंत इतकी वाढत आहे की मनुष्य दिवसेंदिवस वेगवेगळ्या शारीरिक व मानसिक रोगांना बळी पडत आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या चिकित्सापद्धती पण समोर येत आहेत. कधी कधी, एका रोगावर दिलेले औषध हे दुसऱ्या रोगाचे कारण बनत आहे. जगात सध्या अस्तित्वात असलेल्या अनेक चिकित्सा पद्धती आहेत. त्यात वेगवेगळे असे त्यांचे गुण-दोष आहेत.कोणाला कोणती एक पद्धत आवडते तर कोणाला दुसरी. रोग्याला रोगापासून आराम हवा असतो. तो मिळावयास हवा.चिकित्सा पद्धती कोणतीही असो. शक्य तोवर रोगी त्याचे आर्थिक कुवती प्रमाणे चिकित्सापद्धती स्विकारतो असा अनुभव आहे. त्यातही, 'विश्वासः फलदायकः'(Faith is fruitful)विश्वास ठेवणे फलदायी असते. ज्या चिकित्सापद्धतीवर वा चिकित्सकावर रोग्याचा विश्वास नाही, ती चिकित्सा लागू पडत नाही. त्यामुळेच आता बहुतेक रुग्णालयामध्ये ' KEEP FAITH ON YOUR DOCTOR ' असे फलक लागलेले आढळतात. जुन्या काळी ही संकल्पना होती ती पुन्हा रुढ होऊ पहात आहे.याचे जास्त फायदे आहेत. जगात सुमारे १२२ चिकित्सापद्धती असतील असा अंदाज आहे.
0
Answer link
चिकित्सा म्हणजे रोग, जखम किंवा इतर आरोग्य समस्यांचे निदान, उपचार आणि प्रतिबंध करण्याची कला आणि विज्ञान आहे.
चिकित्सेमध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो:
- रोग आणि आरोग्य समस्यांचे निदान करणे.
- औषधे, शस्त्रक्रिया, किंवा इतर उपचारांनी रोगांवर उपचार करणे.
- लसीकरण आणि आरोग्य शिक्षण यांसारख्या उपायांनी रोगांना प्रतिबंध करणे.
- रुग्णांना शारीरिक, मानसिक आणि भावनिक आधार देणे.
चिकित्सा हे एक विस्तृत क्षेत्र आहे ज्यामध्ये अनेकspecialties आणि subspecialties आहेत. काही सामान्यspecialtiesमध्ये सामान्य चिकित्सा, बालरोग चिकित्सा, स्त्रीरोग चिकित्सा आणि शल्य चिकित्सा यांचा समावेश होतो.
चांगल्या आरोग्यासाठी नियमित वैद्यकीय तपासणी करणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.